Friday, 23 August 2019

पालकमंत्री ना.विजय शिवतारेबापू यांचेवरील बेछुट आरोप कदापिही सहन करणार नाही. जशाच तसे उत्तर देवू- आमदार शंभूराज देसाईंचा इशारा



दौलतनगर दि.23:- सातारा जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांनी जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेत सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजय शिवतारेबापू यांची जाणिवपुर्वक बदनामी करण्याच्या हेतूनेच त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. ही बाब पुर्णत: चुकीची असून पालकमंत्री ना.विजय शिवतारेबापू यांचेवरील बेछुट आरोप कदापिही सहन करणार नाही. पालकमंत्र्यावर बेछुट आरोप करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले असून प्रशासनाला वेटीस धरुन स्वत:ची पोळी भाजण्याचा सातारा जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांचा उद्योग यावरुन जाहीरपणे स्पष्ट होत आहे.             
                  सातारा जिल्हा परीषदेतील सर्वसाधारण सभेतील पालकमंत्र्यांवरील धमकीच्या आरोपासंदर्भात पाटणचे आमदार शंभूराज देसाईंना विचारले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या विषया संदर्भात वृत्तपत्रात आलेल्या बातम्या पाहिल्यानंतर पालकमंत्री यांचेशी मी स्वत: बोललो असता, उपाध्यक्ष यांचे वक्तव्य  हे विपर्यास निर्माण करणारे आहे.सातारा जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणते विषय मांडावेत आणि कोणते नाही. यालाही मर्यादा आहेत. सलग 10 वर्षे आम्हीही जिल्हा परीषद सदस्य म्हणून जिल्हा परीषदेत होतो.आताच्या जिल्हा परीषद सदस्यांनी आपले नेमके अधिकार काय आहेत हे तपासण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.पालकमंत्री यांनी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष यांचे बद्दल केलेल्या वक्तव्याचा चूकीचा अर्थ काढला गेला आहे. जिल्हा परीषद उपाध्यक्षांनी पालकमंत्र्यांवर केलेले आरोप बेछुट असून जाणिवपुर्वक त्यांना बदनाम करण्याचा जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांचा डाव असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले आहे.केंजळ येथील खाणपट्टयाचा विषय महसूल विभागांशी संबधित असून प्रशासनाला वेटीस धरुन स्वत:ची पोळी भाजण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.जिल्हयाच्या पालकमंत्र्यांवर तसेच प्रशासनाच्या प्रमुख असणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्यावर आरोप करताना आपण पुराव्यानिशी व जबाबदारीने आरोप करावेत याचे भानही जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राखले गेले नाही ही बाब पुर्णत: चुकीची असून पालकमंत्री तुमच्या विरोधी पक्षाचे आहेत म्हणून त्यांच्यावर बेछुटपणे आरोप करणे जिल्हा परीषदेच्या पंरपरेला धरुन नाही असे माझेही स्पष्ट मत असून पालकमंत्र्यावर बेछुट आरोप करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल.
               असे सांगून ते म्हणाले,केंजळ येथील खाणपट्टयाच्या संदर्भात सातारा जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हयाचे पालकमंत्री यांच्यावर जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांना पालकमंत्र्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन तुरुंगात डांबेन अशी धमकी दिल्याची बातमी माझे वाचनात आले नंतर मी तात्काळ रुग्णालयात असणाऱ्या पालकमंत्री ना.विजय शिवतारेबापू यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधला व या प्रकरणाची माहिती घेतली त्यांनी मला स्पष्टपणे या गोष्टीचा चूकीचा अर्थ काढला गेला असून रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मी नक्कीच या गोष्टी प्रसिध्दीमाध्यमांच्या समोर आणेन मी कुणालाही कसलीही धमकी वगैरे काही दिली नसून जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांचे  बाबतीतील या विषयी संबंधी सर्व वस्तूस्थिती समोर आणेन असे त्यांनी दुरध्वनीवरुन मला सांगितले असून पालकमंत्री यांनी घेतलेली भूमिका प्रशासकीय असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले.


Thursday, 22 August 2019

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील 09 मोठया रस्त्यांच्या कामांना 12 कोटी 3५ लाख 48 हजार रुपयांच्या निधीची शासनाची मंजुरी. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.




दौलतनगर दि.22:- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० करीता संशोधन व विकास अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील नऊ मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 22 ऑगस्ट, २०१९ रोजी पारित केला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील नऊ महत्वाच्या रस्त्यांच्या कामांकरीता एकूण 12 कोटी 3५ लाख ४8 हजार रुपयांचा निधी मंजुर केला असून १5.540 किलोमीटर रस्त्याची लांबी या निधीतून पुर्ण होणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत संशोधन व विकास अंतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१९-२० मध्ये आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे विनंती करुन या कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते.सदरच्या कामांना ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी मान्यता देवून या नऊ रस्त्यांच्या कामांकरीता एकूण 12 कोटी 3५ लाख ४8 हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीमधून १5.540 किलोमीटर रस्त्याची लांबी पुर्ण होणार आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील पाचगणी ते नागवाणटेक पोहोच रस्ता करणे 3.०7० किमी ०२ कोटी 32 लाख 66 हजार, धावडे ते शिद्रुकवाडी पोहोच रस्ता करणे 1.27० किमी 99 लाख 45 हजार, आटोली ते भाकरमळी पोहोच रस्ता करणे 1.400 किमी 01 कोटी 20 लाख, पांढरेपाणी पोहोच रस्ता करणे 2.00० किमी 01 कोटी 93 लाख 7० हजार, नुने गांव पोहोच रस्ता करणे 1.050 किमी 7६ लाख 63 हजार, भारसाखळे ते जौरातवाडी पोहोच रस्ता करणे 1.900 किमी 01 कोटी 53 लाख 1७ हजार, बहुले ते पाळेकरवाडी पोहोच रस्ता करणे 2.400 किमी 01 कोटी 64 लाख ०5 हजार, खिवशी पोहोच रस्ता करणे 0.750 किमी 60 लाख 85 हजार,  तोरणे पोहोच रस्ता करणे 1.700 किमी ०1 कोटी 34 लाख 9७ हजार असा एकूण 12 कोटी 3५ लाख ४8 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 22 ऑगस्ट, २०१९ रोजी पारित केला आहे.या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Wednesday, 21 August 2019

मी कोणत्या पक्षातून लढणार याची काळजी करण्यापेक्षा सत्यजितसिंहाना उभे राहावयाच्या पक्षाची काय अवस्था असेल ? याची काळजी करा. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना टोला.




           दौलतनगर दि.2१:-मी कोणत्या पक्षातून येणारी विधानसभेची निवडणूक लढणार याची सत्यजितसिंह पाटणकरांनी काळजी करण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपण ज्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढविण्यास गुडघ्याला बांशिग बांधून उताविळ झाला आहात त्या पक्षाची विधानसभा निवडणूकीपर्यंत काय अवस्था असेल ? याची काळजी करावी. असा खरमरीत टोला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना लगाविला आहे.
              वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,संपूर्ण पाटण मतदारसंघ  महापुराच्या वेढ्यात असताना स्वतःला पाटण विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार समजणारे पाटणपुरते युवा नेते असणारे सत्यजितसिंह पाटणकरांना मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याची काळजी लागून राहिली आहे. परंतू मला त्यांना सांगावेसे वाटते,मी कोणत्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार आहे हे पाटण मतदारसंघातील जनतेला चांगलेच माहिती आहे.तुम्ही त्याची काळजी करण्यापेक्षा तुम्ही ज्या पक्षातून विधानसभा निवडणूक लढविणार आहात त्या पक्षाची पहिल्यांदा काळजी करा.कारण विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र राज्याची आहे आणि सध्या महाराष्ट्र राज्यातील आपल्या पक्षाचे विधानसभेचे असणारे अनेक उमेदवार हे तुमच्या पक्षाला रामराम करुन कोण शिवसेनेत तर कोण भाजपमध्ये डेरेदाखल होत आहेत.त्यामुळे तुमच्या पक्षाची विधानसभा निवडणूकी पर्यंत महाराष्ट्रात काय अवस्था असेल याची भिती तुमच्या पक्षप्रमुखांनाच लागून राहीली आहे. राज्यातील तुमच्या पक्षाकडे लक्ष देण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपल्या सातारा जिल्हयातीलच त्यांच्या पक्षाची परिस्थिती पहावी की पक्षाला जिल्हयात कशी गळती लागली आहे ते. मतदारसंघातील जनतेने पाटणचे युवा नेते या पुरपरिस्थितीत कुठे दिसले नाहीत ते आहेत तरी कुठे याची माहिती घेतली असता युवा नेते परदेशात मजा मारीत आहेत हे समजल्यानंतर जनतेनेच याबाबत आपणाला जाब विचारला असता आपण फॅक्टरीच्या कामासाठी गेल्याचा निर्वाळा देऊन परदेशवारीचे प्रकरण सोपस्कर दडपण्याचा प्रयत्न केला असला तरी अशा कोणत्या फॅक्टरीसाठी आपण परदेशात गेला होता.तेथीलही आम्ही माहिती घेतली असता त्या देशात ऊसापासून साखर उत्पादन न करता बिटापासून साखर तयार केली जाते. हे जनतेच्याही लक्षात आले आहे.
                सत्यजितसिंह पाटणकरांचा २० वर्ष येत असलेला साखर प्रकल्प त्यांचा त्यांनाच लखलाभ कारण या प्रकल्पातून ते शेतकऱ्यांना काय देणार आहेत हे मतदारसंघातील शेतकऱ्यांचेही लक्षात आले आहे. 20 वर्षापासून आम्ही साखर कारखाना काढणार,साखर कारखाना काढणार म्हणून विधानसभेच्या,कारखान्याच्या,जिल्हा परीषदेच्या निवडणूका पाटणकरांनी लढविल्या आता तर विधानसभा दोन महिन्यावर येवून ठेपली आहे. साखर कारखान्याचे गाजर यंदाच्याही निवडणूकीपुर्वी पाटणकरांनी दाखविले असले तरी ज्या प्रकल्पाचे भूमिपुजन करुन दोन महिने उलटले त्याची साधी वीट कुठे उभी राहल्याची जनतेला दिसत नाही.20 वर्षापासून ज्या कोयना शुगरचे आपण गोडवे गात आहात त्याचा अभ्यास 20 वर्षानंतर करण्याची आपणांस का गरज भासली? आपण प्रकल्पाच्या अभ्यासाकरीता मतदारसंघ पुरात अडकलेला असताना परदेशात गेला होता तिथे नेमके कोणत्या कंपनीचा,कुठल्या फॅक्टरी उत्पादनाचा आपण अभ्यास केला हे जरा मतदारसंघातील जनतेसमोर सांगितले तर बरे होईल. पुरपरिस्थितीत आणि महापुरात किती नुकसान झाले याची पहाणी करण्याचे सत्यजितसिंहाचे नाटक हा केवळ जनतेच्या काळजीचा बेगडीपणा आहे.दुसरे काहीही नाही कारण पहाणी करुन जनतेला मदत करण्यासाठी त्यांच्या हातात काहीही नाही आणि पाटणकर महाशय आता कसली पहाणी करताय अतिवृष्टी, महापुरात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना नुकसानीची मदत आणि पुर्नंबांधणी करण्याचे आदेश ज्यांच्या हातात सत्ता आहे असे राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री यांनी तुम्ही परदेशातून येण्याअगोदरच दिले आहेत त्यावर कार्यवाही सुरु झाली आहे.त्यामुळे अशा परिस्थितीत स्वत:ची निष्क्रीयता लपविण्याकरीता सत्यजितसिंहांचा सुरु असलेला बालिशपणा हा जनतेने पुर्णपणे ओळखला आहे.
चौकट:- आम्ही किती मदत दिल्याचे आकडे तपासण्यापेक्षा तुम्ही काय दिले हे जनतेला सांगा.
            मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना मी किती व कशी मदत दिली याचे आकडे दुर्भिण लावून तपासण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर आपण दानशुरपणा दाखवून मतदारसंघातील पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना किती मदत दिली त्याची आकडेवारी जाहीर करा असा सल्लाही आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंहाना दिला आहे.

Tuesday, 20 August 2019

मुंबईचे पक्षप्रवेशाचे वारे पाटण विधानसभा मतदारसंघात. आमदार शंभूराज देसाईच्या नेतृत्वाखाली पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर शिवसेनेत दाखल.





           दौलतनगर दि.20:- लोकसभा निवडणूकीपुर्वी व निवडणूकीनंतर गेल्या अनेक दिवसापासून 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर संपुर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातून भाजप शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करण्याऱ्यां मान्यवरांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत असून मुंबईच्या पक्षप्रवेशाचे वारे मोठया प्रमाणात आता पाटण विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहचले आहे.पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली गत पंधरा दिवसापासून मतदारसंघातील त्यांचे पारंपारिक विरोधक असणारे राष्ट्रवादी पक्षातील अनेक मान्यवर विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला व राष्ट्रवादीच्या त्यांच्या नेत्यांना सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल होत असल्याचे चित्र मोठया प्रमाणात आमदार शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी प्रतिरोज दिसून येत आहे.
           पाटण विधानसभा मतदारसंघ हा सातारा जिल्हयाच्या आणि पर्यायाने राज्याच्या नेहमीच चर्चेत असणारा मतदारसंघ असून या मतदारसंघातील राजकीय उलथापालथ नेहमीच सातारा जिल्हयाचे अनुभवली आहे. पाटण मतदारसंघाचे विद्यमान आमदार,महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करीत असून अभ्यासपुर्ण आमदार म्हणून त्यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेत व संपुर्ण महाराष्ट्रात दबादबा आहे. गत पाच वर्षात मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करताना त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूकीत मतदारसंघातील जनतेला दिलेल्या विविध आश्वासनापैकी अनेक आश्वासने आपल्या कुशलतेने आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या युतीशासनाच्या माध्यमातून पुर्ण करुन दाखविली आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गांव, वाडयावस्त्यांपर्यंत त्यांनी गत पाच वर्षात कोठयावधी रुपयांचा विकासाचा डोंगर उभा केला आहे.मी जे बोललो ते मी करुन दाखविले ही दिशा घेवून ते येणारी विधानसभा निवडणूक लढविण्यास सज्ज्‍ झाले असून रखडलेला विकास करण्याकरीता मला आमदार होण्याची संधी दया अशी हाक 2014 च्या विधानसभा निवडणूकीत मतदारांना दिली होती. त्या हाकेला साद देत 18824 इतक्या भरघोस मतांनी निवडून आलेल्या आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघात पाच वर्षात लावलेला विकासकामांचा धडाका अनेकांना अचंबीत करणारा व धडकी भरवणारा आहे. मागेल त्या गांवाला, वाडीवस्तीला विविध विकासकांमे देण्यात ते पाच वर्षात यशस्वी झाले आहेत. आपल्या गांवाचा रखडलेला विकास आमदारांच्या माध्यमातून होत आहे हे पाहून आतापर्यंत त्यांच्या विरोधात काम केलेले राष्ट्रवादी पक्षाचे अनेक मान्यवरांच्यामध्ये परीवर्तन होवून या मान्यवरांनी आमदार शंभूराज देसाईंचे नेतृत्व स्विकारण्याचे कामास गेल्या पंधरा दिवसापासून विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सुरुवात केली आहे. आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा धडाकाच आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगर येथील निवासस्थानी प्रतिरोज दिसू लागला असून मुंबईच्या भाजप शिवसेना पक्षात होणाऱ्या राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षातील मान्यवरांप्रमाणे पाटण मतदारसंघातही राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत. तर अनेक मान्यवर दाखल होण्याच्या तयारीत आहेत. त्यांचाही पक्षप्रवेश विधानसभा निवडणूकीच्या अगोदरच करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
               आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दाखल झालेली गांवे व या गांवातील मान्यवरांची नांवे आवर्डे श्री.हणमंत चव्हाण निवडे युवराज शिंदे, शंकर शिंदे फडतरवाडी प्रल्हाद साळुंखे अध्यक्ष याञा कमिटी खडकवाडी विकास साळुंखे,चंद्रकांत शिंदे, महादेव शिंदे, आनंदराव साळुंखे,यशवंत  साळुंखे,सुरेश शिंदे,संतोष शिंदे, दिलीप शिंदे ,कांताराम शिंदे, विठ्ठल साळुंखे, अंकुश साळुंखे,ढोरोशी संदिप मगर, सुनिल लोहार, जगन्नाथ साळुंखे, महेश मगर, सचिन सुतार,दत्ताञय मगर,अमोल काटे,अक्षय मगर, दादासो मगर, प्रकाश मगर,अंकुश सुतार गायमुखवाडी दत्ताञय पवार उत्तम पवार.शंकर साळुंखे,शंकर पवार, बजरंग पवार गुढे शिवाजी शिद्रुक उप.सरपंच,विकास पुजारी ग्राम सदस्य,वसंतराव पाटील ग्राम.सदस्य पंकज पाटील,राजेश पाटील, राजेंद्र कदम,बजरंग शिद्रुक, अनिल पाटील  वाडीकोतावडे  जगन्नाथ सुर्वे, शंकर सुर्वे, नथूराम सुर्वे पापर्डे शिवाजी देसाई (माजी रयत सेवक), कळंबे  बाळू जाधव राजाराम जाधव,अंकुश जाधव, जगन्नाथ जाधव,सर्जेराव जाधव,ज्ञानदेव जाधव,बबन जाधव,सत्यवान जाधव,धोंडिबा जाधव,गोरेवाडी जोतीराम घाडगे,विश्वनाथ घाडगे, सखाराम घाडगे,मारुती घाडगे अशी प्रवेश करणाऱ्या विविध संस्थाच्या, ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मांदियाळी शिवसेनेत दाखल झाल्याचे दिसून येत आहे.


पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील विकासकामांना ०१ कोटी रुपयांचा निधी मंजुर.





           दौलतनगर दि.१९:- सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते तसेच संरक्षक भिंती बांधणे अशा विविध विकासकामांना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांचेकडे मागणी केलेप्रमाणे त्यांनी पाटण तालुक्यातील ९ गांवातील बौध्द, मातंग व दलितवस्तीमध्ये ०१ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्याकरीता निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
                    सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते तसेच संरक्षक भिंती बांधणे अशा विविध विकासकामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करणेकरीता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांचेकडे पावसाळी अधिवेशनामध्ये मागणी केली होती त्यानुसार त्यांनी पाटण तालुक्यातील ०९ गावांतील विविध विकासकामांना ०१ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असून निधी मंजुरीचा शासन निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.१६ ऑगस्ट, २०१९ रोजी पारित केला आहे.या निर्णयामध्ये पाटण तालुक्यातील ०९ गावांतील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील कामांचा समावेश असून समावेश असणारी कामे क्रांतीनगर नाडे येथे मातंगवस्तीकरीता रस्ता व संरक्षक कठडा बांधणे १५ लाख, चोपडी येथील दलितवस्तीतील रस्ता सुधारणा करणे १५ लाख,मणेरी चिंचेचे आव्हाड बौध्दवस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, वजरोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख, चोपदारवाडी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख, येराड बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख, मालोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख, पाळशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख व पापर्डे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख असे एकूण ०१ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते तसेच संरक्षक भिंती बांधणे अशा विविध विकासकामांना आवश्यक असणारा निधी मंजुर केलेबद्दल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांचे आभार व्यक्त केले आहेत दरम्यान यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.


पाटण तालुक्यातील त्या ८६ नळ पाणी पुरवठा योजनांच्या पुर्नंबांधणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा. पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांच्या अधिकाऱ्यांना सक्त आदेश



­­
          दौलतनगर दि.20:-  पाटण तालुक्यात दि.२६ जुलै पासून झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे तसेच कोयना , मोरणा, वांग मराठवाडी व तारळी धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठी असणाऱ्या तसेच डोंगराळ व दुर्गम भागातील एकूण ८६ गांवाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या पुर्नंबांधणीकरीता आवश्यक निधी तात्काळ मंजुर करावा अशी मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचेकडे केली होती त्यानुसार पाटण तालुक्यातील त्या ८६ नळ पाणी पुरवठा योजनांच्या पुर्नंबांधणीचे प्रस्ताव मंजुरीकरीता तात्काळ सादर करा असे सक्त आदेश राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
             पाटण मतदारसंघात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयना,मोरणा,वांग मराठवाडी व तारळी नदीकाठी तसेच डोंगराळ व दुर्गम भागातील अनेक गावांमधील सध्या अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे अतोनात नुकसान झालेले असून संबंधित गावांतील पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे पाणी पुरवठा योजनांचे पॅनेल बोर्ड पाण्यात जाऊन खराब झाले आहेत तर पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये मोठया प्रमाणात गाळ साचलेला आहे.तसेच ग्रॅव्हीटीच्या योजनांच्या पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक पाईप लाईन,इनटेक चेंबर नादुरुस्त, वाहून गेलेल्या व तुटलेल्या असून पाटण तालुक्यात अशा ८६ नळ पाणी पुरवठा असून याची पुर्नंबांधणी करण्याची निंतात गरज असल्याचे लेखी पत्र आमदार शंभूराज देसाईंनी पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचेकडे दिले होते त्यानुसार पाणी पुरवठा मंत्री यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले असून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या नळ पाणी पुरवठा योजनांचे पंचनामे करुन झालेल्या नुकसानीचे अंदाजपत्रक करण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरु आहे. येत्या चार ते पाच दिवसात नुकसानीचा सर्व तपशिल राज्याच्या पाणी पुरवठा विभागाकडे गेल्यानंतर या पुर्नंबांधणीच्या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर होईल अशी माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
                           नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती व पुर्नंबांधणी करण्याच्या कामांमध्ये नावडी, वेताळवाडी, निसरे,आबदारवाडी,गिरेवाडी,नारळवाडी,मंद्रुळहवेली,नवसरवाडी,नाडे,नाडोली,पापर्डे,आडूळपेठ,आडूळ गावठाण, येरफळे, चोपडी,त्रिपुडी,मुळगाव, लुगडेवाडी येरफळे, काळोली, बनपेठवाडी, तामकडे, येराड, शिरळ,नेरळे, जोतिबाचीवाडी, तळीये पश्चिम,कराटे, डोणीचावाडा वांझोळे, गुंजाळी, चाफळ, कोळेकरवाडी, शिंदेवाडी, आंब्रुळे, तारळे, धनगरवाडी तारळे, काटेवाडी तारळे, काढोली, जमदाडवाडी, लेंढोरी,काढणे, आंब्रग, आवर्डे, मंद्रुळकोळे, काळगाव, चोरगेवाडी काळगाव, चौगुलेवाडी काळगाव,भरेवाडी काळगाव, मुठ्ठलवाडी काळगाव, धामणी,मोरेवाडी सुर्वेवाडी, कसणी, निनाईचीवाडी,सतिचीवाडी कसणी, निगडे, मोडकवाडी जिंती, कोकीसरे, हुंबरणे,आंबेघर तर्फ मरळी, बाहे, महिंद,जानुगडेवाडी, माथणेवाडी, गमेवाडी, मसुगडेवाडी दाढोली, तावरेवाडी पाडळोशी, पाडळोशी,मसुगडेवाडी पाडळोशी,ढेबेवाडी, वाघळवाडी ढोरोशी, चिंचेवाडी वजरोशी, वाझोली, म्हावशी, गुजरवाडी म्हावशी,पेठशिवापूर,नहिंबे चिरंबे,दिक्षी, शिद्रुकवाडी,पाचगणी इनामवाडी,किसरुळे भराडवाडी, कोंढावळे चाफयाचा खडक,चाफेर,मेंढेघर कदमवाडी,सलतेवाडी बिबी,बिबी,तामिणे बौध्दवस्ती, तामिणे मानेवस्ती अशा एकूण 86 कामांचा समावेश असून याकरीता अंदाजे  0३  ते ०३.५० कोटी रुपयांचा निधी होण्याची मागणी पाणी पुरवठा विभागाने शासनाच्या पाणी पुरवठा विभागाकडे केली आहे.
चौकट:- शंभूराजेंचे प्रस्ताव आले आहेत, त्यास निधी दया मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश.
             दि.१३ ऑगस्ट रोजीच्या मंत्रीमंडळाच्या मिटींगमध्ये पाणी पुरवठा मंत्री ना.लोणीकर यांनी पुरपरिस्थितीत नुकसान झालेल्या कामांसंदर्भात चर्चा करताना पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी पाण्याचे योजनांच्या पुर्नंबांधणीचे प्रस्ताव पहिले पाठविले आहेत त्यास मान्यता देणे गरजेचे बाब राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पाटणच्या योजनांना तात्काळ मान्यता दया असे आदेश मंत्री मंडळाच्या बैठकीतच दिले.

Sunday, 18 August 2019

देशाचे रक्षण करणाऱ्या फौजींचा सन्मान लोकप्रतिनिधीपेक्षा मोठा- आमदार शंभूराज देसाई. नायब सुभेदार शशिकांत शेजवळ (फौजी) यांचा आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते सत्कार.




           दौलतनगर दि.१८:- लष्करामध्ये भरती होवून फौजी,जवान आपले सारे घरदार,शेजार पाजार, नातेवाईक व मित्रपरीवार यांना सोडून प्रामाणिकपणे सिमेवर आपले कर्तव्य बजावत देशाचे रक्षण करत असतात.सच्चा हिंदूस्थानी म्हणून आपण सर्वजण देशाचे रक्षण करणाऱ्या फौजी तसेच जवांनाकडे पहात असतो.गावांकडे सामाजिक,राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यापेक्षा तसेच माझेसारखे मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीपेक्षा लष्करातील फौजी व जवान यांचा सन्मान मोठा आहे. देशाचे रक्षण करणारे फौजी व जवान आपले सर्वांचे आदर्श असतात असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
           सुळेवाडी ता.पाटण येथील शशिकांत शेजवळ (फौजी) यांना नायब सुभेदार या पदावर बढती मिळालेबद्दल सुळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजीत करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी अशोक शेजवळ,सी.टी.पाटील,दिनकर शेजवळ,महादेव पाटील,एन.डी.पानस्कर,सुभाष महाडिक,राजाराम शेजवळ, लखन पाटील,विष्णू पाटील,विठ्ठल तिकुडवे, प्रकाश शेजवळ, बाबूराज शेजवळ या प्रमुख पदाधिकाऱ्यासंह सुळेवाडी,सोनवडे, हुंबरवाडी व शिंदेवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
              यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील सुळेवाडी गावाचा शशिकांत शेजवळ (फौजी) गरीब कुटुंबातील युवक लष्करात भरती होवून त्यांना नायब सुभेदार पदावर बढती मिळाली आहे ही बाब आपल्या सर्वांकरीता अभिमानास्पद आणि गौरवास्पद असून पाटण तालुक्याची मान अभिमानाने उंचावणारी आहे मी प्रथमत: त्यांना बढती मिळालेबद्दल त्यांचे मनपुर्वक अभिनंदन करतो. जवानांचं जीवन किती खडतर असतं व त्यांना सीमेवर अतिरेक्यांचा कसा सामना करावा लागतो हे मी प्रत्यक्ष जम्मु काश्मीरला गेल्यानंतर पाहिले आहे.आपल्या गांवाकडील,भागातील,तालुक्यातील आणि देशातील लोक सुरक्षित रहावे याकरीता हे फौजी आणि जवान सिमेवर जिवाची बाजी लावत वेळप्रसंगी लढा देत आपले सर्वांचे सरंक्षण करीत असतात.सिमेवर जवान प्रमाणिकपणे लढा देत आहेत म्हणूनच आपण याठिकाणी सुरक्षित आहोत हे आपण विसरुन चालणार नाही.त्यामुळे जवानांना मानसिक बळ देण्याकरीता त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनात आदर असला पाहिजे असे सांगत त्यांनी कारगिलच्या युध्दात शहीद झालेले आपल्या तालुक्यातील भूडकेवाडी गावचे शहीद जवान कै.गजानन मोरे यांच्या २७ ऑगस्टच्या स्मृतीदिनी मी प्रत्येक वर्षी नियमित खंड न पडता अभिवादन करण्यासाठी जात असतो. त्यांच्या वडीलांचे दु:खद निधन झाले असून त्यांच्या मातोश्री श्रीमती चतूराबाई यांना कोणतीही अडचण आल्यानंतर मी स्वत: धावून जातो मी या तालुक्याचा आमदार आहे या अविर्भावात मी कधी रहात नाही.कारण फौजी, जवान किंवा त्यांचे कुटुंब यांचेमुळे आपण सुरक्षित आहोत ही भावना मनी बाळगण्याची सर्वांनी गरज आहे. आपल्या सर्वांपेक्षा त्यांचा मानसन्मान मोठा आहे असे सांगत त्यांनी शशिकांत शेजवळ (फौजी) यांना नायब सुभेदार म्हणून बढती मिळाली असून ते सुभेदार म्हणून या सेवेत सवेानिवृत्त व्हावे व सुभेदार म्हणून त्यांचा सत्कार व सन्मान करण्याची संधी मला मिळावी अशाही शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.तसेच पाटण मतदारसंघात पुरग्रस्तांना, अतिवृष्टीबाधितांना मदत वाटण्याचे कामांची गडबड सुरु असताना मतदारसंघात दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमांना वेळ न देता पुरग्रस्तांना,अतिवृष्टीबाधितांना प्राधान्याने मदत कशाप्रकारे पोहचविता येईल याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले असल्याचे सांगत शशिकांत शेजवळ (फौजी) यांना नायब सुभेदार पदावर बढती मिळालेबद्दल त्यांचा सत्काराचा एकमेव कार्यक्रम आपण स्विकारला असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.
              यावेळी शशिकांत शेजवळ (फौजी) यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन तरुणांनी चांगल्या संगतीमध्ये राहून आपले भविष्य घडवावे व आपले जीवन देशाच्या हिताच्या कामांकरीता मार्गी लागावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.