दौलतनगर दि.१5: महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे
सुपूत्र व पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचे चुलते अरुणराव दौलतराव देसाई
यांचे शुक्रवार दि.१२ जुलै,२०१९ रोजी पहाटे कोल्हापुर याठिकाणी वयाच्या ७३ व्या
वर्षी अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. कै.अरुणराव दौलतराव देसाई यांना लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचेवतीने कारखाना
कार्यस्थळ,दौलतनगर(मरळी),ता.पाटण या ठिकाणी शोकसभा घेण्यात येवून भावपूर्ण श्रध्दांजली
अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपूत्र अरुणराव दौलतराव
देसाई हे उच्चशिक्षित होते.परदेशात आपले शिक्षण पुर्ण करुन त्यांनी कोल्हापूर या
ठिकाणी आपला स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता.सध्या त्यांची दोन मुले कृष्णराज व
पृथ्वीराज हा व्यवसाय सांभाळत आहेत.ते सुरवातीपासून कोल्हापुर याठिकाणीच स्थायिक
होते.गतवर्षी आपल्या मातोश्री कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे नावाने मरळी ता.पाटण
येथे सुरु असलेल्या मरळी हायस्कुलच्या कार्यक्रमानिमित्त कै.अरुणराव देसाई हे दौलतनगर
(मरळी) याठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपले पुतणे आमदार शंभूराज देसाई यांचे राजकीय,सामाजीक,शैक्षणिक
कामाचे विशेष कौतुक करत आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राचे
पोलादी नेतृत्व आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा युतीच्या राज्य शासनाने
महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागह असणाऱ्या विधिमंडळात दि.१० व ११ ऑगस्ट रोजी विशेष
गौरवाचा प्रस्ताव मांडून लोकनेते साहेबांचा यथोचित असा विशेष गुणगौरव केला होता
तसेच आदरणीय साहेबांच्या उल्लेखनीय आणि अतुलनीय कार्याला उजाळाही दिला होता ही बाब
आमच्याकरीता अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असल्याचे सांगून लोकनेते साहेबांच्या आचार
विचारांची जपणूक त्यांचा नातू आणि माझे पुतणे चिरंजीव शंभूराज हे मोठया जबाबदारीने
आदरणीय साहेबांच्या कर्म आणि जन्मभूमित करीत आहेत ही बाब कौतुकास्पद असल्याचे
सांगून लोकनेते साहेबांच्या कार्याला संपुर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेतील विशेष
गौरव प्रस्तावामुळे उजाळा देण्याचे काम युतीच्या शासनाने आणि आमदार शंभूराज यांनी
केले याचा मला सर्वात जास्त आनंद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी या कार्यक्रमात
काढले होते. मनमिळावू स्वभावाचे कै.अरुणराव देसाई यांच्या जाण्याने देसाई
कुटुंबियांचा आधारवड हरपला असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण
समुहाचेवतीने दौलतनगर ता.पाटण येथे दि.13 रोजी शोकसभा आयोजीत करण्यात आली होती या
शोकसभेमध्ये कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांच्यासह कै.अरुणराव देसाई यांना
जवळून पाहिलेल्या विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण
केली. याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग
व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी
यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment