Tuesday, 12 February 2019

येणाऱ्या निवडणूकीत मतदारसंघातील जनताच मी केलेला विकास विरोधकांना दाखवेल. आमदार शंभूराज देसाईंचा विश्वास .


       
दौलतनगर दि.09:- माजी आमदार व त्यांचे सुपुत्राना पाटण मतदारसंघात गत चार वर्षात केलेला व सध्या सुरु असलेला कोटयावधी रुपयांचा विकास चिरेबंदी वाडयात बसून दिसत नाही चिरेबंदी वाडयातून जरा बाहेर या व मी काय काय आणि कुठे कुठे विकास केलाय  हे उघडया डोळयांनी पहा असे मी पाटणकर पितापुत्रांना सातत्याने आवाहन करीत आहे तरीही पितापुत्र वाडयातून काही बाहेर पडेनात. त्यांना जमले नाही ते मी करुन दाखवितोय याचे त्यांना वाईट वाटणे सहाजिकच आहे, परंतू जनतेची दिशाभूल करणाऱ्या याच पाटणकर पितापुत्रांना येणाऱ्या निवडणूकीत मी केलेला विकास मतदारसंघातील जनताच गावागावात प्रत्यक्षात दाखवेल असा विश्वास उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
                               कळंञेवाडी (ता.पाटण) येथे आमदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य शासनाच्या २५१५ योजनेमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सिमा मोरे,प्रकाशराव तवटे,माजी उपसभापती जितेंद्र केसेकर,माजी सदस्य रघूनाथ माटेकर,महादेवराव पानवळ,उपअभियंता एस. व्ही. पाटील, शाखा अभियंता राजाराम खंडागळेयांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होती.
                               याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,माजी आमदारांनी तालुक्याची आमदारकी सहावेळा भोगली.या सहा टर्ममध्ये तालुक्यातील जनतेला देण्याकरीता त्यांच्या हातात बरेच काही होते. मात्र हातात असताना जनतेला ते काही देवू शकले नाहीत हे आपल्या सर्वांचे दुर्दैव आहे.गेल्या चार वर्षात याच माजी आमदारांना आणि त्यांच्या सुपुत्रांना त्यांच्या पक्षाकडून केवळ आणि केवळ १ कोटी १५ लक्ष रुपयांचा निधी मिळाला त्यापेक्षा जादा रक्कमेचे एका रस्त्याचे भूमिपुजन मी अनेक गांवामध्ये एका दिवसात केले आहे. त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा यांनी दोन वर्षापुर्वी तालुक्यात येवून प्रत्येक वर्षी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यातील केवळ १ कोटी रुपयेच त्यांना त्यांनी दिले आणि पुढे निधीचे गाजर दाखविले.विरोधासाठी विरोध करणे हे विरोधकांचे कामच आहे.त्यांनी विरोधक म्हणून विरोध नाही केला तर त्यांना विरोधक कोण म्हणणार.परंतू विरोधकांच्या कार्यकालात पाटण मतदारसंघाची अवस्था काय होती आणि आता चार वर्षात पाटण मतदारसंघात कशाप्रकारे बदल झाला आहे याची तुलना मतदारसंघातील जनता करु लागली आहे.हेच आपल्या विरोधकांना रुचत नाहीये.गत पाच वर्षात विरोधकांच्या काळात पाटण मतदारसंघात रस्त्याच्या कामांसाठी जेवढा निधी आला नाही त्याहून अधिक निधी या चार वर्षात तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील रस्त्याच्या कामांसाठी आणण्यास मला यश मिळाले आहे.आता बांधकाममंत्री असताना जेवढा निधी बांधकाममंत्री यांनी मतदारसंघात आणायला पाहिजे होता त्यापेक्षा जास्त निधी जर केवळ आमदार म्हणून मी मतदारसंघात आणत असेल तर विरोधकांना त्याचे वाईट वाटणे सहाजिकच आहे.मतदारसंघातील व्यथा मांडायला मतदारसंघाचा आमदार विधानसभेत, विधानसभेच्या बाहेर आपले तोंड उघडतो का नाही हे मतदारसंघातील जनतेने उघडया डोळयांनी पाहिले आहे. आता डोळे उघडून पहाण्याची गरज विरोधकांना आहे. त्यांची निष्क्रीयता किती होती व आहे हे जनतेसमोर येवू लागले असल्याने माजी आमदार व त्यांचे सुपुत्र हे आता बेतालपणे वक्तव्य करुन जनतेची डोकी भडकवू पहात आहेत.मतासाठी सर्वसामान्यांची डोकी भडकविण्या व्यतिरिक्त आतापर्यंत पाटणकर पितापुत्रांना काही जमलेच नाही आणि जमणारही नाही त्यामुळे जनतेने त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करायची. मी गत चार वर्षात पाटण मतदारसंघात केलेला कोटयावधी रुपयांचा विकासच मतदारसंघातील जनतेच्या समोर घेवून जाणार आहे. मला विश्वास आहे गत चार वर्षात जेवढा विकास मतदारसंघात झाला तो यापुर्वी कधीच झाला नाही. हीच माझी जमेची बाजू आहे मी केलेल्या कोटयावधी रुपयांच्या विकासकामांना येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मतदारसंघातील जनता भरभरुन साथ देईल असेही ते शेवठी बोलताना म्हणाले.यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

Saturday, 9 February 2019

आमदार शंभूराज देसाईंच्या ७०७० गाडीवर डोंगरकपारीतील मरड गावाचे प्रेम. रांगोळीत महिलांनी साकारली ७०७०.



­­
          दौलतनगर दि.०९:- पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची ७०७० ही फॉरच्युनर गाडी पाटण विधानसभा खुप लोकप्रिय झाली आहे. सोशल मिडीयावर तर अनेकदा आमदार शंभूराज देसाईंच्या ७०७० चीच चर्चा जास्त पहावयास मिळते.पाटण मतदारसंघातील जनता आमदार शंभूराज देसाईंवर लोकप्रिय आमदार म्हणून जेवढे प्रेम करते तेवढेच प्रेम त्यांच्या ७०७० गाडीवर करते.७०७० गाडीवरील प्रेमाचा प्रत्यय पाटण तालुक्यातील पाटण आणि सातारा तालुक्याच्या हद्दीवर डोंगरकपारीत वसलेल्या मरड या गावात आला.या गावाच्या रस्त्याच्या भूमिपुजना करीता आमदार शंभूराज देसाई येणार आहेत हे समजल्यानंतर गावातील महिलांनी कार्यक्रमाकरीता काढलेल्या रांगोळीमध्ये ७०७० हा आमदार शंभूराज देसाईंच्या गाडीचा क्रंमाक टाकून आमदार देसाईंचे गावांमध्ये स्वागत केले.आमदार शंभूराज देसाईंनी ही रांगोळी पाहून याचे कौतुक केले.
                             आमदार शंभूराज देसाई हे त्यांनी कोयना भूकंप निधी समितीमधुन मंजुर केलेल्या १० लाख रुपयांच्या मरड गावपोहोच रस्त्याच्या भूमिपुजन समारंभाकरीता मरड गावात गेले होते.पाटणच्या या पठारावरील घेरादातेगड,अवसरी,काठी या गांवातील विविध विकासकामांची भूमिपुजनांचे कार्यक्रम उरकून ते मरड या गावी रात्री १०.०० वा.पोहचत असताना मरडच्या मुख्य रस्त्यावर धनगरवाडा वस्तीला छोटा पुल करुन दिल्याबद्दल आमदार देसाईंच्या स्वागतकरीता धनगरवाडा या वस्तीतील नागरिक आणि महिला या अबालवृध्दांसह रात्री उशीरपर्यंत थांबले होते.आमच्या वस्तीला कधीही न झालेला छोठा पुल बांधून दिल्याबद्दल येथील नागरिकांनी आणि महिलांनी आमदार शंभूराज देसाईंचे रस्त्यावरच स्वागत करुन आमच्या वस्तीला आता रस्ता करुन दया आणि आमची अनेक वर्षाची गैरसोय दुर करा अशी मागणी केली यावर आमदार शंभूराज देसाईंनी तुमचा रस्ता शासनाकडे प्रस्तावित केला आहे. येणाऱ्या काही दिवसातच तो पुर्ण करुन देतो असे आश्वासन दिले यावेळी येथील नागरिकांनी आणि महिलांनी या पुलाच्या भूमिपुजनाला आपले चिरंजीव आमच्याकडे आले होते याची आठवण करुन दिली. यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी सर्वांची विचारपुस करुन रात्र झाली आहे महिलांना व्यवस्थित घेवून घरी जा असे पुरुष मंडळींना सांगितल्यानंतर उपस्थितांतील सर्वजण भारावून गेले. त्यानंतर मरड गांवात आल्यानंतर येथील महिलांनी आमदार देसाईंचे औक्षण करुन स्वागत केले यावेळी येथील महिलांनी समारंभाकरीता गांवामध्ये काढलेल्या रांगोळीमध्ये आमदार शंभूराज देसाईंच्या गाडीचा ७०७० हा क्रमांक टाकून रांगोळी साकारली होती.रांगोळीमध्ये साकारलेले ७०७० पाहून आमदार देसाईंनी महिलांचे कौतुक केले.माझी ७०७० या गांवामध्ये माझेअगोदर रांगोळीच्या रुपाने पोहचली. आता प्रत्यक्षात ७०७० या गांवाला जोडणाऱ्या रस्त्यावरुन आणणेकरीताच मी गांवामध्ये आलो आहे. लवकरच तुमच्या या गांवाचा पुर्ण रस्ता करुन देण्यासाठी मी कटीबध्द आहे.आपली अपेक्षा लवकरच पुर्ण होईल असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. डोंगरकपारीतील लोक माझेवर जेवढे प्रेम करतात त्याचबरोबर माझे गाडीच्या क्रमांकावरही प्रेम करतात हे पाहून नेत्यावर जनतेचे यापेक्षा आणखी कसले प्रेम हवं आहे असे सांगत आमदार शंभूराज देसाईंनी आनंद व्यक्त केला.


डोंगर फोडून विकास केला म्हणणारे पाटणकरसाहेब, डोंगरातल्या मरड गावाला का रस्ता केला नाही. आमदार शंभूराज देसाईंचा सवाल.





दौलतनगर दि.09:- आमदार असताना डोंगर फोडून विकास केल्याच्या गप्पा हाणणारे माजी आमदार पाटणकरसाहेब मी यापुर्वीही आपणांस तुम्ही आमदार असताना खरोखरच विकास केलाय असे म्हणताय तर मग मी सांगितलेल्या डोंगरपठारावरील मौजे केळेवाडी,म्हारवंड,गाढखोप,शिद्रुकवाडी,गुढे शिबेवाडी,गणेवाडी, हुंबरणे, आंबेघर ते पाळशी,घोट जन्नेवाडी व सडादाढोली,जांभेकरवाडी या रस्त्यांची कामे तुम्हाला का करता आली नाहीत? हे सगळे राहू दया आपल्या पाटण या बालेकिल्ल्यातील मरड या सात ते आठ वस्त्या असणाऱ्या गावाला तुम्हाला इतक्या वर्षात रस्ता देता आला नाही आणि कसल्या विकासाच्या गप्पा हाणता? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी माजी आमदार पाटणकरांना केला आहे.
                सन 2018-19 च्या कोयना भूकंप पुनर्वसन निधि समितीमधून आमदार शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या मौजे मरड ता.पाटण या गावपोहोच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी पंचायत समिती सभापती सौ.मुक्ताबाई माळी, माजी पं.स. सदस्य सुरेश जाधव, बबनराव माळी, इंदूताई मिसाळ, विलास पवार, उप.सरपंच,ग्रा.पं.सदस्य,आनंदा बावधने,ग्रा.पं.सदस्या सौ.लक्ष्मी पवार,सिमा झोरे,रखमाबाई पवार, हणमंत मिसाळ,बहिरू झोरे,सार्वजनीक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी चव्हाण आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते, शंभूराज डोंगरी युवा संघटनेचे कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले, मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे गोडवे गातो,लाळगोटलेपणा करतो असे म्हणणारे पाटणकरसाहेब,राज्याचे मुख्यमंत्री माझे चांगले मित्र आहेत तुमच्याही पक्षात माझेमित्र आहेत तुम्हालाही याची माहिती आहे राज्याचे यापुर्वीचे असणारे मुख्यमंत्री यातील तुमचा एकही मित्र नव्हता व नाही त्याला माझा काय दोष आणि मी मुख्यमंत्र्याचे गोडवे गात असलो तरी त्यांच्याकडून मतदारसंघातील जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याकरीता कोटयावधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणत आहे.हे मतदारसंघातील जनता जाणून आहे. मतदारसंघातील जनतेला मी मुख्यमंत्र्यांचे गोडवे गायलेले चालतात तुमच्याच पोठात का दुखत आहे ? हेच कळेना. मी कुणाचे गोडवे गायचे आणि कुणाचे नाही हा माझा प्रश्न आहे तुम्ही का एवढे वाईट वाटून घेता. तुमची निष्क्रीयता झाकून नेणेकरीता माझेवर आपण करीत असलेले आरोप न समजण्याइतपत पाटण मतदारसंघातील हिरव्या पट्टयातील व डोंगरपठारावरील जनता आता अज्ञान राहिली नाही जनतेच्या आता सर्व लक्षात येवू लागले आहे.या विभागातील एका गांवाला एक नाहीतर दोन दोन- तीन तीन विकासकांमे करण्याकरीता निधी मंजुर करुन दिला आहे मंजुर केलेल्या निधीचे पुरावे या डोंगरपठारावरील जनतेकडे उपलब्ध आहेत. डोंगरी परीषद या विभागात घेवून मी केवळ तोंडदेखलेपणा केला नाहीतर मागेल त्या गांवाला विकास देण्याचे काम मी केले. माझे माध्यमातून कामे होतायत म्हणूनच मतदारसंघातील आणि डोंगरपठारावरील जनता माझेकडे कामे मागायला येत आहे जो देवू शकतो त्याच्याकडे जनता कामे मागते तुमच्याकडे त्यांना देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे तुम्हाला कोण काय मागणार. माजी मंत्री राहिलेल्या पाटणकरसाहेबांना या विभागाने गेल्या अनेक निवडणूकीत पोत्याने भरभरुन मते दिली.मग मरड गावच्या आणि या गावातंर्गत येणाऱ्या रस्त्याची ही अवस्था का? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी मरड ग्रामस्थांना विचारला. मी गांवात येताना मोकळया हाताने आलो नाही सोबत रस्त्याचे काम घेवून आलोय. या गावातील सभामंडपाचे काम पुर्ण झाले. राज्य शासनाने हरीत ऊर्जा योजनेतंर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगर पठारावरील रस्त्यांची कामे करण्याकरीता निधी मंजुर करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. मरड ते मिसाळवाडी हा सुमारे ३ किलोमाटरचा रस्ताही करण्याकरीता मी शासनाकडे आग्रही भूमिका मांडली लवकरात लवकर हा ही रस्ता पुर्ण करुन देणेकरीता मी कटीबध्द आहे. रात्रीचे १० वाजले तरी या गावांतील लोक,महिला या कार्यक्रमाला आर्वजुन उपस्थित आहेत हा या गावातील जनतेचा माझेवरील विश्वास आहे. आत्ताचा आमदार आपल्याला काहीतरी देवू शकतो ही भावना पाटण मतदारसंघातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. जनतेच्या भावनांशी खेळणे मला कधीच जमले नाही. जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याकरीता मला कुणाचे गोडवे गावे लागले तरी ते मी गाणार, पाटणकर दादा, तुम्ही त्याचे एवढे वाईट वाटून घेवू नका असेही आमदार शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले.उपस्थितांचे स्वागत सागर मिसाळ तर राम झोरे  यांनी आभार मानले.

Friday, 8 February 2019

निष्क्रीयांना आतापर्यंत पोत्याने भरुन मते दिली, मताचे पोते आता आमच्या पदरात टाका. - आमदार शंभूराज देसाई.




­­
          दौलतनगर दि.०8:- २१ वर्षे निष्क्रीयांना आतापर्यंत या विभागाने पोत्याने भरुन मते दिली. जनतेने पोत्याने भरुन मते देवूनही या विभागातील गांवाचा विकास मते घेणाऱ्यांनी केला नाही.पिढयानपिढया विकासापासून वंचीत राहिलेल्या या विभागातील गांवाना गत चार वर्षात मला किती मतदान पडले याचा विचार न करता मी या विभागात लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत.अनेक कामे पुर्ण झाली तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत मताचे पोते येणाऱ्या निवडणूकीत आता आमच्या पदरात टाका असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
                             घेरादातेगड ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून १५ लक्ष रुपयांच्या निधीच्या कामांचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,किसन मांडवकर,लक्ष्मण मांडवकर,ग्रामपंचायत सदस्य बंडू पवार,गिता मांडवकर,उत्तम मानसिंग,गणेश मानसिंग,विजय भोसले,निलेश मांडवकर,बबनराव माळी,रामचंद्र पवार, धमेंद्र पवार, गणेश लाड,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
                          याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,घेरादातेगड या गांवातील मतांची पेटी यापुर्वीच्या अनेक निवडणूकीत समोर आली की, माजी आमदारांचे पदरातच सगळी मते. सगळी गांवातील मते देवुन या गावाला पोहोच असणाऱ्या रस्त्यावर इतक्या वर्षात डांबर का पडले नाही.ज्यांना या गांवाने पोत्याने भरभरून यापुर्वी मते दिली त्यांनी गांवाला राज्याचे सार्वजनीक बांधकाम खात्याचे सलग पाच वर्षे मंत्री असताना का डांबरी रस्ता देवू शकले नाहीत. पिढयानपिढया आपण सर्वजण त्यांच्या मागे फिरत राहिला आणि त्यांनी तुम्हाला फिरवतच ठेवले.केवळ मतापुरता आपला वापर करायचा हाच त्यांचा उद्योग या विभागात पहायला मिळतोय. अनेक वर्षे या गांवाचा रस्ता झाला नाही म्हणून काही ग्रामस्थ मला भेटायला आले.गावचे ग्रामदैवताकरीता सभामंडप आणि गावपोहोच रस्ता एवढी आमची दोन कांमे प्रलंबीत आहेत ती पुर्ण करा अशी त्यांनी मागणी केली. पहिल्या भेटीतच ग्रामदैवताकरीता सभामंडप देण्याचे मान्य करुन त्याकरीता निधी दिला.आज या सभामंडपाचे उदघाटन आणि रस्त्याचे भूमिपुजन अशा संयुक्त कार्यक्रमाकरीता गांवात आलो आहे. हा रस्ता जिल्हा नियोजन समितीमधून १५ लाख रुपयांचा असला तरी या गावचा गावपोहोच रस्ता ३ किलोमीटरचा आहे. १५ लाख रुपयांच्या निधीमध्ये गावाकडून रस्ता सुरु करावा. ३ किलोमीटरच्या सदरचे रस्त्याकरीता सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी मी शासनाकडे यापुर्वीच केली होती त्यानुसार चारच दिवसापुर्वी या रस्त्याबरोबर मतदारसंघातील बाकीच्या काही मोठया रस्त्यांच्या संदर्भात मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत या मोठया रस्त्यांच्या कामांना निधी देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. मी केवळ आश्वासन देत नाहीतर दिलेला शब्द पाळतो याचा प्रत्यय या दोन्ही कामांवरुन आपणांस आला आहे. या विभागातील गावागावात आपल्या गांवातील कामांप्रमाणेच मोठया प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. विरोधकांना ही कामे दिसत असून ते दिसत नसल्याचे ढोंग करुन जनतेची डोकी भडकविण्याचे काम करीत आहेत. आताच काही महिलांनी गावाकरीता पिण्याच्या पाण्याच्या योजनेची सोय करा अशी मागणी माझेकडे केली. सन २०१९-२० चा राष्ट्रीय पेयजल योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम शासन पातळीवर सुरु आहे. प्राधान्याने या गांवाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा समावेश हा राष्ट्रीय पेयजल योजनेचा आराखडयात मी करण्यासाठी आग्रही राहीन याची काळजी आपण करु नये असे सांगून ते म्हणाले गावाची एकी विकासकामांच्या माध्यमातुन दिसून येत असून काही विघ्नसंतोषी मंडळी गावात येवून आम्ही असे करतो, आम्ही तसे करतो असे सांगून आपली दिशाभूल करतील अशाच्या नादी न लागता जो विकास देवू शकतोय त्यांच्याच पाठीशी ठाम रहा व येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत गावाची ही एकी अशीच कायम ठेवा. कारण आतापर्यंत ज्यांना आपल्याला काही देता आले नाही त्यांच्या हातात आता तर देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे ते तुम्हाला काही देवू शकणार नाहीत हे मलाही चांगलेच माहिती आहे आणि तुम्हालाही त्यामुळे अशांना चार हात लांबच ठेवून उर्वरीत राहिलेला गांवाचा विकास पुर्ण करुन घ्यावा असेही त्यांनी शेवठी बोलताना सांगितले. यावेळी बबनराव माळी,गणेश लाड यांनी मनोगत व्यक्त केले. घेरादातेगड येथील नागरिक व महिला तसेच मुंबई मंडळातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक निलेश मांडवकर यांनी केले व आभार किसन मांडवकर यांनी मानले.

Wednesday, 6 February 2019

कोयना पर्यटनातील कामांना सुरुवात पहिल्या टप्प्यात कोयनानगर विश्रामगृहाचे बांधकामास २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीस मान्यता. कामांची निविदाही प्रसिध्द- आमदार शंभूराज देसाई




दौलतनगर दि.०६:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता कोयना पर्यटनाचा १८ कोटी २८ लाख रुपयांचा आराखडा शासनाकडे मान्यतेकरीता सादर केला असून कोयना पर्यटनाच्या कामांस शासनाने प्रत्यक्षात सुरुवात करुन कोयना पर्यटनातील कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस पहिल्या टप्प्यात शासनाने मंजुरी दिली आहे. कोयना पर्यटनातील कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तात्काळ मंजुर करावा अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये कोयना दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्याकडे केली होती त्यानुसार आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी शासनाने कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस मंजुर केला आहे या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदाही प्रसिध्द झाली असून कोयना पर्यटनातील कामांना कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणे या कामांपासून सुरुवात झाल्याचा आनंद वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले आहे.
                    आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता जलसंपदा विभागाचे कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांचेमार्फत या विभागातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता अंदाजपत्रक तयार करुन घेतले होते सदरचे अंदाजपत्रक हे सविस्तर प्रस्तावासह जिल्हाधिकारी,सातारा यांचेमार्फत राज्य शासनास सादर केले आहे. प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता संबधित विभागांना शासनाने निधी उपलब्ध करुन दयावा अशी माझी सुरवातीपासूनच शासनाकडे आग्रही मागणी होती राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये कोयना दौऱ्यावर आले होते तेव्हा या कोयना पर्यटन आराखडयाच्या संदर्भात मी जलसंपदा मंत्री यांचे लक्ष वेधले होते तेव्हा त्यांनी तात्काळ कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन देखील दिले होते त्यानुसार जलसंपदा विभागाचे कोयना सिंचन विभाग,कोयनानगर यांचेमार्फत कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता एकूण आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदाही प्रसिध्द झाली असून यावर्षी या कामांस १ कोटी १० लाख रुपयांची तरतूदही शासनाचे जलसंपदा विभागाने विभागास केली आहे. कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणे ही कोयना पर्यटनातील महत्वाची बाब असून पर्यटकांना वास्तव्याकरीता योग्य जागा नसल्याने आतापर्यंत पर्यटकांचा ओढा कोयनानगरकडे कमी होत चालला होता कोयना विश्रामगृहाचे बांधकामामुळे पर्यटकांना हक्काचे वास्तव्य करण्यास मिळणार असल्याने येथील पर्यटनाला चालना मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदा आजच प्रसिध्द झाल्याने कोयना पर्यटनाच्या कामांना गती मिळाली असून लवकरच या विश्रामगृहाचे रुपडे पालटणार असल्याचा आनंद होत आहे. कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आवश्यक असणारा निधी मंजुर करुन उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी या मतदारसंघाचा आमदार या नात्याने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो असेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणेकरीता शासनाकडे सर्व ताकत लावू. पाणी मुद्यावर मणदुरे व केरा विभागातील जनतेने एक व्हा. आमदार शंभूराज देसाईंचे आवाहन




दौलतनगर दि.०६:- गत चार वर्षातच पाटण विधानसभा मतदारसंघातील मोठया व मध्यम धरण प्रकल्पांच्या कामांना गती मिळाली असून तारळी आणि मोरणा गुरेघर या धरण प्रकल्पांच्या प्रमाणे मणदुरे व केरा या विभागातील शेतकऱ्यांना निवकणे,चिटेघर व बिबी मध्यम धरण प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी देण्यास मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून कटीबध्द आहे. माझी आमदारकीची सर्व ताकत या विषयासंदर्भात शासनाकडे मी लावणार असून पाणी मुद्यावर मणदुरे आणि केरा विभागातील जनतेने एक होण्याची गरज आहे असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी करुन हा भाग तसा लवकर तयार होत नाही परंतू तुम्हाला पाणी मिळवून दयायला पोत्याने भरुन मते देणाऱ्या दादांच्या हातात आता काही राहिले नाही असा चिमटाही आमदार शंभूराज देसाईंनी माजी आमदार विक्रमसिंह पाटणकरांचे नाव न घेतला.
     साखरी ता.पाटण येथे मणदुरे आणि केरा विभागातील निवकणे,चिटेघर व बिबी मध्यम धरण प्रकल्पांची कामे पुर्णत्वाकडे नेवून या प्रकल्पातून ठिकठिकाणी कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधून या विभागातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळवून देणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी परीषद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,माजी सदस्य सुरेश जाधव,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,माजी संचालक ॲड.तानाजीराव घाडगे,मधूकर भिसे,बापूराव सावंत,विलास कुऱ्हाडे,बबनराव माळी,लक्ष्मण सकपाळ,कृष्णत देसाई,शंकरराव पाटील,बशीर खोंदू,नगरसेवक गणीभाई चाफेरकर, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,राजेंद्र पाटणकर,शंभूराज युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत साळुंखे व संजय जाधव या मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच या विभागातील शेतकरी व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
                 याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,तालुक्याच्या माजी आमदारांनी सन 1997 ला मेंढोशी येथे या विषयासंदर्भात पाणी परिषद घेतली होती.तेव्हा राज्यात आणि केंद्रातही त्यांचीच सत्ता होती किती शेतकऱ्यांना त्यांनी या प्रकल्पातून पाणी मिळवून दिले तुम्ही मात्र त्यांना पोत्याने भरभरुन मते देत आहात या माळरानावरची शेती हिरवीगार झाली असती परंतू माजी आमदारांना ती करता आली नाही.याचा विचार या विभागातील शेतकऱ्यांनी आणि जनतेने करणे गरजेचे आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पाणी अडविण्याचे धोरण सन १९९7 ला युतीच्या शासनाने घेतले त्यामुळेच आपल्या तालुक्यातील धरणांची कामे सुरु झाली.1999 ला युतीचे सरकार सत्तेवरुन गेले आणि सर्व धरणांची कामे ठप्प झाली. त्याला आपला पाटण तालुकाही अपवाद नाही. आघाडीच्या शासनाने जलसंपदा विभागाचा १५ वर्षात पैसा खर्च केला परंतू मागील आघाडी सरकारचे मुख्यमंत्री हे पृथ्वीराज बाबा असताना त्यांनीच जाहीरपणे एवढा पैसा खर्च करुनही सिंचनाचा एक टक्काही वाढला नसल्याचे जाहीर केले होते. आघाडीच्या शासनाने जलसंपदा विभागाचा पैसा खर्च केला परंतू पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले नाही मग हा पैसा कुठे खर्च झाला.गत चार वर्षात राज्यातील धरण प्रकल्पांच्या कामांना खऱ्या अर्थाने गती आली ती युतीच्या शासनामुळे. मी मंत्री नाही साधा आमदार आहे तरीही तारळी धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील शेतकऱ्यांना पाच उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी 553 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला 50 मीटरच्या वरील क्षेत्राला यामुळे पाणी मिळणार असल्याने एकूण 3000 एकर जादाचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आपल्या तालुक्याच्या माजी आमदारांनी याच तारळी धरण प्रकल्पातील पाणी बंदिस्त पाईपलाईनने त्यांच्या साहेबांच्या मतदारसंघाला देण्याचा घाट घातला होता.माझे सातत्याच्या प्रयत्नामुळे या प्रकल्पातील पाच उपसा जलसिंचन योजनांची निविदाही प्रसिध्द झाली लवकरच कार्यारंभ आदेशही मिळेल.तसेच मोरणा गुरेघर प्रकल्पातील चुकीच्या कॅनॉलमुळे येथीलही बहूतांशी क्षेत्र वंचीत रहात होते तेथेही उपसा जलसिंचन योजना राबवून टेंभू योजनेचे धोरण राबवून पाणी देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे या धोरणानूसार 81 रु. शासनाने आणि केवळ 19 रु शेतकऱ्यांना  भरावे लागणार आहेत.तारळे मोरणेत जे होवू शकते ते मणदुरे व केरा विभागात का होवू शकत नाही याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही याकरीता सर्वांनी उठाव करण्याची गरज आहे.काही प्रकल्पातील शेतकऱ्यांना जमिनींच्या बदल्यात रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे त्यावर लवकरच बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल कुणीतरी भाषणात सांगितले या विभागातील पाणी अडवा मग मतांचा लोंढा पहा.पाणी परिषदेची कार्यकारीणी करुया पक्षीय गटतट,मतभेद बाजूला ठेवून एकत्र या आजची पाणी परिषद ही सुरुवात आहे ‍पिढयान पिढया आपण असे का राहिलो याचा विचार करुन या विभागातील शेतकऱ्यांनी पाणी मुद्यावर एक व्हा अजुनही उशीर झालेला नाही असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
 चौकट:- दादा, दमदाटी करायला येथे वेळ आहे कुणाला?
माजी आमदारसाहेब, गत चार वर्षात एवढी कामे मंजुर करुन आणली आहेत तुम्हाला मंत्री असताना ती आणता आली नव्हती,भूमिपुजने करायला वेळ मिळेना ते दमदाटी करायला येथे वेळ आहे कुणाला? मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आत्ताच्या मुख्यमंत्री यांनी आणली आहे,दादा तुम्ही कधी गेला होता बिबीची योजना मंजुर करायला.पाटण तालुका टँकरमुक्त करण्याकडे आम्ही निघालो आहोत आणि दादा अजुन टँकरमध्येच अडकून राहिले आहेत.या विभागातील जनतेला दादा तुम्ही टँकरने पाणी देणार म्हणता परंतू टँकर मंजुर करायलाही आमदारांचीच सही लागते.दादा,सुरुलकरांना आणि बिबीकरांना नळाचे पाणी पिवू दे की,का कायम टँकरनेच पाणी मिळावे अशी तुमची अपेक्षा आहे असा टोलाही त्यांनी शेवठी बोलताना लागविला.

Monday, 4 February 2019

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील ३ मोठया रस्त्यांच्या कामांना ११ कोटी १० लक्ष रुपयांच्या निधीची शासनाची मंजुरी. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.






दौलतनगर दि.०४ :- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० करीता सुचविण्यात आलेल्या पाटण तालुक्यातील तीन मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पारित केला आहे.पाटण तालुक्यातील विविध भागातील तीन महत्वाच्या रस्त्यांच्या कामांकरीता ११ कोटी १० लाख ४९ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असून ०९.७०० किलोमीटर रस्त्याची लांबी या निधीतून पुर्ण होणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१९-२० मध्ये आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे विनंती करुन या कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते.सदरच्या कामांना ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे सुचनेवरुन राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या तीन रस्त्यांच्या कामांकरीता ११ कोटी १० लाख ४९ हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीमधून ०९.७०० किलोमीटर रस्त्याची लांबी पुर्ण होणार आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांमध्ये पाटण तालुक्यातील घोट ते बोर्गेवाडी रस्ता करणे ३.५०० किमी ३ कोटी २७ लाख ५७ हजार, भालेकरवाडी (बनपूरी) हनुमानवार्ड रस्ता करणे ३.००० किमी ३ कोटी ०१ लाख  ४६ हजार, बोर्गेवाडी वर्पेवाडी सळवे रस्ता करणे ३.२०० किमी ०४ कोटी २६ लाख २१ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर या तिन्ही कामांची पाच वर्षाकरीता नियमीत देखभाल दुरुस्ती करणेकरीता अनुक्रमे १७ लाख ६१ हजार, १४ लाख ९९ हजार, २२ लाख ६५ हजार रुपयांची तरतूदही शासनाने केली असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने      दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पारित केला आहे. या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत.