दौलतनगर दि.30:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध
गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामे कोयना
भूकंप पुनर्वसन निधी मधून मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे
यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती.त्यानुसार कोयना
भूकंप पुनर्वसन निधीमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत
कार्यालय इमारत आदी कामांसाठी 8 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा
शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन-मदत व पुनर्वसन) विभागाने पारित केला असल्याची
माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत
देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले
आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील
अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते नादुरुस्त झाले असल्याने या रस्त्यांचे
कामांसाठी निधी मंजूर होण्यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी केली होती. सदर गावातील ग्रामस्थांची दळण वळणाची
होणारी गैरसोय लक्षात घेता या गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते आदी विकास कामे
ही कोयना भूकंप पुनर्वसन निधी मधून मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री
ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती.
त्यानुसार कोयना भूकंप पुनर्वसन निधीमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत
कार्यालय इमारत आदी कामांसाठी 8 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा
शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन-मदत व पुनर्वसन) विभागाने पारित केला असून
यामध्ये मरळी अंतर्गत बंदीस्त आर.सी.सी.गटर 25 लक्ष, मरळी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 25 लक्ष, गारवडे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 25 लक्ष, मराठवाडी ते आंब्रुळकरवाडी कोळेकरवाडी जकुआई मंदिर रस्ता सुधारणा
24.99 लक्ष, सणबूर अंतर्गत रस्ता
सुधारणा 15 लक्ष, उधवणे अंतर्गत रस्ता
सुधारणा 19.99 लक्ष, भोसगाव स्मशानभूमी
रस्ता सुधारणा 19.98 लक्ष, मराठवाडी
वरची रस्ता सुधारणा 15 लक्ष, मंद्रुळकोळे
खुर्द कुंभारवाडा रोडेवाडी रस्ता सुधारणा 20 लक्ष, धामणी कुंभारवाडा ते दफनभूमी रस्ता सुधारणा 19.99 लक्ष,
आचरेवाडी (चौगुलेवस्ती मातंगवस्ती अंतर्गत
रस्ता सुधारणा 14.99 लक्ष, बागलवाडी
काढणे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, पाचुपतेवाडी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 19.98 लक्ष, कुठरे अंतर्गत रस्ता
सुधारणा 14.98 लक्ष, आचरेवाडी
सावंतवाडी व आचरेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा
14.99 लक्ष, बोर्गेवाडी (कुंभारगाव)
अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, तुपेवाडी
(काढणे) अंतर्गत रस्ता सुधारणा 19.99 लक्ष, मान्याचीवाडी (गुढे) अंतर्गत रस्ता सुधारणा 24.99 लक्ष, चौगुलेवाडी (सांगवड) रामोशीवस्ती ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा
25 लक्ष, रामेल ते शेळकेवस्ती
रस्ता सुधारणा 20 लक्ष, केळेवाडी वरची कडवे
खुर्द अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, जिमनवाडी काळेश्वर मंदिर रस्ता सुधारणा 29.99 लक्ष, माळवाडी बेंदवाडी कडवे रस्ता सुधारणा 20 लक्ष, बिबी ते मकाईचीवाडी रस्ता सुधारणा 15 लक्ष, ढोरोशी जोतिर्लिंग देवालय रस्ता सुधारणा 30 लक्ष, जांभेकरवाडी मरळोशी धनगरवाडा रस्ता सुधारणा 40 लक्ष,
गोरेवाडी मुरुड माळवस्ती रस्ता सुधारणा
20 लक्ष, बोर्गेवाडी घोट अंतर्गत
रस्ता सुधारणा 20 लक्ष, चिंचेवाडी वजरोशी
पोहोच रस्ता सुधारणा 20 लक्ष, जन्नेवाडी
घोट आडापर्यंतचा रस्ता सुधारणा 20 लक्ष,
जगदाळवाडी कडवे बु पोहोच रस्ता सुधारणा
20 लक्ष, सुर्याचीवाडी नाणेगाव
बु अंतर्गत रस्ता सुधारणा 15लक्ष, वाघजाईवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, सुरुल अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, दुटाळवाडी नुने अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, हेळवाक अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, वाजेगाव ते शेळकेवस्ती मारुल तर्फ पाटण रस्ता सुधारणा 20
लक्ष, निवकणे अंतर्गत रस्ता
सुधारणा 20 लक्ष, काठी पासळ ते जानाईदेवी
मंदिर रस्ता सुधारणा 20 लक्ष, येराडवाडी
अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, पाचगणी
नागवण टेक खालचे आवाड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष या कामांना 8 कोटी 34 लक्ष
रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे पत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment