दौलतनगर दि.०९:- पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची ७०७० ही फॉरच्युनर गाडी
पाटण विधानसभा खुप लोकप्रिय झाली आहे. सोशल मिडीयावर तर अनेकदा आमदार शंभूराज
देसाईंच्या ७०७० चीच चर्चा जास्त पहावयास मिळते.पाटण मतदारसंघातील जनता आमदार
शंभूराज देसाईंवर लोकप्रिय आमदार म्हणून जेवढे प्रेम करते तेवढेच प्रेम त्यांच्या
७०७० गाडीवर करते.७०७० गाडीवरील प्रेमाचा प्रत्यय पाटण तालुक्यातील पाटण आणि
सातारा तालुक्याच्या हद्दीवर डोंगरकपारीत वसलेल्या मरड या गावात आला.या गावाच्या
रस्त्याच्या भूमिपुजना करीता आमदार शंभूराज देसाई येणार आहेत हे समजल्यानंतर
गावातील महिलांनी कार्यक्रमाकरीता काढलेल्या रांगोळीमध्ये ७०७० हा आमदार शंभूराज
देसाईंच्या गाडीचा क्रंमाक टाकून आमदार देसाईंचे गावांमध्ये स्वागत केले.आमदार
शंभूराज देसाईंनी ही रांगोळी पाहून याचे कौतुक केले.
आमदार शंभूराज देसाई हे त्यांनी कोयना भूकंप निधी समितीमधुन
मंजुर केलेल्या १० लाख रुपयांच्या मरड गावपोहोच रस्त्याच्या भूमिपुजन समारंभाकरीता
मरड गावात गेले होते.पाटणच्या या पठारावरील घेरादातेगड,अवसरी,काठी या गांवातील
विविध विकासकामांची भूमिपुजनांचे कार्यक्रम उरकून ते मरड या गावी रात्री १०.००
वा.पोहचत असताना मरडच्या मुख्य रस्त्यावर धनगरवाडा वस्तीला छोटा पुल करुन
दिल्याबद्दल आमदार देसाईंच्या स्वागतकरीता धनगरवाडा या वस्तीतील नागरिक आणि महिला
या अबालवृध्दांसह रात्री उशीरपर्यंत थांबले होते.आमच्या वस्तीला कधीही न झालेला
छोठा पुल बांधून दिल्याबद्दल येथील नागरिकांनी आणि महिलांनी आमदार शंभूराज
देसाईंचे रस्त्यावरच स्वागत करुन आमच्या वस्तीला आता रस्ता करुन दया आणि आमची अनेक
वर्षाची गैरसोय दुर करा अशी मागणी केली यावर आमदार शंभूराज देसाईंनी तुमचा रस्ता शासनाकडे
प्रस्तावित केला आहे. येणाऱ्या काही दिवसातच तो पुर्ण करुन देतो असे आश्वासन दिले
यावेळी येथील नागरिकांनी आणि महिलांनी या पुलाच्या भूमिपुजनाला आपले चिरंजीव
आमच्याकडे आले होते याची आठवण करुन दिली. यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी सर्वांची
विचारपुस करुन रात्र झाली आहे महिलांना व्यवस्थित घेवून घरी जा असे पुरुष मंडळींना
सांगितल्यानंतर उपस्थितांतील सर्वजण भारावून गेले. त्यानंतर मरड गांवात आल्यानंतर
येथील महिलांनी आमदार देसाईंचे औक्षण करुन स्वागत केले यावेळी येथील महिलांनी
समारंभाकरीता गांवामध्ये काढलेल्या रांगोळीमध्ये आमदार शंभूराज देसाईंच्या गाडीचा ७०७०
हा क्रमांक टाकून रांगोळी साकारली होती.रांगोळीमध्ये साकारलेले ७०७० पाहून आमदार
देसाईंनी महिलांचे कौतुक केले.माझी ७०७० या गांवामध्ये माझेअगोदर रांगोळीच्या
रुपाने पोहचली. आता प्रत्यक्षात ७०७० या गांवाला जोडणाऱ्या रस्त्यावरुन आणणेकरीताच
मी गांवामध्ये आलो आहे. लवकरच तुमच्या या गांवाचा पुर्ण रस्ता करुन देण्यासाठी मी
कटीबध्द आहे.आपली अपेक्षा लवकरच पुर्ण होईल असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
डोंगरकपारीतील लोक माझेवर जेवढे प्रेम करतात त्याचबरोबर माझे गाडीच्या
क्रमांकावरही प्रेम करतात हे पाहून नेत्यावर जनतेचे यापेक्षा आणखी कसले प्रेम हवं
आहे असे सांगत आमदार शंभूराज देसाईंनी आनंद व्यक्त केला.
No comments:
Post a Comment