दौलतनगर दि. ०8:लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३7 वा पुण्यतिथी कार्यक्रम
प्रतिवर्षाप्रमाणे बुधवार दि.१२ जुलै,२०23 रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व
शिक्षण समुहाच्या वतीने महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,
दौलतनगर ता.पाटण येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात
येणार असून स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे
पाटण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे राज्य
उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न
होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण
समुहाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे
संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना
कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे
यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३7 वा पुण्यतिथी कार्यक्रम बुधवार दि.१२ जुलै, २०23रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथे
आयोजीत केला आहे. स्व.शिवाजीराव
देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने स्व.शिवाजीराव
देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम
होणार असून या कार्यक्रमानंतर सकाळी १०.०० वा. महाराष्ट्र
राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती
पुतळयास व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पाचक्र अर्पण
करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे
पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक
केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या
गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व
गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पाटण तालुक्यातील मुकबधीर
विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत होणार
आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, हितचिंतक, पालकवर्ग,विद्यार्थी व
कार्यकर्ते या सर्वांनी सकाळी १०.०० वा महाराष्ट्र दौलत
लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,दौलतनगर ता.पाटण येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग
नलवडे यांनी पत्रकात केले आहे.
चौकट:- 12 जुलैला पाटण तालुका कराड रहिवाशी मित्रमंडळाचा
कराडला अकरावा वर्धापन दिन कार्यक्रम.
स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे ३7 व्या
पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रम व
कराड येथे पाटण तालुक्यातील रहिवाशी असणा-या नागरीकांकरीता
स्थापन केलेल्या पाटण तालुका मित्रमंडळाचा 11 वा वर्धापन दिन व गुणवंत पाल्य पुरस्कार सोहळा
असा संयुक्त कार्यक्रम राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार
शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार 12 जुलै,2023
रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सायं.05वा.अक्षता मंगल कार्यालय, मलकापूर,कराड या ठिकाणी आयोजित करण्यात आला
आहे.
तसेच मंत्री ना.शंभूराज देसाई यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात राज्य
उत्पादन शुल्क मंत्री व सातारा,ठाणे
जिल्हा पालकमंत्री म्हणून तर मा.यशराज देसाई (दादा) यांची लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहिर सत्कार
कार्यक्रमाचे आयोजन याप्रसंगी करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास पाटण तालुका
कराड रहिवाशी बंधू भगिनींनी मोठया
संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन कराड रहिवाशी मित्र मंडळाकडून करण्यात आले असून सन 2023 मध्ये इ.
05 वी ते पदवी परिक्षेत किमान 70 टक्के पेखा जास्त गुण मिळविणाऱ्या
विद्यार्थ्यांनी दि. 10 जुलै 2023 पर्यंत आपले नाव,पत्ता व गुणपत्रिकेची
झेरॉक्स प्रत शिवदौलत सहकारी बँकेच्या मलकापूर शाखेमध्ये जमा करावी असेही आवाहन
करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment