दौलतनगर दि.26:- पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये दळण-वळणाच्यादृष्टीने
महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांचे मोठया प्रमाणांत
नुकसान झाले होते.त्यामुळे या मार्गांवरुन दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या
नुकसान झालेल्या रस्त्यांच्या कामांचे पुनर्बांधणीसाठी राज्य
शासनाच्या माहे
जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद
होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री
ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांचेकडे
मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती.त्यानुसार पाटण
विधानसभा मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांच्या कामांसाठी 25 कोटी रुपयांचा
निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण
विधानसभा मतदारसंघामध्ये नुकसान
झालेल्या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या पुरवणी
अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील होते. राज्याचे
मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी
चव्हाण यांचेकडे पाटण तालुक्यातील नुकसान
झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली
होती. त्यानुसार मुंबई या ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी
अर्थसंकल्पामध्ये 25 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमध्ये नागठाणे तारळे
पाटण रस्ता प्रजिमा 37 कि.मी.27/00 ते 38/00 भाग सडावाघापूर ते पाटण रस्ता रुंदीकरणासह
सुधारणा 400 लक्ष, वाखाणवस्ती कराड ढेबेवाडी सणबुर महिंद नाटोशी मोरगिरी चाफेर
रसता प्रजिमा- 55 किमी. 47/00 ते 50/00 (भाग
-किमी. 47/00 ते 50/00 कळकेवाडी ते कुसरुंड)
चे सुधारणा 250 लक्ष, डिचोली
नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रामा
148 कि.मी.68/00 ते 69/00 भाग तांबवे पूल ते तांबवे मध्ये रस्त्याची भौमितीक सुधारणा 300 लक्ष, मल्हारपेठ पंढरपूर रस्ता रामा 143 किमी
0/00 ते 3/00 व 6/00 ते 8/00 ते 11/800 ची सुधारणा भाग निसरे फाटा ते ऊरुल,भोळेवाडी
फाटा ते कळंत्रेवाडी ते उंब्रज 400 लक्ष, निसरे मारुल गुढे काळगांव रस्ता प्रजिता
- 54 कि.मी. 0/00 ते 35/350 भाग- कि.मी.10/00 ते 12/500 टेळेवाडी ते शिद्रुकवाडी फाटाची
सुधारणा 300 लक्ष, डिचोली
नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रामा 148 किमी
10/500 ते 15/00 भाग नेहरु उद्यान ते हेळवाक ची सुधारणा 300 लक्ष, रामा
136 ते सुपने येणके अंबवडे काढणे ते प्रजिमा 55 रस्ता प्रजिमा 66 किमी 0/00
ते 3/500 ची सुधारणा भाग सुपने ते किरपे ता.कराड 300 लक्ष, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता रामा 398
किमी 32/500 ते 35/00 भाग तारळे ते निवडे रस्ता सुधारणा 150 लक्ष, चरेगाव चाफळ त्रिपुडी आंब्रुळे कुसरुंड
नाटोशी रस्ता प्रजिमा 53 कि.मी.40/00 ते 43/00 ची सुधारणा भाग नाटोशी ते एस.एच.148
100 लक्ष या 09 कामांना 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.राज्य
शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर
झालेल्या विकास कामांची लवकरच
निविदा कार्यवाही करण्यात येऊन
दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या
असलेल्या या रस्त्यांची कामे
तातडीने हाती घेण्याच्या
सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या असल्याची
माहिती कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
चौकट: जुलैच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये माईंगडेवाडी
व गावडेवाडी खुडुपलेवाडी पुलांचे कामांसाठी 05 कोटी निधीची तरतूद.
पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांच्या प्रयत्नातून नाबार्ड 28 मधून पाटण विधानसभा मतदारसंघातील माईंगडेवाडी
ते हौदाचीवाडी ते सातर ग्रामा 302 वर माईंगडेवाडी येथे मोठया पुलाचे बांधकाम करणे
250 लक्ष व गावडेवाडी ते खुडुपलेवाडी रस्ता ग्रामा 64 वरील किमी 0/600 मधील ओढयावर
पोहोच मार्गासह पुलाचे बांधकाम 250 लक्ष ही 05 कोटी रुपयांची दोन कामे मंजूर झाली होती.या
दोन्ही पुलांचे कामांना माहे जुलै पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 05 कोटी रुपयांची तरतूदही
करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment