दौलतनगर दि.11: महाराष्ट्र खनिज विकास
निधी अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील
विकास कामांकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये मतदारसंघातील रस्ते व जिल्हा
परिषद शाळेतील कामांकरीता निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी
राज्याचे खनिकर्म मंत्री ना.दादाजी भुसे यांचेकडे विनंती केलेली होती. त्यानुसार महाराष्ट्र
खनिज विकास निधी अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पाटण विधानसभा
मतदार संघातील मतदारसंघातील रस्ते व जिल्हा परिषद शाळेतील विकास कामांकरीता 02 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय
राज्य शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाकडून पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील विकास कामांकरीता
सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये मतदारसंघातील रस्ते व जिल्हा परिषद शाळेतील
कामांकरीता निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे खनिकर्म
मंत्री ना.दादाजी भुसे यांचेकडे विनंती केलेली होती.त्यानुसार महाराष्ट्र खनिज विकास
निधी अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील
मतदारसंघातील रस्ते व जिल्हा परिषद शाळेतील विकास कामांकरीता 02 कोटी 15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय
राज्य शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाकडून पारित केला असून यामध्ये कोंजवडे
ते सवारवाडी रस्ता सुधारणा 50 लक्ष, माजगाव ते ऊरुल रस्ता सुधारणा 01 कोटी 25 लक्ष, चेवलेवाडी पोहोच रस्ता सुधारणा 25 लक्ष,कोयनानगर येथील जिल्हा परिषद शाळेतील कामे 05 लक्ष,कामरगाव
येथील जिल्हा परिषद शाळेतील कामे 05 लक्ष, ऐनाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील कामे
05 लाख, पाडळी,ता.कराड येथील जिल्हा परिषद शाळेतील कामे 05 लक्ष या 02 कोटी 20 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा समावेश असून या
कामांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच या मंजूर विकास कामांचे अंदाज पत्रक
तयार करण्याची कार्यवाही करुन या कामांची निविदिा प्रक्रिया तातडीने करुन मंजूर विकास
कामांना तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित
अधिकारी यांना सूचना केल्या असल्याचे शेवटी
प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment