Friday 15 February 2019

माजी आमदार यांचा मंत्रीपदाचा कार्यकाळ निष्क्रीय. मतदारसंघासाठी मंत्रीपदाचा उपयोग शुन्य. आमदार शंभूराज देसाईंचे टिकास्त्र.




दौलतनगर दि.१५:- पाटणचे माजी आमदार आणि राज्याचे माजी बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेले पाटणकर यांचा मंत्रीपदाचा कार्यकाळ हा निष्क्रीय गेला असून त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा पाटण मतदारसंघातील जनतेला शुन्य उपयोग झाला असल्याचे टिकास्त्र  मदार शंभूराज देसाई यांनी केले असून माजी आमदारांच्या मंत्रीपदाच्या काळात मतदारसंघातील जनतेच्या हिताचा एकही धोरणात्मक निर्णय ते घेवू शकले नाहीत कोटयावधी रुपयांचा निधी बांधकाम विभागातून देण्याचे अधिकार हातात असताना ते मतदारसंघातील डोंगर कपारीतील रस्ते करु शकले नाहीत बांधकाम मंत्री असताना त्यांना नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर हा रस्ता राज्यमार्गही करुन घेता आला नाही हे आपले दुर्दैव अशी टिका आमदार शंभूराज देसाईंनी माजी आमदार विक्रमसिंह पाटणकरांचे नांव न घेता केली आहे.
                  तळीये पुर्व, ता.पाटण येथे अर्थसंकल्पातून मंजुर राज्य मार्ग नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर रस्ता भाग मेंढेघर ते मान्याचीवाडी 20 किमी लांबीचा रस्ता करणे तसेच पुरवणी अर्थस्ंकल्पातून मंजुर संगमनगर धक्का ते काढोली रस्ता प्रजिमा 55  हा ३.००  किमी रस्ता करणे व कोयना पुनर्वसन मधून मंजुर झालेल्या ढोकावळे रिसवड येथे पोहोच रस्ता २.०० किमी डांबरीकरण करणे व मोरी बांधकाम करणे या कामांचा संयुक्तरित्या भूमिपुजन समारंभ आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते या कामांकरीता अनुक्रमे ०६.०० कोटी, ०१.०० कोटी व ५२ लाख असे एकूण ७.५२ लाख रुपयांचा निधी आमदार शंभूराज देसाईंनी मंजुर करुन आणला आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर,संजय गांधी निराधर समिती सदस्य सदानंद साळुंखे,जिल्हा परीषद सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती सदस्या सौ.निर्मला देसाई,माजी सदस्य नथूराम कुंभार,भागोजी शेळके,नथूराम सावंत,अशोक पाटील तळीयेकर,विजय बाबर सरपंच,वामन शेलार उपसरपंच,निवृत्ती कदम,शामराव सावंत,गणपतराव सावंत, किसनराव सावंत,भिवाजी जाधव, दिलीप सकपाळ,सुरेश सुतार आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच राज्यमार्गावरील तळीये पुर्व-पश्चिम, मणेरी, माणगांव,झाकडे,किल्लेमोरगिरी,लेढोंरी,चाफेर,चिरंबे,काढोली,कोंडावळे,रिसवड,मेंढेंघर,नांव,गोठणे,मिरगांव येथील नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,मी केवळ मतदारसंघाचा आमदार आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून गेली साडेचार वर्षे काम करताना पाटण मतदारसंघात एक हजार कोटीहून अधिक निधी हा मतदारसंघातील प्रलंबीत विकासकामांकरीता मंजुर करुन आणण्यात मला यश आले आहे.आमदार जर एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी मतदारसंघात आणू शकत असेल तर ज्यांच्या हातात सलग पाच वर्षे राज्याच्या बांधकाम विभागाच्या चाव्या होत्या त्या माजी आमदारांना किती कोटींचा निधी मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांकरीता आणता आला असता परंतू त्यांचा मंत्रीपदाचा कार्यकाळ हा निष्क्रीय गेला असून मी आमदार म्हणून मतदारसंघातील ग्रामीण व डोंगरी भागातील रस्त्यांच्या कामांकरीता जेवढा निधी आणला आहे तेवढा निधी ते मंत्रीपदाच्या काळात पाटण मतदारसंघात आणू शकले नाहीत हे मी छातीठोकपणे दाव्याने सांगु शकतो. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती त्यांची झाली असून बांधकाम खात्याच्या मंत्र्यास त्यांचे स्वत:च्या मतदारसंघातील एखादा रस्ता राज्य मार्ग करणे कितपत अवघड आहे. परंतू  नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर हा रस्ताही त्यांना राज्यमार्ग करता आला नाही. माजी आमदारांच्या कार्यकाळात ते मंत्री असताना पाटण मतदारसंघात सहा- सहा कोटी रुपयांचा निधी कुठल्या रस्त्याच्या कामांला त्यांनी मंजुर करुन आणल्याचे पाटण मतदारसंघातील जनतेने एैकले आहे आहे.? मी तर केवळ आमदार आहे. एका एका रस्त्याला सहा- सहा कोटी रुपयांचा निधी मला आणणे शक्य आहे तर माजी बांधकाम मंत्र्यांना ते का जमले नाही. त्यांची काम करण्याची पध्दत आणि माझी काम करण्याची पध्दत यात जमिन आसमानचा फरक आहे. मी अनेकदा त्यांना जाहीरपणे आवाहन केले आहे की, तुम्ही २००९ ते २०१४ या मतदारसंघाचे आमदार होता आणि मी आता साडेचार वर्षे या मतदारसंघाचा आमदार आहे. तुम्ही त्या पाच वर्षात मतदारसंघात आणलेला विकासनिधी आणि मी आणलेला विकासनिधी जाहीरपणे लेखी स्वरुपात मतदारसंघातील जनतेच्या पुढे मांडा.त्यासही ते तयार होत नाहीत. मी हे केले, मी ते केले अशा खोटया वल्गना करणाऱ्यांना त्या पाच वर्षात याच रस्त्यावरील वाडीकोतावडे येथील मी मंजुर करुन आणलेल्या पुलाचे काम पुर्ण करुन घेता आले नाही त्यांनी काय विकास केला असेल ? ढोकावळे ते रिसवड या रस्त्याचीही तीच अवस्था आहे. त्यांना हा रस्ता आमदार म्हणून का पुर्ण करता आला नाही. हाच रस्ता सोडा मतदारसंघातील डोंगरी भागातील असे अनेक रस्ते आहेत ते माजी आमदारांना का करता आले नाहीत असे मी अनेकदा विचारले होते त्याचे उत्तर त्यांना देता आले नाही. केवळ जनतेमध्ये बुध्दीभेद आणि जनतेच्या डोक्यात विष कालवण्याचे काम ही मंडळी करीत आहेत त्यापासून सावध रहा असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक दिलीप सकपाळ यांनी केले व आभार नथूराम सावंत यांनी मानले.

No comments:

Post a Comment