दौलतनगर
दि.06:- मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र
मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट,२०२1 रोजीचा वाढदिवस व
वाढदिवसानिमित्त पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ व लोकनेते बाळासाहेब देसाई
नागरी सह.पतसंस्था यांच्यावतीने आयोजीत करण्यात येणारे सर्व कार्यक्रम यंदाच्या
वर्षी कोरोनाच्या संकटामुळे तसेच जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत
बाधित कुटुंबिय होऊन शेतकऱ्यांचे शेत जमीनींस शेत पिकांचे झालेले नुकसान अशा
दुहेरी संकटामुळे स्थगित करण्यात आले आहेत. वाढदिनी
ते परगांवी जाणार असून पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतकांनी प्रत्यक्ष न भेटता
भ्रमणध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात, अशी माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी
सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ यांच्यावतीने प्रसिध्दीस
देण्यात आली आहे.
पत्रकांत म्हंटले आहे की,मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे
अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट रोजी प्रतिवर्षी वाढदिवस साजरा करण्यात
येतो त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई
नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ यांच्यावतीने पाटण
तालुक्यातील सातारा रहिवाशी असणाऱ्या इयत्ता 10 वी व 12
वी मधील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा
तसेच ज्या पालकांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित
करण्यात येतो.यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असून जुलै
महिन्यामध्ये पाटण तालुक्यात ढगफुटीसदृश्य मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे
अनेक गावे बाधित झाली तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेत जमीनींसह शेत पिकांचे अतोनात
नुकसान झाले. तसेच सार्वजनिक मालमत्तेची मोठया प्रमाणांत हानी झाली अशा दुहेरी
संकटामुळे रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट, २०२1 चा वाढदिवस व वाढदिवसानिमित्ताचे
सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. कोरोनामुळे पाटण तालुका सातारा रहिवाशी
मित्रमंडळ व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी त्यांचा वाढदिवस
साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून वाढदिवसादिवशी ते परगांवी जाणार असून पदाधिकारी,कार्यकर्ते
व हितचिंतकांनी प्रत्यक्ष न भेटता भ्रमध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात, असे रविराज
देसाईंनी सांगितले असल्याचेही लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व
पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment