Thursday 26 September 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून घाणबी आरोग्य केंद्रासाठी 4 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घाणबी येथे सुसज्ज अशा नवीन मुख्य इमारतीचे होणार बांधकाम.

 


दौलतनगर दि.26:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये आरोग्य सुविधा चांगल्या देण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सातारा जिल्हयामध्ये प्रथमच स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही योजना राबविण्यात येत आहे. शिरळ विभागातील डोंगर पठारावरील दुर्गम भागामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयातून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घाणबी  येथे नवीन मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यासाठी  04 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून सध्या सातारा जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही नाविण्यपूर्ण योजना गत वर्षापासून राबविण्यात आली असून सन 2023-24 मध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजने अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मुरुड,मरळी आणि काळगाव या तीन प्राथमिक आरोग्य केंद्र  इमारतीची अनुषंगीक कामे करण्यासाठी 02 कोटी 13 लाख 85 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन या तीनही आरोग्य केंद्राच्या इमारतींची कामे हाती घेण्यात आली.तर सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजने अंतर्गत चाफळ, मोरगिरी, सोनवडे, तारळे, केरळ,तळमावले,हेळवाक या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामासाठी 6 कोटी 17 लक्ष 28 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.दरम्यान शिरळ विभागातील डोंगर पठारावरील दुर्गम भागामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी घाणबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 04 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मंजूर निधीमधून घाणबी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत उभारण्यात येऊन या इमारतीमध्ये आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने घाणबी परिसरातील कातवडी, पिंपळोशी, बोंद्री, केर, तामकणे, चिटेघर, आंबवणे, घाणव, खिवशी, दिवाशी, भारसाखळे, वनकुसवडे, वन, मरड, रामेल, कुसवडे, मराठवाडी,  आरल, जुंगठी, गावडेवाडी, खुडपलेवाडी, गावडेवाउी, धुईलवाडी, काठी, आवसरी, घाणबी, वाटोळे, कारवट, जाईचीवाडी, टोळेवाडी, घेरादातेगड या गावांतील रुग्णांची आरोग्य विषयक होणारी गैरसोय दूर होण्यासाठी मोठी मदत होणार असून घाणबी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना सर्व सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेमुळे दुर्गम भागामध्ये चांगली आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर दिला गेला असून यामध्ये तज्ञ डॉक्टरसांसह सुसज्ज अशी इमारत होणार आहे.स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजने अंतर्गत घाणबी येथे मंजूर झालेल्या नवीन मुख्य इमारतीचे कामाची तातडीने निविदा प्रक्रिया करण्यात येऊन या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम तातडीने हाती घेण्यासंदर्भात तातडीने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

 

चौकट : लघु पाटबंधारे विभागांतर्गत 55 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये लघु पाटबंधारे विभागांतर्गत वळण बंधारे व आडव्या पाटाची  कामे मंजूर होण्यासाठी  प्रस्तावित केली होती. त्यानुसार आचरेवाडी नं.2 येथील ग्रामतलाव दुरुस्ती 8.06 लक्ष, पाठवडे येथे शेतीसाठी आडवे पाट 15 लक्ष, पळासरी कुसवडे येथे साठवण हौद व शेतीसाठ पाण्याचे पाट 18 लक्ष आणि माईंगडेवाडी जिंती येथे वळण बंधारा दुरुस्ती व पाट पाईप लाईन 14.19 लक्ष असा सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराडयातून 55 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची चांगली सोय होणार आहे.

  

No comments:

Post a Comment