Wednesday 18 September 2024

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना फेज 3 अंतर्गत भारसाखळे जौरातवाडी ते जाईचीवाडी मराठवाडी रस्ता मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून 10 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 10 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

दौलतनगर दि.16:- पाटण विधानसभा मतदारसंघातील शिरळ भागातील भारसाखळे जौरातवाडी ते जाईचीवाडी मराठवाडी या 10किमी लांबीचा रस्ता दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाचा असल्याने या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना फेज 3 मधून निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार प्रधानमंत्री ग्रामसडक योजना फेज 3 मधून भारसाखळे जौरातवाडी ते जाईचीवाडी मराठवाडी या रस्त्यासाठी 9 कोटी 33 लाख 51 हजार रुपयांचा निधी तर या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीसाठी 92 लाख 66 हजार असा 10 कोटी 26 लक्ष 17 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

               प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटल आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील शिरळ भागामध्ये भारसाखळे जौरातवाडी ते जाईचीवाडी मराठवाडी हा रस्ता वाहतूकीच्यादृष्टीने महत्त्वाचा असून या रस्त्याची लांबी 10.665 किमी आहे.हा विभागातील महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्याचे पुनर्बांधणीसाठी सातत्याने या विभागातील जनतेने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे वेळो-वेळी मागणी केली होती. त्यानुसार या रस्त्याचे पुनर्बांधणीसाठी भरीव निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये या रस्त्याच्या कामाची शिफारस करत या रस्त्याला निधी मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यानुसार प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूरीसाठी सादर करण्यात आले.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्यामुळे शिरळ भागातील भारसाखळे जौरातवाडी ते जाईचीवाडी मराठवाडी या 10 किमी लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना फेज 3 अंतर्गत 9 कोटी 33 लाख 51 हजार रुपयांचा निधी तर या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीसाठी 92 लाख 66 हजार असा 10 कोटी 26 लक्ष 17 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामधून या रस्त्याचे पुनर्बांधणीसह ठिक ठिकाणी 74 सी.डी.वर्क ची बांधणी होणार आहे.लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या असून या कामाची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने या रस्त्याचे काम हाती घेण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment