दौलतनगर
दि. 28 :- गतवर्षीच्या गळीत हंगामापेक्षा
महाराष्ट्रामध्ये सध्या ऊसाचे प्रमाण जास्त असून साखरेचे भाव यंदाच्या वर्षीही
अनिश्चित असल्याने अनेक कारखान्यांकडे मोठया प्रमाणांत साखरेचे साठे पडून आहेत.आपला
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील असा कारखाना आहे
जो अडचणीच्या काळातही कारखान्याचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज
देसाईसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली साखर उद्योगात तग धरुन आहे.कारखान्यांने
गतवर्षीचा गळीत हंगाम या पुर्वीच्या सर्वच गळीत हंगामाप्रमाणे चांगल्या प्रकारे
पुर्ण केला आहे.चालू गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप
करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले असून शेतकरी बंधूनी कार्यक्षेत्रातील जास्तीत
जास्त ऊस आपले कारखान्यांस गाळपास दयावा व कारखाना व्यवस्थापनानेही नियोजनबध्द काम
करुन सन 2019-20 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करावा असे आवाहन युवा
नेते यशराज देसाई यांनी केले.
दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात सन 2019-20 चे गळीत हंगामाकरीता रोलरचे
पूजन युवा नेते यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी
रोलरचे पुजन झालेनंतर यशराज देसाई यांनी कारखान्यातील सर्व कामकाजांची पदाधिकारी
यांचेसोबत बारकाईने पहाणी केली.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,संचालक अशोकराव
डिगे,आनंदराव चव्हाण,संपतराव सत्रे, बबनराव भिसे,विकास गिरीगोसावी, सेामनाथ खामकर,पांडूरंग
नलवडे,गजानन जाधव, व्यकंटराव पाटील,राजेंद्र गुरव, बाळासाहेब शेजवळ, सौ.विश्रांती
देशमुख,सौ.दिपाली पाटील या संचालक मंडळासह प्रकाशराव जाधव,शिवदौलत बँकेचे व्हाईस
चेअरमन संजय देशमुख, विजयराव देशमुख, तुकाराम जाधव,एकनाथ जाधव हे प्रमुख पदाधिकारी
तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना यशराज देसाई पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे
मार्गदर्शनाखाली आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना साखर उद्योग
अडचणीत असताना देखील चांगल्या प्रकारे सुरु आहे. कारखान्याची क्षमता कमी असूनही
तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे आणि गाळप केलेल्या
ऊसाला इतर मोठया क्षमतेच्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्याचा आपण नेहमीच
प्रयत्न करीत आहोत.यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता
चांगली राहणार असून शेतकऱ्यांचा आर्थिक विकासाचा कणा असलेल्या साखर कारखानदारीपुढे
आज सातत्याने कोसळणाऱ्या साखर दरामुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली
असतानादेखील यावर मात करुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता सर्वांच्या
सहकार्याची गरज आहे.उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे
मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे सन 2019-20 च्या ऊस गाळप हंगामाकरीता जादा ऊस
गाळपाच्यादृष्टीने कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व
नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.त्या नियोजनाप्रमाणे कारखान्यातील सर्व
अधिकारी व कामगार यांनी नियोजनबध्द काम करावे.तर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस
पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला संपुर्ण ऊस आपले देसाई
कारखान्याला देऊन सहकार्य करावे व येणारा गळीत हंगाम यशस्वी करावा,असे आवाहनही
त्यांनी शेवटी बोलताना केले. यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी,
कर्मचारी व कामगार वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment