दौलतनगर दि.23:- सातारा
जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांनी जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेत सातारा जिल्हयाचे
पालकमंत्री ना.विजय शिवतारेबापू यांची जाणिवपुर्वक बदनामी करण्याच्या हेतूनेच
त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. ही बाब पुर्णत: चुकीची असून पालकमंत्री
ना.विजय शिवतारेबापू यांचेवरील बेछुट आरोप कदापिही सहन करणार नाही. पालकमंत्र्यावर
बेछुट आरोप करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा पाटणचे शिवसेनेचे
आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले असून प्रशासनाला वेटीस धरुन
स्वत:ची पोळी भाजण्याचा सातारा जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांचा उद्योग यावरुन
जाहीरपणे स्पष्ट होत आहे.
सातारा जिल्हा परीषदेतील सर्वसाधारण सभेतील
पालकमंत्र्यांवरील धमकीच्या आरोपासंदर्भात पाटणचे आमदार शंभूराज देसाईंना विचारले
असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या विषया संदर्भात वृत्तपत्रात आलेल्या
बातम्या पाहिल्यानंतर पालकमंत्री यांचेशी मी स्वत: बोललो असता, उपाध्यक्ष यांचे
वक्तव्य हे विपर्यास निर्माण करणारे आहे.सातारा
जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणते विषय मांडावेत आणि कोणते नाही.
यालाही मर्यादा आहेत. सलग 10 वर्षे आम्हीही जिल्हा परीषद सदस्य म्हणून जिल्हा
परीषदेत होतो.आताच्या जिल्हा परीषद सदस्यांनी आपले नेमके अधिकार काय आहेत हे
तपासण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.पालकमंत्री यांनी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष
यांचे बद्दल केलेल्या वक्तव्याचा चूकीचा अर्थ काढला गेला आहे. जिल्हा परीषद
उपाध्यक्षांनी पालकमंत्र्यांवर केलेले आरोप बेछुट असून जाणिवपुर्वक त्यांना बदनाम
करण्याचा जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांचा डाव असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले
आहे.केंजळ येथील खाणपट्टयाचा विषय महसूल विभागांशी संबधित असून प्रशासनाला वेटीस
धरुन स्वत:ची पोळी भाजण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.जिल्हयाच्या पालकमंत्र्यांवर
तसेच प्रशासनाच्या प्रमुख असणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्यावर आरोप करताना आपण पुराव्यानिशी
व जबाबदारीने आरोप करावेत याचे भानही जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राखले
गेले नाही ही बाब पुर्णत: चुकीची असून पालकमंत्री तुमच्या विरोधी पक्षाचे आहेत
म्हणून त्यांच्यावर बेछुटपणे आरोप करणे जिल्हा परीषदेच्या पंरपरेला धरुन नाही असे
माझेही स्पष्ट मत असून पालकमंत्र्यावर बेछुट आरोप करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर दिले
जाईल.
असे
सांगून ते म्हणाले,केंजळ येथील खाणपट्टयाच्या संदर्भात सातारा जिल्हा परीषदेच्या
सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हयाचे पालकमंत्री यांच्यावर जिल्हा परीषदेच्या
उपाध्यक्षांना पालकमंत्र्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन तुरुंगात डांबेन अशी धमकी
दिल्याची बातमी माझे वाचनात आले नंतर मी तात्काळ रुग्णालयात असणाऱ्या पालकमंत्री
ना.विजय शिवतारेबापू यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधला व या प्रकरणाची माहिती घेतली
त्यांनी मला स्पष्टपणे या गोष्टीचा चूकीचा अर्थ काढला गेला असून रुग्णालयातून
बाहेर पडल्यानंतर मी नक्कीच या गोष्टी प्रसिध्दीमाध्यमांच्या समोर आणेन मी
कुणालाही कसलीही धमकी वगैरे काही दिली नसून जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांचे बाबतीतील या विषयी संबंधी सर्व वस्तूस्थिती समोर
आणेन असे त्यांनी दुरध्वनीवरुन मला सांगितले असून पालकमंत्री यांनी घेतलेली भूमिका
प्रशासकीय असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment