दौलतनगर दि.20:- पाटण तालुक्यात दि.२६ जुलै
पासून झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे तसेच कोयना , मोरणा, वांग मराठवाडी व तारळी
धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठी असणाऱ्या तसेच
डोंगराळ व दुर्गम भागातील एकूण ८६ गांवाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या
पुर्नंबांधणीकरीता आवश्यक निधी तात्काळ मंजुर करावा अशी मागणी पाटणचे आमदार
शंभूराज देसाईंनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचेकडे केली
होती त्यानुसार पाटण तालुक्यातील त्या ८६ नळ पाणी पुरवठा योजनांच्या
पुर्नंबांधणीचे प्रस्ताव मंजुरीकरीता तात्काळ सादर करा असे सक्त आदेश राज्याचे
पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले
आहेत.
पाटण मतदारसंघात मोठया प्रमाणात झालेल्या
अतिवृष्टीमुळे कोयना,मोरणा,वांग मराठवाडी व तारळी नदीकाठी तसेच डोंगराळ व दुर्गम
भागातील अनेक गावांमधील सध्या अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे अतोनात
नुकसान झालेले असून संबंधित गावांतील पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला
आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे पाणी पुरवठा योजनांचे पॅनेल बोर्ड पाण्यात जाऊन खराब
झाले आहेत तर पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये मोठया प्रमाणात गाळ साचलेला
आहे.तसेच ग्रॅव्हीटीच्या योजनांच्या पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक पाईप
लाईन,इनटेक चेंबर नादुरुस्त, वाहून गेलेल्या व तुटलेल्या असून पाटण तालुक्यात अशा
८६ नळ पाणी पुरवठा असून याची पुर्नंबांधणी करण्याची निंतात गरज असल्याचे लेखी पत्र
आमदार शंभूराज देसाईंनी पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचेकडे दिले होते
त्यानुसार पाणी पुरवठा मंत्री यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले असून पाणी पुरवठा
विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या नळ पाणी पुरवठा योजनांचे पंचनामे करुन झालेल्या
नुकसानीचे अंदाजपत्रक करण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरु आहे. येत्या चार ते
पाच दिवसात नुकसानीचा सर्व तपशिल राज्याच्या पाणी पुरवठा विभागाकडे गेल्यानंतर या
पुर्नंबांधणीच्या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर होईल अशी माहिती आमदार शंभूराज
देसाईंनी दिली आहे.
नळ पाणी पुरवठा
योजनांची दुरुस्ती व पुर्नंबांधणी करण्याच्या कामांमध्ये नावडी, वेताळवाडी, निसरे,आबदारवाडी,गिरेवाडी,नारळवाडी,मंद्रुळहवेली,नवसरवाडी,नाडे,नाडोली,पापर्डे,आडूळपेठ,आडूळ
गावठाण, येरफळे, चोपडी,त्रिपुडी,मुळगाव, लुगडेवाडी येरफळे, काळोली, बनपेठवाडी, तामकडे,
येराड, शिरळ,नेरळे, जोतिबाचीवाडी, तळीये पश्चिम,कराटे, डोणीचावाडा वांझोळे, गुंजाळी,
चाफळ, कोळेकरवाडी, शिंदेवाडी, आंब्रुळे, तारळे, धनगरवाडी तारळे, काटेवाडी तारळे, काढोली,
जमदाडवाडी, लेंढोरी,काढणे, आंब्रग, आवर्डे, मंद्रुळकोळे, काळगाव, चोरगेवाडी
काळगाव, चौगुलेवाडी काळगाव,भरेवाडी काळगाव, मुठ्ठलवाडी काळगाव, धामणी,मोरेवाडी
सुर्वेवाडी, कसणी, निनाईचीवाडी,सतिचीवाडी कसणी, निगडे, मोडकवाडी जिंती, कोकीसरे,
हुंबरणे,आंबेघर तर्फ मरळी, बाहे, महिंद,जानुगडेवाडी, माथणेवाडी, गमेवाडी,
मसुगडेवाडी दाढोली, तावरेवाडी पाडळोशी, पाडळोशी,मसुगडेवाडी पाडळोशी,ढेबेवाडी,
वाघळवाडी ढोरोशी, चिंचेवाडी वजरोशी, वाझोली, म्हावशी, गुजरवाडी
म्हावशी,पेठशिवापूर,नहिंबे चिरंबे,दिक्षी, शिद्रुकवाडी,पाचगणी इनामवाडी,किसरुळे
भराडवाडी, कोंढावळे चाफयाचा खडक,चाफेर,मेंढेघर कदमवाडी,सलतेवाडी बिबी,बिबी,तामिणे
बौध्दवस्ती, तामिणे मानेवस्ती अशा एकूण 86 कामांचा समावेश असून याकरीता अंदाजे 0३ ते
०३.५० कोटी रुपयांचा निधी होण्याची मागणी पाणी पुरवठा विभागाने शासनाच्या पाणी
पुरवठा विभागाकडे केली आहे.
चौकट:- शंभूराजेंचे प्रस्ताव आले आहेत, त्यास निधी
दया मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश.
दि.१३ ऑगस्ट रोजीच्या
मंत्रीमंडळाच्या मिटींगमध्ये पाणी पुरवठा मंत्री ना.लोणीकर यांनी पुरपरिस्थितीत
नुकसान झालेल्या कामांसंदर्भात चर्चा करताना पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी
पाण्याचे योजनांच्या पुर्नंबांधणीचे प्रस्ताव पहिले पाठविले आहेत त्यास मान्यता
देणे गरजेचे बाब राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून
दिल्यानंतर पाटणच्या योजनांना तात्काळ मान्यता दया असे आदेश मंत्री मंडळाच्या
बैठकीतच दिले.
No comments:
Post a Comment