दौलतनगर दि.09:- माजी आमदार व त्यांचे सुपुत्राना पाटण मतदारसंघात गत चार वर्षात केलेला व सध्या सुरु असलेला कोटयावधी रुपयांचा विकास चिरेबंदी वाडयात बसून दिसत नाही चिरेबंदी वाडयातून जरा बाहेर या व मी काय काय आणि कुठे कुठे विकास केलाय हे उघडया डोळयांनी पहा असे मी पाटणकर पितापुत्रांना सातत्याने आवाहन करीत आहे तरीही पितापुत्र वाडयातून काही बाहेर पडेनात. त्यांना जमले नाही ते मी करुन दाखवितोय याचे त्यांना वाईट वाटणे सहाजिकच आहे, परंतू जनतेची दिशाभूल करणाऱ्या याच पाटणकर पितापुत्रांना येणाऱ्या निवडणूकीत मी केलेला विकास मतदारसंघातील जनताच गावागावात प्रत्यक्षात दाखवेल असा विश्वास उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
कळंञेवाडी (ता.पाटण) येथे आमदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य शासनाच्या २५१५ योजनेमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सिमा मोरे,प्रकाशराव तवटे,माजी उपसभापती जितेंद्र केसेकर,माजी सदस्य रघूनाथ माटेकर,महादेवराव पानवळ,उपअभियंता एस. व्ही. पाटील, शाखा अभियंता राजाराम खंडागळेयांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होती.
याप् रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,माजी आमदारांनी तालुक्याची आमदारकी सहावेळा भोगली.या सहा टर्ममध्ये तालुक्यातील जनतेला देण्याकरीता त्यांच्या हातात बरेच काही होते. मात्र हातात असताना जनतेला ते काही देवू शकले नाहीत हे आपल्या सर्वांचे दुर्दैव आहे.गेल्या चार वर्षात याच माजी आमदारांना आणि त्यांच्या सुपुत्रांना त्यांच्या पक्षाकडून केवळ आणि केवळ १ कोटी १५ लक्ष रुपयांचा निधी मिळाला त्यापेक्षा जादा रक्कमेचे एका रस्त्याचे भूमिपुजन मी अनेक गांवामध्ये एका दिवसात केले आहे. त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा यांनी दोन वर्षापुर्वी तालुक्यात येवून प्रत्येक वर्षी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यातील केवळ १ कोटी रुपयेच त्यांना त्यांनी दिले आणि पुढे निधीचे गाजर दाखविले.विरोधासाठी विरोध करणे हे विरोधकांचे कामच आहे.त्यांनी विरोधक म्हणून विरोध नाही केला तर त्यांना विरोधक कोण म्हणणार.परंतू विरोधकांच्या कार्यकालात पाटण मतदारसंघाची अवस्था काय होती आणि आता चार वर्षात पाटण मतदारसंघात कशाप्रकारे बदल झाला आहे याची तुलना मतदारसंघातील जनता करु लागली आहे.हेच आपल्या विरोधकांना रुचत नाहीये.गत पाच वर्षात विरोधकांच्या काळात पाटण मतदारसंघात रस्त्याच्या कामांसाठी जेवढा निधी आला नाही त्याहून अधिक निधी या चार वर्षात तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील रस्त्याच्या कामांसाठी आणण्यास मला यश मिळाले आहे.आता बांधकाममंत्री असताना जेवढा निधी बांधकाममंत्री यांनी मतदारसंघात आणायला पाहिजे होता त्यापेक्षा जास्त निधी जर केवळ आमदार म्हणून मी मतदारसंघात आणत असेल तर विरोधकांना त्याचे वाईट वाटणे सहाजिकच आहे.मतदारसंघातील व्यथा मांडायला मतदारसंघाचा आमदार विधानसभेत, विधानसभेच्या बाहेर आपले तोंड उघडतो का नाही हे मतदारसंघातील जनतेने उघडया डोळयांनी पाहिले आहे. आता डोळे उघडून पहाण्याची गरज विरोधकांना आहे. त्यांची निष्क्रीयता किती होती व आहे हे जनतेसमोर येवू लागले असल्याने माजी आमदार व त्यांचे सुपुत्र हे आता बेतालपणे वक्तव्य करुन जनतेची डोकी भडकवू पहात आहेत.मतासाठी सर्वसामान्यांची डोकी भडकविण्या व्यतिरिक्त आतापर्यंत पाटणकर पितापुत्रांना काही जमलेच नाही आणि जमणारही नाही त्यामुळे जनतेने त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करायची. मी गत चार वर्षात पाटण मतदारसंघात केलेला कोटयावधी रुपयांचा विकासच मतदारसंघातील जनतेच्या समोर घेवून जाणार आहे. मला विश्वास आहे गत चार वर्षात जेवढा विकास मतदारसंघात झाला तो यापुर्वी कधीच झाला नाही. हीच माझी जमेची बाजू आहे मी केलेल्या कोटयावधी रुपयांच्या विकासकामांना येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मतदारसंघातील जनता भरभरुन साथ देईल असेही ते शेवठी बोलताना म्हणाले.यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment