Thursday 14 February 2019

पुलवामा येथील दहशतवादी हल्लयाचा आमदार शंभूराज देसाईंकडून तीव्र निषेध. पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शहीद जवानांना वाहिली श्रध्दाजंली.




दौलतनगर दि.1:- काल जम्मु काश्मीरच्या पुलवामा जिल्हयात दहशतादयांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफयावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात तब्बल ४0 जवानांचा बळी गेला असून २० हुन अधिक जवान जखमी झाले आहेत.देशावर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.दहशतवादयांच्या या भ्याड हल्लयाचा पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नवारस्ता येथे निषेध सभा घेवून तीव्र निषेध केला असून या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण केली आहे.
                  नवारस्ता ता.पाटण येथे गुरुवारी जम्मु काश्मीरच्या पुलवामा जिल्हयात दहशतवादयांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफयावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्याकरीता पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभा आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी आमदार शंभूराज देसाईंनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.याप्रसंगी निषेध सभेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
                   याप्रसंगी निषेध व्यक्त करताना आमदार देसाई म्हणाले,जम्मु काश्मीरच्या पुलवामा जिल्हयात दहशतादयांनी काल दुपारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफयावर केलेल्या आत्मघातकी हल्ला हा अत्यंत निंदनीय व घृणास्पद असे कृत्य आहे. या दहशतवादी हल्ल्याने संपुर्ण देश हादरला असून या हल्लयाचा निषेध करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.कालच्या आत्मघातकी भ्याड हल्लयात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तब्बल ४0 जवानांचा बळी गेला असून २० हुन अधिक जवान जखमी झाले आहेत. यामध्ये आपले महाराष्ट्र राज्यातील दोन जवानांचा समावेश आहे.दहशतवादयांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्लयाचा मी पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो व भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ न जाणेकरीता आपण सर्वांनी भारतीय जवानांच्या तसेच शहीद झालेल्या जवानांच्या कुटुबिंयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची नितांत गरज आहे. आपण सर्वजण शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी तसेच सोबत ठामपणे उभे राहूया असे सांगून त्यांनी दहशतवादयांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण केली.
           चौकट:- आमदार शंभूराज देसाईंनी केले शासकीय भूमिपुजनांचे कार्यक्रम रद्द.
  दहशतवादयांनी आपल्या देशावर आणि भारतीय जवानांवर केलेला हल्ला दुर्दैवी असून या परिस्थितीचे गांभीर्य राखून आज रोजी आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत पाटण विधानसभा मतदारसंघात आयोजीत केलेले शासकीय कामांचे सर्व भूमिपुजनांचे कार्यक्रम त्यांनी रद्द करुन शहीद जवानांना त्यांनी भावपुर्ण श्रध्दाजंली वाहिली.

No comments:

Post a Comment