Friday 6 August 2021

भुस्खलन झालेल्या गावांचे भुगर्भ तज्ञां कडुन सर्वेक्षण करणार-गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई तारळे विभागातील बाधित गावांतील नागरिकांना स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी दिल्या भेटी.

 

 दौलतनगर दि.06(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-  जुलै महिन्यात सलग दोन ते तीन दिवस ढगफुटीसदृश्य पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यामधील कोयना,मोरणा,ढेबेवाडी व तारळे विभागातील दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांतील नागरिकांना सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतरीत करण्यात आले असून बाधित गावांना संभाव्य धोका लक्षात घेऊन अतिवृष्टीने व भुस्खलन झालेल्या बाधीत गावांचे भुगर्भ तज्ञ समिती मार्फत सर्वेक्षण करून त्या गावांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करण्याचे व बाधीत कुटुंबांना तातडीनं तात्पुरती निवार शेड उभी करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा.ना.शंभुराज देसाई यांनी दिले.

              पाटण तालुक्यातील तारळे विभागातील अतिवृष्टीने बाधीत गायमुखवाडी (बांबावडे),कळंबे,डफळवाडी, केंजळवाडी,बागलेवाडी,जळव गावांची पहाणी व स्थलांतरीत नागरिकांच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.यावेळी  त्यांच्या समवेत माजी पं.स.सदस्य बबनराव शिंदे, संचालक गजाभाऊ जाधव,सोमनाथ खामकर,शिवदौलत बँकेचे व्हा.चेअरमन संजय देशमुख, संचालक अभिजीत पाटील,रणजित शिंदे,विजय पवार,नामदेवराव साळुंखे, माणिक पवार,किशोर बारटक्के,दिपक यादव,मंडलअधिकारी कदम,तलाठी शेट्ये, घोरपडे,सा.बां.वि.शाखा अभियंता घोडके,जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता संदिप पाटील,म.रा.वि.म.शाखा अभियंता धर्मे,उंब्रज पो.स्टेशनचे स.पो.निरीक्षक गोरड,तारळे दुरक्षेत्राचे उपनिरिक्षक पाटील,विविध खात्यांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

             यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, पाटण तालुक्यामध्ये जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन अनेक गावे बाधित होऊन डोंगरी व दुर्गम भागातील गावांचे आसपास मोठया प्रमाणांत भूस्खलन होऊन अनेक गावांवर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता.धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या गावांना सुरक्षित ठिकाणी तातडीने स्थलांतरीत करण्यात आले असून स्थलांतरीत केलेल्या नागरीकांना शासनाकडून प्राथमिक गरज लक्षात घेऊन आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.सध्या शासकीय यंत्रणेकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे नियोजन सुरु आहे. काही गावांना डोंगराचा भाग कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरुपी  पुनर्वसन करणे गरजेचे असून पुनर्वसन करावयाच्या गावांची माहिती घेऊन. पुनर्वसन करण्यासाठी व निवारा शेड उभी करण्यासाठी शासकीय जमीन आहे का ? नसेल तर नागरिकांनी बसुन चर्चा करावी व मालकी हक्कातील जमीन कशी उपलब्ध करता येईल.याचा निर्णय करावा.भविष्यात अशी वेळ परत येणार नाही अशी जमीन निवडण्याच्या सुचना करून,भुस्खलन झालेल्या शेत जमीनीचे जागेवर जाऊन पंचनामे करून ती जमीन शेतीलायक करण्यासाठी काय करावं लागेल त्यांचा चार दिवसात अहवाल उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठवण्याचे व राहिलेले घरांचे, शेतीचे,खाजगी विहीरिंचे,शासकीय मालमत्तेचे पंचनामे दोनचं दिवसात पुर्ण करण्याचे आदेश संबंधीत विभागांना दिले असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, आपत्तीच्या काळामध्ये शासन बाधित कुटुंबियांच्या पाठीशी  ठामपणे उभे असून सर्वोत्परी मदत शासनाकडून केली जाईल. दरम्यान अतिवृष्टीने व भुस्खलन झालेल्या बाधीत गावांचे भुगर्भ तज्ञ समिती मार्फत सर्वेक्षण करून त्या गावांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करण्याचे व बाधीत कुटुंबांना तातडीनं तात्पुरती निवार शेड उभी करण्याचे आश्वासन मंत्री ना.देसाई यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment