Wednesday 20 February 2019

शासनाकडे केलेल्या विशेष प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील २२ गावांना ०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर. दि. १८ फेब्रुवारी, २०१९ रोजी शासन निर्णय पारित. आमदार शंभूराज देसाई.






­­
 दौलतनगर दि.२०:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व सभामंडप इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९  या आर्थिक वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री यांचेकडे केली होती त्यानुसार मुख्यमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री यांनी पाटण मतदारसंघातील एकूण २२ विविध विकासकामांना एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली असून सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामीण विकास राज्यमंत्री ना.दादाजी भूसे यांचे आभार मानले आहेत.
               आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील २२ गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व सभामंडप इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी मंजूर होणेबाबत दि.३१.०१.२०१९ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती. त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांचेकडील दि.१८ फेब्रुवारी,२०१९ रोजीचे शासन निर्णयानुसार एकूण २२ विविध विकास कामांकरीता एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीव कामांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर झालेल्या विकासकामामध्ये  मौजे खिलारवाडी गावपोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख, भिलारवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण ०७.०० लाख,खांडेकरवाडी (सोनवडे) अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकण ०७.०० लाख, खळे  ते मालदन रस्ता खडीकरण,डांबरीकरण २०.०० लाख,खळे गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख,तळमावले येथील काकासाहेब चव्हाण कॉलेजकडे जाणारा अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,मरळोशी अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,कडवे बुद्रुक येथील लिंगाळेवस्ती ते ग्रामदैवत पावनाईदेवी मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख, दौलतनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे ०७.०० लाख,रासाटी येथे गटर बांधकाम ०७.०० लाख,टेळेवाडी कोरीवळे येथील रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,मठवाडी (महिंद) येथील रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख, गिरेवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,आडूळपेठ ते डिगेवाडी येथील दत्त मंदिरासमोरील रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख,हेळवाक मुस्लिमवस्ती नवीन गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण ०७.०० लाख, कुंभारगाव अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख, मंद्रुळहवेली अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, लोहारवस्ती (केरळ) येथील अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, क्रांतीनगर (नाडे) येथील मागासवर्गीय व मातंगवस्ती रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, तोरणे येथील बौध्दवस्ती रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०९.०० लाख, सुपने मंडलातील तांबवे,ता.कराड येथील मशिदीसमोर सभामंडप ०७.०० लाख व पाडळी (केसे),ता.कराड येथील मुस्लिमवस्ती येथे सभामंडप ०७.०० लाख या विकासकामांचा समावेश असून या कामांना एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment