Wednesday 31 July 2019

आपत्ती काळात अलर्ट रहा, अलर्ट आमदार शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना. संभाव्य पुरपरिस्थितीची अधिकाऱ्यांसमवेत केली पहाणी.






           दौलतनगर दि. 31: गेले दोन तीन दिवस पाटण तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील कोयना धरणात पाण्याची आवक मोठया प्रमाणात होत आहे.आज सकाळपर्यंत कोयना धरणात ७४.८९ टीमसी एवढा पाणीसाठा झाला आहे तर तालुक्यातील इतर सर्व धरणे ही पुर्ण क्षमतेने भरुन ओंसडून वाहत असल्याने अनेक ठिकाणी नदीच्या पाण्यामुळे पुल पाण्याखाली जाण्याचे प्रकार घडत असल्याने वाहतूक बंद होत आहेत तर घाटामध्ये डोंगरामधून मोठया प्रमाणात माती रस्त्यावर येत असल्याने वाहतूकीस खोंळबा होत आहे.त्यामुळे या आपत्ती काळात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांनी अलर्ट रहावे व कुठे अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या तर त्या समस्या तात्काळ दुर कराव्यात अशा सक्त सुचना अलर्ट आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
              आज तहसिल कार्यालयात आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती.बैठकीपुर्वीच आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पुरपरिस्थितीची पहाणी मुळगांव पुलापासून केली यावेळी त्यांच्यासोबत पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर,पाटण पोलिस निरिक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे,गट विकास अधिकारी मीना साळुंखे,सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सर्व शाखा अभियंता हे शासकीय अधिकारी उपस्थित होते.पहाणी दौरा झालेनंतर आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत आपत्ती काळात करावयाच्या उपाय योजनांच्या अनुषंगाने आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. या बैठकीमध्ये महसूल,पोलीस यंत्रणा यांच्यासह पाटबंधारे,बांधकाम विभाग,कृषी,पाणी पुरवठा,सार्वजनीक आरोग्य, शिक्षण, वीज वितरण, वन्यजीव विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
               सुरवातीस आमदार शंभूराज देसाईंनी त्यांच्याकडे आलेल्या तालुक्यातील विविध भागातील तक्रारी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिल्या.यामध्ये महिंद धरण पुर्ण भरल्यामुळे तसेच वांग मराठवाडी धरणामध्ये चांगला पाणीसाठा झाल्यामुळे वांग नदीपात्रात पाणी वाढले असून खळे व काढणे येथील देान्ही पुल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे येथील वाहतूक बंद झाली आहे. मी दुपारी त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देणार आहे तसेच कालच सडावाघापूर घाटात डोंगरातील माती कोसळून रस्ता बंद झाला होता.ढेबेवाडी घाटातही रस्त्यावर माती आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता.नाव येथील रस्त्यावर माती आली आहे.वाहतूकीच्या दृष्टीने अशा समस्या निर्माण झाल्याने तात्काळ यावर बांधकाम विभागाने कार्यवाही करावी असे सांगत त्यांनी पाटण येथील एसटी स्टॅन्ड परीसराचा आढावा घेतला यामध्ये स्टॅन्ड परीसरातील कामाचीही माहिती घेतली यावेळी उपस्थिती अधिकाऱ्यांनी ओढयाचे पाणी स्टॅन्ड परीसरात येत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर येथील अतिक्रमणामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याने सदरची अतिक्रमणे तात्काळ हटविण्याच्या सुचना प्रांताधिकारी,पोलीस यंत्रणा व राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंतांना दिल्या.तालुक्यातील निर्लखित झालेल्या शाळांमध्ये अतिवृष्टीच्या काळात विद्यार्थी बसत नाहीत ना याची खात्री गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी करावी.आरोग्य विभागाच्या आढाव्याप्रसंगी अधिकाऱ्यांनी तालुक्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आहेत ती भरणे गरजेचे आहेत असे सांगितल्यानंतर तालुक्यातील रिक्त ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ करण्याकरीता जिल्हाधिकारी यांची उद्याच भेट घेणार असल्याचे सांगितले.तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना थोडा पाऊस झाला की वीज जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत त्यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात कराड चिपळूण रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरु असून या कामांस गती देवून प्रवाशांची गैरसोय दुर करावी अशा सुचना राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता पन्हाळकर यांना दिल्या.तसेच संगमनगर धक्का ते घाटमाथा येथील रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे दुरुस्तीच्या कामांतून सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे तर खळे याठिकाणी मोठा पुल उभारणे गरजेचे आहे याकरीता नाबार्ड योजनेतून हा पुल प्रस्तावित करावा अशा सुचना त्यांनी दुरध्वनीवरुन बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना दिल्या. यासंदर्भात सार्वजनीक बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेशी मी स्वत: बोलेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.सध्या कोयना धरणात ७४.८९ टीमसी एवढा पाणीसाठा असून सरासरी प्रतिरोज ५० हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने एकदम पाणी सोडण्याएैवजी २ हजार क्युसेक्स पॉवर हाऊसच्या माध्यमातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे अशा सुचनाही आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांना केल्या व आपत्ती काळात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही हयगय होवू नये याकरीता सतर्क राहण्याच्या सुचनाही त्यांनी शेवठी बैठकीत केल्या.तसेच सांगवड येथील मंदीराच्या मागील बाजूचा भाग कोयना नदीतील पाण्यामुळे खचला असून येथील पुरसंरक्षक भिंतीच्या कामांस लवकर निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता त्यांनी तात्काळ जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क साधून येथील परिस्थिती यावेळी त्यांचे निदर्शनास आणून दिली.
चौकट:- आजारातून बाहेर येताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात.
              गेली आठ दिवस आजारी असणारे आमदार शंभूराज देसाई आजारातून बाहेर येताच त्यांनी तात्काळ तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेवून तसेच संभाव्य पुरपरिस्थितीची पहाणी दौरा करुन त्यांनी कामांला प्रत्यक्षात सुरुवात देखील केली असल्याचे आज त्यांच्या कामकाजावरुन दिसून आले.


No comments:

Post a Comment