दौलतनगर दि.16:- पाटण शहरातील विकासाच्या कामांमध्ये राजकारण करुन
विकासाकामांकरीता आवश्यक असणारे ठराव न देण्याची पाटण नगरपंचायतीची भूमिका पाटण
शहरात होणाऱ्या विकासकामांना घातक असून राजकारणासाठी आडमुठेपणा करणाऱ्या पाटणच्या नगरपंचायतीवर शासनाकडून कारवाई करण्याची
वेळ आमच्यावर आणू नका असा इशारा आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणमध्ये जावून केला आहे. आडमुठे धोरण राबवून विकासकामांचे
ठराव अडविण्याचे अधिकारात बसत नाही तरी तुमचे अधिकार सांगत असला तरी शासनाचे
अधिकार वापरुन चुकीच्या पध्दतीने काम करणाऱ्या नगरपंचायतीवर कारवाई करण्याचे
अधिकारही शासनाला आहेत ती वेळ येवू देवू नका असा स्पष्ट इशाराच त्यांनी विरोधकांना
दिला आहे.
पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाईंचे स्थानिक
विकास निधीमधून मौजे रामापुर येथील वॉर्ड क्रं.१४ मध्ये अंतर्गत रस्ता सुधारणा व
गटर बांधकाम करणे व प्रभाग १७ मध्ये दिनेश चौधरी यांचे घर ते महादेव भिसे यांचे
घरापर्यंत आर.सी.सी.गटर बांधणे या कामांचे भूमिपुजन आमदार
शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आले
होते.याप्रसंगी ते बोलत होते.या दोन्ही कामांसाठी त्यांनी १० लाख
रुपयांचा निधी मंजूर करुन
दिलेला आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,पंचायत समितीच्या माजी
सभापती सौ.मुक्ताबाई माळी,शिवदौलतचे संचालक अशोकराव पाटील,कारखान्याचे संचालक
बाळासाहेब शेजवळ,बबनराव भिसे,ॲड.तानाजीराव घाडगे,माजी जिल्हा परीषद सदस्य बशीर
खोंदू,पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक गणीभाई चाफेरकर,नगरसेविका सौ.मनिषा जंगम,सलीम
इनामदार,शफीभाई साताराकर,शंकर कुंभार,अरुण घोणे,रामचंद्र पाटील,बबनराव माळी,शकंर पाटील,
गुरुलिंग जंगम,बबनराव पवार,अशोक नाईकवडी,महादेव खैरमोडे,हनिफ साताराकर,मुसाभाई
इनामदार,आर्शफ खोंदू, इब्राहिम साताराकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह रामापुर येथील
नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पाटण शहरात आज भूमिपुजन केलेली दोन्ही कामे ही मला आमदार
म्हणून प्रतिवर्षी मिळणाऱ्या स्थानिक विकास निधीतील आहेत.कालच या कामांच्या
भूमिपुजनांचे कार्यक्रम आयोजीत केले होते काल जम्मु काश्मीरच्या पुलवामा
येथे दहशतवादयांनी भारतीय केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफयावर केलेल्या
आत्मघातकी भ्याड हल्ल्यामुळे आपण हे
कार्यक्रम रद्द केले आपल्या अगोदरच कुणीतरी येवून येथे भूमिपुजनांचे कार्यक्रम
घेतल्याचे समजले. ज्यांनी ही भूमिपुजने घेतली त्यांच्या कामांना मंजुरी नाही मी
मंजुरीचा आदेश आणि या कामांचे कार्यारंभ आदेशच घेवून आलोय.दिखावा करणाऱ्यांना आणि
बिनकामाचे राजकारण करणाऱ्यांनाकडे आपल्याला वेळ नाहीये आपण विकासाचे काम करतोय ते
आपण करीत राहायचे.नगरपंचायतीची निवडणूक होवून दोन वर्षे झाली. पाटणला किती तास
पाणी येते असा उपस्थितांना सवाल करीत ते म्हणाले, पाटणला केवळ अर्धा तास पाणी
मिळते म्हणून मी नगरपंचायतीच्या निवडणूकी आधी पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या
दुरुस्तीच्या कामांकरीता सुमारे ४६.५७ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला. त्याचे
काम या बहाद्दरांना करता आले नाही. आणि आलेत मंजुर नसलेल्या कामांचे भूमिपुजन
करायला. नगरपंचायतीचे काम मंजुर असते तर त्यांचे नेते आले असते ना भूमिपुजन करायला
पण ते आले नाहीत यावरुनच त्यांचे पितळ उघडे पडले आहे हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.
पाटण शहरात चांगले रस्ते,पिण्याच्या पाण्याची योजना, गटारे, दिवाबत्ती यासारख्या
मुलभूत सोयीसुविधा नाहीत हे तालुक्याचे दुर्दैव आहे. अस्वच्छ पाटण म्हणून
रखाणेच्या रखाणे वृत्तपत्रात छापून येतात यावरुन तरी विरोधकांनी स्वत:च्या गांवाची
सुधारणा करायला हवी होती.पाटण शहरातील नागरिकांनी तुम्हाला दिलेली सत्ता चांगल्या
कामाकरीता वापरा, नको तिथे आडमुठेपणा केल्याने याचा त्रास शहरातील नागरिकांना
सोसावा लागत आहे याचे तरी भान येथील निवडून आलेल्या नगरसेवकांनी राहू दे त्यांच्या
नेत्यांनी तरी ठेवायला पाहिजे.एकतर पुर्णवेळ नगरपंचायतीला मुख्य कार्यकारी अधिकारी
नाही. मग कशाचा विकास साधणार ही मंडळी असे सांगून ते म्हणाले, रामापुर येथे
मुस्लिम समाजाकरीता शादीखाना मंजुर करायला मी शासनाकडे मागणी केली त्याचा ठराव
गेली दोन वर्षे मागूनही दिला जात नाही.या कामांचीही तीच अवस्था,आमचे दोन नगरसेवक
आहेत त्यांच्या मागणीवरुन मी सुमारे २ कोटी ५० लक्ष रुपयांची कामांना नगरोथ्यान
मधून जिल्हा नियोजन समितीने निधी दयावा अशी मागणी केली आहे त्याला ठराव देत नाहीत.
नगरपंचायतीला एक रुपया खर्चाचा नाही, केवळ ठराव दयायचा आहे तो ही ते देवू शकत
नाहीत म्हणजे स्वत: काही करायचे नाही आणि दुसरा काय करतोय तर त्याला करु दयायचे
नाही असा आडमुठेपणा आणि चुकीच्या पध्दतीने कामकाज करणाऱ्या नगरपंचायतीवर शासनाकडून
कारवाई करण्याची वेळ आणू शकतो आमदार म्हणून मला ती वेळ आणून देवू नका.असेही
त्यांनी शेवठी बोलताना सांगितले. उपस्थितांचे
स्वागत व प्रास्ताविक वैभव घोणे यांनी करुन आभारही मानले.
चौकट:- शंभूराजच्या
ओजंळीतून राहू दे, तुमच्या ओजंळीने तरी गावकऱ्यांना पाणी दया.
आमदार
म्हणून शंभूराज देसाई कामे देत आहेत तर त्यांच्या ओजंळीने आम्हाला पाणी नको अशी
भूमिका ही विरोधकांची नेहमीच राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या अनेक
गांवामध्ये विकासकामांकरीता ठराव दिले जात नाहीत ही दुर्दैवी बाब आहे.शंभूराजच्या
ओजंळीतून पाणी घ्यायचे नसेल तर राहू दे, निदान तुमच्या ओजंळीने तरी गावकऱ्यांना
पाणी दया. असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी विरोधकांना लगाविला.
No comments:
Post a Comment