दौलतनगर दि.१०: पाटण
तालुक्यातील तारळी मध्यम धरण प्रकल्पाच्या मुख्य भिंतीतून पाण्याचा पाझर होत आहे
आणि तो पाझर मर्यादीत असताना गतवर्षीचे फोटो सोशल मिडीयावर टाकून धरणाला मोठया
प्रमाणात गळती लागली आहे असे सोशल मिडीयावर तसेच वृत्तपत्रातून येत असल्याने
मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी काल धरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत तारळी धरणाच्या
भिंतीची प्रत्यक्ष पहाणी केली.मागील वर्षीच या गळतीसंदर्भात धरणाचे अधिक्षक
अभियंता यांचेसमवेत धरणाच्या मुख्य भिंतीची त्यांनी पहाणी केली होती.त्याचवेळी
गळतीचे काम पुर्ण करुन घ्या अशा सक्त सुचना त्यांनी केल्या होत्या त्यानुसार धरण
माथापासून निरीक्षण गॅलरी व निरीक्षण गॅलरीपासून पाया गॅलरीपर्यंतचे काम
विभागाकडून करण्यात आले असल्याने गळती कमी झाली असून गळतीचे पुर्ण काम हे पावसाळा
संपताच पुर्ण करुन घ्यावे अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी धरणस्थळावरुन
मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता तसेच याठिकाणी उपस्थित असणाऱ्या कार्यकारी
अभियंता यांना दिल्या.
तारळी
मध्यम धरण प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला मोठया प्रमाणात गळती असल्याच्या बातम्या
सोशल मिडीया व वृत्तपत्रातून आल्यानंतर आमदार शंभूराज देसाईंनी तात्काळ या धरणाचे
कार्यकारी अभियंता यांना धरणस्थळावर बोलवून धरणाच्या भिंतीची तसेच पाण्याची गळतीची
प्रत्यक्ष पहाणी केली.यावेळी तारळी धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गायकवाड व
त्यांच्या विभागांच्या अधिकारी,कर्मचारी तसेच तारळे विभागातील पदाधिकारी यांचीही
यावेळी उपस्थिती होती.
यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी मागील
वर्षीच या गळतीसंदर्भात धरणाचे अधिक्षक अभियंता यांचेसमवेत धरणाच्या मुख्य भिंतीची
त्यांनी पहाणी केली होती यावेळी हे गळतीचे काम पुर्ण करुन घेण्याच्या सुचना
अधीक्षक अभियंता यांना दिल्या होत्या त्या कामांसंदर्भात आमदार देसाईंनी उपस्थित
कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता गतवर्षी धरण माथापासून निरीक्षण गॅलरी
व निरीक्षण गॅलरीपासून पाया गॅलरीपर्यंतचे काम विभागाकडून करण्यात आले असल्याने
गळती कमी झाली आहे धरणात सध्या ४३ टक्के पाणी साठा आहे. यंदाच्या पावसाळयानंतर
उर्वरीत राहिलेल्या गळतीचे काम पुर्ण करण्याचे विभागाने नियोजन केले आहे त्यानुसार
विभागामार्फत हे काम पुर्ण करुन घेण्यात येईल. असे सांगितल्यानंतर आमदार शंभूराज
देसाईंनी धरणस्थळावरुनच धरणाचे मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता विजय घोगरे यांना
दुरध्वनीवरुन तारळी धरणाच्या गळतीचे उर्वरीत राहिलेले काम यंदाचा पावसाळा संपताच
पुर्ण करुन घ्यावे अशा सुचना दिल्या.
No comments:
Post a Comment