दौलतनगर दि.2१:-मी
कोणत्या पक्षातून येणारी विधानसभेची निवडणूक लढणार याची सत्यजितसिंह पाटणकरांनी
काळजी करण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपण ज्या पक्षातून विधानसभेची निवडणूक
लढविण्यास गुडघ्याला बांशिग बांधून उताविळ झाला आहात त्या पक्षाची विधानसभा
निवडणूकीपर्यंत काय अवस्था असेल ? याची काळजी करावी. असा खरमरीत टोला आमदार
शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना
लगाविला आहे.
वृत्तपत्राच्या
प्रतिनिधींशी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,संपूर्ण पाटण
मतदारसंघ महापुराच्या वेढ्यात असताना
स्वतःला पाटण विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार समजणारे पाटणपुरते युवा नेते असणारे
सत्यजितसिंह पाटणकरांना मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याची काळजी लागून
राहिली आहे. परंतू मला त्यांना सांगावेसे वाटते,मी कोणत्या पक्षातून विधानसभेची
निवडणूक लढणार आहे हे पाटण मतदारसंघातील जनतेला चांगलेच माहिती आहे.तुम्ही त्याची
काळजी करण्यापेक्षा तुम्ही ज्या पक्षातून विधानसभा निवडणूक लढविणार आहात त्या
पक्षाची पहिल्यांदा काळजी करा.कारण विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र राज्याची आहे आणि
सध्या महाराष्ट्र राज्यातील आपल्या पक्षाचे विधानसभेचे असणारे अनेक उमेदवार हे
तुमच्या पक्षाला रामराम करुन कोण शिवसेनेत तर कोण भाजपमध्ये डेरेदाखल होत
आहेत.त्यामुळे तुमच्या पक्षाची विधानसभा निवडणूकी पर्यंत महाराष्ट्रात काय अवस्था
असेल याची भिती तुमच्या पक्षप्रमुखांनाच लागून राहीली आहे. राज्यातील तुमच्या
पक्षाकडे लक्ष देण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपल्या सातारा जिल्हयातीलच त्यांच्या
पक्षाची परिस्थिती पहावी की पक्षाला जिल्हयात कशी गळती लागली आहे ते. मतदारसंघातील
जनतेने पाटणचे युवा नेते या पुरपरिस्थितीत कुठे दिसले नाहीत ते आहेत तरी कुठे याची
माहिती घेतली असता युवा नेते परदेशात मजा मारीत आहेत हे समजल्यानंतर जनतेनेच
याबाबत आपणाला जाब विचारला असता आपण फॅक्टरीच्या कामासाठी गेल्याचा निर्वाळा देऊन
परदेशवारीचे प्रकरण सोपस्कर दडपण्याचा प्रयत्न केला असला तरी अशा कोणत्या फॅक्टरीसाठी
आपण परदेशात गेला होता.तेथीलही आम्ही माहिती घेतली असता त्या देशात ऊसापासून साखर
उत्पादन न करता बिटापासून साखर तयार केली जाते. हे जनतेच्याही लक्षात आले आहे.
सत्यजितसिंह पाटणकरांचा २० वर्ष
येत असलेला साखर प्रकल्प त्यांचा त्यांनाच लखलाभ कारण या प्रकल्पातून ते
शेतकऱ्यांना काय देणार आहेत हे मतदारसंघातील शेतकऱ्यांचेही लक्षात आले आहे. 20
वर्षापासून आम्ही साखर कारखाना काढणार,साखर कारखाना काढणार म्हणून
विधानसभेच्या,कारखान्याच्या,जिल्हा परीषदेच्या निवडणूका पाटणकरांनी लढविल्या आता
तर विधानसभा दोन महिन्यावर येवून ठेपली आहे. साखर कारखान्याचे गाजर यंदाच्याही
निवडणूकीपुर्वी पाटणकरांनी दाखविले असले तरी ज्या प्रकल्पाचे भूमिपुजन करुन दोन
महिने उलटले त्याची साधी वीट कुठे उभी राहल्याची जनतेला दिसत नाही.20 वर्षापासून
ज्या कोयना शुगरचे आपण गोडवे गात आहात त्याचा अभ्यास 20 वर्षानंतर करण्याची आपणांस
का गरज भासली? आपण प्रकल्पाच्या अभ्यासाकरीता मतदारसंघ पुरात अडकलेला असताना परदेशात
गेला होता तिथे नेमके कोणत्या कंपनीचा,कुठल्या फॅक्टरी उत्पादनाचा आपण अभ्यास केला
हे जरा मतदारसंघातील जनतेसमोर सांगितले तर बरे होईल. पुरपरिस्थितीत आणि महापुरात
किती नुकसान झाले याची पहाणी करण्याचे सत्यजितसिंहाचे नाटक हा केवळ जनतेच्या
काळजीचा बेगडीपणा आहे.दुसरे काहीही नाही कारण पहाणी करुन जनतेला मदत करण्यासाठी
त्यांच्या हातात काहीही नाही आणि पाटणकर महाशय आता कसली पहाणी करताय अतिवृष्टी, महापुरात
नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना नुकसानीची मदत आणि पुर्नंबांधणी करण्याचे आदेश
ज्यांच्या हातात सत्ता आहे असे राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री यांनी
तुम्ही परदेशातून येण्याअगोदरच दिले आहेत त्यावर कार्यवाही सुरु झाली आहे.त्यामुळे
अशा परिस्थितीत स्वत:ची निष्क्रीयता लपविण्याकरीता सत्यजितसिंहांचा सुरु असलेला
बालिशपणा हा जनतेने पुर्णपणे ओळखला आहे.
चौकट:- आम्ही
किती मदत दिल्याचे आकडे तपासण्यापेक्षा तुम्ही काय दिले हे जनतेला सांगा.
मतदारसंघाचा
आमदार म्हणून मतदारसंघातील पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना मी किती व कशी मदत
दिली याचे आकडे दुर्भिण लावून तपासण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर आपण दानशुरपणा
दाखवून मतदारसंघातील पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना किती मदत दिली त्याची
आकडेवारी जाहीर करा असा सल्लाही आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंहाना दिला आहे.
यांच्याकडे लक्ष न दिलेलच बरे कारण यांच्या तिकीटाचाच पत्ता नाही
ReplyDeleteKarun tari kay karanar fakt bolvachanach
ReplyDeleteशुगर फाॅक्टरीची गुजरातवरून आणलेली जुनी मशणरी सुरूलच्या माळावर मायभूमीच्या आवारात पाटण चा पाऊस आणुभवते आहे
ReplyDelete