Saturday 9 February 2019

डोंगर फोडून विकास केला म्हणणारे पाटणकरसाहेब, डोंगरातल्या मरड गावाला का रस्ता केला नाही. आमदार शंभूराज देसाईंचा सवाल.





दौलतनगर दि.09:- आमदार असताना डोंगर फोडून विकास केल्याच्या गप्पा हाणणारे माजी आमदार पाटणकरसाहेब मी यापुर्वीही आपणांस तुम्ही आमदार असताना खरोखरच विकास केलाय असे म्हणताय तर मग मी सांगितलेल्या डोंगरपठारावरील मौजे केळेवाडी,म्हारवंड,गाढखोप,शिद्रुकवाडी,गुढे शिबेवाडी,गणेवाडी, हुंबरणे, आंबेघर ते पाळशी,घोट जन्नेवाडी व सडादाढोली,जांभेकरवाडी या रस्त्यांची कामे तुम्हाला का करता आली नाहीत? हे सगळे राहू दया आपल्या पाटण या बालेकिल्ल्यातील मरड या सात ते आठ वस्त्या असणाऱ्या गावाला तुम्हाला इतक्या वर्षात रस्ता देता आला नाही आणि कसल्या विकासाच्या गप्पा हाणता? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी माजी आमदार पाटणकरांना केला आहे.
                सन 2018-19 च्या कोयना भूकंप पुनर्वसन निधि समितीमधून आमदार शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या मौजे मरड ता.पाटण या गावपोहोच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी पंचायत समिती सभापती सौ.मुक्ताबाई माळी, माजी पं.. सदस्य सुरेश जाधव, बबनराव माळी, इंदूताई मिसाळ, विलास पवार, उप.सरपंच,ग्रा.पं.सदस्य,आनंदा बावधने,ग्रा.पं.सदस्या सौ.लक्ष्मी पवार,सिमा झोरे,रखमाबाई पवार, हणमंत मिसाळ,बहिरू झोरे,सार्वजनीक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी चव्हाण आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते, शंभूराज डोंगरी युवा संघटनेचे कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले, मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे गोडवे गातो,लाळगोटलेपणा करतो असे म्हणणारे पाटणकरसाहेब,राज्याचे मुख्यमंत्री माझे चांगले मित्र आहेत तुमच्याही पक्षात माझेमित्र आहेत तुम्हालाही याची माहिती आहे राज्याचे यापुर्वीचे असणारे मुख्यमंत्री यातील तुमचा एकही मित्र नव्हता व नाही त्याला माझा काय दोष आणि मी मुख्यमंत्र्याचे गोडवे गात असलो तरी त्यांच्याकडून मतदारसंघातील जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याकरीता कोटयावधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणत आहे.हे मतदारसंघातील जनता जाणून आहे. मतदारसंघातील जनतेला मी मुख्यमंत्र्यांचे गोडवे गायलेले चालतात तुमच्याच पोठात का दुखत आहे ? हेच कळेना. मी कुणाचे गोडवे गायचे आणि कुणाचे नाही हा माझा प्रश्न आहे तुम्ही का एवढे वाईट वाटून घेता. तुमची निष्क्रीयता झाकून नेणेकरीता माझेवर आपण करीत असलेले आरोप न समजण्याइतपत पाटण मतदारसंघातील हिरव्या पट्टयातील व डोंगरपठारावरील जनता आता अज्ञान राहिली नाही जनतेच्या आता सर्व लक्षात येवू लागले आहे.या विभागातील एका गांवाला एक नाहीतर दोन दोन- तीन तीन विकासकांमे करण्याकरीता निधी मंजुर करुन दिला आहे मंजुर केलेल्या निधीचे पुरावे या डोंगरपठारावरील जनतेकडे उपलब्ध आहेत. डोंगरी परीषद या विभागात घेवून मी केवळ तोंडदेखलेपणा केला नाहीतर मागेल त्या गांवाला विकास देण्याचे काम मी केले. माझे माध्यमातून कामे होतायत म्हणूनच मतदारसंघातील आणि डोंगरपठारावरील जनता माझेकडे कामे मागायला येत आहे जो देवू शकतो त्याच्याकडे जनता कामे मागते तुमच्याकडे त्यांना देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे तुम्हाला कोण काय मागणार. माजी मंत्री राहिलेल्या पाटणकरसाहेबांना या विभागाने गेल्या अनेक निवडणूकीत पोत्याने भरभरुन मते दिली.मग मरड गावच्या आणि या गावातंर्गत येणाऱ्या रस्त्याची ही अवस्था का? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी मरड ग्रामस्थांना विचारला. मी गांवात येताना मोकळया हाताने आलो नाही सोबत रस्त्याचे काम घेवून आलोय. या गावातील सभामंडपाचे काम पुर्ण झाले. राज्य शासनाने हरीत ऊर्जा योजनेतंर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगर पठारावरील रस्त्यांची कामे करण्याकरीता निधी मंजुर करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. मरड ते मिसाळवाडी हा सुमारे ३ किलोमाटरचा रस्ताही करण्याकरीता मी शासनाकडे आग्रही भूमिका मांडली लवकरात लवकर हा ही रस्ता पुर्ण करुन देणेकरीता मी कटीबध्द आहे. रात्रीचे १० वाजले तरी या गावांतील लोक,महिला या कार्यक्रमाला आर्वजुन उपस्थित आहेत हा या गावातील जनतेचा माझेवरील विश्वास आहे. आत्ताचा आमदार आपल्याला काहीतरी देवू शकतो ही भावना पाटण मतदारसंघातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. जनतेच्या भावनांशी खेळणे मला कधीच जमले नाही. जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याकरीता मला कुणाचे गोडवे गावे लागले तरी ते मी गाणार, पाटणकर दादा, तुम्ही त्याचे एवढे वाईट वाटून घेवू नका असेही आमदार शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले.उपस्थितांचे स्वागत सागर मिसाळ तर राम झोरे  यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment