Wednesday, 31 July 2019

आपत्ती काळात अलर्ट रहा, अलर्ट आमदार शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना. संभाव्य पुरपरिस्थितीची अधिकाऱ्यांसमवेत केली पहाणी.






           दौलतनगर दि. 31: गेले दोन तीन दिवस पाटण तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील कोयना धरणात पाण्याची आवक मोठया प्रमाणात होत आहे.आज सकाळपर्यंत कोयना धरणात ७४.८९ टीमसी एवढा पाणीसाठा झाला आहे तर तालुक्यातील इतर सर्व धरणे ही पुर्ण क्षमतेने भरुन ओंसडून वाहत असल्याने अनेक ठिकाणी नदीच्या पाण्यामुळे पुल पाण्याखाली जाण्याचे प्रकार घडत असल्याने वाहतूक बंद होत आहेत तर घाटामध्ये डोंगरामधून मोठया प्रमाणात माती रस्त्यावर येत असल्याने वाहतूकीस खोंळबा होत आहे.त्यामुळे या आपत्ती काळात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांनी अलर्ट रहावे व कुठे अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या तर त्या समस्या तात्काळ दुर कराव्यात अशा सक्त सुचना अलर्ट आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
              आज तहसिल कार्यालयात आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती.बैठकीपुर्वीच आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पुरपरिस्थितीची पहाणी मुळगांव पुलापासून केली यावेळी त्यांच्यासोबत पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर,पाटण पोलिस निरिक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे,गट विकास अधिकारी मीना साळुंखे,सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सर्व शाखा अभियंता हे शासकीय अधिकारी उपस्थित होते.पहाणी दौरा झालेनंतर आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत आपत्ती काळात करावयाच्या उपाय योजनांच्या अनुषंगाने आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. या बैठकीमध्ये महसूल,पोलीस यंत्रणा यांच्यासह पाटबंधारे,बांधकाम विभाग,कृषी,पाणी पुरवठा,सार्वजनीक आरोग्य, शिक्षण, वीज वितरण, वन्यजीव विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
               सुरवातीस आमदार शंभूराज देसाईंनी त्यांच्याकडे आलेल्या तालुक्यातील विविध भागातील तक्रारी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिल्या.यामध्ये महिंद धरण पुर्ण भरल्यामुळे तसेच वांग मराठवाडी धरणामध्ये चांगला पाणीसाठा झाल्यामुळे वांग नदीपात्रात पाणी वाढले असून खळे व काढणे येथील देान्ही पुल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे येथील वाहतूक बंद झाली आहे. मी दुपारी त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देणार आहे तसेच कालच सडावाघापूर घाटात डोंगरातील माती कोसळून रस्ता बंद झाला होता.ढेबेवाडी घाटातही रस्त्यावर माती आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता.नाव येथील रस्त्यावर माती आली आहे.वाहतूकीच्या दृष्टीने अशा समस्या निर्माण झाल्याने तात्काळ यावर बांधकाम विभागाने कार्यवाही करावी असे सांगत त्यांनी पाटण येथील एसटी स्टॅन्ड परीसराचा आढावा घेतला यामध्ये स्टॅन्ड परीसरातील कामाचीही माहिती घेतली यावेळी उपस्थिती अधिकाऱ्यांनी ओढयाचे पाणी स्टॅन्ड परीसरात येत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर येथील अतिक्रमणामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याने सदरची अतिक्रमणे तात्काळ हटविण्याच्या सुचना प्रांताधिकारी,पोलीस यंत्रणा व राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंतांना दिल्या.तालुक्यातील निर्लखित झालेल्या शाळांमध्ये अतिवृष्टीच्या काळात विद्यार्थी बसत नाहीत ना याची खात्री गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी करावी.आरोग्य विभागाच्या आढाव्याप्रसंगी अधिकाऱ्यांनी तालुक्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आहेत ती भरणे गरजेचे आहेत असे सांगितल्यानंतर तालुक्यातील रिक्त ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ करण्याकरीता जिल्हाधिकारी यांची उद्याच भेट घेणार असल्याचे सांगितले.तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना थोडा पाऊस झाला की वीज जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत त्यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात कराड चिपळूण रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरु असून या कामांस गती देवून प्रवाशांची गैरसोय दुर करावी अशा सुचना राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता पन्हाळकर यांना दिल्या.तसेच संगमनगर धक्का ते घाटमाथा येथील रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे दुरुस्तीच्या कामांतून सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे तर खळे याठिकाणी मोठा पुल उभारणे गरजेचे आहे याकरीता नाबार्ड योजनेतून हा पुल प्रस्तावित करावा अशा सुचना त्यांनी दुरध्वनीवरुन बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना दिल्या. यासंदर्भात सार्वजनीक बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेशी मी स्वत: बोलेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.सध्या कोयना धरणात ७४.८९ टीमसी एवढा पाणीसाठा असून सरासरी प्रतिरोज ५० हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने एकदम पाणी सोडण्याएैवजी २ हजार क्युसेक्स पॉवर हाऊसच्या माध्यमातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे अशा सुचनाही आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांना केल्या व आपत्ती काळात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही हयगय होवू नये याकरीता सतर्क राहण्याच्या सुचनाही त्यांनी शेवठी बैठकीत केल्या.तसेच सांगवड येथील मंदीराच्या मागील बाजूचा भाग कोयना नदीतील पाण्यामुळे खचला असून येथील पुरसंरक्षक भिंतीच्या कामांस लवकर निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता त्यांनी तात्काळ जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क साधून येथील परिस्थिती यावेळी त्यांचे निदर्शनास आणून दिली.
चौकट:- आजारातून बाहेर येताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात.
              गेली आठ दिवस आजारी असणारे आमदार शंभूराज देसाई आजारातून बाहेर येताच त्यांनी तात्काळ तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेवून तसेच संभाव्य पुरपरिस्थितीची पहाणी दौरा करुन त्यांनी कामांला प्रत्यक्षात सुरुवात देखील केली असल्याचे आज त्यांच्या कामकाजावरुन दिसून आले.


Sunday, 28 July 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्यात युवा नेते यशराज देसाई यांचे हस्ते रोलरचे पुजन. शेतकरी बंधूनी कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळपास देण्याचे आवाहन.




दौलतनगर दि. 28 :- गतवर्षीच्या गळीत हंगामापेक्षा महाराष्ट्रामध्ये सध्या ऊसाचे प्रमाण जास्त असून साखरेचे भाव यंदाच्या वर्षीही अनिश्चित असल्याने अनेक कारखान्यांकडे मोठया प्रमाणांत साखरेचे साठे पडून आहेत.आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील असा कारखाना आहे जो अडचणीच्या काळातही कारखान्याचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली साखर उद्योगात तग धरुन आहे.कारखान्यांने गतवर्षीचा गळीत हंगाम या पुर्वीच्या सर्वच गळीत हंगामाप्रमाणे चांगल्या प्रकारे पुर्ण केला आहे.चालू गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले असून शेतकरी बंधूनी कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस आपले कारखान्यांस गाळपास दयावा व कारखाना व्यवस्थापनानेही नियोजनबध्द काम करुन सन 2019-20 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करावा असे आवाहन युवा नेते यशराज देसाई यांनी केले.
            दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात सन 2019-20 चे गळीत हंगामाकरीता रोलरचे पूजन युवा नेते यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी रोलरचे पुजन झालेनंतर यशराज देसाई यांनी कारखान्यातील सर्व कामकाजांची पदाधिकारी यांचेसोबत बारकाईने पहाणी केली.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,संचालक अशोकराव डिगे,आनंदराव चव्हाण,संपतराव सत्रे, बबनराव भिसे,विकास गिरीगोसावी, सेामनाथ खामकर,पांडूरंग नलवडे,गजानन जाधव, व्यकंटराव पाटील,राजेंद्र गुरव, बाळासाहेब शेजवळ, सौ.विश्रांती देशमुख,सौ.दिपाली पाटील या संचालक मंडळासह प्रकाशराव जाधव,शिवदौलत बँकेचे व्हाईस चेअरमन संजय देशमुख, विजयराव देशमुख, तुकाराम जाधव,एकनाथ जाधव हे प्रमुख पदाधिकारी तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई यांची उपस्थिती होती.
         याप्रसंगी बोलताना यशराज देसाई पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना साखर उद्योग अडचणीत असताना देखील चांगल्या प्रकारे सुरु आहे. कारखान्याची क्षमता कमी असूनही तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे आणि गाळप केलेल्या ऊसाला इतर मोठया क्षमतेच्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करीत आहोत.यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता चांगली राहणार असून शेतकऱ्यांचा आर्थिक विकासाचा कणा असलेल्या साखर कारखानदारीपुढे आज सातत्याने कोसळणाऱ्या साखर दरामुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असतानादेखील यावर मात करुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे सन 2019-20 च्या ऊस गाळप हंगामाकरीता जादा ऊस गाळपाच्यादृष्टीने कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.त्या नियोजनाप्रमाणे कारखान्यातील सर्व अधिकारी व कामगार यांनी नियोजनबध्द काम करावे.तर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला संपुर्ण ऊस आपले देसाई कारखान्याला देऊन सहकार्य करावे व येणारा गळीत हंगाम यशस्वी करावा,असे आवाहनही त्यांनी शेवटी बोलताना केले. यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.



Monday, 15 July 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समुहाचेवतीने अरुणराव दौलतराव देसाई यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.





दौलतनगर दि.१5: महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपूत्र व पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचे चुलते अरुणराव दौलतराव देसाई यांचे शुक्रवार दि.१२ जुलै,२०१९ रोजी पहाटे कोल्हापुर याठिकाणी वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. कै.अरुणराव दौलतराव देसाई यांना लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचेवतीने कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर(मरळी),ता.पाटण या ठिकाणी शोकसभा घेण्यात येवून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
             महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपूत्र अरुणराव दौलतराव देसाई हे उच्चशिक्षित होते.परदेशात आपले शिक्षण पुर्ण करुन त्यांनी कोल्हापूर या ठिकाणी आपला स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता.सध्या त्यांची दोन मुले कृष्णराज व पृथ्वीराज हा व्यवसाय सांभाळत आहेत.ते सुरवातीपासून कोल्हापुर याठिकाणीच स्थायिक होते.गतवर्षी आपल्या मातोश्री कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे नावाने मरळी ता.पाटण येथे सुरु असलेल्या मरळी हायस्कुलच्या कार्यक्रमानिमित्त कै.अरुणराव देसाई हे दौलतनगर (मरळी) याठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपले पुतणे आमदार शंभूराज देसाई यांचे राजकीय,सामाजीक,शैक्षणिक कामाचे विशेष कौतुक करत आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राचे पोलादी नेतृत्व आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा युतीच्या राज्य शासनाने महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागह असणाऱ्या विधिमंडळात दि.१० व ११ ऑगस्ट रोजी विशेष गौरवाचा प्रस्ताव मांडून लोकनेते साहेबांचा यथोचित असा विशेष गुणगौरव केला होता तसेच आदरणीय साहेबांच्या उल्लेखनीय आणि अतुलनीय कार्याला उजाळाही दिला होता ही बाब आमच्याकरीता अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असल्याचे सांगून लोकनेते साहेबांच्या आचार विचारांची जपणूक त्यांचा नातू आणि माझे पुतणे चिरंजीव शंभूराज हे मोठया जबाबदारीने आदरणीय साहेबांच्या कर्म आणि जन्मभूमित करीत आहेत ही बाब कौतुकास्पद असल्याचे सांगून लोकनेते साहेबांच्या कार्याला संपुर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेतील विशेष गौरव प्रस्तावामुळे उजाळा देण्याचे काम युतीच्या शासनाने आणि आमदार शंभूराज यांनी केले याचा मला सर्वात जास्त आनंद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी या कार्यक्रमात काढले होते. मनमिळावू स्वभावाचे कै.अरुणराव देसाई यांच्या जाण्याने देसाई कुटुंबियांचा आधारवड हरपला असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व  शिक्षण समुहाचेवतीने दौलतनगर ता.पाटण येथे दि.13 रोजी शोकसभा आयोजीत करण्यात आली होती या शोकसभेमध्ये कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांच्यासह कै.अरुणराव देसाई यांना जवळून पाहिलेल्या विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व‍ शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.




Friday, 12 July 2019

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त गृहराज्यमंत्री ना.दिपक केसरकर,आमदार शंभूराज देसाईंनी केले विनम्र अभिवादन.



                            

          दौलतनगर दि. १2: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे ३3 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण),वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयास व समाधीस्थळास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
           लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.१२ जुलै रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे आयोजीत करण्यात येतो.यंदाच्या पुण्यतिथी कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण),वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रथमत: गृहराज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. त्यानंतर स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पुर्णाकृती पुतळयास व समाधीस्थळास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.यावेळी आमदार शंभूराज देसाई,जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,पंचायत समिती माजी विरोधी पक्षनेते ॲड.दिपक जाधव यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे पाटण विधानसभा मतदारसंघातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस,प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देण्यात येवून पाटण मतदारसंघातील मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
चौकट:- लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपूत्र कै.अरुणराव देसाई यांचे दु:खद निधनाने पुण्यतिथीचा   

  कार्यक्रम रद्द.
              महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपूत्र व पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे सख्ये चुलते अरुणराव दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई यांचे कोल्हापुर याठिकाणी आज अल्पशा आजाराने दु:खद निधन झालेने स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा आयोजीत पुण्यतिथी कार्यक्रम त्यांचे पुर्णाकृती पुतळयास व समाधीस विनम्र अभिवादन व कै.अरुणराव देसाई यांना गृहराज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांनी श्रध्दाजंली वाहून रद्द करण्यात आला.

Wednesday, 10 July 2019

तारळी धरणाच्या गळतीची आमदार शंभूराज देसाईंकडून पहाणी. धरण सुरक्षित परंतू गळतीचे काम पावसाळा संपताच पुर्ण करा. धरणस्थळावरुन मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना दुरध्वनीवरुन दिल्या सुचना.




                            

            दौलतनगर दि.१०: पाटण तालुक्यातील तारळी मध्यम धरण प्रकल्पाच्या मुख्य भिंतीतून पाण्याचा पाझर होत आहे आणि तो पाझर मर्यादीत असताना गतवर्षीचे फोटो सोशल मिडीयावर टाकून धरणाला मोठया प्रमाणात गळती लागली आहे असे सोशल मिडीयावर तसेच वृत्तपत्रातून येत असल्याने मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी काल धरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत तारळी धरणाच्या भिंतीची प्रत्यक्ष पहाणी केली.मागील वर्षीच या गळतीसंदर्भात धरणाचे अधिक्षक अभियंता यांचेसमवेत धरणाच्या मुख्य भिंतीची त्यांनी पहाणी केली होती.त्याचवेळी गळतीचे काम पुर्ण करुन घ्या अशा सक्त सुचना त्यांनी केल्या होत्या त्यानुसार धरण माथापासून निरीक्षण गॅलरी व निरीक्षण गॅलरीपासून पाया गॅलरीपर्यंतचे काम विभागाकडून करण्यात आले असल्याने गळती कमी झाली असून गळतीचे पुर्ण काम हे पावसाळा संपताच पुर्ण करुन घ्यावे अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी धरणस्थळावरुन मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता तसेच याठिकाणी उपस्थित असणाऱ्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या.
              तारळी मध्यम धरण प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला मोठया प्रमाणात गळती असल्याच्या बातम्या सोशल मिडीया व वृत्तपत्रातून आल्यानंतर आमदार शंभूराज देसाईंनी तात्काळ या धरणाचे कार्यकारी अभियंता यांना धरणस्थळावर बोलवून धरणाच्या भिंतीची तसेच पाण्याची गळतीची प्रत्यक्ष पहाणी केली.यावेळी तारळी धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गायकवाड व त्यांच्या विभागांच्या अधिकारी,कर्मचारी तसेच तारळे विभागातील पदाधिकारी यांचीही यावेळी उपस्थिती होती.
                 यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी मागील वर्षीच या गळतीसंदर्भात धरणाचे अधिक्षक अभियंता यांचेसमवेत धरणाच्या मुख्य भिंतीची त्यांनी पहाणी केली होती यावेळी हे गळतीचे काम पुर्ण करुन घेण्याच्या सुचना अधीक्षक अभियंता यांना दिल्या होत्या त्या कामांसंदर्भात आमदार देसाईंनी उपस्थित कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता गतवर्षी धरण माथापासून निरीक्षण गॅलरी व निरीक्षण गॅलरीपासून पाया गॅलरीपर्यंतचे काम विभागाकडून करण्यात आले असल्याने गळती कमी झाली आहे धरणात सध्या ४३ टक्के पाणी साठा आहे. यंदाच्या पावसाळयानंतर उर्वरीत राहिलेल्या गळतीचे काम पुर्ण करण्याचे विभागाने नियोजन केले आहे त्यानुसार विभागामार्फत हे काम पुर्ण करुन घेण्यात येईल. असे सांगितल्यानंतर आमदार शंभूराज देसाईंनी धरणस्थळावरुनच धरणाचे मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता विजय घोगरे यांना दुरध्वनीवरुन तारळी धरणाच्या गळतीचे उर्वरीत राहिलेले काम यंदाचा पावसाळा संपताच पुर्ण करुन घ्यावे अशा सुचना दिल्या.

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर येथे १२ जुलै रोजी विविध कार्यक्रम. गृह (ग्रामीण) व वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.


                            

            दौलतनगर दि. १०:  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३3 वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दि.१२ जुलै,२०१9 रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पाटण मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांचे हस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आणि मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
            दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३3 वा पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार दि.१२ जुलै, २०१9 रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथील “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजीत केला आहे. स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने स्व.(आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर सकाळी १०.०० वा महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर,उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व रविराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयास आणि समाधी स्थळास पुष्पाजंली अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे पाटण विधानसभा मतदारसंघातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पाटण मतदारसंघातील मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांचे हस्ते व उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद,हितचिंतक,पालकवर्ग,विद्यार्थी व कार्यकर्ते या सर्वांनी सकाळी १०.०० वा दौलतनगर ता.पाटण येथील “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी पत्रकात केले आहे.
चौकट:- पुण्यतिथीनिमित्त 12 जुलैला पाटण तालुका कराड मित्रमंडळाचा कराडला सातवा वर्धापन दिन कार्यक्रम.
स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे 33 व्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रम व कराड येथे पाटण तालुक्यातील रहिवाशी नागरीकांकरीता स्थापन केलेल्या पाटण तालुका मित्रमंडळाचा सातवा वर्धापन दिन व गुणवंत पाल्य पुरस्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि.12 जुलै,2019 रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सायं.06 वा.अक्षता मंगल कार्यालय, मलकापुर,कराड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

Thursday, 4 July 2019

आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून तालुक्यातील ११४ गांवात ५०९ गंजलेले विद्यूत पोल बदलण्याच्या कामांस सुरुवात. जिल्हा‍ नियोजनच्या आराखडयातून विद्यूत विकास योजनेतंर्गत आणला ५५ लाखांचा निधी.



              पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील विद्यूत वाहक करणारे वीजेचे पोल मोठया प्रमाणात गंजलेले असल्याने सदरचे पोल तातडीने बदलणेकरीता आमदार शंभूराज देसाईंनी जिल्हा नियोजन समितीच्या आराखडयातून विद्यूत विकास योजनेतंर्गत एकूण ५५ लाख १ हजार २६८ रुपयांचा निधी मंजुर करुन आणला असून आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील ११४ गांवात ५०९ ठिकाणचे गंजलेले विद्यूत पोल बदलण्याच्या कामांस कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्या. विभाग कराड या कार्यालयामार्फत गतीने सुरुवात करण्यात आली आहे. लवकरात लवकर या ११४ गावातील सुचविण्यात आलेल्या ५०९ विजेचे पोल बदलण्याचे काम पुर्ण करावे अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी अभिमन्यू राख,कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्या विभाग कराड तसेच पाटण,मल्हारपेठ व उंब्रज उपविभाग कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत.

              आमदार शंभूराज देसाईंनी जिल्हा नियोजनच्या आराखडयातून विद्यूत विकास योजनेतंर्गत गंजलेले पोल बदलणे याकरीता मंजुर करुन आणलेल्या ५५ लाख १ हजार २६८ रुपयांच्या निधीमध्ये पाटण तालुक्यातील खालील ११४ गांवातील ५०९ गंजलेल्या वीजेच्या पोलचा समावेश असून अत्यंत गरजेच्या ठिकाणचे पोल बदलण्याची प्रक्रिया विभागामार्फत सुरु करण्यात आली असून उर्वरीतही मंजुर करण्यात आलेले विजेचे पोल बदलण्याची प्रक्रिया गतीने करुन सदरचे पोल मुदतीत तात्काळ बदलण्यात यावेत अशा सुचनाही कार्यकारी अभियंता यांना आमदार शंभूराज देसाईंकडून देण्यात आल्या आहेत. गंजलेले वीजेचे पोल बदलणेच्या कामांत पाटण तालुक्यातील खालील गांवाचा व तेथील बदलावयाच्या पोलची संख्यांचा समावेश आहे.नवजा कामरगांव-१५,ढोकावळे-५,खुडूपलेवाडी (धनगरवाडा)-५,घाणबी मोहिते आव्हाड-५, घेरादातेगड-४, जाईचीवाडी-३, बोंद्री- ५, म्हारवंड-५,मरड-४, मरड धनगरवाडी-५,मिसाळवाडी मरड-४, डफळवाडी-७, बागलेवाडी सावरघर-३, भोकरवाडी सावरघर-४, बनपेठवाडी-४,जोतिबाचीवाडी-४, येराड-९, गणेवाडी तांबेवाडी-५, आटोली-६, कदमवाडी(नाटोशी)-२, पेठशिवापूर- ५, किल्ले मोरगिरी-४, कुसरुंड-५, कोकिसरे-४, झाकडे-३, तळीये-२, दिक्षी-३, धावडे-५, नाटोशी-६ ,पाचगणी-६, बाहे-३, मणेरी- ५, शिद्रुकवाडी  धावडे-५, कळकेवाडी-३, तामीणे-५, आचरेवाडी-२, कसणी-१०, काळगांव-१०, चोरगेवाडी काळगांव-२, मस्करवाडी नं.२-३, रामिष्टेवाडी-५ ,लोहारवाडी काळगांव-४, कुंभारगांव-१०, खळे-४, गलमेवाडी-४, गुढे-५, चाळकेवाडी-३, चिखलेवाडी-३, शिद्रुकवाडी काजारवाडी-५, शेंडेवाडी-३ मारुल तर्फ पाटण २-२, वाजेगांव-२, काठी अवसरी-५, कातवडी-२, खिवशी-४, पळासरी-६, भिकाडी-५, रामेल-५, घोट-३, तारळे-५, वाघळवाडी(ढोरोशी)-३, कवठेकरवाडी-२, कोचरेवाडी- ९, खोणोली-२, गमेवाडी-२, चाफळ-५ ,चाफेर-३, जंगलवाडी चाफळ-३, जाळगेवाडी-५, डेरवण-५, दाढोली-२, पाडळोशी-४, बोर्गेवाडी ( डेरवण)- ५, भैरेवाडी ( डेरवण ) -५, माजगांव-४, शिंगणवाडी-२, सडादाढोली-६, उरुल-७, गिरेवाडी-५, नारळवाडी-५, नावडी-६, मंद्रुळहवेली-५, येराडवाडी-५, विहे-५, वेताळवाडी-५, सोनाईचीवाडी-५, डिगेवाडी काळेवाडी-४, गव्हाणवाडी-६, गारवडे-५, चोपदारवाडी-५, डावरी-४, पापर्डे-४, मरळी-४, शिंदेवाडी-३, सांगवड-५, सुर्यवंशीवाडी-३, सुळेवाडी-३, सोनवडे-४, हुंबरवाडी-४, आंब्रग-६, तळीये पश्चिम-३, हुंबरणे-४ ,आंबेघर तर्फ मरळी-३, कोळेकरवाडी-५, जिंती- ५, मोडकवाडी-५, सातर-५, हौदाचीवाडी-४, टेटमेवाडी -४, मस्करवाडी नं.१-२, मुट्टलवाडी-३ ,येळेवाडी-४, लोटलेवाडी-३, करपेवाडी-४ असे एकूण पाटण तालुक्यातील ११४ गांवातील ५०९ वीजेच्या पोलचा यामध्ये समावेश आहे.