Friday 7 July 2023

शिवशंभू दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या चेअरमन पदी श्री.अधिकाराव पाटील तर व्हा.चेअरमन पदी श्री.संजय शिर्के यांची बिनविरोध निवड.

 


       


दौलतनगर दि.07: महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे मार्गदर्शनाखाली दौलतनगर,ता.पाटण येथील शिवशंभू दूध उत्पादक व  प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाची सन 2023-24 ते 2028-29 ची पंचवार्षिक निवडणूक नुकतिच बिनविरोध पार पडली.शिवशंभू दूध संघाच्या चेअरमन पदी श्री.अधिकाराव पाटील तर व्हा.चेअरमन पदी श्री. संजय शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नवनिर्वाचित चेअरमन,व्हा.चेअरमन व नूतन संचालक मंडळाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई,चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई (दादा) यांनी अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती  गितांजली कुंभार यांनी काम पाहिले.

           महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे मार्गदर्शनाखाली दौलतनगर,ता.पाटण येथील शिवशंभू दूध उत्पादक व  प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणूकीत सर्वसाधारण गटातून सर्जेराव शिर्के आडूळ, किसन कवर पिंपळगाव,आबासो शिंदे आबदारवाडी,पांडूरंग पाटील गारवडे,संजय शिर्के आडूळपेठ,जयदिप जाधव खोणोली, अधिक पाटील पापर्डे, विलास देसाई येराडवाडी,संदिप यादव डेरवण, किशोर बारटक्के तारळे तसेच महिला राखीव गटातून सुशीला शेलार यांची बिनविरोध निवड झाली.काल झालेल्या चेअरमन व व्हा.चेअरमन निवडीमध्ये चेअरमन पदी श्री.अधिक पाटील तर व्हा.चेअरमन पदी श्री.संजय शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

No comments:

Post a Comment