Wednesday 10 July 2019

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर येथे १२ जुलै रोजी विविध कार्यक्रम. गृह (ग्रामीण) व वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.


                            

            दौलतनगर दि. १०:  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३3 वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दि.१२ जुलै,२०१9 रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पाटण मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांचे हस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आणि मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
            दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३3 वा पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार दि.१२ जुलै, २०१9 रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजीत केला आहे. स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने स्व.(आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर सकाळी १०.०० वा महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर,उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व रविराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयास आणि समाधी स्थळास पुष्पाजंली अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे पाटण विधानसभा मतदारसंघातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पाटण मतदारसंघातील मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांचे हस्ते व उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद,हितचिंतक,पालकवर्ग,विद्यार्थी व कार्यकर्ते या सर्वांनी सकाळी १०.०० वा दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी पत्रकात केले आहे.
चौकट:- पुण्यतिथीनिमित्त 12 जुलैला पाटण तालुका कराड मित्रमंडळाचा कराडला सातवा वर्धापन दिन कार्यक्रम.
स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे 33 व्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रम व कराड येथे पाटण तालुक्यातील रहिवाशी नागरीकांकरीता स्थापन केलेल्या पाटण तालुका मित्रमंडळाचा सातवा वर्धापन दिन व गुणवंत पाल्य पुरस्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि.12 जुलै,2019 रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सायं.06 वा.अक्षता मंगल कार्यालय, मलकापुर,कराड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

2 comments: