दौलतनगर दि.24 :- लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2020-21
च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते
बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना एफआरपीचीच्या हप्त्यापोटी आत्तापर्यंत प्रतिटन
2330 रुपयांप्रमाणे होणारी रक्कम
ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर यापुर्वीच वर्ग केली असून प्रतिटन 200 रुपयेप्रमाणे
होणारा एफआरपीपोटीचा हप्ता मंगळवार
दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक
खात्यावर वर्ग केला असल्याची
माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर
ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 चे गळीत हंगामात 02 लाख 33 हजार
326 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.91% सरासरी
साखर उताऱ्यांने 02 लाख 78 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सन 2020-21
च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील
गाळपास आलेल्या ऊसाला एफआरपीपोटी
आत्तापर्यंत प्रतिटन रुपये 2330
नुसार होणारी रक्कम ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे बँक खाती यापुर्वीच अदा केले आहे.
दरम्यान
देशासह
संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारी रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे
हे शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधाचे पालन करुन मर्यादितच सुरु आहेत.त्यामुळे सन
2020-21 च्या गळीत हंगामाध्ये उत्पादित झालेल्या साखर विक्रीवर याचा मोठा परिणाम झाला.
त्यामुळे या गळीत हंगामात उत्पादित साखरेचा उठाव न झाल्याने तसेच
साखरेचे सतत कमी-जादा होणारे दर यामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम होत आहे. कोविड 19 चे महामारीच्या काळातही
सर्व संकटांचा सामना करत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक
व महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली
कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजनामध्ये मोठी काटकसर करण्याचे धोरण राबविले असून
कारखाना
कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन आलेल्या परिस्थितीचा योग्य
नियोजनातून एफआरपीचा हप्ता देण्याचे नियोजन केले होते. महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री
नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई व कारखाना संचालक
मंडळाने सन 2020-21 च्या गळीत हंगामात कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीपोटीचा
हप्ता प्रतिटन 200 रुपये इतकी रक्कम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
साखर कारखान्याने आज मंगळवार दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी ऊस
उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली आहे.तरी सन 2020-21 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला
गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या
शाखांशी संपर्क साधावा असे सांगून सन 2021-22 गळीत हंगामाकरीता आवश्यक असलेली कारखान्याची
यंत्रसामुग्री देखभाल दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली असून ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे
आवश्यक करार करण्यात आले आहेत. तरी ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी पिकविलेला संपूर्ण
ऊस आपले कारखान्यास गळीतास घालून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे
आवाहन कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी
शेवटी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
No comments:
Post a Comment