Thursday 17 October 2024

एका विचाराने हातात हात घालून तालुक्याचा विकास करण्याचे काम करुया.ना.शंभूराज देसाई.


दौलतनगर दि.17-  गत दोन वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे सहकार्याने राज्यातील शिवसेना भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकारासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात यश आले. गावा-गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या अडचणी  लक्षात घेऊन त्यांच्या मागणीनुसार विविध विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परिणामी गावच्या गावे विकास प्रवाहात सामिल झाल्याचे चित्र सध्या दिसत असून शिवसेना पक्षामध्ये नव्याने पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना जुना-नवा असा भेदभान न करता यापुढे  सन्मानाची वागणूक देत एका विचाराने हातात हात घालून तालुक्याचा विकास करण्याचे काम करुया,असे आवाहन ना.शंभूराज देसाई यांनी केले.

                 ते दौलतनगर,ता.पाटण येथे गत दोन वर्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संवाद मेळाव्याप्रसंगी  बोलत होते.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),चि.जयराज देसाई(दादा),शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,ॲङमिलिंद पाटील,ॲङडी.पी.जाधव,संजय देशमुख,बबनराव शिंदे,प्रदिप पाटील,जालंदर पाटील,संतोष गिरी,भरत साळूंखे,प्रशांत पाटील,नामदेव साळूंखे,बाळासो खबाले पाटील,निलेश मोरे,विजय शिंदे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

                 यावेळी बोलताना ते पुढे  म्हणाले की, पाटण तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने गटा तटाच्या राजकारणाला सन 1980 साली सुरुवात झाली.पाटण तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये डोंगरा एवढ काम करणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांना या कालावधीत तालुक्यातील काही मंडळींनी जाणिव पूर्वक त्रास देण्याचे काम केले.त्रास देणाऱ्या या मंडळींनी त्यावेळी मनाचा मोठेपणा दाखवायच काम करायला हव   होतं पण प्रत्यक्षात तस झालं नाही. त्यामुळे विरोधकांकडे असलेली आमदारकीची सत्ता सर्व सामान्य जनतेच्या हातात यायला 21 वर्ष लागली. या काळात आपण अनेक प्रसंगांना सामोरे गेलो. सत्ता नसताना अनेक सुख दुखाचे प्रसंग अनुभवले,चढ उतार पाहायला मिळाले,पराभवांना सामोरे जावे लागले पण मैदान सोडले नाही. पराभवामुळे अनेकवेळा कार्यकर्ते दुखी व्हायचे  परंतु त्यांना धीर देत विजय मिळवायच्या हेतूने नेहमी प्रयत्नशील राहिलो.पराभवाच्या दुसऱ्या दिवशी  कामाला लागत स्वत:च्या नशिबात विजय नव्हता,स्वता:ला जबाबदार धरत पुन्हा जोमाने कामाला लागलो.आपला पक्ष संघटना वाढविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख यांनी ज्या भाजपा पक्षाच्या युतीच्या माध्यमातून मते मागून निवडणूक लढवली त्या भाजपा पक्षाशी फारकत घेत महाविकास आघाडीची स्थापना करत सत्ता स्थापन केली. आपण तालुक्यामध्ये ज्यांच्या विरोधात कायम पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून पिढयान पिढया लढलो त्यांच्या सोबतच आघाडी करण्याची वेळ आली.परंतु मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला आणि राज्यात पुन्हा भाजपा शिवसेना महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी  सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री  त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या.त्यामुळे मतदारसंघामध्ये संपर्क कमी झाला.परंतु असे असले तरी प्रत्येक आठवडयाच्या शनिवार व रविवारी मतदारसंघामध्ये येऊन जनता दरबार घेऊन लोकांच्या अडी अडचणी जागेवर सोडविण्याचा प्रयत्न केला.गत दोन वर्षामध्ये अनेक विकासाची कामे मार्गी लावण्याचे काम केले. गावा गावांत वाडी वस्तीवर विकासाची कामे होऊ लागल्याने अनेक गावातील कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने  शिवसेना पक्षामध्ये मोठया प्रमाणांत जाहिर प्रवेश केले.अनेक गावे विकासाच्या प्रवाहात सामिल झाली.केवळ पक्षप्रवेश करुन आपण थांबलो नाही तर ज्या ज्या गावांना विकास कामांची आश्वासन दिली ती विकासाची कामे मंजूर करत मार्गी लावली.त्यामुळे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना विकासाच्या प्रवाहात आल्याचे निश्चत समाधान असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षामध्ये जूना नवा असा कदापि भेदभाव होणार नाही.आपण संघटना म्हणून एकत्र आलो आहे.गावाचा विकास साधण्याबरोबर आपली संघटना कशी वाढेल यासाठी सांघिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. आता निवडणुका जवळ आल्या की काही मंडळी फोन करत भावनिक आव्हाहन करत आहेत. ती विरोधकांची जूनी सवय आहे.त्यांच्या भावनिकतेला बळी  पडू नका. जेामाने विकासाचे काम करायच असल्याने महिनाभर एक एक मत मिळवण्यासाठी प्रयत्न करुया. कसल्याही भूलथापांना बळी न पडता शिवसेना भाजपा महायुतीची ताकद अधिक बळकट करुया.

चौकट : तीच खरी श्रध्दांजली....

विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. दि. 20 नोव्हेंबर ही स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचा जयंती  दिन आहे. स्व.आबासाहेब यांचे अपूर्ण स्वप्न हे सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादने आपण पूर्ण करु शकलो.त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी 20 नोव्हेंबरला जास्तीत जास्त मतदान शिवसेना पक्षाला करुन जास्तीत जास्त मताधिक्याने निवडूण येण्यासाठी प्रयत्न करुयात तीच खरी स्व.शिवाजीराव देसाई (स्व.आबासाहेब) यांना श्रध्दांजली ठरेल असे ना.शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगीतले.


Monday 14 October 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन मधून 9 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी.

 

दौलतनगर दि.14:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामे कोयना भूकंप पुनर्वसन निधी मधून मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती.त्यानुसार कोयना भूकंप पुनर्वसन निधीमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील  सभामंडप,संरक्षक भिंती,अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामांसाठी 9 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन-मदत व पुनर्वसन) विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील  सभामंडप,संरक्षक भिंती,अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारती नादुरुस्त झाले असल्याने या रस्त्यांचे कामांसाठी निधी मंजूर होण्यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी केली होती. सदर गावातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता या गावांतील अंतर्गत सभामंडप,संरक्षक भिंती,अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी विकास कामे ही कोयना भूकंप पुनर्वसन निधी मधून मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती. त्यानुसार कोयना भूकंप पुनर्वसन निधीमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील  अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामांसाठी 9 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन-मदत व पुनर्वसन) विभागाने पारित केला असून यामध्ये कुसवडे दिवशी खुर्द स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लक्ष, चिंचेवाडी ज्ञानेश्वर महाराज सभामंडप 15 लक्ष, लोरेवाडी नुने सभामंडप 15 लक्ष, डोणी येथे सभामंडप 15 लक्ष, कडवववाडी नाणेगाव बु येथे सभामंडप 15 लक्ष, केळोली केदारलिंग मंदिर संरक्षक भिंत 15 लक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाटण म्हावशी पेठ दुरुस्ती 50 लक्ष, गणेवाडी ठोमसे त्र्यंबकेश्वर मंदिर सभामंडप 15 लक्ष, जमदाडवाडी कदमनगर प्रा.शाळा ते ओढया बंदीस्त गटर 10 लक्ष, आबदारवाडी छ.शिवाजी महाराज स्मारक परिसर सुशोभिकरण 5 लक्ष, कवरवाडी सुतारवस्ती सभामंडप 10 लक्ष, बेलवडे खुर्द विक्रम मंडळ सभामंडप 15 लक्ष, वरंडेवाडी आंबेघर काळूबाई मंदिरासमोर सभामंडप 15 लक्ष, मोरगिरी सुतारवस्ती येथे सभामंडप 15 लक्ष, पेठशिवापूर येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 25 लक्ष, शिंदेवाडी येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप 15 लक्ष, मंगेवाडी मरळी येथे दत्त मंदिर सभामंडप 15 लक्ष, सातर येथे सभामंडप 15 लक्ष, जिंती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, सळवे कुंभार समाज सभामंडप 15 लक्ष, निनाईवाडी कसणी येथे सभामंडप 15 लक्ष, माटेकरवाडी येथे सभामंडप 15 लक्ष, गलमेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या मोकळया जागेमध्ये सभामंडप 15 लक्ष, खिवशी सुतारवस्ती सभामंडप 15 लक्ष, बोत्रेवाडी कुंभारगाव कॅनाल ते वाडी संरक्षक भिंत 25 लक्ष, कोळगेवाडी विहिर बांधकाम 10 लक्ष, येराड खंडूचा वाडा विहिर बांधकाम 5 लक्ष, वस्ती साकुर्डी येथे रामोशी समाज सभामंडप 15 लक्ष, काढणे स्मशानभूमी सुधारणा 10 लक्ष, पाडळी पाडळेश्वर मंदिर संरक्षक भिंत 15 लक्ष, केसे येथे येथे मुस्लिम दफन भूमी ते वारुंजी शिव रस्त्यावर मोरी बांधकाम व रस्ता सुधारणा 20 लक्ष, कोरिवळे शिवाजी आनंदा शिंदे यांचे घर ते यशवंत तुकाराम शिंदे यांचे घरापर्यंतचा आर.सी.सी.गटर 15 लक्ष, कोंडावळे रस्ता सुधारणा 20 लक्ष, सलतेवाडी वाझोली उर्वरित रस्ता सुधारणा 15 लक्ष, सुर्यवंशीवाडी सांगवड जोतिबा मंदिर ते स्मशानभूमी रस्ता 20 लक्ष, मोडकवाडी जिंती हेळोबा देवस्थान सुधारणा 20 लक्ष, सणबूर विठ्ठलवाडी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 15 लक्ष, झाकडे पवारवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, सुपुगडेवाडी कुठरे ता.पाटण येथे अंतर्गत कदमवस्ती व लोकरेवस्ती रस्ता सुधारणा 15 लक्ष, पाचुपतेवाडी चोपदार बांध ते जाधववाडी रस्ता  सुधारणा 20 ल क्ष, खालची शिद्रुकवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, शेडगेवाडी मस्करवाडी  संरक्षक भिंत 20 लक्ष, राजवाडा घाणव रस्ता सुधारणा 5 लक्ष, खिवशी येथे सभामंडप सुधारणा 8 लक्ष, खिवशी सभामंडप वाढीव काम 5 लक्ष, महाबळवाडी दाढोली येथे दत्त मंदिरासमोर ग्रामपंचायतीच्या मोकळया जागेमध्ये  सभामंडप 13 लक्ष, साखरी येथे संरक्षक भित 20 लक्ष, ढेरुगडेवाडी येराड येथे शाळा खोली 14 लक्ष, घाणव शेळकेवस्ती रस्ता सुधारणा 10 लक्ष, सडानिनाई उर्वरित रस्ता सुधारणा 15 लक्ष, सुभाषनगर कराड चिपळूण रोड वडाचे झाड ते बाळासो शिर्के यांचे शेड रस्ता सुधारणा 15 लक्ष, हेळवाक कोंडीबा शेलार यांचे घर ते मुख्य रस्ता सुधारणा 15 लक्ष, कुशी ते वेखंडवाडी रस्ता सुधारणा 15 लक्ष, कुसरुंड गांधीनगर ते हायस्कूल अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, हारुगडेवाडी नाडोली अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, नाव बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 10 लक्ष, गोवारे गवळीनगर येथे रस्ता सुधारणा 20 लक्ष, केरळ नंदा पवार यांचे घर ते झरा रस्ता व मोरी बांधकाम 20 लक्ष, घाटेवाडी मालोशी सालादेवी मंदिर रस्ता सुधारणा 25 लक्ष, नुने खराडेवस्ती महाडीकवाडी केदारेश्वर मंदिर पोहोच रस्ता सुधारणा 25 लक्ष, धडामवाडी केरळ येथे ओढयावर स्लॅब ड्रेन 25 लक्ष या 61 कामांना 9 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी  मंजूर झाला असल्याचे पत्रकांत म्हंटले आहे.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 3 कोटी तर नाविण्यपूर्ण योजना विशेष घटक योजनेतून 1 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 



 

दौलतनगर दि.14:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील प्रसिध्द असलेली तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी पर्यटन मंत्री ना.गिरीशजी महाजन यांचेकडे शिफारशी केल्या होत्या. तर मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमधील अभ्यासिका व पत्र्याचे सभामंडप बांधण्याची कामे ही सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये प्रस्तावित केली होती. त्यानुसार प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 8 कामांना 3 कोटी तर जिल्हा वार्षिक आराखडयातून नाविण्यपूर्ण योजना (विशेष घटक) मधून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका व सामाजिक सभागृहांचे कामांना 1 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील प्रसिध्द असलेली तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी पर्यटन मंत्री ना.गिरीशजी महाजन यांचेकडे शिफारशी केल्या होत्या. तर मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमधील अभ्यासिका व सामाजिक सभागृह बांधण्याची कामे ही सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये प्रस्तावित केली होती.तसेच या विकास कामांना निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये दौलतनगर श्री गणेश मंदिर परिसर सुधारणा 100 लक्ष, मालोशी श्री जानाई मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष, मारुल तर्फ पाटण शेळकेवस्ती श्री हनुमान मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष, येराड श्री येडोबा मंदिर परिसरामध्ये यात्री निवासासह सुधारणा 55 लक्ष, पाबळवाडी तारकेश्वर मंदिर सुशोभिकरण 25 लक्ष, गव्हाणवाडी निनाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, नाडे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुधारणा 30 लक्ष, आटोली वाघजाई देवी मंदिर रस्ता सुधारणा 25 लक्ष या 8 कामांना 3 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.तर पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका व सभामंडप बांधण्याच्या कामांमध्ये बाचोली मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लक्ष, हेळवाक मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लक्ष, तारळे बौध्दवस्ती वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लक्ष, गारवडे मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लक्ष, पापर्डे खुर्द मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लक्ष, कुठरे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह 25 लक्ष व हेळवाक मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह 25 लक्ष या 7 कामांना 1 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

Saturday 12 October 2024

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचा गळीत हंगाम सभासद शेतकरी यांनी यशस्वी करावा.-चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा) लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा 51 वा बॉयलय अग्निप्रदिपन कार्यक्‌रम संपन्न.

 

दौलतनगर दि.12-  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहिला असून कारखान्याचे विस्तारवाढीचे काम पुर्णत्वाकडे गेले असून कारखान्याचा सन 2024-25 चा गळीत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सभासद शेतकरी यांनी यशस्वी करावा असे आवाहन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा) यांनी केले.

            ते दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 1 व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याचे संचालक मा.श्री.सुनिल शिवराम पानस्कर व त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सौ. मंगल सुनिल पानस्कर यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग नलवडे,माजी चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,ॲङडी.पी.जाधव,ॲङमिलिंद पाटील, सभापती बाळासो पाटील,संचालिका सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर,जालंदर पाटील,संचालकसर्जेराव जाधव,प्रशांत पाटील,शशिकांत निकम,शंकरराव पाटील,बळीराम साळूंखे,लक्ष्मण बोर्गे,सुनील पवार,वाय.के.जाधव,हेमंत पवार, गोरख देसाई,प्रकाशराव जाधव,राजाराम मोहिते,कार्यकारी संचालक सुहास देसाई तसेच कारखान्याचे सर्व संचालक,सभासद,ऊस उत्पादक शेतकरी,अधिकारी,कामगार वर्ग हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              चेअरमन यशराज देसाई(दादा) म्हणाले की,गेल्या पन्नास वर्षापासून देसाई कारखाना यशस्वीरित्या गाळप करीत आहे. मात्र यावर्षीपासून सर्व शेतकरी सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 1250 मेट्रिक टनाचा हा कारखाना तीन हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा करण्यात आला आहे.तर आपले लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने  संपूर्ण एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. असे असतानाही जाणीवपूर्वक बाहेरच्या काऱखान्याला ऊस घालणाऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे असे सांगत ते पुढे म्हणाले की,राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी साखरेचा किमान विक्री दर हा 38 रुपये करावा अशी केंद्र सरकारकडे मागणी केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी यासंदर्भात केंद्रीय सहकारी मंत्री ना.अमित शहा यांना भेटून  तालुक्यातील शेतक-यांनी व सभासदांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता देवून गळीत हंगाम य़शस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी प्रयत्न करावेत असे आवाहन चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी शेवटी  केले.

 

 

राहून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास व्यक्त करून कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या खात्यावर एफ.आर.पी. ची सर्व रक्कम अदा करून ही संस्था नावारूपाला आणण्यासाठी सभासद शेतकरी यांच्याबरोबर कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग आहे त्यासाठी यावर्षी देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस जाहीर करत असल्याची घोषणा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी केली.दरम्यान हा निर्णय देसाई कारखान्याच्या सभासद शेतकरी आणि कामगारांना खऱ्या अर्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे.

 

Friday 11 October 2024

शनिवार दि.12 ऑक्टोंबर रोजी विजया दशमी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम.

 दौलतनगर दि.11:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन २०24-25 च्या 51 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शनिवार दि.12ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 0.30 वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई(वहिनीसाहेब) यांचे शुभहस्ते तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा) व मा.डॉ.सौ.वैष्णवीराजे यशराज देसाई(वहिनीसाहेब),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळ दौलतनगर (मरळीयेथे संपन्न होणार आहेया कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक श्री.सुनिल शिवराम पानस्कर व त्यांच्या पत्नी सौ. मंगल सुनिल पानस्कर यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयेाजित केली असून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमास कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद,शेतकरी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 



Tuesday 8 October 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून विद्युत विकास कामांसाठी 2 कोटी 88 लक्ष रुपयांचा निधी. जिल्हा वार्षिक आराखडयात विद्युत विकास योजने अंतर्गत वाढीव पोल,रोहित्र,थ्री फेजची कामे लागणार मार्गी.


         

दौलतनगर दि.08:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत कामांचा समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण मतदारसंघातील वीज पुरवठा सुरळीत होण्याचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाढीव पोल, नवीन रोहित्र, थ्री फेज लाईन,गंजलेले पोल बदलणे इत्यादी कामांसाठी निधीची आवश्यकता होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत 2 कोटी 88 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांमधील वीज पुरवठा सुरळीत होण्याचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाढीव पोल, नवीन रोहित्र, थ्री फेज लाईन,गंजलेले पोल बदलणे इत्यादी कामांसाठी निधीची आवश्यकता होती. या कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये शिफारस केली होतीत्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत 2 कोटी 88 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला वाढीववस्ती विद्युतीकरणांतर्गत आंबेघर किसरुळे 1.41 लक्ष, आंब्रग 0.55 लक्ष, आचरेवाडी नं. 2 0.29 लक्ष, इनामवाडी नाटोशी बौध्दवस्ती 2.25 लक्ष, कडवे खुर्द 2.88 लक्ष, कडवे बुद्रुक 2.60 लक्ष, कळंत्रेवाडी कुंभारगाव 0.71 लक्ष, काटकरवाडी मंद्रुळकोळे 1.04 लक्ष, काठी 4.42 लक्ष, काढणे 1.17 लक्ष, कुठरे 1.22 लक्ष, केर 1.89 लक्ष, खळे ते मालदन  रस्ता 2.09 लक्ष, खांडेकरवाडी 2.59 लक्ष, खिलारवाडी सोनाईचीवाडी 2.90 लक्ष, खुडेवाडी धायटी   1.09, गलमेवाडी 1.04 लक्ष, गारवडे 1.26 लक्ष, गारवडे 0.74 लक्ष, गुरेघर ता.पाटण प्रशांत पवार यांचे घराकडे 1.04 लक्ष, गुरेघर 0.55 लक्ष, घाटेवाडी मालोशी 2.29 लक्ष, चाळकेवाडी 1.17 लक्ष, चोपदारवाडी 3.65 लक्ष, डावरी 1.06 लक्ष, तोंडोशी 3.12 लक्ष, दाढोली 0.78 लक्ष, दिक्षी 0.56 लक्ष, दिवशी बु  01.00 लक्ष, धावडे 1.27 लक्ष, नवजा 0.70 लक्ष, नवजा 1.04 लक्ष, पांढरेपाणी 3.46 लक्ष, पाडळी 7.71 लक्ष, पाडळोशी 3.44 लक्ष, पापर्डे 2.55 लक्ष, पाळशी 2.64 लक्ष, बनपेठ 3.51 लक्ष, बहुले 2.08 लक्ष, बांबवडे 4.03 लक्ष, बाचोली 2.13 लक्ष, बाटेवाडी 0.80 लक्ष, बेलवडे खुर्द 7.18 लक्ष, बोडकेवाडी 3.42 लक्ष, भालेकरवाडी डावरी 1.06 लक्ष, भोकरवाडी सावरघर 3.75 लक्ष, भोळेवाडी 3.36 लक्ष, मंद्रुळकोळे 1.93 लक्ष, मणदुरे 4.17 लक्ष, मत्रेवाडी 1.46 लक्ष, मरड कुसवडे 1.34 लक्ष, मराठवाडी 1.49 लक्ष, मल्हारपेठ 4.57 लक्ष, मळा 1.80 लक्ष, मसुगडेवाडी दाढोली 1.47 लक्ष, महिंद 2.90 लक्ष, महिंद 0.77 लक्ष, माईंगडेवाडी जिंती 1.97 लक्ष, माजगाव धुमाळवस्ती 2.38 लक्ष, माजगाव 6.69 लक्ष, मानाईनगर 1.19 लक्ष, मारुलहवेली 3.00 लक्ष, मारुलहवेली 5.93 लक्ष, मालदन,जाधववाडी व पानवळवाडी 5.65 लक्ष, मिरगाव 1.19 लक्ष, मुळगाव 3.58 लक्ष, मोरगिरी 0.55 लक्ष, मोरगिरी 3.03 लक्ष, म्हारवंड 1.95 लक्ष, येरफळे 1.73 लक्ष, राजवाडा घाणव 3.90 लक्ष, लेंढोरी 3.84 लक्ष, वन कुसवडे 2.55 लक्ष, वर्पेवाडी सळवे 2.42 लक्ष, वस्ती साकुर्डी ता.कराड 4.05 लक्ष, वाडीकोतावडे 0.55 लक्ष, विठ्ठलवाडी शिरळ 1.76 लक्ष, शिद्रुकवाडी वरची कोरिवळे 1.72 लक्ष, शिद्रुकवाडी वरची खळे 1.64 लक्ष, शेंडेवाडी 2.42 लक्ष, शेडगेवाडी विहे 2.90 लक्ष, सडानिनाई 0.78 लक्ष, सडावाघापूर 1.93 लक्ष, सणबूर 3.81 लक्ष, सांगवड 6.64 लक्ष, साईकडे 2.42 लक्ष, साजूर ता.कराड 10.59 लक्ष, सोनवडे 4.17 लक्ष, हावळेवाडी 2.18  लक्ष, हुंबरवाडी 1.06 लक्ष, हेळवाक 4.30 लक्ष, सुपने ता.कराड 6.29 लक्ष, शितपवाडी येथे थ्री फेज लाईन 1.76 लक्ष, शिंदेवाडी येथे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेस वीज पुरवठा 2.81 लक्ष, लेंढोरी येथे थ्रीफेज लाईन 2.45 लक्ष, म्हारवंड 11 गंजलेले पोल 2.90 लक्ष, मल्हारपेठ येथील उच्चदाब वाहिनी भूमिगत 11.13 लक्ष, भोळेवाडी म्होप्रे बेलदरे येथे 16 तास वीज पुरवठा जोडणी 20.70 लक्ष, बाचोली येथे थ्री फेज लाईन 1.73 लक्ष, पेठशिवापूर वाढीव पाच पोल  व विद्युत पथदिवे लाईन पंधरा गाळे तसेच जुन्या झालेल्या विद्युत वाहिनी खराब झालेने विद्युत वाहिनी बदलणे 4.61 लक्ष, खबालवाडी येथे नवीन रोहित्र 5.82 लक्ष या कामांचा समावेश आहे. नव्याने मंजूर झालेल्या विज वितरणाच्या कामांमुळे डोंगरी व दुर्गम भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार असून या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करुन ही कामे लवकरात लवकर हाती घेण्याबाबत पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी पत्रकांत दिली आहे.

Wednesday 2 October 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून दरडप्रवण गावांतील उपाय योजनांचे कामांसाठी 27 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. धोकादयक स्थितीतील दरडप्रवण गावांत प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कामे लागणार मार्गी.

 

दौलतनगर दि.02:- पाटण विधानसभा मतदारसंघात प्रतिवर्षी होणाऱ्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांवर डोंगरकडे कोसळण्यासारखी धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते. दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या दरडप्रवण गावांचे सुरक्षिततेच्यादृष्टीने या गावांमध्ये संरक्षक भिंत,मोरी व गटर बांधकाम तसेच गुरुत्वाकर्षण  टिकवून ठेवणारी भिंत,पुरवठा आणि फिक्सिंग रॉक फॉल प्रोटेक्शन, ड्रेनेज, सिस्टमची स्थापना/नूतनीकरण,दुरुस्ती,धूप आणि उतार हालचाल कमी करण्यासाठी उपाय,ड्रेनेज वाहिन्या खोल करण्याच्या कामांचे प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केल्यानंतर महसूल व वन विभागाचे आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन विभागाकडून या दरडप्रवण गावांच्या उपाय योजनांचे प्रस्ताव सादर करण्यात येऊन पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून दरड प्रवण गावांमध्ये आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत दरड प्रतिबंधक कामे करण्यासाठी 27 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय पारित झाला असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.  

                    प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदार संघामध्ये प्रतिवर्षी मोठया प्रमाणांत अतिवृष्टी तसेच ढगफुटीसदृश्य पाऊस होत असल्याने कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांच्या वरच्या बाजूला असलेले डोंगर कडे कोसळण्याची परिस्थिती निर्माण होते. तसेच काही ठिकाणी गावांवर डोंगराचे कडे कोसळण्याचे प्रकार मागील काही वर्षात होत असल्याने या गावांतील नागरिकांमध्ये भितीचे  वातावरण निर्माण होऊन वेळ प्रसंगी येथील नागरीक हे प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले जातात.त्यामुळे या दरडप्रवण गावांमध्ये दरडी कोसळण्यास प्रतिबंधक उपाय योजना करण्याच्या हेतून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दरड प्रवण गावांतील उपाय योजनासंबंधी जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष या गावांची पाहणी करुन आवश्यक ते प्रस्ताव राज्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत विविध कामांचे प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार या विभागाकडून या दरडप्रवण गावांचे सर्वेक्षण करत उपाय योजनांसह आवश्यक असलेल्या निधीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. प्रकल्प मुल्यमापन समितीने शिफारस केलेलया प्रस्तावांना राज्य कार्यकारी समितीने मंजूरी दिल्यानंतर या प्रसतावास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बैठकीत मंजूरी  दिली. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील दरडप्रवण गावांतील उपाय योजनांतर्गत आपत्ती सौम्यीकरण करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाने राज्यासाठी राज्य आपत्ती सौम्यीकरण निधी अंतर्गत दरड प्रतिबंधक कामे करण्यासाठी 27 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय नुकताच पारित झाला असून या कामांमध्ये दिक्षी गाव संरक्षक भिंत 68.31 लक्ष, बागलेवाडी संरक्षक भिंत व मोरी बांधणे,गटर बांधणे काढणे 82.54 लक्ष, वरंडेवाडी संरक्षक भिंत व मोरी बांधणे 55.66 लक्ष, धडामवाडी संरक्षक भिंत व मोरी बांधणे,गटर बांधणे काढणे ,दरड काढणे 49.04 लक्ष, जळव संरक्षक भिंत व मोरी बांधणे गटर बांधणे काढणे दरड काढणे 70.86 लक्ष, पाबळवाडी संरक्षक भिंत व मोरी बांधणे गटर बांधणे दरड काढणे 50.56 लक्ष, लुगडेवाडी केरळ संरक्षक भिंत व मोरी बांधणे गटर बांधणे काढणे दरड काढणे 49.55 लक्ष, जोतिबाचीवाडी संरक्षक भिंत  42.24 लक्ष, झाकडे संरक्षक भिंत 42.24 लक्ष, मसुगडेवाडी संरक्षक भिंत 42.24 लक्ष, तामिणे संरक्षक भिंत व मोरी 60.72 लक्ष, पाडळोशी संरक्षक भिंत 52.92 लक्ष, लेंढोरी धनगरवाडी संरक्षक भिंत 42.24 लक्ष, गुजरवाडी म्हावशी संरक्षक भिंत 42.24 लक्ष, काळगाव संरक्षक भिंत 34.16 लक्ष, मोरगिरी जुने गावठाण संरक्षक भिंत 52.92 लक्ष, आटोली गुरेघर अंतर्गत कोकाणेवाडी संरक्षक भिंत 52.92 लक्ष, बाजे वर सरकून संरक्षक भिंत 151.80 लक्ष, गोकूळनाला कामगारव बी संरक्षक भिंत 51.87 लक्ष गुरुत्वाकर्षण  टिकवून ठेवणारी भिंत,पुरवठा आणि फिक्सिंग रॉक फॉल प्रोटेक्शन, ड्रेनेज, सिस्टमची स्थापना/नूतनीकरण,दुरुस्ती,धूप आणि उतार हालचाल कमी करण्यासाठी उपाय,ड्रेनेज वाहिन्या खोल करण्यांतर्गत किल्ले मोरगिरी 5 कोटी 22 लक्ष 93 हजार, डावरी 2 कोटी 26 लक्ष 01 हजार,महिंद 55.96 लक्ष,बनपूरी 97.65 लक्ष,सळवे 63.02 लक्ष, जितकरवाडी जिंती 50 लक्ष, जोशेवाडी काळगाव 50 लक्ष तर गुरुत्वाकर्षण  टिकवून ठेवणारी भिंत,सैल सामग्री काढून टाकणे,नाला ट्रेचिंग इ. कामांसाठी बांबवडे 35.51 लक्ष,पाडेकरवाडी 39.26 लक्ष, कळंबे 79.69 लक्ष, घोट 97.59 लक्ष,दुसाळे 35 लक्ष, किसरुळे 73.74 लक्ष, गोकूळ तर्फ हेळवाक 88.94 लक्ष, म्हारवंड  81.86 लक्ष व रासाटी 53.81 लक्ष असा 27 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  असा एकूण 27 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई  यांनी केल्या असून कामाची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने या रस्त्याचे काम हाती घेण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे शेवटी पत्रकात म्हटलं आहे.

Monday 30 September 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन मधून 8 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी. अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामे लागणार मार्गी.

 

   

दौलतनगर दि.30:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामे कोयना भूकंप पुनर्वसन निधी मधून मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती.त्यानुसार कोयना भूकंप पुनर्वसन निधीमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील  अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामांसाठी 8 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन-मदत व पुनर्वसन) विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील  अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते नादुरुस्त झाले असल्याने या रस्त्यांचे कामांसाठी निधी मंजूर होण्यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी केली होती. सदर गावातील ग्रामस्थांची दळण वळणाची होणारी गैरसोय लक्षात घेता या गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते आदी विकास कामे ही कोयना भूकंप पुनर्वसन निधी मधून मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती. त्यानुसार कोयना भूकंप पुनर्वसन निधीमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील  अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामांसाठी 8 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन-मदत व पुनर्वसन) विभागाने पारित केला असून यामध्ये मरळी अंतर्गत बंदीस्त आर.सी.सी.गटर 25 लक्ष, मरळी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 25 लक्ष, गारवडे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 25 लक्ष, मराठवाडी ते आंब्रुळकरवाडी कोळेकरवाडी जकुआई मंदिर रस्ता सुधारणा 24.99 लक्ष, सणबूर अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, उधवणे अंतर्गत रस्ता सुधारणा 19.99 लक्ष, भोसगाव स्मशानभूमी रस्ता सुधारणा 19.98 लक्ष, मराठवाडी वरची रस्ता सुधारणा 15 लक्ष, मंद्रुळकोळे खुर्द कुंभारवाडा रोडेवाडी रस्ता सुधारणा 20 लक्ष, धामणी कुंभारवाडा ते दफनभूमी रस्ता सुधारणा 19.99 लक्ष, आचरेवाडी (चौगुलेवस्ती मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 14.99 लक्ष, बागलवाडी काढणे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, पाचुपतेवाडी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 19.98 लक्ष, कुठरे अंतर्गत रस्ता  सुधारणा 14.98 लक्ष, आचरेवाडी सावंतवाडी व आचरेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा  14.99 लक्ष, बोर्गेवाडी (कुंभारगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, तुपेवाडी (काढणे) अंतर्गत रस्ता सुधारणा 19.99 लक्ष, मान्याचीवाडी (गुढे) अंतर्गत रस्ता सुधारणा 24.99 लक्ष, चौगुलेवाडी (सांगवड) रामोशीवस्ती ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 25 लक्ष, रामेल ते शेळकेवस्ती रस्ता सुधारणा 20 लक्ष, केळेवाडी वरची कडवे खुर्द अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, जिमनवाडी काळेश्वर मंदिर रस्ता सुधारणा 29.99 लक्ष, माळवाडी बेंदवाडी कडवे रस्ता सुधारणा 20 लक्ष, बिबी ते मकाईचीवाडी रस्ता सुधारणा 15 लक्ष, ढोरोशी जोतिर्लिंग देवालय रस्ता सुधारणा 30 लक्ष, जांभेकरवाडी मरळोशी धनगरवाडा रस्ता सुधारणा 40 लक्ष, गोरेवाडी मुरुड माळवस्ती रस्ता सुधारणा 20 लक्ष, बोर्गेवाडी घोट अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, चिंचेवाडी वजरोशी पोहोच रस्ता सुधारणा 20 लक्ष, जन्नेवाडी घोट आडापर्यंतचा रस्ता सुधारणा 20  लक्ष, जगदाळवाडी कडवे बु पोहोच रस्ता सुधारणा 20 लक्ष, सुर्याचीवाडी नाणेगाव बु अंतर्गत रस्ता सुधारणा 15लक्ष, वाघजाईवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, सुरुल अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, दुटाळवाडी नुने अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, हेळवाक अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, वाजेगाव ते शेळकेवस्ती मारुल तर्फ पाटण रस्ता सुधारणा 20 लक्ष, निवकणे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, काठी पासळ ते जानाईदेवी मंदिर रस्ता सुधारणा 20 लक्ष, येराडवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, पाचगणी नागवण टेक खालचे आवाड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष या कामांना 8 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे पत्रकांत म्हंटले आहे.