Wednesday 18 September 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून विद्युत विकास कामांसाठी 2 कोटी 72 लक्ष रुपयांचा निधी. जिल्हा वार्षिक आराखडयात विद्युत विकास योजने अंतर्गत वाढीव पोल,रोहित्र,थ्री फेजची कामे लागणार मार्गी.

 

  

दौलतनगर दि.18:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत कामांचा समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण मतदारसंघातील वीज पुरवठा सुरळीत होण्याचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाढीव पोल, नवीन रोहित्र, थ्री फेज लाईन इत्यादी कामांसाठी निधीची आवश्यकता होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत 2 कोटी 72 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांमधील वीज पुरवठा सुरळीत होण्याचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाढीव पोल, नवीन रोहित्र, थ्री फेज लाईन इत्यादी कामांसाठी निधीची आवश्यकता होती. या कामांना निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये शिफारस केली होतीत्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत 2 कोटी 72 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला यामध्ये निगडे जादा क्षमतेचे रोहित्र 5.40 लक्ष, ऊरुल पवारमळा येथे 25 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 5.75 लक्ष, नेचल श्रीपात सेवा मंडळाचे श्रीक्षेत्र दत्त धाम येथे 100 केव्हीए रोहित्र 6.33 लक्ष, जुंगठी येथे 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 8.09 लक्ष, मिरगाव येथे रोहित्र क्षमता वाढ 8.48 लक्ष, नाडे येथे 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 9.14 लक्ष, ढोपरेवाडी आंब्रुळे येथे 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 9.25लक्ष, जौरातवाडी भारसाखळे पवारमळा येथे 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 11.22 लक्ष, धुईलवाडी (गावडेवाडी) येथे 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र 15.25 लक्ष, खळे अधिक महापुरे यांचे घराजवळील पोल स्थलांतरीत 0.38 लक्ष,वाढीव वस्ती  विद्युतीकरणामध्ये चोपडेवाडी डावरी 1.03 लक्ष, कडववाडी नाणेगाव बु 1.10 लक्ष, गुरेघर 1.14 लक्ष, निवकणे 1.28 लक्ष, काटेवाडी तारळे 1.39 लक्ष, निवडे 1.39 लक्ष, आडूळ गावठाण कातकरी वस्ती 1.42 लक्ष, धुईलवाडी (गावडेवाडी) येथे थ्री फेज लाईन 1.59 लक्ष, तुपेवाडी काढणे येथे थ्री फेज लाईन 1.71 लक्ष, जुंगठी दिवशी खुर्द 1.80 लक्ष, ऊरुल पवारमळा येथे थ्री फेज 1.85 लक्ष, जिमनवाडी कुशी 1.88 लक्ष, कोळेकरवाडी 2.09 लक्ष, चव्हाणवाडी धामणी 2.09 लक्ष, धामणी 2.09 लक्ष, गारवडे मातंगवस्ती(कांबळे) 2.11 लक्ष, दिवशी बु 2.11 लक्ष, नावडी 2.14 लक्ष, तामीणे 2.15 लक्ष, जाळगेवाडी 2.21 लक्ष, जौरातवाडी भारसाखळे येथे थ्री फेज लाईन 2.45 लक्ष, कवडेवाडी 2.57 लक्ष, पाबळवाडी 2.67 लक्ष, आंबवणे 2.72 लक्ष, गोवारे 2.74 लक्ष, ढोपरेवाडी आंब्रुळे 2.80 लक्ष, कळकेवाडी कुसरुंड 2.88 लक्ष, ठोमसे येथील गट नंबर 47 मधील रोहित्र स्थलांतरन 2.92 लक्ष, जंगलवाडी चाफळ 3.01 लक्ष, घाणबी  नरसोबाचीवाडी येथे गंजलेले पोल बदलण्यासाठी 3.97 लक्ष, पाचगणी बाहे जि.प.शाळा 3.99 लक्ष, डिगेवाडी काळेवाडी आडूळ येथे मेननाथ मंदिर 4.32 लक्ष, उत्तर तांबवे 4.44 लक्ष, डेरवण,बोर्गेवाडी,भैरेवाडी,जानाईचीवाडी व कोळेकरवाडी 4.48 लक्ष, चोपदारवाडी 4.70 लक्ष, बनपूरी 4.90 लक्ष, निगडे गंजलेले पोल बदलणे 5 लक्ष, चाफळ 5.01 लक्ष, गव्हाणवाडी 5.08 लक्ष, कळकेवाडी कुसरुंड रोहित्राची जागा बदलणे 5.45 लक्ष, कोळणे (गोवारे) रोहित्र स्थलांतरित करणे 5.45 लक्ष, डोंगळेवाडी खालची रोहित्र स्थलांतरित करणे,थ्री फेज लाईन 5.45 लक्ष, काळेवाडी आडूळ 6.22 लक्ष, घाणबी  नरसोबाचीवाडी 6.22 लक्ष, नुने 6.39 लक्ष, पाथरपुंज येथील रोहित्र स्थलांतरीत करणे 7.38 लक्ष, दुसाळे येथे शेतीसाठी थ्री फेज लाईन 7.87 लक्ष, वन,मरड,मिसाळवाडी,धनगरवाडा,भिकाडी,रामेल गंजलेले पोल बदलणे 8.12 लक्ष, डेरवण 9.45 लक्ष, आडूळपेठ, डिगेवाडी व काळेवाडी नळ पाणी पुरवठा योजनांसाठी दोन रोहित्र सह वीज जोडणी 10.18 लक्ष या कामांचा समावेश आहे. नव्याने मंजूर झालेल्या विज वितरणाच्या कामांमुळे डोंगरी व दुर्गम भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार असून या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करुन ही कामे लवकरात लवकर हाती घेण्याबाबत पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी पत्रकांत दिली आहे.

 

No comments:

Post a Comment