Monday 31 July 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास येाजनेतून 05 कोटी निधी मंजूर. पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विविध विकास कामे लागणार मार्गी.

 




  दौलतनगर दि.27:- पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विविध‍ विकास कामांना 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्यासाठी  मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी मिळणेबाबत विनंती केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षात 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 31 जुलै, 2023 रोजी पारित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

                  प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांना व गावांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास येाजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांकरीता सन 2023-24 या वर्षात 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर केले असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 31 जुलै, 2023 रोजी पारीत केला असून या कामांमध्ये मणदुरे बौध्दवस्ती  रस्ता सुधारणा 15 लाख, सळवे मागासवर्गीय वस्ती रस्ता सुधारणा 20 लाख, चोपदारवाडी मागासवर्गीय वस्ती रस्ता सुधारणा 20 लाख, विहे बौध्दवस्ती व मातंगवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख, पाचगणी बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख, मान्याचीवाडी कुंभारगाव ते मातंगवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख, खळे मातंगवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख, कुंभारगाव मागासवर्गीयवस्ती संरक्षक भिंत 15 लाख, मेंढोशी  मागासवर्गीय वस्ती मध्ये समाज मंदिर 15 लाख, उधवणे बौध्दवस्ती ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, दिवशी बुद्रुक  मागासवर्गीय वस्ती स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, कुठरे  दलितवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, निवी  बौध्दवसती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, धामणी मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, काढणे बौध्दवस्ती सचीन नांगरे घर ते भिंगारदेवे वस्ती पर्यंत रस्ता सुधारणा 15 लाख, धावडे मातंगवस्तीमध्ये सभामंडप 15 लाख, येराड बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 11 लाख, पाडळोशी मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, तारळे मातंगवस्ती स्मशानभूमीकरीता संरक्षक भिंत 20 लाख, कुसरुंड येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लाख, काळगाव येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लाख, मोरगिरी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लाख, निवकणे येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लाख, तोंडोशी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लाख, पाणेरी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लाख, पाळशी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लाख, मुळगाव येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता सुधारणा 18 लाख, म्होप्रे येथे दलितवस्तीमध्ये संरक्षक भिंत 20 लाख, संजयनगर पाडळी मागासवर्गीय वस्ती पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख  व दक्षिण तांबवे मागासवर्गीय वस्ती रस्ता सुधारणा 20 लाख या कामांचा समावेश आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांमधील रस्ते,अभ्यासिका,सभामंडप,समाज मंदिर व संरक्षक भिंती अशी विविध विकास कामे मार्गी लागणार असून मंजूर झालेल्या विकास कामांची लवकरच निविदा कार्यवाही करण्यात येऊन पाऊस कमी झाल्यानंतर कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती कार्यालयाचेवतीने  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

 

Wednesday 26 July 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत आरल दिवशी रस्त्याकरीता निधी मंजूर. लवकरच आरल दिवशी रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार.

 


दौलतनगर दि.27:- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत आरल दिवशी खुर्द रस्त्याचे पुनर्बांधणीसाठी 03 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाने पारित केला असून या कामाची निविदा प्रक्रीया पुर्ण झाली आहे.पाऊस कमी होताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या आरल दिवशी खुर्द रस्त्याचे कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आरल गावचे ग्रामस्थ  विलास कदम,तानजी पवार व जगन्नाथ पवार यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, माहे जुलै 2021 रोजी पाटण तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे केरा विभागातील आरल दिवशी रस्त्याचे मोठया प्रमाणांत नुकसान होऊन या गावाचा दळण-वळणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.आरल दिवशी गावाचे दळण-वळण पुर्ववत सुरळीत होण्यासाठी कै.बबनराव माळी (आप्पा) व आम्ही  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे लेखी निवेदन देऊन प्राधान्याने या रस्त्यावरील ओढयावरील साकव बांधण्यासाठी  निधी मंजूर करण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता.तसेच आमचे आरल गावचा रस्त्यासाठी भरघोस निधी मंजूर करुन त्याचे काम लवकर सुरु करण्यासाठीही निवेदन दिले आहे. आमच्या ग्रामस्थांच्या मागणीची  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तातडीने दखल घेऊन आरल रस्त्यावील दोन साकवांचे बांधकाम करण्यासाठी  अतिवृष्टी व पूरहानी योजनेअंतर्गत 60 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. फक्त निधीच मंजूर केला नाही तर यंदाच्या पावसाळयापूर्वी या दोन साकव पूलांची कामे सध्या पुर्णत्वास गेली आहे.तसेच उर्वरित असलेला आरल पोहोच रस्त्याचे कामासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 03 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामाची सध्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर लगेचच या कामास सुरुवात होऊन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातूनच आरल गावच्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला आहे.त्यामुळे गेल्या देान तीन दिवसांपासून विनाकारण रस्त्याचे कामासंदर्भात गैरसमज पसरवला जात आहे.परंतु पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून आरल गावच्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला असून ज्यांना या गोष्टीची माहिती नाही त्यांनी अगोदर माहिती घ्यावी व खात्री करुनच मग प्रसिध्दीमाध्यमांना द्यावी असे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

  चौकट: विकास कामांना विरोध करणाऱ्या मंडळींचाच कांगावा.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून नुकताच आरल गावामध्ये अंतर्गत रस्त्याचे काम चालू  होते.परंतु गावातील काही विघ्नसंतोषी मंडळींना केवळ विकास कामे होत असल्याचे बघवत नसल्याने या मंडळींनी पाईप लाईनचे काम करतोय म्हणून अंतर्गत रस्ता पुर्णपणे उखडून टाकला.परंतु गावातील हिच विकास कामांना विरोध करणारी मंडळी आता आरल गावच्या रस्त्याच्या कामासंदभा्रत सगळीकडे कांगावा करत सुटली असून या मंडळींनी आरल रस्त्याच्या कामाची अजिबात काळजी करुन नये कारण आम्ही ग्रामस्थ या रस्त्याचे काम पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून पुर्णत्वाकडे नेण्यासाठी सक्षम असल्याचेही ग्रामस्थांनी म्हंटले आहे.

Tuesday 25 July 2023

ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांच्या कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर.

 


दौलतनगर दि.26:- पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे या मार्गांवरुन दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या नुकसान झालेल्या रस्त्यांच्या कामांचे पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या माहे जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांचेकडे मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांच्या कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नुकसान झालेल्या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील होते. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांचेकडे पाटण तालुक्यातील नुकसान झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती. त्यानुसार मुंबई या ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 25 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमध्ये नागठाणे तारळे पाटण रस्ता प्रजिमा 37 कि.मी.27/00 ते 38/00 भाग सडावाघापूर ते पाटण रस्ता रुंदीकरणासह सुधारणा 400 लक्ष, वाखाणवस्ती  कराड ढेबेवाडी सणबुर महिंद नाटोशी मोरगिरी चाफेर रसता प्रजिमा- 55 किमी. 47/00 ते 50/00  (भाग -किमी. 47/00 ते 50/00  कळकेवाडी ते कुसरुंड) चे सुधारणा 250 लक्ष, डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रामा 148 कि.मी.68/00 ते 69/00 भाग तांबवे पूल ते तांबवे मध्ये रस्त्याची  भौमितीक सुधारणा 300 लक्ष, मल्हारपेठ पंढरपूर रस्ता रामा 143 किमी 0/00 ते 3/00 व 6/00 ते 8/00 ते 11/800 ची सुधारणा भाग निसरे फाटा ते ऊरुल,भोळेवाडी फाटा ते कळंत्रेवाडी ते उंब्रज  400 लक्ष, निसरे मारुल गुढे काळगांव रस्ता प्रजिता - 54 कि.मी. 0/00 ते 35/350 भाग- कि.मी.10/00 ते 12/500 टेळेवाडी ते शिद्रुकवाडी फाटाची सुधारणा 300 लक्ष, डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रामा 148 किमी 10/500 ते 15/00 भाग नेहरु उद्यान ते हेळवाक ची सुधारणा 300 लक्ष, रामा  136 ते सुपने येणके अंबवडे काढणे ते प्रजिमा 55 रस्ता प्रजिमा 66 किमी 0/00 ते 3/500 ची सुधारणा भाग सुपने ते किरपे ता.कराड 300 लक्ष, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता रामा 398 किमी 32/500 ते 35/00 भाग तारळे ते निवडे रस्ता सुधारणा 150 लक्ष, चरेगाव चाफळ त्रिपुडी आंब्रुळे कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा 53 कि.मी.40/00 ते 43/00 ची सुधारणा भाग नाटोशी ते एस.एच.148 100 लक्ष या 09 कामांना 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या विकास कामांची लवकरच निविदा कार्यवाही करण्यात येऊन दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती कार्यालयाचेवतीने  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

चौकट: जुलैच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये माईंगडेवाडी व गावडेवाडी खुडुपलेवाडी पुलांचे कामांसाठी 05 कोटी निधीची तरतूद.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून नाबार्ड 28 मधून पाटण विधानसभा मतदारसंघातील माईंगडेवाडी ते हौदाचीवाडी ते सातर ग्रामा 302 वर माईंगडेवाडी येथे मोठया पुलाचे बांधकाम करणे 250 लक्ष व गावडेवाडी ते खुडुपलेवाडी रस्ता ग्रामा 64 वरील किमी 0/600 मधील ओढयावर पोहोच मार्गासह पुलाचे बांधकाम 250 लक्ष ही 05 कोटी रुपयांची दोन कामे मंजूर झाली होती.या दोन्ही पुलांचे कामांना माहे जुलै पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 05 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.

Thursday 20 July 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे सुचनेवरुन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली भागा-भागात पाहणी . पावसाळी अधिवेशनामध्ये व्यस्त असूनही ना.देसाई यांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतली अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती.

 


दौलतनगर दि.21:- मुंबई याठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे पुर्णवेळ व्यस्त आहेत. तर गेले दोन दिवस पाटण तालुक्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना डोंगरी व दुर्गम भागातील गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करुन समस्या जाणून घेण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केल्या होत्या.ना.शंभूराज देसाई यांचे सुचनेनुसार पदाधिकारी व कार्यकर्ते  यांनी आज त्या त्या भागा-भागातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांना भेट देऊन तेथील दळण वळणासह अन्य समस्यांची  माहिती  घेत ना.देसाई यांना सर्व तपशील सांगीतला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

            प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की,कालपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात 39.09 टिएमसी  पाणी साठा झाला असून कोयना धरणाच्या पाणीसाठयामध्ये झपाटयाने वाढ होत आहे. गत दोन दिवसांपासून पाटण विधानसभा मतदार संघामध्ये मुसळधार पाऊस पडत असून ठिक-ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण होत आहे,तर डोंगरी व दुर्गम भागातील ओढयांना मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी येऊन रस्ते खचणे,मो-यांचे नुकसान होणे,रस्त्यांवर दरडी कोसळून वाहतूक ठप्प होणे अशा अनेक समस्या निर्माण होऊन जनजिवन विस्कळीत होण्याचे प्रकार होत आहेत. दरम्यान मुंबई याठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे पुर्णवेळ व्यस्त असल्या कारणाने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांनी पुरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कालच मुळगाव पुल व पाटण बसस्थानक परिसराची पाहणी दौरा करुन पाटण तालुक्यातील आपतकालीन परिस्थितीचा आढावा घेत ती हाताळण्यासाठी प्रशासनकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेतली.तर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी काल पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील वेग-वेगळया भागातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत का हे पाहण्यासाठी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना डोंगरी व दुर्गम भागातील गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या.ना.शंभूराज देसाई यांच्या सुचनेनुसार तारळे, कोयना, ढेबेवाडी, मोरगिरी,काळगाव,शिरळ या डोंगरी व दुर्गम भागातील संवेदनशिल गावांना स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.तसेच संबंधित गावातील ग्रामस्थांशी चर्चा करुन काही समस्या आहेत का याची माहितीही घेत या सर्व परिस्थितीची माहिती त्यांनी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनामध्ये व्यस्त असलेल्या ना.शंभूराज देसाई यांना दिली.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे पावसाळी अधिवेशामध्ये व्यस्त असतानाही त्यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांचेकडून मतदारसंघातील पूरपरिस्थितीची सतत माहिती घेत असल्याने त्यांचे पुर्ण लक्ष मतदारसंघातील आपत्कालीन परिस्थितीवर असल्याचे शेवठी पत्रकात लक्ष म्हटंले आहे.

चौकट: जिल्हा प्रशासनाचेवतीने जिल्हाधिकारी यांची पाटण मतदारसंघातील पुरपरिस्थितीची पाहणी.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे सुचनेवरुन गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण विधानसभा मतदारसंघात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीची जिल्हा प्रशासनाचेवतीने जिल्हाधिकारी जितेंद्रसिंह डुडी हे गेले दोन दिवस मतदारसंघातील आपत्कालीन परिस्थिती सदृश्य ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पाहणी करत प्रशासनाचेवतीने तातडीने उपाय योजना करण्यासंदर्भात संबंधित अधिकारी यांना जागेवर सुचना करत आहेत.      

Wednesday 19 July 2023

चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांनी केली मुळगाव पुल व पाटण बसस्थानक परिसराची पाहणी.

    


दौलतनगर दि.19:-गेल्या 24 तासांत पाटण तालुक्यामध्ये पडत असलेल्या मुसधार पावसाने आज रौद्ररुपधारण करत सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी लावली.कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदी दुधडी भरुन वाहू लागली असून मुळगाव व पाटण या गावांना जोडणारा मुळगाव पुलाला कोयना नदीच्या पुराचे पाणी लागले आहे तर पाटण बसस्थानक परिसरामध्ये पावसाचे पाणी येण्यास सुरुवात झाली असल्याने या दोन्ही ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी पाहणी केली.दरम्यान मुंबई याठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे पुर्णवेळ व्यस्त असल्याकारणाने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांनी पुरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज हा पाहणी दौरा करुन पुरपरिस्थितीचा आढावा घेतला.

                यावेळी  मा.यशराज देसाई(दादा) यांचे समवेत पाटणचे नायब तहसिलदार बोरकर,सहा. पोलीस निरिक्षक पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे, जि.बांधकाम विभागाचे प्र. उपअभियंता संदिप पाटील यांचेसह मिलिंद पाटील, सलीम इनामदार, बशीर खोंदू, गणेश भिसे, प्रमोद मोहिते, सुधीर नायकवडी, स्वप्निल मोरे, पंकज नायकवडी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

              कालपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धणाच्या पाणीसाठयात 24 तासात तब्बल 3.8 टीएमसीने वाढ झाली आहे. पाटण तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये सुमारे 307 मीमी पेक्षा जादा पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात 33.37 टिएमसी  पाणी साठा झाला असून कोयना धरणाच्या पाणीसाठयामध्ये झपाटयाने वाढ होत आहे.काल पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदी दुधडी भरून वाहू लागली असून नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली असल्याने पाटण ते मुळगाव रस्त्यावरील मुळगाव पुलाला कोयना नदीचे पाणी लागले असून हा पूल कधीही पुराच्या पाण्याखाली जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाटण बसस्थानक परिसरातील पुराच्या पाण्याची पाहणी केली.यावेळी मुळगाव पुलावरुन अचानक पाणी जाऊ लागल्यास तात्काळ हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्याकरीता तातडीच्या कोणत्या उपाय योजना केल्या आहेत याची माहिती संबंधित अधिकारी यांचेकडून घेऊन या पुलावरुन ये-जा करणाऱ्या नागरीकांना प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात गावामध्ये सर्व नागरीकांना माहिती देण्यात यावी जेणेकरुन कोणतीही  अनुचित घटना घडणार नाही याची प्रशासनाकडून काळजी घेण्यासंदर्भात उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.  

चौकट:ना.शंभूराज देसाई यांचे प्रमाणेच मा.यशराज देसाई(दादा) यांची कार्यपध्दती.

पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी,राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई हे प्रतिवर्षी अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये पुरसदृश्य असलेल्या ठिकाणी शासकीय अधिकारी यांना घेऊन भेट देत प्रशासनाकडून केलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याकरीता अधिकाऱ्यांना सूचना देतात.विशेषत: कोयना नदीला आलेल्या पुरामुळे प्रतिवर्षी पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या मुळगाव व नेरळे या दोन पुलांच्या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत असतात.यावेळी मुंबई या ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशामध्ये नामदार शंभूराज देसाई हे व्यस्त असल्याने मतदारसंघातील पुरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांचे सुपुत्र लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी आज मुळगाव पुल व पाटण बसस्थानक परिसरातील पुरपरिस्थितीची पाहणी केली.त्यामुळे ना.शंभूराज देसाई यांचेप्रमाणेच चेअरमन मा.यशराज देसाई यांची कार्यपध्दती असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

Wednesday 12 July 2023

आता तालुक्यात लवकरच अग्रीकल्चर महाविद्यालय उभारणार..!मंत्री ना.शंभूराज देसाई. दौलतनगर ता.पाटण येथे स्व.शिवाजीराव देसाई यांचा37वा पुण्यतिथी कार्यक्रम व विद्यार्थी गुण-गौरव कार्यक्रम संपन्न.

 

                       

दौलतनगर दि.12  :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रगती साठी पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील विध्यार्थी यांच्या प्रगतीसाठी स्वर्गीय आबासाहेब यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारां च्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपण सदैव प्रयतशील आहे.दरम्यान पाटण तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव देसाई यांनी आपले आयुष्य वेचले मात्र तालुक्यातील काही लोकांनी कारस्थान करून  कोयना शिक्षण संस्थेतुन देसाई परिवाराला जाणीवपूर्वक बाजूला केले मात्र तरीही तालुक्यात विविध प्रकारची शिक्षणाची दालने उभी करून देसाई परिवाराने   सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आता तालुक्यात लवकरच अग्रीकल्चर महाविद्यालय उभारणार असल्याची ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केली.

                   लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या ३७ वा पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई,जयराज देसाई,आदित्यराज देसाई,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार,डॉ दिलीपराव चव्हाण,पाटण बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील,विलास गोडाबे,अशोकराव पाटील, बशीर खोंदू,ॲङ डी.पी.जाधव, विजय पवार,विजय शिंदे,संतोष गिरी, पंजाबराव देसाई,सुरेश पानस्कर,भरत साळूंखे,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख,भिजित पाटील,बबनराव शिंदे, माणिक पवार, राजेंद्र चव्हाण,नामदेवराव साळूंखे,जालिंदर पाटील, सोमनाथ खामकर,बबनराव भिसे, शशिकांत निकम,विजय जंबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

         ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले, सहकार क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत काम कसे करायचे याची शिकवण खऱ्या अर्थाने स्वर्गीय आबासाहेब यांनी दिली. कारखान्याची उभारणी करताना लोकनेते सत्तेमधून बाहेर गेले तरी ही खडतर परिस्थिती मध्ये त्यांनी कारखाना चालवला आणि अल्पावधीमध्येच हा कारखाना कर्जमुक्त करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मालकीचा करून दिला. स्पर्धेचे युग आहे. आपण स्वतः शी स्पर्धा केली पाहिजे. ग्रामीण भागात मुल मुली अव्वल कामगिरी करत आहेत. स्पर्धा वाढली आहे. ग्रामीण भागातील मुलांना विनंती आहे, मुलांनी पालकांकडे मागणी करताना आपण ही आपल्या पालकांचे नाव उज्वल करावं ही जिद्द मनी बाळगली पाहिजे. तालुक्यातील मुलं मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका काढली आहे. शहरातील मुलं स्पर्धा परिक्षेत यश मिळवत आहेत आपल्या ही तालुक्यातील मुलं अशी घडली पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस युवा पिढीला मंत्री देसाई यांनी शुभेच्छा व्यक्त करून मंत्री देसाई म्हणाले,आपल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी अग्रिकलक्चर सारखे महाविद्यालय निर्माण व्हावे अशी ग्रामीण भागातून मागणी असलेने लवकरच आपण  पाटण मतदार संघात अग्रिकलक्चर महाविद्यालय उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा करून  लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा एक काळ सुवर्णकाळ होता आणि लोकनेत्यांच्या तोच दरारा आणि सुवर्णकाळ पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. तसेच पाटण मतदारसंघ हा विकासकामांत  संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एक रोल मॉडेल होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. स्व आबासाहेब यांची कर्मभूमी, जन्मभूमीत आपण आहोत. त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव उज्वल करण्याचे काम आपण केले पाहिजे.असे आवाहन ही त्यांनी शेवटी केले.दरम्यान  मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक केंद्रात प्रथम, व्दितीय, तृतीय व विविध स्पर्धा त उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पांडुरंग नलावडे यांनी केले. आभार बबनराव शिंदे यांनी मानले.

चौकट: कोयना शिक्षण संस्थेत कारस्थान केले..!

          लोकनेते बाळासाहेब देसाई,के.व्ही.बापू पाटील,भागवतराव देसाई यांनी कोयना शिक्षण संस्था उभारली आणि काही लोकांनी त्यांना या संस्थेतून बाहेर काढले. काही लोकांनी स्वतः च्या ताब्यात कोयना शिक्षण संस्था घेतली. राजकारण करुन संस्था ताब्यात घेतली. म्हणून मोरणा शिक्षण संस्था काढली. राजकारण कटकारस्थान करुन कोयना संस्था ताब्यात घेतली. म्हणून आम्ही जिद्दीने मोरणा संस्था काढून तालुक्यात शिक्षणाची दारे उघडून दिली.असा टोला मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी लगावला.


Tuesday 11 July 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत 02 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. महाराष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत रस्ते व शाळांची कामे लागणार मार्गी.

 



दौलतनगर दि.11: महाराष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील विकास कामांकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये मतदारसंघातील रस्ते व जिल्हा परिषद शाळेतील कामांकरीता निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे खनिकर्म मंत्री ना.दादाजी भुसे यांचेकडे विनंती केलेली होती. त्यानुसार महाराष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील मतदारसंघातील रस्ते व जिल्हा परिषद शाळेतील विकास कामांकरीता 02 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाकडून पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील विकास कामांकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये मतदारसंघातील रस्ते व जिल्हा परिषद शाळेतील कामांकरीता निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे खनिकर्म मंत्री ना.दादाजी भुसे यांचेकडे विनंती केलेली होती.त्यानुसार महाराष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील मतदारसंघातील रस्ते व जिल्हा परिषद शाळेतील विकास कामांकरीता 02 कोटी 15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाकडून पारित केला असून यामध्ये कोंजवडे ते सवारवाडी रस्ता सुधारणा 50 लक्ष, माजगाव ते ऊरुल रस्ता सुधारणा 01 कोटी 25 लक्ष, चेवलेवाडी पोहोच रस्ता सुधारणा 25 लक्ष,कोयनानगर येथील जिल्हा परिषद शाळेतील कामे 05 लक्ष,कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील कामे 05 लक्ष, ऐनाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील कामे 05 लाख, पाडळी,ता.कराड येथील जिल्हा परिषद शाळेतील कामे 05 लक्ष या 02 कोटी 20 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा समावेश असून या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच या मंजूर विकास कामांचे अंदाज पत्रक तयार करण्याची कार्यवाही करुन या कामांची निविदिा प्रक्रिया तातडीने करुन मंजूर विकास कामांना तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.