Monday 30 August 2021

'शिवशंभु' दूध संघाच्या पाठीशी राज्य शासन ठाम.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई. शिवशंभू दूध संघाचा शीतकरण यंत्रणा शुभारंभ ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते संपन्न.

                        


               

दौलतनगर दि.30(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- दूध शीतकरण यंत्रणा शुभारंभ कार्यक्रमात मंत्री शंभुराज देसाई यांची ग्वाही पाटण तालुक्यातील 'शिवशंभु' दूध उत्पादक प्रक्रिया संघाने चिलिंग क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊल टाकले असून या संघाने जास्तीत जास्त दूध संकलन करून आणखी मोठ्या क्षमतेचा प्रकल्प उभा करावा त्यासाठी राज्य शासन 'शिवशंभू' संघाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे अर्थ आणि गृहराज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांनी केले.

         ते दौलतनगर ता पाटण येथे शिवशंभु सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या दूध शीतकरण यंत्रणा कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी युवा नेते यशराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलिंद पाटील,संचालक चंद्रकांत पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,सीमा मोरे,बशीर खोंदू, मा.पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,संजय गांधी निराधार योजना समिती मा.अध्यक्ष भरत साळूंखे, सदानंद साळूंखे,रणजित शिंदे,सोमनाथ खामकर,गजानन जाधव, नामदेवराव साळूंखे, सुरेश जाधव,बबनराव माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

             ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, १९९८/९९ साली शिवशंभु सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया या संघाची स्थापना झाली मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आणि चिलिंग प्लॅन्ट नसल्यामुळे  या संघाचे दूध संकलन गरजेपेक्षा जास्त वाढले गेले नाही मात्र तरीही तालुक्यातील इतर दूध संघाच्या तुलनेत बरोबरीत दर आणि बोनस देऊन दूध उत्पादकांच्या विश्वासास पात्र ठरला आहे ही कौतुकाची बाब आहे.मात्र  स्पर्धेच्या युगात कोणत्याही क्षेत्रात धाडस आणि स्पर्धा केल्याशिवाय यश मिळत नाही त्याप्रमाणे शिवशंभु दूध संघाने  चिलिंग प्लॅन्ट सारख्या क्षेत्रात महत्वाचे पाऊल टाकले आहे त्यासाठी आता तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हा संघ आपला आहे असे समजून या संघाला जास्तीत जास्त दूध घालून आपली नैतिक जबाबदरी यशस्वी पणे पार पाडावी असे स्पष्ट करून मंत्री देसाई म्हणाले या संघाला सध्या तालुक्यातील ठराविक गावांतूनच केवळ साडे ५हजार दूध संकलन सुरू होते ते आता संपूर्ण तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात संकलन करून पंधरा हजार लिटर क्षमता वाढवावी,बाहेर जाणारे दूध थांबवावे,प्रत्येकाने स्वतःला झोकून आपला संघ आपली जबाबदारी म्हणून काम करावे  असे झाल्यास  तातडीने ३० हजार लिटर क्षमतेचा  प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल असा विश्वास मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

चौकट :मंत्री देसाई यांच्या स्वप्नातला दूध संघ निर्माण करणार :यशराज देसाई

                युवा नेते यशराज देसाई म्हणाले पाटण तालुक्यात दररोज सुमारे ७० हजार दुधाचे उत्पन्न असून  शिवशंभु संघाकडे दूध थंड करण्याची यंत्रणा नसल्यामुळे केवळ साडे आठ टक्के इतकेच दुधाचे संकलन होत होते  मात्र आता शिवशंभु संघात  दूध शीतकरण यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे शिवशंभु  संघाचे दूध संकलन वाढविण्यात कोणतीही अडचण नाही त्यामुळे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आता दूध संकलन वाढण्यासाठी प्रयत्न  करून ही  संस्था पूर्ण क्षमतेने चालवून मंत्री शंभुराज देसाई यांच्या स्वप्नातला दूध संघ निर्माण करून दुग्धउत्पादन क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला तसेच या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात रोजगाराची ही मोठी संधी निर्माण होणार आहे शिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी या संस्थेच्या माध्यमातून पशु खाद्य,आणि पशुवैद्यकीय सुविधा ही पुरवल्या जाणार असल्याची माहिती यशराज देसाई यांनी यावेळी दिली.

चौकट: यशराज ला साथ द्या..!

                यशराज देसाई सारख हुशार नेतृत्व या कारखान्याला आणि दूध संघाला लाभले आहे.उच्चशिक्षित दादांचे खऱ्या अर्थाने परदेशात शिकण्याचे स्वप्न होते मात्र मतदार संघाच्या हितासाठी आम्ही कुटुंबाने यशराज यांच्या इच्छेविरुद्ध केवळ मतदार संघाच्या हितासाठी त्यांना कारखान्याची पहिली जबाबदारी दिली.मात्र यशराज ने ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे त्यांचे आपणाला मनस्वी समाधान आणि एक आधार मिळत असून आता दूध संघाची जबाबदारी ते तेवढ्याच जिद्दीने आणि प्रयत्नातून यशस्वीपणे पार पाडतील असा मला विश्वास आहे मात्र यशराज यांच्या प्रयत्नाला दूध उत्पादकांनी साथ द्यावी असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोकराव पाटील यांनी केले स्वागत अधिकराव  पाटील यांनी केले तर आभार प्रकाशराव जाधव यांनी मानले.


No comments:

Post a Comment