Friday 22 February 2019

निधी कसा मंजुर करुन आणायचा याचे आमदारांना भान असावे लागते. आमदार शंभूराज देसाईंचा विरोधकांवर हल्लाबोल. लोहारवाडी रस्त्याचा लोकार्पण सोहळा.




दौलतनगर दि.2:- पक्षाच्या मेळाव्यात डुलक्या काढणाऱ्या माजी आमदारांना या मतदारसंघातील जनतेने सलग २१ वर्षे तालुक्याचा आमदार होण्याची संधी दिली. माजी आमदारांप्रमाणे डुलक्या काढत आणि हाताची घडी तोंडावर बोट ठेवून विधानसभा सभागृहात बसलो असतो तर आपल्याला आमदारांना मिळणाऱ्या आमदार फंडावरच समाधान मानावे लागले असते,जनतेच्या विकासासाठी भांडणारा,त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडणारा आमदार तुम्ही सर्वांनी निवडून दिल्याने कोटयावधी रुपयांचा विकासनिधी मतदारसंघात आणण्यामध्ये मला यश मिळत आहे.विकासकामांचा निधी कसा मंजुर करुन आणावा याचे भान मतदारसंघाच्या आमदारांना असावे लागते.डुलक्या काढून विकासनिधी मिळत नसतो असा हल्लाबोल आमदार शंभूराज देसाईंनी माजी आमदार पाटणकरांचे नाव न घेता केला.
                         लोहारवाडी काळगांव ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाईंनी लोहारवाडी गांवास जिल्हा नियोजन समितीतंर्गत, कोयना भूकंप निधी व राज्य शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत पुर्ण झालेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते मौजे कुठरे व धामणी येथेही मंजुर केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्या सौ.सिमा मोरे,पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर.पाटील,माजी सदस्य रघूनाथ माटेकर,दत्ताबापू चोरगे,महादेवराव पानवळ,विशाल पवार,सचिन चव्हाण,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,माजी संचालक बबनराव पाटील,शिवदौलत बँकेचे संचालक किशोर मोरे, सुरेश पाटील,शंकर पाटील,तानाजीराव चाळके,भरत दुधडे,काकासो सुपुगडे,काळगांव सरपंच जयवंत देसाई,उपसरपंच उत्तम मानुस्करे,काशीनाथ लोहार,सुधाकर काळे,उमेश लोहार,अशोक सवादेकर,दिलीप काळे,संजय लोहार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येथील प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                        याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,माझी आमदार म्हणुन दुसरीच टर्म आहे.आमदारकीच्या या दोन टर्ममध्ये पाटण मतदारसंघाचा चौफेर विकास कसा करता येईल याकरीताच माझे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. मी मंजुर करुन आणलेल्या विकासकांमाना एवढा निधी येतोय कुठुन? हा विरोधकांना संशोधनाचा विषय वाटू लागला आहे त्यांना या निधीबाबत काही शंका असेल तर त्यांनी शासन दरबारी आपल्या तालुक्याच्या आमदारांचा जनतेच्या हिताकरीता किती पाठपुरावा करीत असतो. याची जावून पहाणी करावी.आत्ताचा आपला आमदार जनतेच्या प्रश्नांसाठी भांडणारा आमदार आहे. आपला आमदार जनतेच्या विकासासाठी भरघोस निधी आणणारा आमदार आहे याची खात्री मतदारसंघातील जनतेला पटली आहे.जनतेच्या विकासासाठी भांडणारा,त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडणारा आमदार जर शासन दरबारी तोंडावर बोट ठेवून राहिला तर या मतदारसंघाचा विकास कसा होणार.आपल्या विरोधकांनी गेली २१ वर्षे हेच केले त्यामुळेच मतदार संघातील जनतेने त्यांना सन्मानाने घरी बसविले.असे सांगून ते म्हणाले लोहारवाडी गावचा रस्ता अतिशय कठीण होता कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता करायचा हा निश्चय आमदार झाल्या झाल्याच मी केला होता.आमदारकीच्या पहिल्या दोनच वर्षात या रस्त्याच्या कामाकरीता एकत्रित निधी देण्याची इच्छा असूनही तो देता आला नाही. म्हणून जिल्हा नियोजन समितीतंर्गत १० लाख, कोयना भूकंप निधीमधून १५ लाख व राज्य शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत १५ लाख असा एकूण ४० लाख रुपयांचा निधी या रस्त्याच्या कामांला मंजुर करुन दिला. अजुनही थोडा रस्ता करणे शिल्लक आहे येत्या आर्थिक वर्षात याकरीता निधी देवून हा रस्ता पुर्ण करुन घेणार असल्याचा शब्द आज याठिकाणी देत आहे. हा रस्ता व्हावा याकरीता या गांवातील नागरिक या विभागाचे यापुर्वीचे माजी आमदार विलासराव पाटील यांच्याकडे गेले होते.त्यांनीही हा रस्ता करण्याचे काम प्रस्तावित केले होते त्यानंतर २००९ ला हा विभाग पाटण मतदारसंघाला जोडला गेला. या गांवाला रस्ता देण्याची वेळ आली तेव्हा माझा ५८० मतांनी पराभव झाला. त्यामुळे हा रस्ता मला करता आला नाही.या रस्त्याला माझाच हात लागायचा होता म्हणून या कामाकरीता शासनाच्या विविध योजनेमधून मी निधी मंजुर करुन दिला.परंतू मला नागरिकांना प्रश्न विचारायचा आहे. २००९ ते २०१४ या काळात राज्याचे माजी बांधकाम मंत्री या मतदारसंघाचे आमदार होते त्यांनी एक रुपयाचा निधी या गावाच्या रस्त्यावर दिला नाही.यावरुनच त्यांनी मतदारसंघातील इतर विभागातील गांवाचा किती विकास केला असेल हे तुमच्या लक्षात येईल.काळगांव,कुंभारगांव भाग असेल किंवा संपुर्ण पाटण मतदारसंघ असेल मतदारसंघातील बोटावर मोजता येईल अशा गांवामध्ये विकासकामे प्रलंबित आहेत. मतदारसंघाच्या सर्व विभागात चौफेर असा विकास या साडेचार वर्षात करण्याचे काम आपण केले आहे.कोणत्या कामांसाठी कोणत्या योजनेतून कसा आणि किती निधी मंजुर करुन आणायचा याचे भान मतदारसंघाच्या आमदारांना असणे गरजेचे आहे.निधी कुठुनही आणा परंतू ते काम पुर्ण करा ही भूमिका आमदारांनी घेतली पाहिजे आणि हीच भूमिका आपण घेत असल्याने अनेक गांवाचे प्रलंबीत राहिलेली विकासकामे मार्गी लागण्यास मदत होत आहे असेही ते शेवठी बोलताना म्हणाले. उपस्थितांचे स्वागत विष्णू लोहार यांनी केले व आभार उमेश लोहार यांनी मानले.

No comments:

Post a Comment