Monday 30 September 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन मधून 8 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी. अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामे लागणार मार्गी.

 

   

दौलतनगर दि.30:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामे कोयना भूकंप पुनर्वसन निधी मधून मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती.त्यानुसार कोयना भूकंप पुनर्वसन निधीमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील  अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामांसाठी 8 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन-मदत व पुनर्वसन) विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील  अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते नादुरुस्त झाले असल्याने या रस्त्यांचे कामांसाठी निधी मंजूर होण्यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी केली होती. सदर गावातील ग्रामस्थांची दळण वळणाची होणारी गैरसोय लक्षात घेता या गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते आदी विकास कामे ही कोयना भूकंप पुनर्वसन निधी मधून मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती. त्यानुसार कोयना भूकंप पुनर्वसन निधीमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील  अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामांसाठी 8 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन-मदत व पुनर्वसन) विभागाने पारित केला असून यामध्ये मरळी अंतर्गत बंदीस्त आर.सी.सी.गटर 25 लक्ष, मरळी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 25 लक्ष, गारवडे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 25 लक्ष, मराठवाडी ते आंब्रुळकरवाडी कोळेकरवाडी जकुआई मंदिर रस्ता सुधारणा 24.99 लक्ष, सणबूर अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, उधवणे अंतर्गत रस्ता सुधारणा 19.99 लक्ष, भोसगाव स्मशानभूमी रस्ता सुधारणा 19.98 लक्ष, मराठवाडी वरची रस्ता सुधारणा 15 लक्ष, मंद्रुळकोळे खुर्द कुंभारवाडा रोडेवाडी रस्ता सुधारणा 20 लक्ष, धामणी कुंभारवाडा ते दफनभूमी रस्ता सुधारणा 19.99 लक्ष, आचरेवाडी (चौगुलेवस्ती मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 14.99 लक्ष, बागलवाडी काढणे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, पाचुपतेवाडी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 19.98 लक्ष, कुठरे अंतर्गत रस्ता  सुधारणा 14.98 लक्ष, आचरेवाडी सावंतवाडी व आचरेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा  14.99 लक्ष, बोर्गेवाडी (कुंभारगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, तुपेवाडी (काढणे) अंतर्गत रस्ता सुधारणा 19.99 लक्ष, मान्याचीवाडी (गुढे) अंतर्गत रस्ता सुधारणा 24.99 लक्ष, चौगुलेवाडी (सांगवड) रामोशीवस्ती ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 25 लक्ष, रामेल ते शेळकेवस्ती रस्ता सुधारणा 20 लक्ष, केळेवाडी वरची कडवे खुर्द अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, जिमनवाडी काळेश्वर मंदिर रस्ता सुधारणा 29.99 लक्ष, माळवाडी बेंदवाडी कडवे रस्ता सुधारणा 20 लक्ष, बिबी ते मकाईचीवाडी रस्ता सुधारणा 15 लक्ष, ढोरोशी जोतिर्लिंग देवालय रस्ता सुधारणा 30 लक्ष, जांभेकरवाडी मरळोशी धनगरवाडा रस्ता सुधारणा 40 लक्ष, गोरेवाडी मुरुड माळवस्ती रस्ता सुधारणा 20 लक्ष, बोर्गेवाडी घोट अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, चिंचेवाडी वजरोशी पोहोच रस्ता सुधारणा 20 लक्ष, जन्नेवाडी घोट आडापर्यंतचा रस्ता सुधारणा 20  लक्ष, जगदाळवाडी कडवे बु पोहोच रस्ता सुधारणा 20 लक्ष, सुर्याचीवाडी नाणेगाव बु अंतर्गत रस्ता सुधारणा 15लक्ष, वाघजाईवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, सुरुल अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, दुटाळवाडी नुने अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, हेळवाक अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, वाजेगाव ते शेळकेवस्ती मारुल तर्फ पाटण रस्ता सुधारणा 20 लक्ष, निवकणे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, काठी पासळ ते जानाईदेवी मंदिर रस्ता सुधारणा 20 लक्ष, येराडवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, पाचगणी नागवण टेक खालचे आवाड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष या कामांना 8 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे पत्रकांत म्हंटले आहे.

Thursday 26 September 2024

मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ना.अजितदादा पवार यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी विविध ‍विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम.

 

 

दौलतनगर दि.26:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 289 कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व ना.अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रताराव जाधव यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वा. दौलतनगर ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार व माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

        प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.यामध्ये काळोली ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकूल 5 कोटी रुपयांचे कामाचा लोकार्पण सोहळा, पाटण नगरपंचायत नवीन नळपाणी पुरवठा योजनेच्या 20 कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन, नाडे ता.पाटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळयाचा लोकार्पण सोहळा, मल्हारपेठ ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय मल्हारपेठच्या 50 लक्ष रुपयांचे नुतनीकरण केलेलया इमारतीचा लोकार्पण सोहळा,वाटोळे ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई राज्य उत्पादन शुल्क विभागोच 94 कोटी रुपांचे प्रशिक्षण केंद्राचे ई भूमिपूजन, मोरणा गुरेघर येथील बंदिस्त पाईप लाईन आणि नाटोशी उपसा सिंचन योजनेच्या 90 कोटींचया कामांचे ई भूमिपूजन, तारळी प्रकल्पामधील 50 मीटर व 100 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनेच्या 79 कोटींच्या कामांचा लोकार्पण सोहळा अशा पध्दतीले शिवसेना-भाजपा महायुती शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 289 कोटी रुपयांचे कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांचे शुभहस्ते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस,ना.श्री.अजितदादा पवार,केंद्रीय राज्यमंत्री ना.श्री.प्रतापराव जाधव,आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे,खासदार श्री. नितीनकाका जाधव-पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आ.श्री. रामराजे नाईक-निंबाळकर, आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,आमदार श्री.मकरंद जाधव-पाटील,आमदार श्री.जयकुमार गोरे, आमदार श्री. दिपक चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) आदी मान्यवरांचे उपस्थितीमध्ये रविवार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वा. दौलतनगर ता.पाटण येथे संपन्न होत आहे. तरी पाटण विधानसभा मतदासंघातील शिवसेना-भाजपा महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तमाम शिवसैनिक,युवा सेना पदाधिकारी,शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व आम जनता यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून घाणबी आरोग्य केंद्रासाठी 4 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घाणबी येथे सुसज्ज अशा नवीन मुख्य इमारतीचे होणार बांधकाम.

 


दौलतनगर दि.26:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये आरोग्य सुविधा चांगल्या देण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सातारा जिल्हयामध्ये प्रथमच स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही योजना राबविण्यात येत आहे. शिरळ विभागातील डोंगर पठारावरील दुर्गम भागामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयातून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घाणबी  येथे नवीन मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यासाठी  04 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सध्या सातारा जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही नाविण्यपूर्ण योजना गत वर्षापासून राबविण्यात आली असून सन 2023-24 मध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजने अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मुरुड,मरळी आणि काळगाव या तीन प्राथमिक आरोग्य केंद्र  इमारतीची अनुषंगीक कामे करण्यासाठी 02 कोटी 13 लाख 85 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन या तीनही आरोग्य केंद्राच्या इमारतींची कामे हाती घेण्यात आली.तर सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजने अंतर्गत चाफळ, मोरगिरी, सोनवडे, तारळे, केरळ,तळमावले,हेळवाक या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामासाठी 6 कोटी 17 लक्ष 28 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.दरम्यान शिरळ विभागातील डोंगर पठारावरील दुर्गम भागामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी घाणबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 04 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मंजूर निधीमधून घाणबी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत उभारण्यात येऊन या इमारतीमध्ये आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने घाणबी परिसरातील कातवडी, पिंपळोशी, बोंद्री, केर, तामकणे, चिटेघर, आंबवणे, घाणव, खिवशी, दिवाशी, भारसाखळे, वनकुसवडे, वन, मरड, रामेल, कुसवडे, मराठवाडी,  आरल, जुंगठी, गावडेवाडी, खुडपलेवाडी, गावडेवाउी, धुईलवाडी, काठी, आवसरी, घाणबी, वाटोळे, कारवट, जाईचीवाडी, टोळेवाडी, घेरादातेगड या गावांतील रुग्णांची आरोग्य विषयक होणारी गैरसोय दूर होण्यासाठी मोठी मदत होणार असून घाणबी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना सर्व सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेमुळे दुर्गम भागामध्ये चांगली आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर दिला गेला असून यामध्ये तज्ञ डॉक्टरसांसह सुसज्ज अशी इमारत होणार आहे.स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजने अंतर्गत घाणबी येथे मंजूर झालेल्या नवीन मुख्य इमारतीचे कामाची तातडीने निविदा प्रक्रिया करण्यात येऊन या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम तातडीने हाती घेण्यासंदर्भात तातडीने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

 

चौकट : लघु पाटबंधारे विभागांतर्गत 55 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये लघु पाटबंधारे विभागांतर्गत वळण बंधारे व आडव्या पाटाची  कामे मंजूर होण्यासाठी  प्रस्तावित केली होती. त्यानुसार आचरेवाडी नं.2 येथील ग्रामतलाव दुरुस्ती 8.06 लक्ष, पाठवडे येथे शेतीसाठी आडवे पाट 15 लक्ष, पळासरी कुसवडे येथे साठवण हौद व शेतीसाठ पाण्याचे पाट 18 लक्ष आणि माईंगडेवाडी जिंती येथे वळण बंधारा दुरुस्ती व पाट पाईप लाईन 14.19 लक्ष असा सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराडयातून 55 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची चांगली सोय होणार आहे.

  

Wednesday 18 September 2024

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना फेज 3 अंतर्गत भारसाखळे जौरातवाडी ते जाईचीवाडी मराठवाडी रस्ता मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून 10 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 10 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

दौलतनगर दि.16:- पाटण विधानसभा मतदारसंघातील शिरळ भागातील भारसाखळे जौरातवाडी ते जाईचीवाडी मराठवाडी या 10किमी लांबीचा रस्ता दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाचा असल्याने या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना फेज 3 मधून निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार प्रधानमंत्री ग्रामसडक योजना फेज 3 मधून भारसाखळे जौरातवाडी ते जाईचीवाडी मराठवाडी या रस्त्यासाठी 9 कोटी 33 लाख 51 हजार रुपयांचा निधी तर या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीसाठी 92 लाख 66 हजार असा 10 कोटी 26 लक्ष 17 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

               प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटल आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील शिरळ भागामध्ये भारसाखळे जौरातवाडी ते जाईचीवाडी मराठवाडी हा रस्ता वाहतूकीच्यादृष्टीने महत्त्वाचा असून या रस्त्याची लांबी 10.665 किमी आहे.हा विभागातील महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्याचे पुनर्बांधणीसाठी सातत्याने या विभागातील जनतेने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे वेळो-वेळी मागणी केली होती. त्यानुसार या रस्त्याचे पुनर्बांधणीसाठी भरीव निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये या रस्त्याच्या कामाची शिफारस करत या रस्त्याला निधी मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यानुसार प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूरीसाठी सादर करण्यात आले.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्यामुळे शिरळ भागातील भारसाखळे जौरातवाडी ते जाईचीवाडी मराठवाडी या 10 किमी लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना फेज 3 अंतर्गत 9 कोटी 33 लाख 51 हजार रुपयांचा निधी तर या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीसाठी 92 लाख 66 हजार असा 10 कोटी 26 लक्ष 17 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामधून या रस्त्याचे पुनर्बांधणीसह ठिक ठिकाणी 74 सी.डी.वर्क ची बांधणी होणार आहे.लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या असून या कामाची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने या रस्त्याचे काम हाती घेण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आले आहे.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून विद्युत विकास कामांसाठी 2 कोटी 72 लक्ष रुपयांचा निधी. जिल्हा वार्षिक आराखडयात विद्युत विकास योजने अंतर्गत वाढीव पोल,रोहित्र,थ्री फेजची कामे लागणार मार्गी.

 

  

दौलतनगर दि.18:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत कामांचा समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण मतदारसंघातील वीज पुरवठा सुरळीत होण्याचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाढीव पोल, नवीन रोहित्र, थ्री फेज लाईन इत्यादी कामांसाठी निधीची आवश्यकता होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत 2 कोटी 72 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांमधील वीज पुरवठा सुरळीत होण्याचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाढीव पोल, नवीन रोहित्र, थ्री फेज लाईन इत्यादी कामांसाठी निधीची आवश्यकता होती. या कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये शिफारस केली होतीत्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत 2 कोटी 72 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला यामध्ये निगडे जादा क्षमतेचे रोहित्र 5.40 लक्ष, ऊरुल पवारमळा येथे 25 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 5.75 लक्ष, नेचल श्रीपात सेवा मंडळाचे श्रीक्षेत्र दत्त धाम येथे 100 केव्हीए रोहित्र 6.33 लक्ष, जुंगठी येथे 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 8.09 लक्ष, मिरगाव येथे रोहित्र क्षमता वाढ 8.48 लक्ष, नाडे येथे 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 9.14 लक्ष, ढोपरेवाडी आंब्रुळे येथे 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 9.25लक्ष, जौरातवाडी भारसाखळे पवारमळा येथे 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 11.22 लक्ष, धुईलवाडी (गावडेवाडी) येथे 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 15.25 लक्ष, खळे अधिक महापुरे यांचे घराजवळील पोल स्थलांतरीत 0.38 लक्ष,वाढीव वस्ती  विद्युतीकरणामध्ये चोपडेवाडी डावरी 1.03 लक्ष, कडववाडी नाणेगाव बु 1.10 लक्ष, गुरेघर 1.14 लक्ष, निवकणे 1.28 लक्ष, काटेवाडी तारळे 1.39 लक्ष, निवडे 1.39 लक्ष, आडूळ गावठाण कातकरी वस्ती 1.42 लक्ष, धुईलवाडी (गावडेवाडी) येथे थ्री फेज लाईन 1.59 लक्ष, तुपेवाडी काढणे येथे थ्री फेज लाईन 1.71 लक्ष, जुंगठी दिवशी खुर्द 1.80 लक्ष, ऊरुल पवारमळा येथे थ्री फेज 1.85 लक्ष, जिमनवाडी कुशी 1.88 लक्ष, कोळेकरवाडी 2.09 लक्ष, चव्हाणवाडी धामणी 2.09 लक्ष, धामणी 2.09 लक्ष, गारवडे मातंगवस्ती(कांबळे) 2.11 लक्ष, दिवशी बु 2.11 लक्ष, नावडी 2.14 लक्ष, तामीणे 2.15 लक्ष, जाळगेवाडी 2.21 लक्ष, जौरातवाडी भारसाखळे येथे थ्री फेज लाईन 2.45 लक्ष, कवडेवाडी 2.57 लक्ष, पाबळवाडी 2.67 लक्ष, आंबवणे 2.72 लक्ष, गोवारे 2.74 लक्ष, ढोपरेवाडी आंब्रुळे 2.80 लक्ष, कळकेवाडी कुसरुंड 2.88 लक्ष, ठोमसे येथील गट नंबर 47 मधील रोहित्र स्थलांतरन 2.92 लक्ष, जंगलवाडी चाफळ 3.01 लक्ष, घाणबी  नरसोबाचीवाडी येथे गंजलेले पोल बदलण्यासाठी 3.97 लक्ष, पाचगणी बाहे जि.प.शाळा 3.99 लक्ष, डिगेवाडी काळेवाडी आडूळ येथे मेननाथ मंदिर 4.32 लक्ष, उत्तर तांबवे 4.44 लक्ष, डेरवण,बोर्गेवाडी,भैरेवाडी,जानाईचीवाडी व कोळेकरवाडी 4.48 लक्ष, चोपदारवाडी 4.70 लक्ष, बनपूरी 4.90 लक्ष, निगडे गंजलेले पोल बदलणे 5 लक्ष, चाफळ 5.01 लक्ष, गव्हाणवाडी 5.08 लक्ष, कळकेवाडी कुसरुंड रोहित्राची जागा बदलणे 5.45 लक्ष, कोळणे (गोवारे) रोहित्र स्थलांतरित करणे 5.45 लक्ष, डोंगळेवाडी खालची रोहित्र स्थलांतरित करणे,थ्री फेज लाईन 5.45 लक्ष, काळेवाडी आडूळ 6.22 लक्ष, घाणबी  नरसोबाचीवाडी 6.22 लक्ष, नुने 6.39 लक्ष, पाथरपुंज येथील रोहित्र स्थलांतरीत करणे 7.38 लक्ष, दुसाळे येथे शेतीसाठी थ्री फेज लाईन 7.87 लक्ष, वन,मरड,मिसाळवाडी,धनगरवाडा,भिकाडी,रामेल गंजलेले पोल बदलणे 8.12 लक्ष, डेरवण 9.45 लक्ष, आडूळपेठ, डिगेवाडी व काळेवाडी नळ पाणी पुरवठा योजनांसाठी दोन रोहित्र सह वीज जोडणी 10.18 लक्ष या कामांचा समावेश आहे. नव्याने मंजूर झालेल्या विज वितरणाच्या कामांमुळे डोंगरी व दुर्गम भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार असून या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करुन ही कामे लवकरात लवकर हाती घेण्याबाबत पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी पत्रकांत दिली आहे.

 

Thursday 12 September 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून रस्त्यांच्या कामांसाठी 4 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी. जिल्हा वार्षिक आराखडयात 3054 ग्रामीण मार्ग व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्तीतून रस्त्यांची कामे लागणार मार्गी.

  


दौलतनगर दि.12:- पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण मतदारसंघातील दळण-वळणाचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांचे पुनर्बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत 4 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण या डोंगरी व दुर्गम भागात दळण वळणाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग हे रस्ते नादुरुस्त झाल्याने  या रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी निधी मंजूर होणे गरजेचे होते. त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत 4 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत प्रजिमा 55 आंबळे बांबवडे तोंडोशी निवडे रस्ता इजिमा 131 सुधारणा 50 लक्ष, मोरगिरी आडदेव आंब्रुळे बेलवडे खुर्द सांगवड पापर्डे खु पापर्डे बु रामा 142 रस्ता इजिमा 135 भाग आडदेव ते आंब्रुळे रस्ता सुधारणा 50 लक्ष व त्रिपुडी ते रामा 136 मुळगाव नेरळे मोरगिरी धावडे गोकूळ गुरेघर पाचगणी  रस्ता इजिमा 136 रस्ता सुधारणा 45 लक्ष अशा तीन इतर जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 1 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तर 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती अंतर्गत म्होप्रे ते रामा 136 रस्ता ग्रामा 80 सुधारणा 25 लक्ष, थोरात मळा पश्चिम सुपने ते जुने सुपने गाव ते जुनी पाडळी रस्ता ग्रामा 138 रस्ता सुधारणा 25 लक्ष, आरेवाडी हरीजनवस्ती ते डेळेवाडी रस्ता ग्रामा 146 सुधारणा 30 लक्ष, प्रजिमा 57 ते वेखंडवाडी खबालवाडी ग्रामा 48 रस्ता सुधारणा 40 लक्ष,देवघर ते इजिमा 147 तामकणे ग्रामा 84 रस्ता सुधारणा 25 लक्ष, प्रजिमा 29 ते रामेल शेळकेवस्ती रस्ता ग्रामा 52 रस्ता सुधारणा 20 लक्ष, खुडुपलेवाडी ते गावडेवाडी रस्ता ग्रामा 64 रस्ता सुधारणा 40 लक्ष, काळगाव ते डाकेवाडी मळयाचीवाडी कराडकरवस्ती रस्ता ग्रामा 354 रस्ता सुधारणा 40 लक्ष, नाटोशी कदमवाडी रस्ता ग्रामा 231 रस्ता सुधारणा 25 लक्ष व जाईचीवाडी मराठवाडी ग्रामा 70 रस्ता सुधारणा 35 या 12 ग्रामीण रस्त्यांचे कामांसाठी  3 कोटी 05 लक्ष असा इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयातून रस्त्यांचे कामांसाठी 4 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांची तातडीने निवीदा प्रक्रिया करुन लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यासंदर्भातही संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

चौकट :- शेतीच्या पाण्यासाठी साठवण हौद,वळण बंधारा व आडव्या पाटांच्या कामांसाठी 01 कोटी 55 लक्ष निधी मंजूर.

पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील विविध गावांमध्ये शेतीच्या पाण्याची सोय होण्यासाठी लघु पाटबंधारे विभागांतर्गत सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 01 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये मरड धनगरावाडा येथे शेतीसाठी साठवण हौद 15 लक्ष, दिवशी खुर्द शेतीसाठी वळण बंधारा व आडवे पाट 16.29 लक्ष, वाटोळे येथे झरा,पाथळ व सातर गौड येथे वळण बंधारा 16.58 लक्ष, मराठवाडी दिवशी खुर्द शेतीसाठी आडवे पाट 16.98 लक्ष, वेखंडवाडी पाट 16.20 लक्ष, आंबेवाडी घोट साठवण हौद व पाट 16 लक्ष, ठोमसे येथे जोस्क शिवारात वळण बंधारा 19.52 लक्ष, शेडगेवाडी विहे येथे साठवण वळण बंधारा 12.29 लक्ष, म्हारवंड येथे साठवण हौद व शेतीसाठी पाट बांधणे पाईप लाईन 29.29 लक्ष या कामांचा समावेश आहे.

Thursday 5 September 2024

पाटण मतदारसंघातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात प्रस्ताव सादर करा. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थिती बैठक संपन्न.

 

                दौलतनगर,ता.05: पाटण विधानसभा मतदारसंघातील वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशत: बाधित जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांच्या रोख रकमेबाबत,तारळी प्रकल्पात 100 टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पामुळे अंशत: बाधित झालेल्या माथणेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसनाबाबत वरील प्रकल्पांच्या प्रलंबीत कामासंदर्भात संबंधित विभागने तातडीने प्रस्ताव सादर करावेत अशा सुचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विनंतीवरुन मंत्रालय मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील  यांनी  केल्या.

              मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या उपसिथतीमध्ये मंत्रालय मुंबई या ठिकाणी वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशत: बाधित मौजे जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांचया प्रस्तावाबाबत,तारळी प्रकल्पामध्ये 100 टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्यात वाढ करण्याबाबत  आणि उत्तर मांड धरण मध्यम प्रकल्पामुळे अंशत: बाधित झालेल्या माथणेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसन प्रस्तावाबाबत बैठक झाली.या बैठकीस जलसंपदा व पुनर्वसन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांचे दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

              मदत व पुनर्वसन मंत्री यांचे दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशत: बाधित जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांच्या रोख रक्कम मिळण्यासाठीचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असून जिंती व निगडे येथील प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनाऐवीज रोख मिळावी अशी आग्रही मागणी असल्याने जिंती व निगडे या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या रोख रक्कमेचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात यावी.तसेच तारळी धरण प्रकल्पात 100 टक्के जमीन गेलेले अनेक प्रकल्पग्रस्त असून पूर्ण जमीन धरणप्रकल्पासाठी संपादित झाल्याने या प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत तारळी धरण प्रकल्पग्रस्तांची सातत्याची मागणी असल्याचे मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी निदर्शनास आणून देत तारळी प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्यामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी द्यावी. तर उत्तर मांड मध्यम प्रकल्पामुळे अंशत: बाधित झालेल्या माथणेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसन करणे गरजेचे असून उत्तर मांड धरण प्रकल्पामध्ये 46 घरे ही पूररेषेत येत असल्याने अद्यापही ही कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास असून या कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने माथणेवाडी येथील 46 कुटुंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची माथणेवाडी येथील प्रकल्पग्रस्तांची सातत्याची मागणी असून माथणेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसनासाठी संबंधित विभागाने तातडीने प्रस्तावाला मंजूरी द्यावी, अशा पाटण विधानसभा मतदासंघातील वांग मराठवाडी,तारळी व उत्तर मांड धरण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या  प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करुन या प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजूरी द्यावी अशी मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांचेकडे विनंती केली. यावेळी मंत्री ना. अनिल पाटील यांनी सांगीतले की, उत्तर मांड मध्म प्रकल्पामधील अंशत: बाधित झालेल्या माथ्णेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसनासाठी  कृष्णा खोरे विकास महामंडळाने नियामक मंडळामध्ये मान्यता घेऊन प्रस्ताव तातडीने सादर करावा. तसेच वांग मध्यम प्रकल्पांतर्गत अंशत: बाधित मौजे जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या रोख रकमेबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने वित्त,विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायासह पाठवावेत तर तारळी प्रकल्पात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाहासाठी येणाऱ्या खर्चाबाबतची वस्तुनिष्ठ माहितीसातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने अभिप्रायासह तातडीने सादर करावी.प्रकल्पग्रस्तांना देय असणारी मदत वेळीच  मिळाली पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावना संवेदनशीलपणे जाणून घ्याव्यात व प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत अशा सूचना मंत्री ना.अनिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.