Thursday 20 July 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे सुचनेवरुन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली भागा-भागात पाहणी . पावसाळी अधिवेशनामध्ये व्यस्त असूनही ना.देसाई यांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतली अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती.

 


दौलतनगर दि.21:- मुंबई याठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे पुर्णवेळ व्यस्त आहेत. तर गेले दोन दिवस पाटण तालुक्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना डोंगरी व दुर्गम भागातील गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करुन समस्या जाणून घेण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केल्या होत्या.ना.शंभूराज देसाई यांचे सुचनेनुसार पदाधिकारी व कार्यकर्ते  यांनी आज त्या त्या भागा-भागातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांना भेट देऊन तेथील दळण वळणासह अन्य समस्यांची  माहिती  घेत ना.देसाई यांना सर्व तपशील सांगीतला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

            प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की,कालपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात 39.09 टिएमसी  पाणी साठा झाला असून कोयना धरणाच्या पाणीसाठयामध्ये झपाटयाने वाढ होत आहे. गत दोन दिवसांपासून पाटण विधानसभा मतदार संघामध्ये मुसळधार पाऊस पडत असून ठिक-ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण होत आहे,तर डोंगरी व दुर्गम भागातील ओढयांना मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी येऊन रस्ते खचणे,मो-यांचे नुकसान होणे,रस्त्यांवर दरडी कोसळून वाहतूक ठप्प होणे अशा अनेक समस्या निर्माण होऊन जनजिवन विस्कळीत होण्याचे प्रकार होत आहेत. दरम्यान मुंबई याठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे पुर्णवेळ व्यस्त असल्या कारणाने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांनी पुरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कालच मुळगाव पुल व पाटण बसस्थानक परिसराची पाहणी दौरा करुन पाटण तालुक्यातील आपतकालीन परिस्थितीचा आढावा घेत ती हाताळण्यासाठी प्रशासनकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेतली.तर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी काल पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील वेग-वेगळया भागातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत का हे पाहण्यासाठी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना डोंगरी व दुर्गम भागातील गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या.ना.शंभूराज देसाई यांच्या सुचनेनुसार तारळे, कोयना, ढेबेवाडी, मोरगिरी,काळगाव,शिरळ या डोंगरी व दुर्गम भागातील संवेदनशिल गावांना स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.तसेच संबंधित गावातील ग्रामस्थांशी चर्चा करुन काही समस्या आहेत का याची माहितीही घेत या सर्व परिस्थितीची माहिती त्यांनी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनामध्ये व्यस्त असलेल्या ना.शंभूराज देसाई यांना दिली.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे पावसाळी अधिवेशामध्ये व्यस्त असतानाही त्यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांचेकडून मतदारसंघातील पूरपरिस्थितीची सतत माहिती घेत असल्याने त्यांचे पुर्ण लक्ष मतदारसंघातील आपत्कालीन परिस्थितीवर असल्याचे शेवठी पत्रकात लक्ष म्हटंले आहे.

चौकट: जिल्हा प्रशासनाचेवतीने जिल्हाधिकारी यांची पाटण मतदारसंघातील पुरपरिस्थितीची पाहणी.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे सुचनेवरुन गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण विधानसभा मतदारसंघात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीची जिल्हा प्रशासनाचेवतीने जिल्हाधिकारी जितेंद्रसिंह डुडी हे गेले दोन दिवस मतदारसंघातील आपत्कालीन परिस्थिती सदृश्य ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पाहणी करत प्रशासनाचेवतीने तातडीने उपाय योजना करण्यासंदर्भात संबंधित अधिकारी यांना जागेवर सुचना करत आहेत.      

No comments:

Post a Comment