दौलतनगर दि.12:- पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण मतदारसंघातील दळण-वळणाचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांचे पुनर्बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत 4 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण या डोंगरी व दुर्गम भागात दळण वळणाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग हे रस्ते नादुरुस्त झाल्याने या रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी निधी मंजूर होणे गरजेचे होते. त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 3054 ग्रामीण मार्ग व 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत 4 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत प्रजिमा 55 आंबळे बांबवडे तोंडोशी निवडे रस्ता इजिमा 131 सुधारणा 50 लक्ष, मोरगिरी आडदेव आंब्रुळे बेलवडे खुर्द सांगवड पापर्डे खु पापर्डे बु रामा 142 रस्ता इजिमा 135 भाग आडदेव ते आंब्रुळे रस्ता सुधारणा 50 लक्ष व त्रिपुडी ते रामा 136 मुळगाव नेरळे मोरगिरी धावडे गोकूळ गुरेघर पाचगणी रस्ता इजिमा 136 रस्ता सुधारणा 45 लक्ष अशा तीन इतर जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 1 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तर 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती अंतर्गत म्होप्रे ते रामा 136 रस्ता ग्रामा 80 सुधारणा 25 लक्ष, थोरात मळा पश्चिम सुपने ते जुने सुपने गाव ते जुनी पाडळी रस्ता ग्रामा 138 रस्ता सुधारणा 25 लक्ष, आरेवाडी हरीजनवस्ती ते डेळेवाडी रस्ता ग्रामा 146 सुधारणा 30 लक्ष, प्रजिमा 57 ते वेखंडवाडी खबालवाडी ग्रामा 48 रस्ता सुधारणा 40 लक्ष,देवघर ते इजिमा 147 तामकणे ग्रामा 84 रस्ता सुधारणा 25 लक्ष, प्रजिमा 29 ते रामेल शेळकेवस्ती रस्ता ग्रामा 52 रस्ता सुधारणा 20 लक्ष, खुडुपलेवाडी ते गावडेवाडी रस्ता ग्रामा 64 रस्ता सुधारणा 40 लक्ष, काळगाव ते डाकेवाडी मळयाचीवाडी कराडकरवस्ती रस्ता ग्रामा 354 रस्ता सुधारणा 40 लक्ष, नाटोशी कदमवाडी रस्ता ग्रामा 231 रस्ता सुधारणा 25 लक्ष व जाईचीवाडी मराठवाडी ग्रामा 70 रस्ता सुधारणा 35 या 12 ग्रामीण रस्त्यांचे कामांसाठी 3 कोटी 05 लक्ष असा इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग दुरुस्ती योजने अंतर्गत सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयातून रस्त्यांचे कामांसाठी 4 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांची तातडीने निवीदा प्रक्रिया करुन लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यासंदर्भातही संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
चौकट :- शेतीच्या पाण्यासाठी साठवण हौद,वळण बंधारा व आडव्या पाटांच्या कामांसाठी 01 कोटी 55 लक्ष निधी मंजूर.
पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील विविध गावांमध्ये शेतीच्या पाण्याची सोय होण्यासाठी लघु पाटबंधारे विभागांतर्गत सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये 01 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये मरड धनगरावाडा येथे शेतीसाठी साठवण हौद 15 लक्ष, दिवशी खुर्द शेतीसाठी वळण बंधारा व आडवे पाट 16.29 लक्ष, वाटोळे येथे झरा,पाथळ व सातर गौड येथे वळण बंधारा 16.58 लक्ष, मराठवाडी दिवशी खुर्द शेतीसाठी आडवे पाट 16.98 लक्ष, वेखंडवाडी पाट 16.20 लक्ष, आंबेवाडी घोट साठवण हौद व पाट 16 लक्ष, ठोमसे येथे जोस्क शिवारात वळण बंधारा 19.52 लक्ष, शेडगेवाडी विहे येथे साठवण वळण बंधारा 12.29 लक्ष, म्हारवंड येथे साठवण हौद व शेतीसाठी पाट बांधणे पाईप लाईन 29.29 लक्ष या कामांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment