दौलतनगर दि.26:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन
शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 289
कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे
मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व ना.अजितदादा
पवार, केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रताराव जाधव यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार
दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वा. दौलतनगर ता.पाटण येथे संपन्न होणार
असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार व माजी जिल्हा परिषद सदस्य विजय
पवार यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे
विशेष प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन व
लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.यामध्ये काळोली ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब
देसाई बहुउद्देशीय कृषी संकूल 5 कोटी रुपयांचे कामाचा लोकार्पण सोहळा, पाटण
नगरपंचायत नवीन नळपाणी पुरवठा योजनेच्या 20 कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन, नाडे
ता.पाटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळयाचा लोकार्पण सोहळा,
मल्हारपेठ ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय मल्हारपेठच्या 50
लक्ष रुपयांचे नुतनीकरण केलेलया इमारतीचा लोकार्पण सोहळा,वाटोळे ता.पाटण येथील
लोकनेते बाळासाहेब देसाई राज्य उत्पादन शुल्क विभागोच 94 कोटी रुपांचे प्रशिक्षण
केंद्राचे ई भूमिपूजन, मोरणा गुरेघर येथील बंदिस्त पाईप लाईन आणि नाटोशी उपसा
सिंचन योजनेच्या 90 कोटींचया कामांचे ई भूमिपूजन, तारळी प्रकल्पामधील 50 मीटर व
100 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनेच्या 79 कोटींच्या कामांचा लोकार्पण सोहळा अशा
पध्दतीले शिवसेना-भाजपा महायुती शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 289 कोटी
रुपयांचे कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय
मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांचे शुभहस्ते, महाराष्ट्र राज्याचे
उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस,ना.श्री.अजितदादा पवार,केंद्रीय
राज्यमंत्री ना.श्री.प्रतापराव जाधव,आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे
उपाध्यक्ष महेश शिंदे,खासदार श्री. नितीनकाका जाधव-पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती
उदयनराजे भोसले, आ.श्री. रामराजे नाईक-निंबाळकर, आ.श्रीमंत छत्रपती
शिवेंद्रसिंहराजे भोसले,आमदार श्री.मकरंद जाधव-पाटील,आमदार श्री.जयकुमार गोरे,
आमदार श्री. दिपक चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) आदी
मान्यवरांचे उपस्थितीमध्ये रविवार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वा. दौलतनगर
ता.पाटण येथे संपन्न होत आहे. तरी पाटण विधानसभा मतदासंघातील शिवसेना-भाजपा
महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तमाम शिवसैनिक,युवा सेना
पदाधिकारी,शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व आम जनता यांनी
बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.
No comments:
Post a Comment