Sunday 18 August 2019

देशाचे रक्षण करणाऱ्या फौजींचा सन्मान लोकप्रतिनिधीपेक्षा मोठा- आमदार शंभूराज देसाई. नायब सुभेदार शशिकांत शेजवळ (फौजी) यांचा आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते सत्कार.




           दौलतनगर दि.१८:- लष्करामध्ये भरती होवून फौजी,जवान आपले सारे घरदार,शेजार पाजार, नातेवाईक व मित्रपरीवार यांना सोडून प्रामाणिकपणे सिमेवर आपले कर्तव्य बजावत देशाचे रक्षण करत असतात.सच्चा हिंदूस्थानी म्हणून आपण सर्वजण देशाचे रक्षण करणाऱ्या फौजी तसेच जवांनाकडे पहात असतो.गावांकडे सामाजिक,राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यापेक्षा तसेच माझेसारखे मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीपेक्षा लष्करातील फौजी व जवान यांचा सन्मान मोठा आहे. देशाचे रक्षण करणारे फौजी व जवान आपले सर्वांचे आदर्श असतात असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
           सुळेवाडी ता.पाटण येथील शशिकांत शेजवळ (फौजी) यांना नायब सुभेदार या पदावर बढती मिळालेबद्दल सुळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजीत करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी अशोक शेजवळ,सी.टी.पाटील,दिनकर शेजवळ,महादेव पाटील,एन.डी.पानस्कर,सुभाष महाडिक,राजाराम शेजवळ, लखन पाटील,विष्णू पाटील,विठ्ठल तिकुडवे, प्रकाश शेजवळ, बाबूराज शेजवळ या प्रमुख पदाधिकाऱ्यासंह सुळेवाडी,सोनवडे, हुंबरवाडी व शिंदेवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
              यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील सुळेवाडी गावाचा शशिकांत शेजवळ (फौजी) गरीब कुटुंबातील युवक लष्करात भरती होवून त्यांना नायब सुभेदार पदावर बढती मिळाली आहे ही बाब आपल्या सर्वांकरीता अभिमानास्पद आणि गौरवास्पद असून पाटण तालुक्याची मान अभिमानाने उंचावणारी आहे मी प्रथमत: त्यांना बढती मिळालेबद्दल त्यांचे मनपुर्वक अभिनंदन करतो. जवानांचं जीवन किती खडतर असतं व त्यांना सीमेवर अतिरेक्यांचा कसा सामना करावा लागतो हे मी प्रत्यक्ष जम्मु काश्मीरला गेल्यानंतर पाहिले आहे.आपल्या गांवाकडील,भागातील,तालुक्यातील आणि देशातील लोक सुरक्षित रहावे याकरीता हे फौजी आणि जवान सिमेवर जिवाची बाजी लावत वेळप्रसंगी लढा देत आपले सर्वांचे सरंक्षण करीत असतात.सिमेवर जवान प्रमाणिकपणे लढा देत आहेत म्हणूनच आपण याठिकाणी सुरक्षित आहोत हे आपण विसरुन चालणार नाही.त्यामुळे जवानांना मानसिक बळ देण्याकरीता त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनात आदर असला पाहिजे असे सांगत त्यांनी कारगिलच्या युध्दात शहीद झालेले आपल्या तालुक्यातील भूडकेवाडी गावचे शहीद जवान कै.गजानन मोरे यांच्या २७ ऑगस्टच्या स्मृतीदिनी मी प्रत्येक वर्षी नियमित खंड न पडता अभिवादन करण्यासाठी जात असतो. त्यांच्या वडीलांचे दु:खद निधन झाले असून त्यांच्या मातोश्री श्रीमती चतूराबाई यांना कोणतीही अडचण आल्यानंतर मी स्वत: धावून जातो मी या तालुक्याचा आमदार आहे या अविर्भावात मी कधी रहात नाही.कारण फौजी, जवान किंवा त्यांचे कुटुंब यांचेमुळे आपण सुरक्षित आहोत ही भावना मनी बाळगण्याची सर्वांनी गरज आहे. आपल्या सर्वांपेक्षा त्यांचा मानसन्मान मोठा आहे असे सांगत त्यांनी शशिकांत शेजवळ (फौजी) यांना नायब सुभेदार म्हणून बढती मिळाली असून ते सुभेदार म्हणून या सेवेत सवेानिवृत्त व्हावे व सुभेदार म्हणून त्यांचा सत्कार व सन्मान करण्याची संधी मला मिळावी अशाही शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.तसेच पाटण मतदारसंघात पुरग्रस्तांना, अतिवृष्टीबाधितांना मदत वाटण्याचे कामांची गडबड सुरु असताना मतदारसंघात दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमांना वेळ न देता पुरग्रस्तांना,अतिवृष्टीबाधितांना प्राधान्याने मदत कशाप्रकारे पोहचविता येईल याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले असल्याचे सांगत शशिकांत शेजवळ (फौजी) यांना नायब सुभेदार पदावर बढती मिळालेबद्दल त्यांचा सत्काराचा एकमेव कार्यक्रम आपण स्विकारला असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.
              यावेळी शशिकांत शेजवळ (फौजी) यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन तरुणांनी चांगल्या संगतीमध्ये राहून आपले भविष्य घडवावे व आपले जीवन देशाच्या हिताच्या कामांकरीता मार्गी लागावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.


No comments:

Post a Comment