Wednesday 20 February 2019

सुपने मंडलातील प्रत्येक गांवामध्ये विकासाचा झंझावात. आमदार शंभूराज देसाईंचा दावा.



दौलतनगर दि.20:- पाटण मतदारसंघातील सुपने मंडल हे पाटण मतदारसंघाला जोडून 10 वर्षाचा काळ लोटला,या विभागाचे नेतृत्व यापुर्वी कराड दक्षिणचे माजी आमदार विलासराव पाटील हे करीत होते.या विभागातील नागरिकांना त्यांनी अगणित विकासाची कामे दिली त्यांच्या काळात जसा विकासाचा झंझावात या मंडलामध्ये सुरु होता तोच झंझावात आताही सुरु आहे त्यांच्याएवढे काम करणे केवळ पाच वर्षात शक्य नाही परंतू या मंडलातील प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये विकासाचे काम पोहचविण्याचा माझा गत साडेचार वर्षात प्रयत्न राहिला आहे. असा दावा आमदार शंभूराज देसाईंनी केला असून सुपने मंडलातील प्रत्येक गांवामध्ये आपण विकासाचे काम दिले आहे विकासाचा हा झंझावात असाच कायम सुरु ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील या विभागालाही पाटण मतदारसंघातील इतर विभागांच्या प्रमाणे विकास कामांत झुकते माप दिले जाईल असे आश्वासन आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेआहे.
                म्होर्पे ता.कराड याठिकाणी सुपने मंडलातील मौजे भोळेवाडी,म्होर्पे,कळंबे मळा,थोरातमळा (प.सुपने), वसंतगड, आबईचीवाडी,सुपने व केसे येथे आमदार शंभूराज देसाईंनी राज्य शासनाच्या 2515 योजनेतंर्गत तसेच जिल्हा नियोजन समितीतंर्गत मंजुर करुन आणलेल्या निधींच्या विविध कामांचाभुमीपूजन कार्यक्रम आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.या विभागातील रस्त्यांच्या तसेच साकव पुलांच्या कामांसाठी त्यांनी सुमारे १ कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेलही विविध काम आमदार शंभूराज देसाईंनी एका वर्षातच मार्गी लाल्याने सुपने मंडलातील नागरिकांमध्ये समाधान दिसून आले.यावेळी शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील,पं.स सदस्य सविता संकपाळ, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण,प्रभाकर शिदे,रयत कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, बबनराव शिंदे सर,कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील,शिवाजीराव शिंदे,तुकाराम डुबल,हणंमत निकम, डॉ.पांडुरंग निकम,लक्ष्मण देसाई,सरपंच तुकाराम कोकरे,संदीप सावंत,सुनिल पाटील,संदीप साळुंखे,अर्जुन कळंबे,अमित पाटील,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संचालक बबनराव भिसे आदी मान्यवरांसह मौजे भोळेवाडी,म्होर्पे,कळंबेमळा,थोरातमळा (प.सुपने),वसंतगड,आबईचीवाडी,सुपने व केसे येथील प्रमुख पदाधिकारीकार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पाटण मतदारसंघात सुपने मंडलाने दोन विधानसभा निवडणूकीत पाटणच्या लोकप्रतिनिधींना मतदान करण्याचे काम केले 2014 च्या विधानसभा निवडणूकीत या विभागाने मला भरघोस असे मताधिक्कय देवून माझे 18824 च्या मताधिक्कयामध्ये मोलाचा वाटा उचलला याचा मला आनंद आहे. 2009 च्या  विधानसभा निवडणूकीतही या विभागाने पाटणच्या माजी आमदारांना मतदान केले. केलेल्या मतदानाच्या बदल्यात माजी आमदारांनी या विभागाला ‍किती विकासाची कामे दिली किती नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडविले हेही पहाणे तितकेच गरजेचे आहे.येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे.‍ शिवसेना भाजप युतीच्या सरकारमधील सत्ताधारी सदस्य म्हणून मला या साडेचार वर्षात युतीच्या शासनाने कोटयावधी रुपयांचा निधी मतदारसंघातील विकास कामांकरीता दिला त्यानिधीतील बहूतांशी वाटा या सुपने मंडलामध्ये देण्याचा मी प्रयत्न केला.आज या विभागातील प्रत्येक गांवामध्ये विकासाचे काम सुरु आहे. विकासाचे काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची परंपरा या विभागाला आहे तीच परंपरा या विभागाने कायमस्वरुपी जपावी विकासाची प्रक्रिया ही कधीही न थांबणारी आहे. ज्यांना गरज आहे ते काम त्या त्या लोकप्रतिनिधींने देणे गरजेचे आहे.केवळ ही निवडणूक ते ती निवडणूक नागरिकांना मते मागण्यापुरते त्यांच्या दारात जायचे व मते मागून गेल्यावर त्यांच्या सुखदु:खात ढुंकूनही पहायचे नाही ही आपल्या विरोधंकाची पध्दत आहे.परंतू आपण तसे केले नाही या विभागातील समस्या जाणून घेणेकरीता आपण या विभागाचा स्वतंत्र असा जनता दरबार घेतला अनेक नागरिकांचे प्रश्न आपण जागेवर सोडविले तसेच विकासाकामांची ज्या ज्या गांवाना व वाडयावस्त्यांना आवश्यकता आहे त्या त्या गांवाना व वाडयावस्त्यांना आपण विकासाचे काम देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आज एका दिवसात आपण सुमारे 1 कोटी 13 लाख रुपयांच्या कामांची भूमिपुजने केली यापुर्वीच्या माजी आमदारांच्या काळात सन  2009 ते 2014 मध्ये एवढी विकासाची कामे या विभागात त्यांनी कधी दिली आहेत कायाची तुलना सुपने मंडलातील नागरिकांनी करावी. विकासाच्या कामांकरीता यापुढेही भरघोस असा निधी या विभागाला दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.               

No comments:

Post a Comment