Thursday, 21 February 2019

आमदार शंभूराज देसाईंच्या चुलत आज्जी वत्सलाताई शिवराम देसाई ­­यांचे वृध्दापकाळाने निधन.


   
                    

         दौलतनगर दि.२१:-महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या भावजय,कै.शिवराम श्रीपतराव देसाई यांच्या पत्नी व पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या चुलत आज्जी श्रीमती वत्सलाताई शिवराम देसाई रा.मरळी,ता.पाटण यांचे वयाच्या 90 वर्षी वार्धक्याने निधन झाले.
                                    श्रीमती वत्सलाताई शिवराम देसाई यांचे निधनाने मरळी परिसरासह देसाई कूटुंबीयावर शोककळा पसरली असून मरळी ता.पाटण येथे शोकाकुल वातावरणात त्यांचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कै.वत्सलाताई देसाई ह्या ताई या आदरातिथ्य नावाने सर्वत्र परिचित होत्या. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या त्या चुलत आज्जी असून त्यांचे चिरंजीव रमेश देसाई  देसाई हे निवृत्त मोटर वाहन निरीक्षक असून श्रीमती वत्सलाताई शिवराम देसाई यांचे यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा व तीन मुली,सुन,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मरळी या त्यांच्या मुळ गावी शुक्रवार दि.22/02/2019 रोजी सकाळी 10.00 होणार आहे असे देसाई परिवारामार्फत सांगण्यात आले आहे.


Wednesday, 20 February 2019

कोयना पर्यटनातील विकासकामे करण्याकरीता दुसऱ्या टप्प्यात २ कोटी ०५ लाखांचा निधी मंजुर. निधी मान्यतेचा १८ फेब्रुवारी शासन निर्णय पारित. - आमदार शंभूराज देसाईंची माहिती





दौलतनगर दि.२०:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता कोयना पर्यटनाचा संपुर्ण आराखडा शासनाकडे मान्यतेकरीता सादर केला होता त्यानुसार कोयना पर्यटनाच्या कामांस शासनाने प्रत्यक्षात सुरुवात करुन कोयना पर्यटनातील कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस पहिल्या टप्प्यात शासनाने मंजुरी दिली. तर आराखडयातील पर्यटनाच्या सुचविलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही निधी मंजुर केल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने दि.१८ फेब्रुवारी, २०१९ रोजी पारित केला असून कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस २ कोटी ५० लाख व २ कोटी ०५ लाख असे एकूण ४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                    आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे जिल्हाधिकारी, सातारा यांच्यामार्फत या विभागातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता अंदाजपत्रक तयार करुन घेतले होते सदरचे अंदाजपत्रक हे सविस्तर प्रस्तावासह जिल्हाधिकारी,सातारा यांचेमार्फत राज्य शासनास सादर केले आहे. प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता संबधित विभागांना शासनाने निधी उपलब्ध करुन दयावा अशी माझी शासनाकडे आग्रही मागणी होती.राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे कोयना दौऱ्यावर आले तेव्हा या कोयना पर्यटन आराखडयाच्या संदर्भात मी जलसंपदामंत्री यांचे लक्ष वेधून कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात जलसंपदा विभागाकडून या विभागाचे कोयना सिंचन विभाग,कोयनानगर यांचेमार्फत कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता एकूण आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला.या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदाही प्रसिध्द झाली. तर दुसऱ्या टप्प्यात पर्यटनाच्या दृष्टीने आराखडयात सुचविलेल्या कोयनानगर येथील अस्तित्वात असणाऱ्या नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयनानगर येथील धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयना धरण व्यवस्थापनाचे जीर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नुतनीकरण करणे,कोयनानगर येथे पर्यटकांना बसण्याकरीता ठिक ठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे व कोयना धरणातील जलाशयामध्ये बोटिंगची व्यवस्था करणे या कामांकरीता एकूण २ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे मंजुर करण्यात आला असून या शासन निर्णयामध्ये जिल्हाधिकारी,सातारा यांनी त्यांच्या स्तरावर कार्यान्वयीन यंत्रणा निश्चित करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.शासनाकडे सादर केलेल्या कोयना पर्यटनाच्या आराखडयातील बहूतांशी कामांना राज्य शासनाने जलसंपदा व पर्यटन विभाग यांच्यामार्फत आवश्यक असणारा निधी मंजुर करुन कोयना पर्यटनाला चालना देण्याचे काम केले आहे. या निधीमुळे कोयना पर्यटनाच्या कामांना गती मिळाली असून लवकरच या कोयनानगरचे आणि कोयनानगर परिसराचे रुपडे पालटणार असल्याचा आनंद होत आहे. सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. कोयना पर्यटनाच्या आराखडयात अजुनही काही महत्वाच्या कामांना निधी मिळणे आवश्यक आहे सदरच्या उर्वरीत राहिलेल्या कामांनाही आवश्यक असणारा निधी मिळावा याकरीता मी येणाऱ्या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे प्रयत्नशील राहणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.
 चौकट :- केवळ घोषणा नाही तर करुन दाखविले.
              कोयना पर्यटनाच्या आराखडयाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळवून येथील पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ठिकाणांची तसेच महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता आवश्यक असणारा निधी कोयना पर्यटनाच्या माध्यमातून मंजुर करुन आणणार असे मी सांगितले होते. मी केवळ घोषणा करीत नाही तर त्याचा पाठपुरावा करुन जे जे ठरवतो ते दाखवून देतो त्याचप्रमाणे कोयना पर्यटनाची नुसती घोषणा केली नाही तर यातील कामांना निधी मंजुर करुन आणला आणि ते करुन दाखविले.


शासनाकडे केलेल्या विशेष प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील २२ गावांना ०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर. दि. १८ फेब्रुवारी, २०१९ रोजी शासन निर्णय पारित. आमदार शंभूराज देसाई.






­­
 दौलतनगर दि.२०:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व सभामंडप इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९  या आर्थिक वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री यांचेकडे केली होती त्यानुसार मुख्यमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री यांनी पाटण मतदारसंघातील एकूण २२ विविध विकासकामांना एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली असून सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामीण विकास राज्यमंत्री ना.दादाजी भूसे यांचे आभार मानले आहेत.
               आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील २२ गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व सभामंडप इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी मंजूर होणेबाबत दि.३१.०१.२०१९ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती. त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांचेकडील दि.१८ फेब्रुवारी,२०१९ रोजीचे शासन निर्णयानुसार एकूण २२ विविध विकास कामांकरीता एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीव कामांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर झालेल्या विकासकामामध्ये  मौजे खिलारवाडी गावपोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख, भिलारवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण ०७.०० लाख,खांडेकरवाडी (सोनवडे) अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकण ०७.०० लाख, खळे  ते मालदन रस्ता खडीकरण,डांबरीकरण २०.०० लाख,खळे गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख,तळमावले येथील काकासाहेब चव्हाण कॉलेजकडे जाणारा अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,मरळोशी अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,कडवे बुद्रुक येथील लिंगाळेवस्ती ते ग्रामदैवत पावनाईदेवी मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख, दौलतनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे ०७.०० लाख,रासाटी येथे गटर बांधकाम ०७.०० लाख,टेळेवाडी कोरीवळे येथील रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,मठवाडी (महिंद) येथील रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख, गिरेवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,आडूळपेठ ते डिगेवाडी येथील दत्त मंदिरासमोरील रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख,हेळवाक मुस्लिमवस्ती नवीन गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण ०७.०० लाख, कुंभारगाव अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख, मंद्रुळहवेली अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, लोहारवस्ती (केरळ) येथील अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, क्रांतीनगर (नाडे) येथील मागासवर्गीय व मातंगवस्ती रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, तोरणे येथील बौध्दवस्ती रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०९.०० लाख, सुपने मंडलातील तांबवे,ता.कराड येथील मशिदीसमोर सभामंडप ०७.०० लाख व पाडळी (केसे),ता.कराड येथील मुस्लिमवस्ती येथे सभामंडप ०७.०० लाख या विकासकामांचा समावेश असून या कामांना एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

सुपने मंडलातील प्रत्येक गांवामध्ये विकासाचा झंझावात. आमदार शंभूराज देसाईंचा दावा.



दौलतनगर दि.20:- पाटण मतदारसंघातील सुपने मंडल हे पाटण मतदारसंघाला जोडून 10 वर्षाचा काळ लोटला,या विभागाचे नेतृत्व यापुर्वी कराड दक्षिणचे माजी आमदार विलासराव पाटील हे करीत होते.या विभागातील नागरिकांना त्यांनी अगणित विकासाची कामे दिली त्यांच्या काळात जसा विकासाचा झंझावात या मंडलामध्ये सुरु होता तोच झंझावात आताही सुरु आहे त्यांच्याएवढे काम करणे केवळ पाच वर्षात शक्य नाही परंतू या मंडलातील प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये विकासाचे काम पोहचविण्याचा माझा गत साडेचार वर्षात प्रयत्न राहिला आहे. असा दावा आमदार शंभूराज देसाईंनी केला असून सुपने मंडलातील प्रत्येक गांवामध्ये आपण विकासाचे काम दिले आहे विकासाचा हा झंझावात असाच कायम सुरु ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील या विभागालाही पाटण मतदारसंघातील इतर विभागांच्या प्रमाणे विकास कामांत झुकते माप दिले जाईल असे आश्वासन आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेआहे.
                म्होर्पे ता.कराड याठिकाणी सुपने मंडलातील मौजे भोळेवाडी,म्होर्पे,कळंबे मळा,थोरातमळा (प.सुपने), वसंतगड, आबईचीवाडी,सुपने व केसे येथे आमदार शंभूराज देसाईंनी राज्य शासनाच्या 2515 योजनेतंर्गत तसेच जिल्हा नियोजन समितीतंर्गत मंजुर करुन आणलेल्या निधींच्या विविध कामांचाभुमीपूजन कार्यक्रम आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.या विभागातील रस्त्यांच्या तसेच साकव पुलांच्या कामांसाठी त्यांनी सुमारे १ कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेलीही विविध कामे आमदार शंभूराज देसाईंनी एका वर्षातच मार्गी लावल्याने सुपने मंडलातील नागरिकांमध्ये समाधान दिसून आले.यावेळी शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील,पं.स सदस्य सविता संकपाळ, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण,प्रभाकर शिदे,रयत कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, बबनराव शिंदे सर,कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील,शिवाजीराव शिंदे,तुकाराम डुबल,हणंमत निकम, डॉ.पांडुरंग निकम,लक्ष्मण देसाई,सरपंच तुकाराम कोकरे,संदीप सावंत,सुनिल पाटील,संदीप साळुंखे,अर्जुन कळंबे,अमित पाटील,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संचालक बबनराव भिसे आदी मान्यवरांसह मौजे भोळेवाडी,म्होर्पे,कळंबेमळा,थोरातमळा (प.सुपने),वसंतगड,आबईचीवाडी,सुपने व केसे येथील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पाटण मतदारसंघात सुपने मंडलाने दोन विधानसभा निवडणूकीत पाटणच्या लोकप्रतिनिधींना मतदान करण्याचे काम केले 2014 च्या विधानसभा निवडणूकीत या विभागाने मला भरघोस असे मताधिक्कय देवून माझे 18824 च्या मताधिक्कयामध्ये मोलाचा वाटा उचलला याचा मला आनंद आहे. 2009 च्या  विधानसभा निवडणूकीतही या विभागाने पाटणच्या माजी आमदारांना मतदान केले. केलेल्या मतदानाच्या बदल्यात माजी आमदारांनी या विभागाला ‍किती विकासाची कामे दिली किती नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडविले हेही पहाणे तितकेच गरजेचे आहे.येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे.‍ शिवसेना भाजप युतीच्या सरकारमधील सत्ताधारी सदस्य म्हणून मला या साडेचार वर्षात युतीच्या शासनाने कोटयावधी रुपयांचा निधी मतदारसंघातील विकास कामांकरीता दिला त्यानिधीतील बहूतांशी वाटा या सुपने मंडलामध्ये देण्याचा मी प्रयत्न केला.आज या विभागातील प्रत्येक गांवामध्ये विकासाचे काम सुरु आहे. विकासाचे काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची परंपरा या विभागाला आहे तीच परंपरा या विभागाने कायमस्वरुपी जपावी विकासाची प्रक्रिया ही कधीही न थांबणारी आहे. ज्यांना गरज आहे ते काम त्या त्या लोकप्रतिनिधींने देणे गरजेचे आहे.केवळ ही निवडणूक ते ती निवडणूक नागरिकांना मते मागण्यापुरते त्यांच्या दारात जायचे व मते मागून गेल्यावर त्यांच्या सुखदु:खात ढुंकूनही पहायचे नाही ही आपल्या विरोधंकाची पध्दत आहे.परंतू आपण तसे केले नाही या विभागातील समस्या जाणून घेणेकरीता आपण या विभागाचा स्वतंत्र असा जनता दरबार घेतला अनेक नागरिकांचे प्रश्न आपण जागेवर सोडविले तसेच विकासाकामांची ज्या ज्या गांवाना व वाडयावस्त्यांना आवश्यकता आहे त्या त्या गांवाना व वाडयावस्त्यांना आपण विकासाचे काम देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आज एका दिवसात आपण सुमारे 1 कोटी 13 लाख रुपयांच्या कामांची भूमिपुजने केली यापुर्वीच्या माजी आमदारांच्या काळात सन  2009 ते 2014 मध्ये एवढी विकासाची कामे या विभागात त्यांनी कधी दिली आहेत का? याची तुलना सुपने मंडलातील नागरिकांनी करावी. विकासाच्या कामांकरीता यापुढेही भरघोस असा निधी या विभागाला दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.               

Saturday, 16 February 2019

शासनाकडून पाटणच्या नगरपंचायतीवर कारवाई करण्याची वेळ आणू नका. आमदार शंभूराज देसाईंचा विरोधकांना पाटणमध्ये इशारा.





दौलतनगर दि.16:- पाटण शहरातील विकासाच्या कामांमध्ये राजकारण करुन विकासाकामांकरीता आवश्यक असणारे ठराव न देण्याची पाटण नगरपंचायतीची भूमिका पाटण शहरात होणाऱ्या विकासकामांना घातक असून राजकारणासाठी आडमुठेपणा करणाऱ्या पाटणच्या नगरपंचायतीवर शासनाकडून कारवाई करण्याची वेळ आमच्यावर आणू नका असा इशारा आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणमध्ये जावून केला आहे. आडमुठे धोरण राबवून विकासकामांचे ठराव अडविण्याचे अधिकारात बसत नाही तरी तुमचे अधिकार सांगत असला तरी शासनाचे अधिकार वापरुन चुकीच्या पध्दतीने काम करणाऱ्या नगरपंचायतीवर कारवाई करण्याचे अधिकारही शासनाला आहेत ती वेळ येवू देवू नका असा स्पष्ट इशाराच त्यांनी विरोधकांना दिला आहे.
                 पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाईंचे स्थानिक विकास निधीमधून मौजे रामापुर येथील वॉर्ड क्रं.१४ मध्ये अंतर्गत रस्ता सुधारणा व गटर बांधकाम करणे व प्रभाग १७ मध्ये दिनेश चौधरी यांचे घर ते महादेव भिसे यांचे घरापर्यंत आर.सी.सी.गटर बांधणे या कामांचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते.या दोन्ही कामांसाठी त्यांनी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिलेला आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,शिवदौलतचे संचालक अशोकराव पाटील,कारखान्याचे संचालक बाळासाहेब शेजवळ,बबनराव भिसे,ॲड.तानाजीराव घाडगे,माजी जिल्हा परीषद सदस्य बशीर खोंदू,पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक गणीभाई चाफेरकर,नगरसेविका सौ.मनिषा जंगम,सलीम इनामदार,शफीभाई साताराकर,शंकर कुंभार,अरुण घोणे,रामचंद्र पाटील,बबनराव माळी,शकंर पाटील, गुरुलिंग जंगम,बबनराव पवार,अशोक नाईकवडी,महादेव खैरमोडे,हनिफ साताराकर,मुसाभाई इनामदार,आर्शफ खोंदू, इब्राहिम साताराकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह रामापुर येथील नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पाटण शहरात आज भूमिपुजन केलेली दोन्ही कामे ही मला आमदार म्हणून प्रतिवर्षी मिळणाऱ्या स्थानिक विकास निधीतील आहेत.कालच या कामांच्या भूमिपुजनांचे कार्यक्रम आयोजीत केले होते काल जम्मु काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादयांनी भारतीय केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफयावर केलेल्या आत्मघातकी भ्याड हल्ल्यामुळे आपण हे कार्यक्रम रद्द केले आपल्या अगोदरच कुणीतरी येवून येथे भूमिपुजनांचे कार्यक्रम घेतल्याचे समजले. ज्यांनी ही भूमिपुजने घेतली त्यांच्या कामांना मंजुरी नाही मी मंजुरीचा आदेश आणि या कामांचे कार्यारंभ आदेशच घेवून आलोय.दिखावा करणाऱ्यांना आणि बिनकामाचे राजकारण करणाऱ्यांनाकडे आपल्याला वेळ नाहीये आपण विकासाचे काम करतोय ते आपण करीत राहायचे.नगरपंचायतीची निवडणूक होवून दोन वर्षे झाली. पाटणला किती तास पाणी येते असा उपस्थितांना सवाल करीत ते म्हणाले, पाटणला केवळ अर्धा तास पाणी मिळते म्हणून मी नगरपंचायतीच्या निवडणूकी आधी पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या दुरुस्तीच्या कामांकरीता सुमारे ४६.५७ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला. त्याचे काम या बहाद्दरांना करता आले नाही. आणि आलेत मंजुर नसलेल्या कामांचे भूमिपुजन करायला. नगरपंचायतीचे काम मंजुर असते तर त्यांचे नेते आले असते ना भूमिपुजन करायला पण ते आले नाहीत यावरुनच त्यांचे पितळ उघडे पडले आहे हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. पाटण शहरात चांगले रस्ते,पिण्याच्या पाण्याची योजना, गटारे, दिवाबत्ती यासारख्या मुलभूत सोयीसुविधा नाहीत हे तालुक्याचे दुर्दैव आहे. अस्वच्छ पाटण म्हणून रखाणेच्या रखाणे वृत्तपत्रात छापून येतात यावरुन तरी विरोधकांनी स्वत:च्या गांवाची सुधारणा करायला हवी होती.पाटण शहरातील नागरिकांनी तुम्हाला दिलेली सत्ता चांगल्या कामाकरीता वापरा, नको तिथे आडमुठेपणा केल्याने याचा त्रास शहरातील नागरिकांना सोसावा लागत आहे याचे तरी भान येथील निवडून आलेल्या नगरसेवकांनी राहू दे त्यांच्या नेत्यांनी तरी ठेवायला पाहिजे.एकतर पुर्णवेळ नगरपंचायतीला मुख्य कार्यकारी अधिकारी नाही. मग कशाचा विकास साधणार ही मंडळी असे सांगून ते म्हणाले, रामापुर येथे मुस्लिम समाजाकरीता शादीखाना मंजुर करायला मी शासनाकडे मागणी केली त्याचा ठराव गेली दोन वर्षे मागूनही दिला जात नाही.या कामांचीही तीच अवस्था,आमचे दोन नगरसेवक आहेत त्यांच्या मागणीवरुन मी सुमारे २ कोटी ५० लक्ष रुपयांची कामांना नगरोथ्यान मधून जिल्हा नियोजन समितीने निधी दयावा अशी मागणी केली आहे त्याला ठराव देत नाहीत. नगरपंचायतीला एक रुपया खर्चाचा नाही, केवळ ठराव दयायचा आहे तो ही ते देवू शकत नाहीत म्हणजे स्वत: काही करायचे नाही आणि दुसरा काय करतोय तर त्याला करु दयायचे नाही असा आडमुठेपणा आणि चुकीच्या पध्दतीने कामकाज करणाऱ्या नगरपंचायतीवर शासनाकडून कारवाई करण्याची वेळ आणू शकतो आमदार म्हणून मला ती वेळ आणून देवू नका.असेही त्यांनी शेवठी बोलताना सांगितले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक वैभव घोणे यांनी करुन आभारही मानले.
चौकट:- शंभूराजच्या ओजंळीतून राहू दे, तुमच्या ओजंळीने तरी गावकऱ्यांना पाणी दया.
आमदार म्हणून शंभूराज देसाई कामे देत आहेत तर त्यांच्या ओजंळीने आम्हाला पाणी नको अशी भूमिका ही विरोधकांची नेहमीच राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या अनेक गांवामध्ये विकासकामांकरीता ठराव दिले जात नाहीत ही दुर्दैवी बाब आहे.शंभूराजच्या ओजंळीतून पाणी घ्यायचे नसेल तर राहू दे, निदान तुमच्या ओजंळीने तरी गावकऱ्यांना पाणी दया. असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी विरोधकांना लगाविला.


Friday, 15 February 2019

माजी आमदार यांचा मंत्रीपदाचा कार्यकाळ निष्क्रीय. मतदारसंघासाठी मंत्रीपदाचा उपयोग शुन्य. आमदार शंभूराज देसाईंचे टिकास्त्र.




दौलतनगर दि.१५:- पाटणचे माजी आमदार आणि राज्याचे माजी बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेले पाटणकर यांचा मंत्रीपदाचा कार्यकाळ हा निष्क्रीय गेला असून त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा पाटण मतदारसंघातील जनतेला शुन्य उपयोग झाला असल्याचे टिकास्त्र  आमदार शंभूराज देसाई यांनी केले असून माजी आमदारांच्या मंत्रीपदाच्या काळात मतदारसंघातील जनतेच्या हिताचा एकही धोरणात्मक निर्णय ते घेवू शकले नाहीत कोटयावधी रुपयांचा निधी बांधकाम विभागातून देण्याचे अधिकार हातात असताना ते मतदारसंघातील डोंगर कपारीतील रस्ते करु शकले नाहीत बांधकाम मंत्री असताना त्यांना नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर हा रस्ता राज्यमार्गही करुन घेता आला नाही हे आपले दुर्दैव अशी टिका आमदार शंभूराज देसाईंनी माजी आमदार विक्रमसिंह पाटणकरांचे नांव न घेता केली आहे.
                  तळीये पुर्व, ता.पाटण येथे अर्थसंकल्पातून मंजुर राज्य मार्ग नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर रस्ता भाग मेंढेघर ते मान्याचीवाडी 20 किमी लांबीचा रस्ता करणे तसेच पुरवणी अर्थस्ंकल्पातून मंजुर संगमनगर धक्का ते काढोली रस्ता प्रजिमा 55  हा ३.००  किमी रस्ता करणे व कोयना पुनर्वसन मधून मंजुर झालेल्या ढोकावळे रिसवड येथे पोहोच रस्ता २.०० किमी डांबरीकरण करणे व मोरी बांधकाम करणे या कामांचा संयुक्तरित्या भूमिपुजन समारंभ आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते या कामांकरीता अनुक्रमे ०६.०० कोटी, ०१.०० कोटी व ५२ लाख असे एकूण ७.५२ लाख रुपयांचा निधी आमदार शंभूराज देसाईंनी मंजुर करुन आणला आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर,संजय गांधी निराधर समिती सदस्य सदानंद साळुंखे,जिल्हा परीषद सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती सदस्या सौ.निर्मला देसाई,माजी सदस्य नथूराम कुंभार,भागोजी शेळके,नथूराम सावंत,अशोक पाटील तळीयेकर,विजय बाबर सरपंच,वामन शेलार उपसरपंच,निवृत्ती कदम,शामराव सावंत,गणपतराव सावंत, किसनराव सावंत,भिवाजी जाधव, दिलीप सकपाळ,सुरेश सुतार आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच राज्यमार्गावरील तळीये पुर्व-पश्चिम, मणेरी, माणगांव,झाकडे,किल्लेमोरगिरी,लेढोंरी,चाफेर,चिरंबे,काढोली,कोंडावळे,रिसवड,मेंढेंघर,नांव,गोठणे,मिरगांव येथील नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,मी केवळ मतदारसंघाचा आमदार आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून गेली साडेचार वर्षे काम करताना पाटण मतदारसंघात एक हजार कोटीहून अधिक निधी हा मतदारसंघातील प्रलंबीत विकासकामांकरीता मंजुर करुन आणण्यात मला यश आले आहे.आमदार जर एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी मतदारसंघात आणू शकत असेल तर ज्यांच्या हातात सलग पाच वर्षे राज्याच्या बांधकाम विभागाच्या चाव्या होत्या त्या माजी आमदारांना किती कोटींचा निधी मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांकरीता आणता आला असता परंतू त्यांचा मंत्रीपदाचा कार्यकाळ हा निष्क्रीय गेला असून मी आमदार म्हणून मतदारसंघातील ग्रामीण व डोंगरी भागातील रस्त्यांच्या कामांकरीता जेवढा निधी आणला आहे तेवढा निधी ते मंत्रीपदाच्या काळात पाटण मतदारसंघात आणू शकले नाहीत हे मी छातीठोकपणे दाव्याने सांगु शकतो. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती त्यांची झाली असून बांधकाम खात्याच्या मंत्र्यास त्यांचे स्वत:च्या मतदारसंघातील एखादा रस्ता राज्य मार्ग करणे कितपत अवघड आहे. परंतू  नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर हा रस्ताही त्यांना राज्यमार्ग करता आला नाही. माजी आमदारांच्या कार्यकाळात ते मंत्री असताना पाटण मतदारसंघात सहा- सहा कोटी रुपयांचा निधी कुठल्या रस्त्याच्या कामांला त्यांनी मंजुर करुन आणल्याचे पाटण मतदारसंघातील जनतेने एैकले आहे आहे.? मी तर केवळ आमदार आहे. एका एका रस्त्याला सहा- सहा कोटी रुपयांचा निधी मला आणणे शक्य आहे तर माजी बांधकाम मंत्र्यांना ते का जमले नाही. त्यांची काम करण्याची पध्दत आणि माझी काम करण्याची पध्दत यात जमिन आसमानचा फरक आहे. मी अनेकदा त्यांना जाहीरपणे आवाहन केले आहे की, तुम्ही २००९ ते २०१४ या मतदारसंघाचे आमदार होता आणि मी आता साडेचार वर्षे या मतदारसंघाचा आमदार आहे. तुम्ही त्या पाच वर्षात मतदारसंघात आणलेला विकासनिधी आणि मी आणलेला विकासनिधी जाहीरपणे लेखी स्वरुपात मतदारसंघातील जनतेच्या पुढे मांडा.त्यासही ते तयार होत नाहीत. मी हे केले, मी ते केले अशा खोटया वल्गना करणाऱ्यांना त्या पाच वर्षात याच रस्त्यावरील वाडीकोतावडे येथील मी मंजुर करुन आणलेल्या पुलाचे काम पुर्ण करुन घेता आले नाही त्यांनी काय विकास केला असेल ? ढोकावळे ते रिसवड या रस्त्याचीही तीच अवस्था आहे. त्यांना हा रस्ता आमदार म्हणून का पुर्ण करता आला नाही. हाच रस्ता सोडा मतदारसंघातील डोंगरी भागातील असे अनेक रस्ते आहेत ते माजी आमदारांना का करता आले नाहीत असे मी अनेकदा विचारले होते त्याचे उत्तर त्यांना देता आले नाही. केवळ जनतेमध्ये बुध्दीभेद आणि जनतेच्या डोक्यात विष कालवण्याचे काम ही मंडळी करीत आहेत त्यापासून सावध रहा असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक दिलीप सकपाळ यांनी केले व आभार नथूराम सावंत यांनी मानले.

Thursday, 14 February 2019

पुलवामा येथील दहशतवादी हल्लयाचा आमदार शंभूराज देसाईंकडून तीव्र निषेध. पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शहीद जवानांना वाहिली श्रध्दाजंली.




दौलतनगर दि.1५:- काल जम्मु काश्मीरच्या पुलवामा जिल्हयात दहशतादयांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफयावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात तब्बल ४0 जवानांचा बळी गेला असून २० हुन अधिक जवान जखमी झाले आहेत.देशावर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.दहशतवादयांच्या या भ्याड हल्लयाचा पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नवारस्ता येथे निषेध सभा घेवून तीव्र निषेध केला असून या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण केली आहे.
                  नवारस्ता ता.पाटण येथे गुरुवारी जम्मु काश्मीरच्या पुलवामा जिल्हयात दहशतवादयांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफयावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्याकरीता पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभा आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी आमदार शंभूराज देसाईंनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.याप्रसंगी निषेध सभेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
                   याप्रसंगी निषेध व्यक्त करताना आमदार देसाई म्हणाले,जम्मु काश्मीरच्या पुलवामा जिल्हयात दहशतादयांनी काल दुपारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफयावर केलेल्या आत्मघातकी हल्ला हा अत्यंत निंदनीय व घृणास्पद असे कृत्य आहे. या दहशतवादी हल्ल्याने संपुर्ण देश हादरला असून या हल्लयाचा निषेध करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.कालच्या आत्मघातकी भ्याड हल्लयात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तब्बल ४0 जवानांचा बळी गेला असून २० हुन अधिक जवान जखमी झाले आहेत. यामध्ये आपले महाराष्ट्र राज्यातील दोन जवानांचा समावेश आहे.दहशतवादयांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्लयाचा मी पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो व भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ न जाणेकरीता आपण सर्वांनी भारतीय जवानांच्या तसेच शहीद झालेल्या जवानांच्या कुटुबिंयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची नितांत गरज आहे. आपण सर्वजण शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी तसेच सोबत ठामपणे उभे राहूया असे सांगून त्यांनी दहशतवादयांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण केली.
           चौकट:- आमदार शंभूराज देसाईंनी केले शासकीय भूमिपुजनांचे कार्यक्रम रद्द.
  दहशतवादयांनी आपल्या देशावर आणि भारतीय जवानांवर केलेला हल्ला दुर्दैवी असून या परिस्थितीचे गांभीर्य राखून आज रोजी आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत पाटण विधानसभा मतदारसंघात आयोजीत केलेले शासकीय कामांचे सर्व भूमिपुजनांचे कार्यक्रम त्यांनी रद्द करुन शहीद जवानांना त्यांनी भावपुर्ण श्रध्दाजंली वाहिली.