Thursday 21 February 2019

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीकडून पाटण मतदारसंघातील १० कामांना ०१ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.



­­
दौलतनगर दि.2१:-पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते, सभामंडप इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९  या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून १ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                             प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील २५  गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप व नळ पाणी पुरवठा योजना करणे इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मंजूर होणेकरीता दि.२२.११.२०१८ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती.त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असणाऱ्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण २५ विविध विकासकामांना आवश्यक असणारा २ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजुर होणेकरीताची ही मागणी होती या २५ कामांपैकी १० विकासकांमाना पहिल्या टप्प्यात एकूण १ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना दि.११ फेब्रुवारी,२०१९ रोजीचे पत्रानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.मंजूर झालेल्या विकासकामामध्ये कराड चिपळूण रस्ता ते मौजे माथणेवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख,मौजे वनवासवाडी बोंद्री पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ०७.०० लाख,मौजे सुरुल  अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५.०० लाख,मौजे मुरुड अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख,मौजे वजरोशी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख, मौजे नवजा अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५.०० लाख,मौजे कामरगाव गोकूळ एस ते सुतारवाडी पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे १०.०० लाख,मौजे जाधववाडी नुने अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख, मौजे बोर्गेवाडी डेरवण अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५.०० लाख व मौजे दुटाळवाडी नुने येथे सार्वजनिक सभागृह बांधणे ०७.०० लाख असे एकूण १० विकासकांमाना १ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असून पाणी पुरवठा विभागाकडील ४ विकासकामांना ४५ लाख रुपयांचा व सार्वजनीक बांधकाम विभागाकडील पोहोच रस्ते व सार्वजनीक सभागृह बांधणेची ११ कामे अशी एकूण १५ कामांचे प्रस्ताव अंदाजपत्रकासह कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मान्यतेकरीता दुसऱ्या टप्प्यात सादर केली आहेत. या कामांकरीता १ कोटी ६९ लाख रुपयांची आवश्यकता असून येत्या अधिवेशनात याही १५ विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता घेवून लवकरच या कामांच्या निविदा प्रसिध्द करुन याही कामांना याच आर्थिक वर्षात सुरुवात करण्यात येणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment