दौलतनगर दि.27:- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत
आरल दिवशी खुर्द रस्त्याचे पुनर्बांधणीसाठी 03 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा
शासन निर्णय राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाने पारित केला असून या कामाची निविदा प्रक्रीया
पुर्ण झाली आहे.पाऊस कमी होताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या आरल
दिवशी खुर्द रस्त्याचे कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आरल गावचे ग्रामस्थ विलास कदम,तानजी पवार व जगन्नाथ पवार यांनी प्रसिध्दीपत्रकांत
दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे
की, माहे जुलै 2021 रोजी पाटण तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे केरा
विभागातील आरल दिवशी रस्त्याचे मोठया प्रमाणांत नुकसान होऊन या गावाचा दळण-वळणाचा मोठा
गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.आरल दिवशी गावाचे दळण-वळण पुर्ववत सुरळीत होण्यासाठी
कै.बबनराव माळी (आप्पा) व आम्ही पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचेकडे लेखी निवेदन देऊन प्राधान्याने या रस्त्यावरील ओढयावरील
साकव बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यासंदर्भात
सातत्याने पाठपुरावा केला होता.तसेच आमचे आरल गावचा रस्त्यासाठी भरघोस निधी मंजूर करुन
त्याचे काम लवकर सुरु करण्यासाठीही निवेदन दिले आहे. आमच्या ग्रामस्थांच्या मागणीची पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तातडीने दखल
घेऊन आरल रस्त्यावील दोन साकवांचे बांधकाम करण्यासाठी अतिवृष्टी व पूरहानी योजनेअंतर्गत 60 लक्ष रुपयांचा
निधी मंजूर केला. फक्त निधीच मंजूर केला नाही तर यंदाच्या पावसाळयापूर्वी या दोन साकव
पूलांची कामे सध्या पुर्णत्वास गेली आहे.तसेच उर्वरित असलेला आरल पोहोच रस्त्याचे कामासाठी
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 03 कोटी रुपयांचा
निधी मंजूर केला असून या कामाची सध्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर
लगेचच या कामास सुरुवात होऊन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातूनच आरल गावच्या
रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला आहे.त्यामुळे गेल्या देान तीन दिवसांपासून
विनाकारण रस्त्याचे कामासंदर्भात गैरसमज पसरवला जात आहे.परंतु पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचेकडून आरल गावच्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला असून ज्यांना
या गोष्टीची माहिती नाही त्यांनी अगोदर माहिती घ्यावी व खात्री करुनच मग प्रसिध्दीमाध्यमांना
द्यावी असे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
चौकट: विकास कामांना विरोध करणाऱ्या मंडळींचाच कांगावा.
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून नुकताच
आरल गावामध्ये अंतर्गत रस्त्याचे काम चालू
होते.परंतु गावातील काही विघ्नसंतोषी मंडळींना केवळ विकास कामे होत असल्याचे
बघवत नसल्याने या मंडळींनी पाईप लाईनचे काम करतोय म्हणून अंतर्गत रस्ता पुर्णपणे उखडून
टाकला.परंतु गावातील हिच विकास कामांना विरोध करणारी मंडळी आता आरल गावच्या रस्त्याच्या
कामासंदभा्रत सगळीकडे कांगावा करत सुटली असून या मंडळींनी आरल रस्त्याच्या कामाची अजिबात
काळजी करुन नये कारण आम्ही ग्रामस्थ या रस्त्याचे काम पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचेकडून पुर्णत्वाकडे नेण्यासाठी सक्षम असल्याचेही ग्रामस्थांनी म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment