Friday, 22 February 2019

निधी कसा मंजुर करुन आणायचा याचे आमदारांना भान असावे लागते. आमदार शंभूराज देसाईंचा विरोधकांवर हल्लाबोल. लोहारवाडी रस्त्याचा लोकार्पण सोहळा.




दौलतनगर दि.2२:- पक्षाच्या मेळाव्यात डुलक्या काढणाऱ्या माजी आमदारांना या मतदारसंघातील जनतेने सलग २१ वर्षे तालुक्याचा आमदार होण्याची संधी दिली. माजी आमदारांप्रमाणे डुलक्या काढत आणि हाताची घडी तोंडावर बोट ठेवून विधानसभा सभागृहात बसलो असतो तर आपल्याला आमदारांना मिळणाऱ्या आमदार फंडावरच समाधान मानावे लागले असते,जनतेच्या विकासासाठी भांडणारा,त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडणारा आमदार तुम्ही सर्वांनी निवडून दिल्याने कोटयावधी रुपयांचा विकासनिधी मतदारसंघात आणण्यामध्ये मला यश मिळत आहे.विकासकामांचा निधी कसा मंजुर करुन आणावा याचे भान मतदारसंघाच्या आमदारांना असावे लागते.डुलक्या काढून विकासनिधी मिळत नसतो असा हल्लाबोल आमदार शंभूराज देसाईंनी माजी आमदार पाटणकरांचे नाव न घेता केला.
                         लोहारवाडी काळगांव ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाईंनी लोहारवाडी गांवास जिल्हा नियोजन समितीतंर्गत, कोयना भूकंप निधी व राज्य शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत पुर्ण झालेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते मौजे कुठरे व धामणी येथेही मंजुर केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्या सौ.सिमा मोरे,पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर.पाटील,माजी सदस्य रघूनाथ माटेकर,दत्ताबापू चोरगे,महादेवराव पानवळ,विशाल पवार,सचिन चव्हाण,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,माजी संचालक बबनराव पाटील,शिवदौलत बँकेचे संचालक किशोर मोरे, सुरेश पाटील,शंकर पाटील,तानाजीराव चाळके,भरत दुधडे,काकासो सुपुगडे,काळगांव सरपंच जयवंत देसाई,उपसरपंच उत्तम मानुस्करे,काशीनाथ लोहार,सुधाकर काळे,उमेश लोहार,अशोक सवादेकर,दिलीप काळे,संजय लोहार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येथील प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                        याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,माझी आमदार म्हणुन दुसरीच टर्म आहे.आमदारकीच्या या दोन टर्ममध्ये पाटण मतदारसंघाचा चौफेर विकास कसा करता येईल याकरीताच माझे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. मी मंजुर करुन आणलेल्या विकासकांमाना एवढा निधी येतोय कुठुन? हा विरोधकांना संशोधनाचा विषय वाटू लागला आहे त्यांना या निधीबाबत काही शंका असेल तर त्यांनी शासन दरबारी आपल्या तालुक्याच्या आमदारांचा जनतेच्या हिताकरीता किती पाठपुरावा करीत असतो. याची जावून पहाणी करावी.आत्ताचा आपला आमदार जनतेच्या प्रश्नांसाठी भांडणारा आमदार आहे. आपला आमदार जनतेच्या विकासासाठी भरघोस निधी आणणारा आमदार आहे याची खात्री मतदारसंघातील जनतेला पटली आहे.जनतेच्या विकासासाठी भांडणारा,त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडणारा आमदार जर शासन दरबारी तोंडावर बोट ठेवून राहिला तर या मतदारसंघाचा विकास कसा होणार.आपल्या विरोधकांनी गेली २१ वर्षे हेच केले त्यामुळेच मतदार संघातील जनतेने त्यांना सन्मानाने घरी बसविले.असे सांगून ते म्हणाले लोहारवाडी गावचा रस्ता अतिशय कठीण होता कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता करायचा हा निश्चय आमदार झाल्या झाल्याच मी केला होता.आमदारकीच्या पहिल्या दोनच वर्षात या रस्त्याच्या कामाकरीता एकत्रित निधी देण्याची इच्छा असूनही तो देता आला नाही. म्हणून जिल्हा नियोजन समितीतंर्गत १० लाख, कोयना भूकंप निधीमधून १५ लाख व राज्य शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत १५ लाख असा एकूण ४० लाख रुपयांचा निधी या रस्त्याच्या कामांला मंजुर करुन दिला. अजुनही थोडा रस्ता करणे शिल्लक आहे येत्या आर्थिक वर्षात याकरीता निधी देवून हा रस्ता पुर्ण करुन घेणार असल्याचा शब्द आज याठिकाणी देत आहे. हा रस्ता व्हावा याकरीता या गांवातील नागरिक या विभागाचे यापुर्वीचे माजी आमदार विलासराव पाटील यांच्याकडे गेले होते.त्यांनीही हा रस्ता करण्याचे काम प्रस्तावित केले होते त्यानंतर २००९ ला हा विभाग पाटण मतदारसंघाला जोडला गेला. या गांवाला रस्ता देण्याची वेळ आली तेव्हा माझा ५८० मतांनी पराभव झाला. त्यामुळे हा रस्ता मला करता आला नाही.या रस्त्याला माझाच हात लागायचा होता म्हणून या कामाकरीता शासनाच्या विविध योजनेमधून मी निधी मंजुर करुन दिला.परंतू मला नागरिकांना प्रश्न विचारायचा आहे. २००९ ते २०१४ या काळात राज्याचे माजी बांधकाम मंत्री या मतदारसंघाचे आमदार होते त्यांनी एक रुपयाचा निधी या गावाच्या रस्त्यावर दिला नाही.यावरुनच त्यांनी मतदारसंघातील इतर विभागातील गांवाचा किती विकास केला असेल हे तुमच्या लक्षात येईल.काळगांव,कुंभारगांव भाग असेल किंवा संपुर्ण पाटण मतदारसंघ असेल मतदारसंघातील बोटावर मोजता येईल अशा गांवामध्ये विकासकामे प्रलंबित आहेत. मतदारसंघाच्या सर्व विभागात चौफेर असा विकास या साडेचार वर्षात करण्याचे काम आपण केले आहे.कोणत्या कामांसाठी कोणत्या योजनेतून कसा आणि किती निधी मंजुर करुन आणायचा याचे भान मतदारसंघाच्या आमदारांना असणे गरजेचे आहे.निधी कुठुनही आणा परंतू ते काम पुर्ण करा ही भूमिका आमदारांनी घेतली पाहिजे आणि हीच भूमिका आपण घेत असल्याने अनेक गांवाचे प्रलंबीत राहिलेली विकासकामे मार्गी लागण्यास मदत होत आहे असेही ते शेवठी बोलताना म्हणाले. उपस्थितांचे स्वागत विष्णू लोहार यांनी केले व आभार उमेश लोहार यांनी मानले.

पाटण मतदारसंघात मारुलहवेली येथून भगव्या सप्ताहाला सुरुवात. आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते शुभारंभ. महिलांची उपस्थिती उल्लेखनीय.




दौलतनगर दि.22:- शिवसेना पक्षाच्या वतीने राज्याच्या संपुर्ण जिल्हयात,तालुक्यात व प्रत्येक गांवामध्ये भगवा सप्ताह सुरु करुन या सप्ताहाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पाटण विधानसभा मतदारसंघात सातारा जिल्हयाचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या सहकार्याने हा भगवा सप्ताह सुरु करण्यात आला आहे.याची सुरुवात मारुलहवेली ता.पाटण येथून आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या शुभारंभाला मारुलहवेली गांवातील महिलांची भगवे फेटे बांधून असणारी उपस्थिती ही उल्लेखनीय ठरली.
                        हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ९२ जयंतीचे औचित्य साधून पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ उत्कृष्ट संसदपटु शिवसेना पक्षाचे आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे हस्ते दौलतनगर येथे करण्यात आला होता.संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व नवनिर्वाचीत शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून भगवा सप्ताहाचे आयोजन करुन सदस्य नोंदणी करण्याचे कामांस गती देण्याचे काम करावे असे शिवसेना पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.त्यानुसार पाटण मतदारसंघातील भगव्या सप्ताहाचा शुभारंभ मारुलहवेली येथून करण्यात आला व शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीस सुरुवात करण्यात आली यावेळी या शुभारंभ समारंभास युवा नेते यशराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर.पाटील,जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्य संतोष गिरी, सुरेश पानस्कर,माजी सदस्य जालंदर पाटील,बशीर खोंदू,ॲड.डी.पी.जाधव,ॲड.मारुती नांगरे,प्रकाशराव जाधव, कारखाना व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,संचालक बबनराव भिसे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मतदारसंघातील शिवसेनेचे येथील प्रमुख शिवसैनिक,कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट:- मारुलहवेली महिलांच्या फेंटयामुळे भगवेमय.
            आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत मारुलहवेली गांवामध्ये भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या गांवातील दोनशे अडीचशे माहिलांनी या सप्ताहाचे समारंभाकरीता स्वयंस्फुर्तींने भगवे फेटे बांधून समारंभाला लावलेली उपस्थिती ही उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी होती. महिलांच्या उल्लेखनीय उपस्थितीमुळे आणि त्यांच्या शिरावरील भगव्या फेंटयामुळे मारुलहवेली भगवेमय झाल्याचे दिसून आले.

Thursday, 21 February 2019

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीकडून पाटण मतदारसंघातील १० कामांना ०१ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.



­­
दौलतनगर दि.2१:-पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते, सभामंडप इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९  या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून १ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                             प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील २५  गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप व नळ पाणी पुरवठा योजना करणे इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मंजूर होणेकरीता दि.२२.११.२०१८ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती.त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असणाऱ्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण २५ विविध विकासकामांना आवश्यक असणारा २ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजुर होणेकरीताची ही मागणी होती या २५ कामांपैकी १० विकासकांमाना पहिल्या टप्प्यात एकूण १ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना दि.११ फेब्रुवारी,२०१९ रोजीचे पत्रानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.मंजूर झालेल्या विकासकामामध्ये कराड चिपळूण रस्ता ते मौजे माथणेवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख,मौजे वनवासवाडी बोंद्री पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ०७.०० लाख,मौजे सुरुल  अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५.०० लाख,मौजे मुरुड अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख,मौजे वजरोशी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख, मौजे नवजा अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५.०० लाख,मौजे कामरगाव गोकूळ एस ते सुतारवाडी पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे १०.०० लाख,मौजे जाधववाडी नुने अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख, मौजे बोर्गेवाडी डेरवण अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५.०० लाख व मौजे दुटाळवाडी नुने येथे सार्वजनिक सभागृह बांधणे ०७.०० लाख असे एकूण १० विकासकांमाना १ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असून पाणी पुरवठा विभागाकडील ४ विकासकामांना ४५ लाख रुपयांचा व सार्वजनीक बांधकाम विभागाकडील पोहोच रस्ते व सार्वजनीक सभागृह बांधणेची ११ कामे अशी एकूण १५ कामांचे प्रस्ताव अंदाजपत्रकासह कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मान्यतेकरीता दुसऱ्या टप्प्यात सादर केली आहेत. या कामांकरीता १ कोटी ६९ लाख रुपयांची आवश्यकता असून येत्या अधिवेशनात याही १५ विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता घेवून लवकरच या कामांच्या निविदा प्रसिध्द करुन याही कामांना याच आर्थिक वर्षात सुरुवात करण्यात येणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

आमदार शंभूराज देसाईंच्या चुलत आज्जी वत्सलाताई शिवराम देसाई ­­यांचे वृध्दापकाळाने निधन.


   
                    

         दौलतनगर दि.२१:-महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या भावजय,कै.शिवराम श्रीपतराव देसाई यांच्या पत्नी व पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या चुलत आज्जी श्रीमती वत्सलाताई शिवराम देसाई रा.मरळी,ता.पाटण यांचे वयाच्या 90 वर्षी वार्धक्याने निधन झाले.
                                    श्रीमती वत्सलाताई शिवराम देसाई यांचे निधनाने मरळी परिसरासह देसाई कूटुंबीयावर शोककळा पसरली असून मरळी ता.पाटण येथे शोकाकुल वातावरणात त्यांचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कै.वत्सलाताई देसाई ह्या ताई या आदरातिथ्य नावाने सर्वत्र परिचित होत्या. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या त्या चुलत आज्जी असून त्यांचे चिरंजीव रमेश देसाई  देसाई हे निवृत्त मोटर वाहन निरीक्षक असून श्रीमती वत्सलाताई शिवराम देसाई यांचे यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा व तीन मुली,सुन,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मरळी या त्यांच्या मुळ गावी शुक्रवार दि.22/02/2019 रोजी सकाळी 10.00 होणार आहे असे देसाई परिवारामार्फत सांगण्यात आले आहे.


Wednesday, 20 February 2019

कोयना पर्यटनातील विकासकामे करण्याकरीता दुसऱ्या टप्प्यात २ कोटी ०५ लाखांचा निधी मंजुर. निधी मान्यतेचा १८ फेब्रुवारी शासन निर्णय पारित. - आमदार शंभूराज देसाईंची माहिती





दौलतनगर दि.२०:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता कोयना पर्यटनाचा संपुर्ण आराखडा शासनाकडे मान्यतेकरीता सादर केला होता त्यानुसार कोयना पर्यटनाच्या कामांस शासनाने प्रत्यक्षात सुरुवात करुन कोयना पर्यटनातील कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस पहिल्या टप्प्यात शासनाने मंजुरी दिली. तर आराखडयातील पर्यटनाच्या सुचविलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही निधी मंजुर केल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने दि.१८ फेब्रुवारी, २०१९ रोजी पारित केला असून कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस २ कोटी ५० लाख व २ कोटी ०५ लाख असे एकूण ४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                    आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे जिल्हाधिकारी, सातारा यांच्यामार्फत या विभागातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता अंदाजपत्रक तयार करुन घेतले होते सदरचे अंदाजपत्रक हे सविस्तर प्रस्तावासह जिल्हाधिकारी,सातारा यांचेमार्फत राज्य शासनास सादर केले आहे. प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता संबधित विभागांना शासनाने निधी उपलब्ध करुन दयावा अशी माझी शासनाकडे आग्रही मागणी होती.राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे कोयना दौऱ्यावर आले तेव्हा या कोयना पर्यटन आराखडयाच्या संदर्भात मी जलसंपदामंत्री यांचे लक्ष वेधून कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात जलसंपदा विभागाकडून या विभागाचे कोयना सिंचन विभाग,कोयनानगर यांचेमार्फत कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता एकूण आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला.या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदाही प्रसिध्द झाली. तर दुसऱ्या टप्प्यात पर्यटनाच्या दृष्टीने आराखडयात सुचविलेल्या कोयनानगर येथील अस्तित्वात असणाऱ्या नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयनानगर येथील धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयना धरण व्यवस्थापनाचे जीर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नुतनीकरण करणे,कोयनानगर येथे पर्यटकांना बसण्याकरीता ठिक ठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे व कोयना धरणातील जलाशयामध्ये बोटिंगची व्यवस्था करणे या कामांकरीता एकूण २ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे मंजुर करण्यात आला असून या शासन निर्णयामध्ये जिल्हाधिकारी,सातारा यांनी त्यांच्या स्तरावर कार्यान्वयीन यंत्रणा निश्चित करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.शासनाकडे सादर केलेल्या कोयना पर्यटनाच्या आराखडयातील बहूतांशी कामांना राज्य शासनाने जलसंपदा व पर्यटन विभाग यांच्यामार्फत आवश्यक असणारा निधी मंजुर करुन कोयना पर्यटनाला चालना देण्याचे काम केले आहे. या निधीमुळे कोयना पर्यटनाच्या कामांना गती मिळाली असून लवकरच या कोयनानगरचे आणि कोयनानगर परिसराचे रुपडे पालटणार असल्याचा आनंद होत आहे. सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. कोयना पर्यटनाच्या आराखडयात अजुनही काही महत्वाच्या कामांना निधी मिळणे आवश्यक आहे सदरच्या उर्वरीत राहिलेल्या कामांनाही आवश्यक असणारा निधी मिळावा याकरीता मी येणाऱ्या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे प्रयत्नशील राहणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.
 चौकट :- केवळ घोषणा नाही तर करुन दाखविले.
              कोयना पर्यटनाच्या आराखडयाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळवून येथील पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ठिकाणांची तसेच महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता आवश्यक असणारा निधी कोयना पर्यटनाच्या माध्यमातून मंजुर करुन आणणार असे मी सांगितले होते. मी केवळ घोषणा करीत नाही तर त्याचा पाठपुरावा करुन जे जे ठरवतो ते दाखवून देतो त्याचप्रमाणे कोयना पर्यटनाची नुसती घोषणा केली नाही तर यातील कामांना निधी मंजुर करुन आणला आणि ते करुन दाखविले.


शासनाकडे केलेल्या विशेष प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील २२ गावांना ०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर. दि. १८ फेब्रुवारी, २०१९ रोजी शासन निर्णय पारित. आमदार शंभूराज देसाई.






­­
 दौलतनगर दि.२०:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व सभामंडप इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९  या आर्थिक वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री यांचेकडे केली होती त्यानुसार मुख्यमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री यांनी पाटण मतदारसंघातील एकूण २२ विविध विकासकामांना एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली असून सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामीण विकास राज्यमंत्री ना.दादाजी भूसे यांचे आभार मानले आहेत.
               आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील २२ गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व सभामंडप इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी मंजूर होणेबाबत दि.३१.०१.२०१९ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती. त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांचेकडील दि.१८ फेब्रुवारी,२०१९ रोजीचे शासन निर्णयानुसार एकूण २२ विविध विकास कामांकरीता एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीव कामांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर झालेल्या विकासकामामध्ये  मौजे खिलारवाडी गावपोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख, भिलारवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण ०७.०० लाख,खांडेकरवाडी (सोनवडे) अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकण ०७.०० लाख, खळे  ते मालदन रस्ता खडीकरण,डांबरीकरण २०.०० लाख,खळे गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख,तळमावले येथील काकासाहेब चव्हाण कॉलेजकडे जाणारा अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,मरळोशी अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,कडवे बुद्रुक येथील लिंगाळेवस्ती ते ग्रामदैवत पावनाईदेवी मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख, दौलतनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे ०७.०० लाख,रासाटी येथे गटर बांधकाम ०७.०० लाख,टेळेवाडी कोरीवळे येथील रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,मठवाडी (महिंद) येथील रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख, गिरेवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,आडूळपेठ ते डिगेवाडी येथील दत्त मंदिरासमोरील रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख,हेळवाक मुस्लिमवस्ती नवीन गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण ०७.०० लाख, कुंभारगाव अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख, मंद्रुळहवेली अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, लोहारवस्ती (केरळ) येथील अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, क्रांतीनगर (नाडे) येथील मागासवर्गीय व मातंगवस्ती रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, तोरणे येथील बौध्दवस्ती रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०९.०० लाख, सुपने मंडलातील तांबवे,ता.कराड येथील मशिदीसमोर सभामंडप ०७.०० लाख व पाडळी (केसे),ता.कराड येथील मुस्लिमवस्ती येथे सभामंडप ०७.०० लाख या विकासकामांचा समावेश असून या कामांना एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

सुपने मंडलातील प्रत्येक गांवामध्ये विकासाचा झंझावात. आमदार शंभूराज देसाईंचा दावा.



दौलतनगर दि.20:- पाटण मतदारसंघातील सुपने मंडल हे पाटण मतदारसंघाला जोडून 10 वर्षाचा काळ लोटला,या विभागाचे नेतृत्व यापुर्वी कराड दक्षिणचे माजी आमदार विलासराव पाटील हे करीत होते.या विभागातील नागरिकांना त्यांनी अगणित विकासाची कामे दिली त्यांच्या काळात जसा विकासाचा झंझावात या मंडलामध्ये सुरु होता तोच झंझावात आताही सुरु आहे त्यांच्याएवढे काम करणे केवळ पाच वर्षात शक्य नाही परंतू या मंडलातील प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये विकासाचे काम पोहचविण्याचा माझा गत साडेचार वर्षात प्रयत्न राहिला आहे. असा दावा आमदार शंभूराज देसाईंनी केला असून सुपने मंडलातील प्रत्येक गांवामध्ये आपण विकासाचे काम दिले आहे विकासाचा हा झंझावात असाच कायम सुरु ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील या विभागालाही पाटण मतदारसंघातील इतर विभागांच्या प्रमाणे विकास कामांत झुकते माप दिले जाईल असे आश्वासन आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेआहे.
                म्होर्पे ता.कराड याठिकाणी सुपने मंडलातील मौजे भोळेवाडी,म्होर्पे,कळंबे मळा,थोरातमळा (प.सुपने), वसंतगड, आबईचीवाडी,सुपने व केसे येथे आमदार शंभूराज देसाईंनी राज्य शासनाच्या 2515 योजनेतंर्गत तसेच जिल्हा नियोजन समितीतंर्गत मंजुर करुन आणलेल्या निधींच्या विविध कामांचाभुमीपूजन कार्यक्रम आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.या विभागातील रस्त्यांच्या तसेच साकव पुलांच्या कामांसाठी त्यांनी सुमारे १ कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेलीही विविध कामे आमदार शंभूराज देसाईंनी एका वर्षातच मार्गी लावल्याने सुपने मंडलातील नागरिकांमध्ये समाधान दिसून आले.यावेळी शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील,पं.स सदस्य सविता संकपाळ, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण,प्रभाकर शिदे,रयत कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, बबनराव शिंदे सर,कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील,शिवाजीराव शिंदे,तुकाराम डुबल,हणंमत निकम, डॉ.पांडुरंग निकम,लक्ष्मण देसाई,सरपंच तुकाराम कोकरे,संदीप सावंत,सुनिल पाटील,संदीप साळुंखे,अर्जुन कळंबे,अमित पाटील,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संचालक बबनराव भिसे आदी मान्यवरांसह मौजे भोळेवाडी,म्होर्पे,कळंबेमळा,थोरातमळा (प.सुपने),वसंतगड,आबईचीवाडी,सुपने व केसे येथील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पाटण मतदारसंघात सुपने मंडलाने दोन विधानसभा निवडणूकीत पाटणच्या लोकप्रतिनिधींना मतदान करण्याचे काम केले 2014 च्या विधानसभा निवडणूकीत या विभागाने मला भरघोस असे मताधिक्कय देवून माझे 18824 च्या मताधिक्कयामध्ये मोलाचा वाटा उचलला याचा मला आनंद आहे. 2009 च्या  विधानसभा निवडणूकीतही या विभागाने पाटणच्या माजी आमदारांना मतदान केले. केलेल्या मतदानाच्या बदल्यात माजी आमदारांनी या विभागाला ‍किती विकासाची कामे दिली किती नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडविले हेही पहाणे तितकेच गरजेचे आहे.येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे.‍ शिवसेना भाजप युतीच्या सरकारमधील सत्ताधारी सदस्य म्हणून मला या साडेचार वर्षात युतीच्या शासनाने कोटयावधी रुपयांचा निधी मतदारसंघातील विकास कामांकरीता दिला त्यानिधीतील बहूतांशी वाटा या सुपने मंडलामध्ये देण्याचा मी प्रयत्न केला.आज या विभागातील प्रत्येक गांवामध्ये विकासाचे काम सुरु आहे. विकासाचे काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची परंपरा या विभागाला आहे तीच परंपरा या विभागाने कायमस्वरुपी जपावी विकासाची प्रक्रिया ही कधीही न थांबणारी आहे. ज्यांना गरज आहे ते काम त्या त्या लोकप्रतिनिधींने देणे गरजेचे आहे.केवळ ही निवडणूक ते ती निवडणूक नागरिकांना मते मागण्यापुरते त्यांच्या दारात जायचे व मते मागून गेल्यावर त्यांच्या सुखदु:खात ढुंकूनही पहायचे नाही ही आपल्या विरोधंकाची पध्दत आहे.परंतू आपण तसे केले नाही या विभागातील समस्या जाणून घेणेकरीता आपण या विभागाचा स्वतंत्र असा जनता दरबार घेतला अनेक नागरिकांचे प्रश्न आपण जागेवर सोडविले तसेच विकासाकामांची ज्या ज्या गांवाना व वाडयावस्त्यांना आवश्यकता आहे त्या त्या गांवाना व वाडयावस्त्यांना आपण विकासाचे काम देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आज एका दिवसात आपण सुमारे 1 कोटी 13 लाख रुपयांच्या कामांची भूमिपुजने केली यापुर्वीच्या माजी आमदारांच्या काळात सन  2009 ते 2014 मध्ये एवढी विकासाची कामे या विभागात त्यांनी कधी दिली आहेत का? याची तुलना सुपने मंडलातील नागरिकांनी करावी. विकासाच्या कामांकरीता यापुढेही भरघोस असा निधी या विभागाला दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.