दौलतनगर दि.22:- राज्य
शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० करीता संशोधन व विकास
अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील नऊ मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य
शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या
प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 22 ऑगस्ट,
२०१९ रोजी पारित केला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील नऊ महत्वाच्या
रस्त्यांच्या कामांकरीता एकूण 12 कोटी 3५ लाख ४8 हजार रुपयांचा निधी मंजुर केला
असून १5.540 किलोमीटर रस्त्याची लांबी या निधीतून पुर्ण होणार असल्याची माहिती
आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकामध्ये
आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि
डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक
योजनेतंर्गत संशोधन व विकास अंतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१९-२० मध्ये आवश्यक
असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे
यांचेकडे विनंती करुन या कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले
होते.सदरच्या कामांना ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी मान्यता देवून
या नऊ रस्त्यांच्या कामांकरीता एकूण 12 कोटी 3५ लाख ४8 हजार रुपयांचा निधी मंजुर
केला आहे. या निधीमधून १5.540 किलोमीटर रस्त्याची लांबी पुर्ण होणार आहे.
प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील पाचगणी ते
नागवाणटेक पोहोच रस्ता करणे 3.०7० किमी ०२ कोटी 32 लाख 66 हजार, धावडे ते
शिद्रुकवाडी पोहोच रस्ता करणे 1.27० किमी 99 लाख 45 हजार, आटोली ते भाकरमळी पोहोच
रस्ता करणे 1.400 किमी 01 कोटी 20 लाख, पांढरेपाणी पोहोच रस्ता करणे 2.00० किमी 01
कोटी 93 लाख 7० हजार, नुने गांव पोहोच रस्ता करणे 1.050 किमी 7६ लाख 63 हजार,
भारसाखळे ते जौरातवाडी पोहोच रस्ता करणे 1.900 किमी 01 कोटी 53 लाख 1७ हजार, बहुले
ते पाळेकरवाडी पोहोच रस्ता करणे 2.400 किमी 01 कोटी 64 लाख ०5 हजार, खिवशी पोहोच
रस्ता करणे 0.750 किमी 60 लाख 85 हजार, तोरणे
पोहोच रस्ता करणे 1.700 किमी ०1 कोटी 34 लाख 9७ हजार असा एकूण 12 कोटी 3५ लाख ४8
हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा
शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 22 ऑगस्ट, २०१९ रोजी पारित केला
आहे.या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल
असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण भागातील
अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न
केल्यामुळे या गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले
आहेत.
No comments:
Post a Comment