Thursday, 14 November 2019

नेहरु गार्डन येथे नेहरु जयंती व बालदिन उत्साहात साजरा आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातुन कोयनानगरचे रुपडे पालटले. बालदिनाला सर्व शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती.





            दौलतनगर दि.१4:- दि.१४ नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती संपुर्ण देशामध्ये बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. पाटण तालुक्यातील कोयना धरणास देशाचे पंतप्रधान पंडीतजी नेहरु यांनी भेट दिली होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे नावाने याठिकाणी गार्डनही तयार करण्यात आले असून या नेहरु गार्डनमध्ये आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून तालुकास्तरीय पंडीत जवाहरलाल नेहरु यांची 130 वी जयंती व या जंयतीच्या निमित्ताने बालदिनाचा कार्यक्रम तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. आमदार शंभूराज देसाई व शासनाचे सर्व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व विभागातील प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडीतील लहान मुलांच्या समवेत हा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
            प्रांरभी आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयास व देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त नेहरु उद्यानातील पंडीत नेहरू यांच्या अर्धाकृती पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले त्यांनतर आमदार शंभूराज देसाई व तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान मुलांच्या समवेत आकाशात फुगे सोडून बालदिनही साजरा करण्यात आला बालदिनाच्या निमित्ताने आमदार शंभूराज देसाई यांच्या वतीने या विभागातील प्राथमिक शाळेतील तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना शालेय साहित्य म्हणून वहयाचे,बॉलपेनचे व खावू वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्या समवेत पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रवींद्र माने, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, कोयनानगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बावीकट्टे,शिवसेना जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, पंचायत समिती माजी सदस्य हरीष भोमकर,धोंडीराम भोमकर, निजाम जमाते, गणपतभाई कदम,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
            याप्रसंगी प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी पंडीत नेहरु यांच्या जंयतीनिमित्त नेहरु यांना विनम्र अभिवादन करुन उपस्थित बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती संपुर्ण देशामध्ये बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जयंती कार्यक्रम व या जंयतीच्या निमित्ताने बालदिनाचा कार्यक्रम हा तालुका प्रशासनाच्या वतीने पाटण तालुक्यातील कोयना धरणास देशाचे पंतप्रधान पंडीतजी नेहरु यांनी भेट दिली होती त्याठिकाणी आपण गत दोन वर्षापासून साजरा करीत आहे.आज आयोजीत केलेला कार्यक्रम प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांच्या समन्वयातून तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय निटनेटका आयोजीत करण्यात आला आहे.कोयनानगर येथे देशाचे पहिले पंतप्रधान पंडीतजी नेहरु यांनी भेट दिल्यानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ याठिकाणी नेहरु उद्यान उभे करण्यात यावे याकरीता जी.आर.देसाई यांनी वेळप्रसंगी उपोषणही केले होते.आज याठिकाणी उभारण्यात आलेल्या नेहरु गार्डनचे रुपडे पालटण्याचा आपण प्रयत्न केला असून कोयनानगर व कोयनानगरचा 10 किमीचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्याकरीता कोयना पर्यटनाचा आराखडा युतीच्या शासनाकडे सादर केला होता त्या आराखडयातील बहुतांशी कामांना युतीच्या शासनाने विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे कोयना पर्यटनाच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.दोन वर्षापुर्वी नेहरु जयंतीच्या दिवशीच कोयना पर्यटनाच्या माध्यमातून कोयनानगर व कोयनानगरचा परिसर विकसीत करण्याचा शब्द मी दिला होता शब्द देवून मी थांबलो नाहीतर  कोयना पर्यटनाच्या माध्यमातून या विभागाचे रुपडे पालटण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचे सांगून कोयना नेहरु गार्डनमध्ये अजुनही काही नवीन करण्याकरीताचा प्रयत्न माझा राहील असेही यावेळी आमदार शंभूराज देसाई म्हणाले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थितांचे स्वागत कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आभार तहसिलदार रवींद्र माने यांनी मानले.

Wednesday, 13 November 2019

उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त दि.17 नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन . पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता वहया आणण्याचे आवाहन.




दौलतनगर दि.१३ :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार,महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा 53 वा वाढदिवस रविवार दि.17 नोव्हेंबर,2019 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे मोठया दिमाखात साजरा होत असल्याची  माहिती आमदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचेकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली असून वाढदिवसानिमित्त आमदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा देण्याकरीता येणाऱ्या हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  पुष्पहार अथवा हारतुरे न आणता तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना वाढदिवसाची भेट देण्याकरीता वहया तसेच शालेय वस्तू आणाव्यात असे आवाहनही  नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
                                  पत्रकांत म्हंटले आहे की,उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा 53 वा वाढदिवस रविवार दि.17 नोव्हेंबर,2019 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे मोठया दिमाखात साजरा होत असून या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर येथे करण्यात आला आहे .सकाळी 09.00 वा.त्यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर सकाळी 09.00 ते 11.00 पर्यंत ते कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी  येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन स्विकारणार आहेत.त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई ( ताईसाहेब ) यांच्या पुतळा,स्व.शिवाजीराव देसाई ( आबासाहेब  ) यांची समाधी व पुर्णाकृती  पुतळयास व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र अभिवादन असे धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.त्यानंतर हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन व पुण्यस्मरण दिनानिमित्त गरीब कुटुंबातील महिलांना संसारपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.शिवदैालत बँकेच्या विस्तारीत कक्षाचे 16 व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहणार आहेत त्यानंतर त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर या परिसरातील प्राथमिक शाळेतील तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊवाटप व शालेय साहित्यांचे वाटप करुन लहान मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्याचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.त्यानंतर स.11.00 पासून दुपारी 04.00 वाजेपर्यंत आमदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते, हितचिंतक व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत.दुपारी 04.00 वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठया मताधिक्क्याने आमदार शंभूराज देसाईंना निवडून देवून विजयाची हॅक्ट्रीक साधल्याबद्दल “ आमदार हॅट्रीक ”  विजयी महासभा पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने आयोजीत केली आहे. या विजयी महासभेला संबोधित करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 07.30 वा.आतिष बाजी व रात्री 09.00 वा. श्री.गणेश सांस्कृतिक मंडळ ,दौलतनगर यांचेवतीने आयोजित    “ करते तुम्हा मुजरा ”  हा मराठी लावण्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.आमदार शंभूराज देसाई हे या दिवशी दिवसभर शुभेच्छा स्विकारण्यासाठी दौलतनगर ता.पाटण येथे उपस्थित राहणार आहेत,याची हितचिंतकांनी नोंद घ्यावी तसेच शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे,पुष्पगुच्छ व पुष्पहार न आणता शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पेन,वहया इ.शालेय साहित्य आणावे असे आवाहन मान्यवर मंडळीसह तालुक्यातील पदाधिकारी, हितचिंतक,कार्यकर्ते यांना करण्यात येत असून पाटण मतदारसंघातील आम जनतेने कारखान्याचे सभासद, हितचिंतक, कार्येकर्ते  यांनी आपल्या मतदार संघाचे लाडके आमदार शंभूराज देसाई यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त व आयोजित  “ आमदार हॅट्रीक  ”  विजयी महासभेला बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही आमदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्या वतीने पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

Tuesday, 12 November 2019

कोयना पर्यटनातील उर्वरीत विकासकामे करण्याकरीता तिसऱ्या टप्प्यात ०३ कोटींचा निधी मंजुर. निधी मान्यतेचा ११ सप्टेंबरला शासन निर्णय पारित.- आतापर्यंत तीन टप्प्यामध्ये ०७ कोटी ५५ लक्ष रुपयांचा निधी मंजुर आमदार शंभूराज देसाईंची माहिती




दौलतनगर दि.१2:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता कोयना पर्यटनाचा संपुर्ण आराखडा शासनाकडे मान्यतेकरीता सादर केला होता त्यानुसार कोयना पर्यटनाच्या कामांस शासनाने प्रत्यक्षात सुरुवात करुन पहिल्या टप्प्यात ०२ कोटी ५० लाख, दुसऱ्या टप्प्यात ०२ कोटी ०५ लाख व आता तिसऱ्या टप्प्यांमध्ये कोयनानगर येथे वॉटर पार्ककरीता ०१ कोटी,ओझर्डे धबधबा सुशोभिकरण ०१.५० कोटी व अंबाखेळती देवी मंदीर बोपोली येथील परिसर सुशोभिकरण ५० लक्ष या तीन कामांकरीता ०३ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून ०३ कोटी रुपयांच्या निधीचा  शासन निर्णय दि.११ सप्टेंबर, २०१९ रोजी पारित करण्यात आला आहे.आतापर्यंत कोयना पर्यटनाच्या कामांना तीन टप्प्यामध्ये ०७ कोटी ५५ लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणण्यात मला यश मिळाले असल्याची माहिती कोयना पर्यटनाचा निधी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन मंजुर करुन आणणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                           आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे पाठपुरावा करुन जिल्हाधिकारी,सातारा यांच्यामार्फत या विभागातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता अंदाजपत्रक तयार करुन घेतले होते सदरचे अंदाजपत्रक हे सविस्तर प्रस्तावासह जिल्हाधिकारी,सातारा यांचेमार्फत राज्य शासनास सादर केले आहे. प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता संबधित विभागांना शासनाने निधी उपलब्ध करुन दयावा अशी माझी शासनाकडे आग्रही मागणी होती.राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन हे कोयना दौऱ्यावर आले तेव्हाही या पर्यटनाच्या निधीसंदर्भात त्यांचेकडे मागणी केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात जलसंपदा विभागाकडून या विभागाचे कोयना सिंचन विभाग,कोयनानगर यांचेमार्फत कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता एकूण आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला.तसेच दुसऱ्या टप्प्यात पर्यटनाच्या दृष्टीने आराखडयात सुचविलेल्या कोयनानगर येथील अस्तित्वात असणाऱ्या नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण,कोयनानगर येथील धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण व नुतनीकरण,कोयना धरण व्यवस्थापनाचे जीर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नुतनीकरण,कोयनानगर येथे पर्यटकांना बसण्याकरीता ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था व कोयना धरणातील जलाशयामध्ये बोटिंगची व्यवस्था या कामां करीता एकूण २ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे मंजुर करुन तो कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता यांचेकडे वर्गही करण्यात आला. कोयना पर्यटनातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामांना प्रत्यक्षात कोयना विभागात सुरुवात देखील झाली असून आता तिसऱ्या टप्प्यांमध्ये कोयनानगर येथे वॉटर पार्क उभारण्याकरीता ०१ कोटी, ओझर्डे धबधबा सुशोभिकरण ०१.५० कोटी व अंबाखेळती देवी मंदीर बोपोली येथील परिसर सुशोभिकरण ५० लक्ष असे एकूण तिसऱ्या टप्प्यात एकूण ०३.०० रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. शासनाकडे सादर केलेल्या कोयना पर्यटनाच्या आराखडयातील बहूतांशी कामांना राज्य शासनाने जलसंपदा व पर्यटन विभाग यांच्यामार्फत आवश्यक असणारा निधी मंजुर करुन कोयना पर्यटनाला चालना देण्याचे काम केले आहे. या निधीमुळे कोयना पर्यटनाच्या कामांना गती मिळाली असून लवकरच या कोयनानगरचे आणि कोयनानगर परिसराचे रुपडे पालटणार असल्याचा आनंद होत आहे.सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचे जाहीर आभार व्यक्त करतो.
चौकट :- केवळ घोषणा नाही तर मी करुन दाखविले.- आमदार देसाई.
              कोयना पर्यटनाच्या आराखडयाला शासनाकडून मंजुरी मिळवून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ठिकाणांची तसेच महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती,दुरुस्ती करणेकरीता आवश्यक निधी कोयना पर्यटनाच्या माध्यमातून मंजुर करुन आणणार असे मी सांगितले होते.मी केवळ घोषणा करीत नाही तर त्याचा पाठपुरावा करुन मी जे जे ठरवतो ते ते करुन दाखवून देतो त्याचप्रमाणे कोयना पर्यटनाची नुसती घोषणा केली नाही तर यातील कामांना निधी मंजुर करुन आणला यातली बहूतांशी कामे सुरु असल्याने जे बोललो ते मी करुन दाखविले. असेही आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

Sunday, 10 November 2019

दि.१४ रोजी नेहरु गार्डन येथे तालुका प्रशासनाच्या वतीने नेहरू जयंती व बालदिनाचे आयोजन. आमदार शंभूराज देसाई यांचेसह तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती.






दौलतनगर दि.११ :- गुरुवार दि.१४ नोव्हेंबर,२०१९ रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची 1३० वी जयंती असून या जयंतीनिमित्ताने संपुर्ण देशामध्ये बालदिन साजरा करण्यात येतो. पाटण तालुक्यातील कोयना धरणास देशाचे स्व.पंतप्रधान पंडीतजी नेहरु यांनी भेट दिली होती.त्यांचे नावाने याठिकाणी गार्डनही तयार करण्यात आले असून या नेहरु गार्डनमध्ये आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून दोन वर्षापासून तालुकास्तरीय नेहरु जयंती व या जंयतीच्या निमित्ताने बालदिनाचा कार्यक्रम तालुका प्रशासनाच्या वतीने नेहरु गार्डन,कोयनानगर येथे सकाळी 09.30 वाजता आयोजीत केला असून आमदार शंभूराज देसाई यांचेसह तालुकास्तरीय सर्व अधिकारी हे प्रमुख उपस्थित राहून या विभागातील लहान मुलांसह बालदिन साजरा करण्यात येणार आहे.
            मागील दोन वर्षापासून गुरुवार दि.१४ नोव्हेंबरचा बालदिन कार्यक्रम तालुका प्रशासनाच्या वतीने साजरा करणेसंदर्भात पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी यांना सुचित केले असून या सर्व कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रांताधिकारी श्रीरंग तांबे याचे सर्व नियोजन देण्यात आले आहे.प्रांताधिकारी यांनी सर्व संबधित शासकीय अधिकारी यांची बैठक घेवून आमदार शंभूराज देसाईंचे सुचनेवरुन दि.१४ नोव्हेंबरच्या बालदिनाच्या कार्यक्रमाचे पुर्ण नियोजन करण्यात आले आहे.दि.14 रोजीचे नेहरु जयंती व या निमित्ताने बालदिनाचा कार्यक्रम मोठया प्रमाणांत साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून हा तालुकास्तरीय कार्यक्रम होत असून गत दोन वर्षापासून देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांना जयंती सोहळयानिमित्त विनम्र अभिवादन व या निमित्ताने बालदिनाचा तालुकास्तरीय कार्यक्रम हा स्व. पंडीतजी नेहरु यांनी कोयनानगरला कोयना धरणास भेट दिली होती त्याठिकाणी साजरा करण्याचे ठरविल्यानुसार हा कार्यक्रम याठिकाणी प्रतिवर्षी होत आहे. यंदाच्या वर्षीही हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या दिवशी प्रथमत: तालुकयाचे आमदार शंभूराज देसाई व तालुका प्रशासनाच्या वतीने पंडीतजी नेहरु यांच्या १३० जयंतीनिमित्त पंडीतजी नेहरु यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन जयंती कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून आमदार शंभूराज देसाई यांच्या वतीने या विभागातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील बालकांना शालेय साहित्य म्हणून वहयाचे वाटप तसेच खावू वाटप करण्यात येणार आहे.पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु व बालदिनाच्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे तालुका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Friday, 8 November 2019

आमदार शंभूराज देसाईंना मिळालेली विजयाची हॅट्रीक साजरी करण्याकरीता दि.१७ रोजी दौलतनगरला विजयी महासभेचे आयोजन. विजयी महासभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.



                


दौलतनगर दि.०८ :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांना पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने विधानसभा निवडणूकीत मिळवून दिलेल्या विजयाच्या हॅट्रीकचा विजयोत्सव रविवार दि.१७ नोव्हेंबर,२०१९ रोजी दौलतनगर ता.पाटण येथे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी महासभेने साजरा करण्याचे नियोजन पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने करण्यात आले असून या विजयी महासभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार शंभूराज देसाई “आमदार हॅट्रीक ” विजयी महासभेचे संयोजक यांच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                              संयोजकांनी प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हंटले आहे, पाटण विधानसभेचे लोकप्रिय आणि महाराष्ट्र विधानसभेतील पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटू आमदार म्हणून गौरविण्यात आलेले आमदार शंभूराज देसाई यांना पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने मोठया विश्वासाने आणि मोठया मताधिक्क्याने महाराष्ट्र विधानसभेत जाण्याची तीनवेळा संधी देवून पाटण मतदारसंघातील जनतेने आमदार शंभूराज देसाईंच्या विजयाची हॅट्रीक साधली आहे. या विजयाची हॅट्रीक विजयी महासभेने आमदार शंभूराज देसाईंच्या जन्म आणि कर्मभूमित मोठया उत्साहाने आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्याचे नियोजन आमदार शंभूराज देसाईंच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दि.१७ नोव्हेंबर,२०१९ रोजी दुपारी ०४.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथे करण्यात आले आहे.या विजयी महासभेला आमदार शंभूराज देसाई प्रमुख उपस्थित राहून पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या बरोबरीने आमदार हॅट्रीकचा विजयोत्सव साजरा करुन जनतेला संबोधित करणार आहेत. या विजयी महासभेला व आपल्या लाडक्या नेत्याला शुभार्शिवाद देणेकरीता पाटण मतदारसंघातील तमाम जनतेने मोठया संख्येने उपस्थित राहून या विजयोत्सव सोहळयाचे साक्षीदार व्हावे अशी आग्रहाची विनंती व आवाहन आमदार शंभूराज देसाई “आमदार हॅट्रीक ” विजयी महासभेचे संयोजक यांनी केले आहे.

Thursday, 7 November 2019

आता पावसाळा संपलाय, मंजुर कामे तात्काळ सुरु करा. आमदार शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.




दौलतनगर दि.०७ :- यंदाच्या वर्षी मोठया प्रमाणात पावसाळा असल्याने मंजुर झालेली विकासकामे करण्याकरीता संबधित यंत्रणांना अडचणी येत होत्या. आता पावसाळा संपलाय, मोठया पावसाची शक्यता कमी आहे त्यामुळे सार्वजनीक बांधकाम, जिल्हा परीषद बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाकडे मंजुर असणारी अनेक विकासकामे पावसाच्या कारणाने रेंगाळली आहेत ही रेंगाळलेली कामे तात्काळ सुरु करा. अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना देवून बहूतांशी विकासकामे ही बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाकडेच असल्यामुळे कार्यभारात सुधारणा करा कुठल्याही अधिकाऱ्याची चालढकल आता चालणार नाही असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
                                  पाटण तहसिल कार्यालयातील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहामध्ये आमदार शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली सन २०१८-२०१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाच्या विविध योजनांमधून मंजुर करुन आणलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेणेकरीता बैठक आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी वरीलप्रमाणे आमदार शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना सुचना केल्या. यावेळी बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रवींद्र माने,सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय पाटील,अजित पाटील,जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे भंडारी,पाणी पुरवठा विभागाचे खाबडे,तालुका कृषी अधिकारी अविनाश मोरे,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता गायकवाड, जलसंधारण विभागाचे उपअभियंता पदमाळे,एमएसईबीचे उपअभियंता कांबळे यांच्यासह तालुकास्तरीय सर्व विभागांचे अधिकारी, सहाय्यक अधिकारी,शाखा अभियंता यांची प्रमुख उपस्थिती होती.
                                याप्रसंगी प्रारंभी आमदार शंभूराज देसाईंनी सार्वजनीक बांधकाम, जिल्हा परीषद बांधकाम व पाणी पुरवठा विभागातील या दोन आर्थिक वर्षात मंजुर झालेल्या कामांचा आढावा घेतला. मोठया प्रमाणात बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाकडे विविध योजनांमधून विविध विकासकामे मंजुर आहेत. या दोन्ही विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून पावसाळयामध्ये प्रशासकीय मान्यता, निविदा प्रसिध्दी, कार्यारंभ आदेश  ही तांत्रिक कामे मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे या दोन्ही विभागाकडील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ही तांत्रिक कामे बऱ्याच प्रमाणात मार्गी लावली आहेत. आता निवडणूकाही झाल्या आहेत आणि पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे पावसाची आणि निवडणूकीची सबब आता चालणार नाही या तिन्ही विभागांना आठ दिवसाचा कालावधी देण्यात येत आहे.या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्या त्यांच्या विभागाकडे मंजुर असणारी कामे लवकरात लवकर सुरु करण्याचे नियोजन या अधिकाऱ्यांनी करावे आठ दिवसानंतर कोणतेही कारण एैकून घेतले जाणार नाही जनतेच्या हितासाठी जी कामे मंजुर करुन आणली आहेत ती वेळेत पुर्ण करण्याची जबाबदारी जशी ठेकेदाराची आहे तशीच जबाबदारी अधिकाऱ्यांची ही आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनीच चालढकल करु नये. येत्या आठ दिवसात पुनश्च: या तिन्ही विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला जाईल असे सांगून आमदार शंभूराज देसाईंनी जलसंधारण,एमएसईबी,कृष्णा खोरे विकास महामंडळ,कृषी विभाग  या विभागाकडील कामांचा आढावा घेतला.त्याचबरोबर माहे ऑक्टोंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याच्या दृष्टीने कोणीही शेतकरी पंचनाम्यापासून वंचीत राहणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेतलीच आहे परंतू झालेले पंचनामे लवकरात लवकर शासनाकडे मदतीकरीता सादर करावेत अशा सुचना प्रांताधिकारी,तहसिलदार व कृषी अधिकारी यांना आमदार शंभूराज देसाईंनी दिल्या. तसेच अतिवृष्टीमध्ये डोंगराखाली वसलेल्या गांवाना, वाडयांना नैसर्गिक आपत्ती निवारणामधून ९ गांवामध्ये तात्पुरते निवारा शेड उभारण्याची कामे मंजुर केली आहेत. सदरच्या ०९ गांवामध्ये व वाडयामध्ये या कामांना सुरुवात करण्यात आली आहे मात्र या कामांना गती नाही त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामांना गती दयावी त्याचबरोबर एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी तालुका विकास आराखडयातंर्गत विद्युत विकासाची कामे करण्याकरीता आणलेल्या निधीचे पहिल्या टप्प्यांचे ०५.५० कोटी रुपयांची निविदा प्रसिध्द होवून कार्यारंभ आदेशही दिला आहे ती कामे लवकर सुरु करावित असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले. उपस्थितांचे स्वागत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले व आभार तहसिलदार रवींद्र माने यांनी मानले.
चौकट:- प्रतिक्षालय इमारतीच्या नुतनीकरणाकरीता निधी मंजुर करु.- आमदार देसाई.
             सन २००४ ते २००९ या कालावधीत शासकीय बैठका तसेच तहसिल कार्यालयात येणाऱ्या पाटण तालुक्यातील नागरिकांकरीता बसण्याचे ठिकाण म्हणून आपण ही प्रतिक्षालय इमारत बांधली आहे. इमारत बांधून बरीच वर्षे झाली या प्रतिक्षालयाचे नुतनीकरण करणे आवश्यक असून बांधकाम विभागाने नुतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करावे त्यास निधी मंजुर करु असेही आमदार शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.

पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व पुलांच्या पुर्नंबांधणीकरीता ५ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई




दौलतनगर दि.०७ :- पाटण तालुक्यात माहे जुलै, ऑगस्टमध्ये मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे ग्रामीण तसेच इतर जिल्हा मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांचे तसेच पुलांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसान झालेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांची पुर्नंबांधणी करणेकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी राज्याचे बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे केली होती त्यानुसार त्यांनी पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांच्या पुर्नंबांधणीकरीता ०५ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला असून सदरचा निधी या कामांना उपलब्धही करुन दिला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
                                आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या माहितीमध्ये पाटण तालुक्यातील खालील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना निधी उपलब्ध झाला आहे. चरेगाव चाफळ दाढोली रस्त्यावरील क्षतिग्रस्त कॉजवेच्या ठिकाणी नविन पुलाचे बांधकाम 70 लाख, चिपळूण कराड रस्ता किमी 74/600 ते 90/00 क्षतिग्रस्त पुलाची व पोहोच रस्त्याची दुरुस्ती ३० लाख, तसेच या रस्त्यावर किमी 74/600 ते 90/00 या लांबीमध्ये अतिवृष्टीमुळे व पुरामुळे खचलेल्या व खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती २५ लाख, तारळे पाटण रस्त्यावरील किमी 7/740 ते 39/200 खचलेल्या रस्त्याची पुर्नस्थापना २५ लाख, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता किमी 0/00 ते 38/00 मध्ये खचलेल्या रस्त्याची पुर्नस्थापना ८० लाख, मल्हारपेठ पंढरपूर रस्ता किमी 0/00 ते 11/850,नागठाणे तारळे पाटण रस्ता किमी 7/740 ते 39/200 व पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता प्रजिमा 57 किमी 0/00 ते 38/00 अतिवृष्टीमुळे रस्त्यावर कोसळलेल्या दरडी काढणे १२ लाख,नवजा हेळवाक मोरगिरी साजूर रस्ता किमी 18/00 ते 62/500 मध्ये रस्त्याच्या भरावाची पुर्नस्थापना ६ लाख, ढेबेवाडी सणबूर महिंद नाटोशी मोरगिरी संगमनगर धक्का रस्ता किमी 25/200 ते 42/500 रस्त्याच्या भरावाची पुर्नस्थापना २५ लाख, नवजा हेळवाक मोरगिरी साजूर रस्ता किमी 18/00 ते 44/00 मध्ये क्षतिग्रस्त झालेल्या मोऱ्यांची दुरुस्ती १६ लाख, तसेच याच रस्त्यावरील किमी  44/00 ते 62/500 मध्ये लहान पुलांचे व हेडवॉलचे बांधकाम करणे मोऱ्यांची पुर्नस्थापना ७६ लाख, नाडे सांगवड ढेबेवाडी रस्ता किमी 0/00 ते 20/700 मध्ये क्षतिग्रस्त झालेल्या मोरींची दुरुस्ती १० लाख,निसरे मारुल गुढे काळगाव भुरभुशी रस्ता किमी 0/00 ते 35/350 मध्ये क्षतिग्रस्त झालेल्या मोऱ्यांची दुरुस्ती १५ लाख, मानेवाडी कुंभारगाव गलमेवाडी येवती रस्ता किमी 0/00 ते 10/00 मध्ये मोऱ्यांची दुरुस्ती ५ लाख, नवजा हेळवाक मोरगिरी साजूर किमी 18/00 ते 44/00 मध्ये अतिवृष्टीमुळे रस्त्यावर कोसळलेल्या दरडी काढणे ४ लाख, ढेबेवाडी सणबूर महिंद नाटोशी मोरगिरी संगमनगर धक्का रस्ता प्रजिमा 55 किमी 25/200 ते 76/00 भाग 47/300 ते 51/300,55/400 ते 56/800 किमी 73/00 ते 76/00 मध्ये व मानेवाडी कुंभारगाव गलमेवाडी रस्ता किमी 0/00 ते 10/00 मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ५ लाख, नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा 58 किमी 0/00 ते 20/700 मध्ये कोसळलेल्या दरडी काढणे ७ लाख, ढाणकल जि.प.शाळा दुरुस्ती २.१९ लाख,दिक्षी जि.प.शाळा दुरुस्ती २.६१ लाख, मरड धनगरवाडा गावपोहोच रस्ता सुधारणा २० लाख, वाटोळे जरआवाड पाणवठा ते घाणबी रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख, कळंबे ते डफळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण २५ लाख, बोत्रेवाडी दऱ्यातील मोरेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, निवी ते निगडेवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण ७.५० लाख, मरळी चव्हाणडाग स्मशानभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख, तारळे जंगलवाडी फडतरवाडी रस्ता दुरुस्ती व संरक्षक भिंत १० लाख, मुरुड लोरेवाडी गावापोहोच रस्ता दुरुस्ती १० लाख, मरळी येथील निनाईमंदिर ते पाकाळरस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख असा एकूण ०५ कोटी २८ लाख ३० हजार रुपयांचा निधी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना मंजुर होवून तो उपलब्धही झाला आहे. लवकरच नुकसान झालेल्या कामांच्या पुर्नंबांधणीस सुरुवात करावी अशा सुचना सार्वजनीक बांधकाम व जिल्हा परीषद बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे ही आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.