दौलतनगर दि.19:-गेल्या 24 तासांत पाटण तालुक्यामध्ये पडत असलेल्या मुसधार
पावसाने आज रौद्ररुपधारण करत सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी लावली.कालपासून पडत
असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदी दुधडी भरुन वाहू लागली असून मुळगाव व पाटण
या गावांना जोडणारा मुळगाव पुलाला कोयना नदीच्या पुराचे पाणी लागले आहे तर पाटण
बसस्थानक परिसरामध्ये पावसाचे पाणी येण्यास सुरुवात झाली असल्याने या दोन्ही
ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी पाहणी केली.दरम्यान मुंबई याठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामुळे
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई हे पुर्णवेळ व्यस्त असल्याकारणाने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चेअरमन
मा.यशराज देसाई (दादा) यांनी पुरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज हा पाहणी दौरा
करुन पुरपरिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी मा.यशराज देसाई(दादा) यांचे समवेत पाटणचे नायब तहसिलदार बोरकर,सहा. पोलीस निरिक्षक पाटील,सार्वजनिक
बांधकाम विभागाचे, जि.बांधकाम
विभागाचे प्र. उपअभियंता संदिप पाटील यांचेसह मिलिंद पाटील, सलीम इनामदार, बशीर खोंदू, गणेश भिसे, प्रमोद
मोहिते,
सुधीर नायकवडी, स्वप्निल मोरे, पंकज नायकवडी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची
उपस्थिती होती.
कालपासून कोयना
धरण पाणलोट क्षेत्रासह
पाटण तालुक्यात
मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या
कोयना धणाच्या पाणीसाठयात 24 तासात
तब्बल 3.8 टीएमसीने वाढ झाली
आहे. पाटण तालुक्यात सर्वदूर
मुसळधार पाऊस पडत आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये सुमारे
307 मीमी
पेक्षा जादा पावसाची नोंद
झाली असून कोयना धरणात
33.37
टिएमसी पाणी
साठा झाला असून कोयना
धरणाच्या पाणीसाठयामध्ये झपाटयाने
वाढ होत आहे.काल
पासून पडत असलेल्या मुसळधार
पावसामुळे कोयना नदी दुधडी
भरून वाहू लागली असून
नदीच्या पाणी पातळीतही वाढ
झाली असल्याने पाटण ते मुळगाव
रस्त्यावरील मुळगाव पुलाला कोयना नदीचे पाणी लागले असून हा पूल कधीही पुराच्या पाण्याखाली जाण्यासारखी
परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच पाटण बसस्थानक परिसरातील
पुराच्या पाण्याची पाहणी केली.यावेळी
मुळगाव पुलावरुन अचानक पाणी जाऊ लागल्यास तात्काळ हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्याकरीता
तातडीच्या कोणत्या उपाय योजना केल्या आहेत याची माहिती संबंधित अधिकारी यांचेकडून घेऊन
या पुलावरुन ये-जा करणाऱ्या नागरीकांना प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात
गावामध्ये सर्व नागरीकांना माहिती देण्यात यावी जेणेकरुन कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची प्रशासनाकडून काळजी
घेण्यासंदर्भात उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
चौकट:ना.शंभूराज
देसाई यांचे प्रमाणेच मा.यशराज देसाई(दादा) यांची कार्यपध्दती.
पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी,राज्य उत्पादन शुल्कमंत्री
ना.शंभूराज देसाई हे प्रतिवर्षी अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये पुरसदृश्य असलेल्या ठिकाणी
शासकीय अधिकारी यांना घेऊन भेट देत प्रशासनाकडून केलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी
करण्याकरीता अधिकाऱ्यांना सूचना देतात.विशेषत: कोयना नदीला आलेल्या पुरामुळे प्रतिवर्षी
पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या मुळगाव व नेरळे या दोन पुलांच्या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत
पाहणी करत असतात.यावेळी मुंबई या ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशामध्ये नामदार
शंभूराज देसाई हे व्यस्त असल्याने मतदारसंघातील पुरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन
त्यांचे सुपुत्र लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज
देसाई(दादा) यांनी आज मुळगाव पुल व पाटण बसस्थानक परिसरातील पुरपरिस्थितीची पाहणी केली.त्यामुळे
ना.शंभूराज देसाई यांचेप्रमाणेच चेअरमन मा.यशराज देसाई यांची कार्यपध्दती असल्याची
चर्चा उपस्थितांमध्ये होती.
No comments:
Post a Comment