Monday 30 August 2021

'शिवशंभु' दूध संघाच्या पाठीशी राज्य शासन ठाम.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई. शिवशंभू दूध संघाचा शीतकरण यंत्रणा शुभारंभ ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते संपन्न.

                        


               

दौलतनगर दि.30(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- दूध शीतकरण यंत्रणा शुभारंभ कार्यक्रमात मंत्री शंभुराज देसाई यांची ग्वाही पाटण तालुक्यातील 'शिवशंभु' दूध उत्पादक प्रक्रिया संघाने चिलिंग क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊल टाकले असून या संघाने जास्तीत जास्त दूध संकलन करून आणखी मोठ्या क्षमतेचा प्रकल्प उभा करावा त्यासाठी राज्य शासन 'शिवशंभू' संघाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे अर्थ आणि गृहराज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांनी केले.

         ते दौलतनगर ता पाटण येथे शिवशंभु सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या दूध शीतकरण यंत्रणा कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी युवा नेते यशराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलिंद पाटील,संचालक चंद्रकांत पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,सीमा मोरे,बशीर खोंदू, मा.पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,संजय गांधी निराधार योजना समिती मा.अध्यक्ष भरत साळूंखे, सदानंद साळूंखे,रणजित शिंदे,सोमनाथ खामकर,गजानन जाधव, नामदेवराव साळूंखे, सुरेश जाधव,बबनराव माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

             ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, १९९८/९९ साली शिवशंभु सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया या संघाची स्थापना झाली मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आणि चिलिंग प्लॅन्ट नसल्यामुळे  या संघाचे दूध संकलन गरजेपेक्षा जास्त वाढले गेले नाही मात्र तरीही तालुक्यातील इतर दूध संघाच्या तुलनेत बरोबरीत दर आणि बोनस देऊन दूध उत्पादकांच्या विश्वासास पात्र ठरला आहे ही कौतुकाची बाब आहे.मात्र  स्पर्धेच्या युगात कोणत्याही क्षेत्रात धाडस आणि स्पर्धा केल्याशिवाय यश मिळत नाही त्याप्रमाणे शिवशंभु दूध संघाने  चिलिंग प्लॅन्ट सारख्या क्षेत्रात महत्वाचे पाऊल टाकले आहे त्यासाठी आता तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हा संघ आपला आहे असे समजून या संघाला जास्तीत जास्त दूध घालून आपली नैतिक जबाबदरी यशस्वी पणे पार पाडावी असे स्पष्ट करून मंत्री देसाई म्हणाले या संघाला सध्या तालुक्यातील ठराविक गावांतूनच केवळ साडे ५हजार दूध संकलन सुरू होते ते आता संपूर्ण तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात संकलन करून पंधरा हजार लिटर क्षमता वाढवावी,बाहेर जाणारे दूध थांबवावे,प्रत्येकाने स्वतःला झोकून आपला संघ आपली जबाबदारी म्हणून काम करावे  असे झाल्यास  तातडीने ३० हजार लिटर क्षमतेचा  प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल असा विश्वास मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

चौकट :मंत्री देसाई यांच्या स्वप्नातला दूध संघ निर्माण करणार :यशराज देसाई

                युवा नेते यशराज देसाई म्हणाले पाटण तालुक्यात दररोज सुमारे ७० हजार दुधाचे उत्पन्न असून  शिवशंभु संघाकडे दूध थंड करण्याची यंत्रणा नसल्यामुळे केवळ साडे आठ टक्के इतकेच दुधाचे संकलन होत होते  मात्र आता शिवशंभु संघात  दूध शीतकरण यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे शिवशंभु  संघाचे दूध संकलन वाढविण्यात कोणतीही अडचण नाही त्यामुळे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आता दूध संकलन वाढण्यासाठी प्रयत्न  करून ही  संस्था पूर्ण क्षमतेने चालवून मंत्री शंभुराज देसाई यांच्या स्वप्नातला दूध संघ निर्माण करून दुग्धउत्पादन क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला तसेच या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात रोजगाराची ही मोठी संधी निर्माण होणार आहे शिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी या संस्थेच्या माध्यमातून पशु खाद्य,आणि पशुवैद्यकीय सुविधा ही पुरवल्या जाणार असल्याची माहिती यशराज देसाई यांनी यावेळी दिली.

चौकट: यशराज ला साथ द्या..!

                यशराज देसाई सारख हुशार नेतृत्व या कारखान्याला आणि दूध संघाला लाभले आहे.उच्चशिक्षित दादांचे खऱ्या अर्थाने परदेशात शिकण्याचे स्वप्न होते मात्र मतदार संघाच्या हितासाठी आम्ही कुटुंबाने यशराज यांच्या इच्छेविरुद्ध केवळ मतदार संघाच्या हितासाठी त्यांना कारखान्याची पहिली जबाबदारी दिली.मात्र यशराज ने ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे त्यांचे आपणाला मनस्वी समाधान आणि एक आधार मिळत असून आता दूध संघाची जबाबदारी ते तेवढ्याच जिद्दीने आणि प्रयत्नातून यशस्वीपणे पार पाडतील असा मला विश्वास आहे मात्र यशराज यांच्या प्रयत्नाला दूध उत्पादकांनी साथ द्यावी असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोकराव पाटील यांनी केले स्वागत अधिकराव  पाटील यांनी केले तर आभार प्रकाशराव जाधव यांनी मानले.


Saturday 28 August 2021

शिवशंभु' दूध डेअरी ने कात टाकली..! 'यशराज ' यांचे आणखी एक यशस्वी पाऊल दुग्ध जन्य पदार्थ क्षेत्रात पदार्पण होणार

 

 

 दौलतनगर दि. २८ (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- मंत्री पुत्र आणि युवा नेते यशराज देसाई यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यातील दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने अल्पावधीतच आधुनिक बदल आणि निर्णय घेऊन  साखर कारखानदारीत यशस्वी पाऊल ठेवले यानंतर आता शिवशंभु सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ ही एका नव्या अत्याधुनिक  दुग्धजन्य क्षेत्रात पदार्पण करीत आहे. त्यामुळे  कारखान्याच्या यशस्वी जबाबदारी नंतर यशराज देसाई यांचे हे आणखीन एक यशस्वी पाऊल असल्याची चर्चा सध्या पाटण मतदारसंघात सुरू आहे.

             शिवशंभु सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया हा संघ महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सहकारी संघअसून या संघाचे सध्या २३ व्या वर्षात पदार्पण होत आहे तर या संघाची प्रतिदिन २० हजार लिटर दुध हाताळणी क्षमता आहे.महाराष्ट्र राज्याचे गृह आणि अर्थ राज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने गेल्या तेवीस वर्षात यशस्वी वाटचाल केली आहे.

               सध्या या संघाची जबाबदारी युवा नेते यशराज देसाई यांनी घेतली असल्याने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या यशस्वी जबाबदारी  नंतर 'यशराज' यांची पुन्हा एकदा सहकारी क्षेत्रातील ही आणखी एक दमदार एन्ट्री ठरणार आहे.सभासद शेतकरी यांच्या नेहमीच हिताचा विचार करून सदैव नाविन्य शोधणाऱ्या या युवा नेतृत्वाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता दूध उत्पादक शेतकऱ्यांचा ही अपेक्षा वाढल्या आहेत.कारण यशराज यांनी दूध संघाची जबाबदारी हाती घेताच  'शिवशंभु ' दूध शीतकरण यंत्रणा शुभारंभ हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेवुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना पहिलाच सुखद धक्का दिला आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून शिवशंभु सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ च्या माध्यमातून आता दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे लवकरच पाटण तालुक्यातील या शिवशंभु सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाची नवी उत्पादने बाजारात मिळणार आहेत.त्यामुळे दुधाच्या मागणीत वाढ होणार असून पाटण तालुक्यातील दूध उत्पादक शेकऱ्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन येणार हे मात्र नक्की.

 

चौकट  गृहराज्य मंत्र्यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ..!

              दौलतनगर,ता.पाटण येथील शिवशंभू दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचा दूध शीतकरण यंत्रणा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),युवानेते मा.यशराज देसाई(दादा),लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हा. चेअरमन राजाराम पाटील यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वा. दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती शिवशंभू दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन अधिकराव पाटील  व व्हा.चेअरमन किसनराव कवर यांनी  दिली आहे.

 

Friday 27 August 2021

शहीद जवान कै.गजानन मोरे यांचे २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून अभिवादन.

 

दौलतनगर दि. २७ (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सन १९९९ ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे आज दि.२७ ऑगस्ट रोजीचे २१ वे पुण्यस्मरण दिनानिमित्त गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रतिवर्षाप्रमाणे शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षीचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी पाटणचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, नायब तहसिलदार चौगुले,सहाय्यक गट विकास अधिकारी विभुते, उंब्रजचे सपोनी अजय गोरड यांची प्रमुख उपस्थिती होती.

                  प्रारंभी गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद जवान कै.गजाजन मोरे यांचे भूडकेवाडी ता.पाटण येथील शहीद स्मारकातील अर्धाकृती पुतळयाला पुष्पचक्र अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण केले. अभिवादनानंतर गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद स्मारक पुढील ध्वजारोहण करण्यात आला.यावेळी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस बँन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर करुन अभिवादन केले. भुडकेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनीनी ध्वजगीत सादर केले.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शहिद कै.गजानन मोरे यांची आई श्रीमती चतुराबाई मोरे यांचा सत्कार केला. कार्यक्रमास याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सोमनाथ खामकर,शिवदौलत सहकारी  बँकेचे व्हा.चेअरमन संजय देशमुख, संचालक अभिजित पाटील,रणजित शिंदे,नामदेवराव साळूंखे,माणिक पवार, विजय पवार(फौजी), किशोर बारटक्के यांच्यासह विविध गावचे सरपंच,सदस्य कै.गजानन मोरे यांच्या मातोश्री श्रीमती चतुराबाई मोरे आणि त्यांचे कुटुंबिय यांची  प्रमुख उपस्थिती होती.              

                           सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा असून देशाच्या संरक्षणासाठी सातारा जिल्हयातील अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहूती दिली देऊन आपले बलीदान दिले आहे. देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींचे सातत्याने स्मरण करणे, त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होणे, त्यांच्या पवित्र स्मृतिला अभिवादन करणे हे आपले सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. सन १९९९ ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे हे त्यातीलच एक.तारळे विभागातील भुडकेवाडी सारख्या ग्रामीण भागातील गावामध्ये सामान्य कुटुंबातील कै.गजानन मोरे हे देश सेवेसाठी सैन्य दलात भरती झाले होते.कारगिल युध्दामध्ये ते शहिद झाले. शहिद जवान कै.गजानन मोरे यांनी आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्हयाचे, महाराष्ट्राचे  नाव देशामध्ये अजरामर केले आहे. कै. गजानन मोरे हे देश सेवेसाठी शहिद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवाने त्यावेळी जो प्रसंग ओढावला त्यातून हे कुटुंब सावरत आहे. त्या मोरे कुटुंबियांना साथ देणे, त्यांच्या अडी-अडचणीच्या काळात पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच गावा-गावातील युवा वर्गाने शहिद गजानन मोरे यांचा आदर्श घेऊन देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करावी असे आवाहन करुन पाटण मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून मी प्रतिवर्षी कुठेही असलो तरी आजच्या दिवशी शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे स्मृतीदिनी भूडकेवाडी येथे आवर्जुन उपस्थित असतो. मी महाराष्ट्र राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून शहिद जवान कै. गजानन मोरे यांच्या स्मृतिला उजाळा देत त्यांना राज्य शासनाच्या  व पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो,असे यावेळी बोलताना गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले.

Tuesday 24 August 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून 200 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकखाती वर्ग. चेअरमन अशोकराव पाटील यांची माहिती.

दौलतनगर दि.24 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2020-21 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना एफआरपीचीच्या हप्त्यापोटी आत्तापर्यंत प्रतिटन 2330 रुपयांप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर यापुर्वीच वर्ग केली असून प्रतिटन 200 रुपयेप्रमाणे होणारा एफआरपीपोटीचा हप्ता मंगळवार दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 चे गळीत हंगामात 02 लाख 33 हजार 326 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.91% सरासरी साखर उताऱ्यांने 02 लाख 78 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सन 2020-21 च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसाला एफआरपीपोटी आत्तापर्यंत प्रतिटन रुपये 2330 नुसार होणारी रक्कम ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे बँक खाती यापुर्वीच अदा केले आहे.
दरम्यान देशासह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारी रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे हे शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधाचे पालन करुन मर्यादितच सुरु आहेत.त्यामुळे सन 2020-21 च्या गळीत हंगामाध्ये उत्पादित झालेल्या साखर विक्रीवर याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे या गळीत हंगामात उत्पादित साखरेचा उठाव न झाल्याने तसेच साखरेचे सतत कमी-जादा होणारे दर यामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम होत आहे. कोविड 19 चे महामारीच्या काळातही सर्व संकटांचा सामना करत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजनामध्ये मोठी काटकसर करण्याचे धोरण राबविले असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन आलेल्या परिस्थितीचा योग्य नियोजनातून एफआरपीचा हप्ता देण्याचे नियोजन केले होते. महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई व कारखाना संचालक मंडळाने सन 2020-21 च्या गळीत हंगामात कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीपोटीचा हप्ता प्रतिटन 200 रुपये इतकी रक्कम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने आज मंगळवार दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली आहे.तरी सन 2020-21 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा असे सांगून सन 2021-22 गळीत हंगामाकरीता आवश्यक असलेली कारखान्याची यंत्रसामुग्री देखभाल दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली असून ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे आवश्यक करार करण्यात आले आहेत. तरी ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस आपले कारखान्यास गळीतास घालून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे  चेअरमन अशोकराव पाटील यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

Wednesday 11 August 2021

पंचनाम्यापासून कोणीही बाधित वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्या- गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना.

 


दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- माहे जुलै महिन्यामध्ये पाटण मतदारसंघात मोठया प्रमाणात झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे पाटण मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी,शेतीपिकांसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठया संख्येने नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे संबंधित यंत्रणेमार्फत पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देणेकरीता कटीबध्द असून बाधितांना नुकसानीची मदत मिळणेकरीता आवश्यक असणारे पंचनाम्यापासून कोणीही बाधित वंचीत राहू नये याची शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

           दौलतनगर,ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईं यांचे अध्यक्षतेखाली अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे करावयाचे पंचनाम्या संदर्भात आयोजित आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार  योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळूंखे, मराविमचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख,तालुका कृषी अधिकारी ताकटे,सार्व.बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील, विद्याधर शिंदे, जिल्हा परिषद बांधकामचे भंडारे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे बसुगडे,पाटणचे पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील यांचेसह अन्य शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती  होती.

                  याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, माहे जुलै महिन्यामध्ये पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊन डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांवर कडा कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने अनेक गावे बाधित झाली होती. धोकादायक स्थितीमधील या गावांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. सलग दोन ते तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढयांना मोठया प्रमाणांत आलेल्या पुराच्या पाण्यामुळे रस्ते,साकव पूल, मोरी, नळ पाणी पुरवठा योजना अशा सार्वजनिक मालमत्तांचे मोठया अतोनात नुकसान झाले.अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या मतदारसंघातील अनेक गांवातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व शेत जमिनींचे नुकसानीचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे शासकीय यंत्रणेकडून पंचनामे  करणेसंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठका घेवून अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेला कोणीही शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचीत राहू नये याची शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सुचना कृषी व महसूल,ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. अतिवृष्टीमुळे  झालेल्या नुकसानीच्या संदर्भात कालच जिल्हास्तरीय अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात येऊन नुकसानीचा आढावा घेण्यात आला, असे सांगत अतिवृष्टीमध्ये जीवितहानी,शेतीचे नुकसान तसेच रस्ते,साकव पूल, मोरी, नळ पाणी पुरवठा योजना अशा सार्वजनिक मालमत्ता यासंह घरांचे नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या नुकसानीच्या आराखडयामध्ये कोणताही अतिवृष्टी बाधित वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व शासकीय यंत्रणेकडून घेण्यात यावी अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या बैठकी दरम्यान सर्व अधिकाऱ्यांना केल्या.

पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईं दौलतनगर,ता.पाटण येथे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न. ­­­



दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- मागील काही दिवसात पाटण तालुक्यातील कोविड बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असून कोविड उपाय योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंधांमध्ये सवलत देत दुकाने,हॉटेल इत्यांदीं सुरु ठेवण्यासाठी वेळ वाढवली असल्याने तालुक्यातील बाजारपेठांच्या ठिकाणी व दुकानांमध्ये खरेदी करण्याकरीता गर्दी होताना दिसत आहे. बाजारपेठांमध्ये वाढलेली नागरीकांची वर्दळ यामुळे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडून घालून दिलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबाजवणी करुन सध्या कोरोना बाधित रुग्णांची वाढीची संख्या पाहता पाटण तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी कोविड 19 चा संसर्ग पुन्हा वाढू नये याकरीता तालुकास्तरीय सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे,अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

           पाटण तालुक्यातील कोरोना संसर्गामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्याचेदृष्टीने आज दौलतनगर,ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार  योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळूंखे, पाटणचे पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ.दिपक कुऱ्हाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खराडे, मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार,कोविड सेंटर समन्वयक अमर कदम आदींची उपस्थिती  होती.

                  बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरवातीस तालुक्यात बाधित रुग्णांची माहिती घेऊन तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या व त्यांचेवर करण्यात येणारे औषधोपचार याची सविस्तर माहिती घेतली. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने ती पुन्हा वाढू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना करत सध्या जिल्हयामध्ये कोरोना बाधित रुग्णांची सख्या कमी जास्त होत असल्याने सर्वांना शासकीय निर्बधांचे पालन करावे लागत आहे.असे असतानाही काही प्रमाणांत निर्बंधामध्ये शिथिलता दिली असल्याने बाजारपेठांच्या ठिकाणी,विविध दुकानांमध्ये खरेदी करण्याकरीता मोठया प्रमाणांत गर्दी होताना दिसत आहे. कोरोना संसर्ग पुन्हा मोठया प्रमाणांत वाढण्याची  भिती असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून शासनाच्या सर्व निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात यावी. गत महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे बाधित झाली असून सतत वातावरणामध्ये बदल होत असल्याने संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी असणाऱ्या आवश्यक औषध व गोळया प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करुन देण्यात याव्यात,जेणेकरुन ग्रामीण भागातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरीकांची आरोग्य विषयक गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी याठिकाणी उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेटंरमध्ये तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार मिळत असल्याने विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांचा याचा मोठा फायदा होताना दिसत असून पाटण तालुक्यामध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे सांगत बाजारपेठा,दुकाने व इतर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळणेकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणा काम करीत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढू नये याकरीता आपण खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुकाने व हॉटेल सुरु ठेवण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत आहे का यावरही लक्ष ठेवत गर्दी टाळणेकरीता तालुक्यातील पोलीस यंत्रणेने सतर्क रहावे,अशा सूचना करत पाटण तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी असले तरी कोविड 19 चा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी तालुकास्तरीय सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे,असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बैठकीत केले.

 

शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा या संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

 

दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना येणाऱ्या अडचणी लवकरात मार्गी लावून ग्रामपंचायत स्तरावर असणारी कामे जलदगतीने मार्गी लागण्याच्या हेतूने गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून स्व.शिवाजीराव देसाई(स्व.आबासहेब) यांचे दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथीचे औचित्य साधून शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा या संघाची स्थापना करण्यात आली असल्याचे जाहिर करण्यात आले होते.तसेच या दिवशी जिल्हा परिषद गण निहाय एका सदस्य याप्रमाणे कार्यकारिणी तयार करण्यात आली होती.आज दौलतनगर,ता.पाटण येथे शिवशाही सरपंच संघाच्या कार्यकारीणीची बैठक घेण्यात येऊन संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

                  गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा या संघाच्या अध्यक्षपदी आबदारवाडी गावचे सरपंच विजय शिंदे,उपाध्यक्षपदी पाबळवाडी सरपंच किरण सुर्यवंशी व कुसवडे सरपंच इंदूताई मिसाळ,सचिवपदी शिद्रुकवाडी सरपचं महेश शिद्रुक,खजिनदार म्हणून सुपने सरपंच अशोक झिमरे यांच्या निवडी करण्यात आल्या.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमूख जयवंतराव शेलार,लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलिपराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य विजयराव पवार,पांडूरंग शिरवाडकर,शिवदौलत बँकेचे संचालक अभिजित पाटील,विलास कुराडे,विजय बाबर,दिपक गव्हाणे यांचेसह शिवशाही सरपंच संघातील कार्यकारीणी सदस्यांची उपस्थिती होती. पाटण विधानसभा मतदार नव्याने स्थापन झालेल्या या शिवशाही सरपंच संघामुळे गावाचा कारभार चांगल्या पद्धतीने करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ तयार झाले असून गावामध्ये शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी यांची मोठी मदत होणार आहे. तसेच चांगल्या योजना राबविण्यासाठी सर्व सरपंचांनी  यांनी एका छता खाली येऊन गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवशाही सरपंच संघ प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकारी यांचेवतीने  शेवटी सांगण्यात आले.

 

Friday 6 August 2021

मा.रविराज देसाई यांचा दि.12 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम स्थगित . वाढदिनी परगावी जाणार असल्याने भ्रमणध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचे आवाहन.

 

दौलतनगर दि.06:- मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट,२०२1 रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्त पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ व लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सह.पतसंस्था यांच्यावतीने आयोजीत करण्यात येणारे सर्व कार्यक्रम यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे तसेच जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत बाधित कुटुंबिय होऊन शेतकऱ्यांचे शेत जमीनींस शेत पिकांचे झालेले नुकसान अशा दुहेरी संकटामुळे स्थगित करण्यात आले आहेत. वाढदिनी ते परगांवी जाणार असून पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतकांनी प्रत्यक्ष न भेटता भ्रमणध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात, अशी माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ यांच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली  आहे.

 पत्रकांत म्हंटले आहे की,मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट रोजी प्रतिवर्षी वाढदिवस साजरा करण्यात येतो त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ यांच्यावतीने पाटण तालुक्यातील सातारा रहिवाशी असणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा तसेच ज्या पालकांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असून जुलै महिन्यामध्ये पाटण तालुक्यात ढगफुटीसदृश्य मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे बाधित झाली तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेत जमीनींसह शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच सार्वजनिक मालमत्तेची मोठया प्रमाणांत हानी झाली अशा दुहेरी संकटामुळे रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट, २०२1 चा वाढदिवस व वाढदिवसानिमित्ताचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. कोरोनामुळे पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून वाढदिवसादिवशी ते परगांवी जाणार असून पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतकांनी प्रत्यक्ष न भेटता भ्रमध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात, असे रविराज देसाईंनी सांगितले असल्याचेही लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


भुस्खलन झालेल्या गावांचे भुगर्भ तज्ञां कडुन सर्वेक्षण करणार-गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई तारळे विभागातील बाधित गावांतील नागरिकांना स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी दिल्या भेटी.

 

 दौलतनगर दि.06(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-  जुलै महिन्यात सलग दोन ते तीन दिवस ढगफुटीसदृश्य पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यामधील कोयना,मोरणा,ढेबेवाडी व तारळे विभागातील दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांतील नागरिकांना सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतरीत करण्यात आले असून बाधित गावांना संभाव्य धोका लक्षात घेऊन अतिवृष्टीने व भुस्खलन झालेल्या बाधीत गावांचे भुगर्भ तज्ञ समिती मार्फत सर्वेक्षण करून त्या गावांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करण्याचे व बाधीत कुटुंबांना तातडीनं तात्पुरती निवार शेड उभी करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा.ना.शंभुराज देसाई यांनी दिले.

              पाटण तालुक्यातील तारळे विभागातील अतिवृष्टीने बाधीत गायमुखवाडी (बांबावडे),कळंबे,डफळवाडी, केंजळवाडी,बागलेवाडी,जळव गावांची पहाणी व स्थलांतरीत नागरिकांच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.यावेळी  त्यांच्या समवेत माजी पं.स.सदस्य बबनराव शिंदे, संचालक गजाभाऊ जाधव,सोमनाथ खामकर,शिवदौलत बँकेचे व्हा.चेअरमन संजय देशमुख, संचालक अभिजीत पाटील,रणजित शिंदे,विजय पवार,नामदेवराव साळुंखे, माणिक पवार,किशोर बारटक्के,दिपक यादव,मंडलअधिकारी कदम,तलाठी शेट्ये, घोरपडे,सा.बां.वि.शाखा अभियंता घोडके,जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता संदिप पाटील,म.रा.वि.म.शाखा अभियंता धर्मे,उंब्रज पो.स्टेशनचे स.पो.निरीक्षक गोरड,तारळे दुरक्षेत्राचे उपनिरिक्षक पाटील,विविध खात्यांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

             यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, पाटण तालुक्यामध्ये जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन अनेक गावे बाधित होऊन डोंगरी व दुर्गम भागातील गावांचे आसपास मोठया प्रमाणांत भूस्खलन होऊन अनेक गावांवर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता.धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या गावांना सुरक्षित ठिकाणी तातडीने स्थलांतरीत करण्यात आले असून स्थलांतरीत केलेल्या नागरीकांना शासनाकडून प्राथमिक गरज लक्षात घेऊन आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.सध्या शासकीय यंत्रणेकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे नियोजन सुरु आहे. काही गावांना डोंगराचा भाग कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरुपी  पुनर्वसन करणे गरजेचे असून पुनर्वसन करावयाच्या गावांची माहिती घेऊन. पुनर्वसन करण्यासाठी व निवारा शेड उभी करण्यासाठी शासकीय जमीन आहे का ? नसेल तर नागरिकांनी बसुन चर्चा करावी व मालकी हक्कातील जमीन कशी उपलब्ध करता येईल.याचा निर्णय करावा.भविष्यात अशी वेळ परत येणार नाही अशी जमीन निवडण्याच्या सुचना करून,भुस्खलन झालेल्या शेत जमीनीचे जागेवर जाऊन पंचनामे करून ती जमीन शेतीलायक करण्यासाठी काय करावं लागेल त्यांचा चार दिवसात अहवाल उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठवण्याचे व राहिलेले घरांचे, शेतीचे,खाजगी विहीरिंचे,शासकीय मालमत्तेचे पंचनामे दोनचं दिवसात पुर्ण करण्याचे आदेश संबंधीत विभागांना दिले असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, आपत्तीच्या काळामध्ये शासन बाधित कुटुंबियांच्या पाठीशी  ठामपणे उभे असून सर्वोत्परी मदत शासनाकडून केली जाईल. दरम्यान अतिवृष्टीने व भुस्खलन झालेल्या बाधीत गावांचे भुगर्भ तज्ञ समिती मार्फत सर्वेक्षण करून त्या गावांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करण्याचे व बाधीत कुटुंबांना तातडीनं तात्पुरती निवार शेड उभी करण्याचे आश्वासन मंत्री ना.देसाई यांनी यावेळी दिले.