दौलतनगर
दि. २७ (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सन १९९९ ला
झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान
कै.गजानन
मोरे यांचे आज दि.२७
ऑगस्ट रोजीचे २१ वे पुण्यस्मरण दिनानिमित्त गृह व वित्तराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी प्रतिवर्षाप्रमाणे शहिद जवान कै.गजानन
मोरे यांचे पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन
केले.कोरोनाच्या
संकटामुळे यंदाच्या वर्षीचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत साध्या पध्दतीने साजरा
करण्यात आला.
यावेळी पाटणचे प्रभारी
उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, नायब तहसिलदार चौगुले,सहाय्यक गट विकास अधिकारी
विभुते, उंब्रजचे
सपोनी अजय गोरड
यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी गृह व वित्तराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद जवान कै.गजाजन
मोरे यांचे भूडकेवाडी ता.पाटण
येथील शहीद स्मारकातील अर्धाकृती पुतळयाला पुष्पचक्र अर्पण करण्यात येवून अभिवादन
करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण केले. अभिवादनानंतर
गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद
स्मारक पुढील ध्वजारोहण करण्यात आला.यावेळी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस बँन्ड
पथकाने राष्ट्रगीत सादर करुन अभिवादन केले. भुडकेवाडी येथील जिल्हा
परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनीनी ध्वजगीत सादर केले.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी शहिद कै.गजानन मोरे यांची आई श्रीमती चतुराबाई मोरे यांचा सत्कार केला. कार्यक्रमास
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
साखर कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सोमनाथ खामकर,शिवदौलत
सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन संजय देशमुख,
संचालक अभिजित पाटील,रणजित
शिंदे,नामदेवराव साळूंखे,माणिक पवार, विजय पवार(फौजी), किशोर बारटक्के यांच्यासह
विविध गावचे सरपंच,सदस्य
कै.गजानन
मोरे यांच्या मातोश्री श्रीमती चतुराबाई मोरे आणि त्यांचे कुटुंबिय यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा जिल्हा हा शूरवीरांचा
जिल्हा असून देशाच्या संरक्षणासाठी सातारा जिल्हयातील अनेक जवानांनी
आपल्या प्राणांची आहूती दिली देऊन आपले बलीदान दिले आहे. देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या थोर
व्यक्तींचे सातत्याने स्मरण करणे, त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होणे, त्यांच्या पवित्र
स्मृतिला अभिवादन करणे हे आपले सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. सन १९९९ ला
झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान
कै.गजानन
मोरे हे त्यातीलच एक.तारळे
विभागातील भुडकेवाडी सारख्या ग्रामीण भागातील गावामध्ये सामान्य कुटुंबातील कै.गजानन
मोरे हे देश सेवेसाठी सैन्य दलात भरती झाले होते.कारगिल युध्दामध्ये ते शहिद झाले.
शहिद जवान कै.गजानन मोरे यांनी आपल्या
गावाचे, तालुक्याचे, जिल्हयाचे, महाराष्ट्राचे
नाव देशामध्ये अजरामर केले आहे. कै. गजानन मोरे हे देश सेवेसाठी शहिद झाल्यानंतर
त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवाने त्यावेळी जो प्रसंग ओढावला त्यातून हे कुटुंब सावरत
आहे. त्या मोरे कुटुंबियांना साथ देणे, त्यांच्या अडी-अडचणीच्या काळात पाठीशी ठामपणे
उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच गावा-गावातील युवा वर्गाने शहिद गजानन मोरे यांचा
आदर्श घेऊन देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करावी असे आवाहन करुन पाटण मतदारसंघाचा
प्रथम नागरिक म्हणून मी प्रतिवर्षी कुठेही असलो तरी आजच्या दिवशी शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे स्मृतीदिनी भूडकेवाडी येथे आवर्जुन उपस्थित असतो. मी
महाराष्ट्र राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून शहिद जवान कै. गजानन मोरे
यांच्या स्मृतिला उजाळा देत त्यांना राज्य शासनाच्या व पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने
विनम्र अभिवादन करतो,असे
यावेळी बोलताना गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले.
No comments:
Post a Comment