दौलतनगर दि.22:- शिवसेना पक्षाच्या वतीने राज्याच्या संपुर्ण
जिल्हयात,तालुक्यात व प्रत्येक गांवामध्ये भगवा सप्ताह सुरु करुन या सप्ताहाच्या
माध्यमातून शिवसेना
पक्षाच्या सदस्य नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.पाटणचे शिवसेनेचे आमदार
शंभूराज देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पाटण विधानसभा मतदारसंघात सातारा
जिल्हयाचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या सहकार्याने हा भगवा सप्ताह सुरु
करण्यात आला आहे.याची सुरुवात मारुलहवेली ता.पाटण येथून आमदार शंभूराज देसाईंच्या
प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या शुभारंभाला मारुलहवेली गांवातील महिलांची भगवे
फेटे बांधून असणारी उपस्थिती ही उल्लेखनीय ठरली.
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख
स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ९२ जयंतीचे औचित्य साधून पाटण विधानसभा
मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ उत्कृष्ट संसदपटु शिवसेना
पक्षाचे आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे हस्ते दौलतनगर येथे करण्यात आला होता.संपुर्ण
पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व
नवनिर्वाचीत शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत
शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून भगवा सप्ताहाचे
आयोजन करुन सदस्य नोंदणी करण्याचे कामांस गती देण्याचे काम करावे असे शिवसेना
पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.त्यानुसार पाटण मतदारसंघातील भगव्या सप्ताहाचा
शुभारंभ मारुलहवेली येथून करण्यात आला व शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीस सुरुवात
करण्यात आली यावेळी या शुभारंभ समारंभास युवा
नेते यशराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी
चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,पंचायत समिती माजी उपसभापती
डी.आर.पाटील,जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती
गटनेते पंजाबराव देसाई,सदस्य संतोष गिरी, सुरेश पानस्कर,माजी सदस्य जालंदर पाटील,बशीर खोंदू,ॲड.डी.पी.जाधव,ॲड.मारुती
नांगरे,प्रकाशराव जाधव, कारखाना व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,संचालक बबनराव भिसे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मतदारसंघातील शिवसेनेचे येथील प्रमुख शिवसैनिक,कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची
प्रमुख उपस्थिती होती.
चौकट:- मारुलहवेली
महिलांच्या फेंटयामुळे भगवेमय.
आमदार
शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत मारुलहवेली गांवामध्ये भगव्या सप्ताहाचे
आयोजन करण्यात आले होते.या गांवातील दोनशे अडीचशे माहिलांनी या सप्ताहाचे
समारंभाकरीता स्वयंस्फुर्तींने भगवे फेटे बांधून समारंभाला लावलेली उपस्थिती ही
उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी होती. महिलांच्या उल्लेखनीय उपस्थितीमुळे आणि
त्यांच्या शिरावरील भगव्या फेंटयामुळे मारुलहवेली भगवेमय झाल्याचे दिसून आले.
No comments:
Post a Comment