दौलतनगर दि.11(जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये
ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना येणाऱ्या अडचणी लवकरात मार्गी लावून ग्रामपंचायत
स्तरावर असणारी कामे जलदगतीने मार्गी लागण्याच्या हेतूने गृहराज्यमंत्री ना. शंभूराज
देसाई यांच्या संकल्पनेतून स्व.शिवाजीराव देसाई(स्व.आबासहेब) यांचे दि. 12 जुलै रोजीचे
पुण्यतिथीचे औचित्य साधून शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा या संघाची स्थापना करण्यात
आली असल्याचे जाहिर करण्यात आले होते.तसेच या दिवशी जिल्हा परिषद गण निहाय एका सदस्य
याप्रमाणे कार्यकारिणी तयार करण्यात आली होती.आज दौलतनगर,ता.पाटण येथे शिवशाही सरपंच
संघाच्या कार्यकारीणीची बैठक घेण्यात येऊन संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात
आल्या.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे मार्गदर्शनाखाली शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा या संघाच्या अध्यक्षपदी आबदारवाडी
गावचे सरपंच विजय शिंदे,उपाध्यक्षपदी पाबळवाडी सरपंच किरण सुर्यवंशी व कुसवडे सरपंच
इंदूताई मिसाळ,सचिवपदी शिद्रुकवाडी सरपचं महेश शिद्रुक,खजिनदार म्हणून सुपने सरपंच
अशोक झिमरे यांच्या निवडी करण्यात आल्या.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना
जिल्हाप्रमूख जयवंतराव शेलार,लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे माजी
चेअरमन डॉ.दिलिपराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य विजयराव पवार,पांडूरंग शिरवाडकर,शिवदौलत
बँकेचे संचालक अभिजित पाटील,विलास कुराडे,विजय बाबर,दिपक गव्हाणे यांचेसह शिवशाही
सरपंच संघातील कार्यकारीणी सदस्यांची उपस्थिती होती. पाटण विधानसभा मतदार नव्याने
स्थापन झालेल्या या शिवशाही सरपंच संघामुळे गावाचा कारभार चांगल्या पद्धतीने
करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ तयार झाले असून गावामध्ये शासनाच्या विविध योजना
राबविण्यासाठी यांची मोठी मदत होणार आहे. तसेच
चांगल्या योजना राबविण्यासाठी सर्व सरपंचांनी यांनी एका
छता खाली येऊन गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवशाही सरपंच संघ प्रयत्नशील राहणार असल्याचे
नवनियुक्त पदाधिकारी यांचेवतीने शेवटी
सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment